Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3071

Shah Rukh Khan: विमानतळावरून बाहेर येणाऱ्या शाहरुख खानने चाहत्याचा फोन भिरकावला? पाहा व्हिडीओ…

0
Shah Rukh Khan: विमानतळावरून बाहेर येणाऱ्या शाहरुख खानने चाहत्याचा फोन भिरकावला? पाहा व्हिडीओ…

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेता शाहरुख खान मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. किंग खान जेव्हा काळ्या कपड्यात विमानतळामधून बाहेर पडत होता, तेव्हा त्याला चाहत्यांच्या गर्दीने घेरले होते. यावेळी गर्दीतील एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी फोन घेऊन पुढे आला. मात्र, शाहरुखने चाहत्याला हाताने मागे ढकलून, स्वतःजवळ येण्यापासून रोखले. यावेळी, पापाराझी शाहरुखच्या नावाने ओरडत होते. परंतु, अभिनेता काहीही उत्तर न देता त्याच्या गाडीच्या दिशेने गेला. आता लोकांना शाहरुखचे हे वागणे अजिबात आवडलेले नाही.

Source link

The Kerala Story: जीवे मारण्याची धमकी, मध्यरात्री सोडावं लागलेलं हॉटेल! ‘द केरळ स्टोरी’च्या शूटिंगमध्ये आलेली अनेक विघ्न

0
The Kerala Story: जीवे मारण्याची धमकी, मध्यरात्री सोडावं लागलेलं हॉटेल! ‘द केरळ स्टोरी’च्या शूटिंगमध्ये आलेली अनेक विघ्न

The Kerala Story shooting: सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काय काय अडचणींना तोंड द्यावे लागले, याचे किस्से सांगितले आहे.

Source link

Hema Malini- Dharmendra: धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी लग्नानंतर मिळून खरेदी केला होता आलिशान बंगला! पाहा झलक..

0
Hema Malini- Dharmendra: धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी लग्नानंतर मिळून खरेदी केला होता आलिशान बंगला! पाहा झलक..

घराच्या सर्व खोल्यांमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या आहेत, ज्यातून बाहेरचे सुंदर दृश्य दिसते. हेमा मालिनी यांनीही त्यांच्या घरात एक कुत्रा पाळला आहे, जो त्यांचा खूप लाडका आहे. हेमा मालिनी यांनी हे घर अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. याच घरात त्यांनी यांच्या दोन्ही मुली ईशा आणि आहाना यांचे लग्न लावले होते. हेमा मालिनी सध्या यूपीमधील मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. मथुरेच्या खासदार असल्याने, हेमा यांनी तिथेही एक घर विकत घेतले आहे. सध्या धर्मेंद्र त्यांचा बहुतांश वेळ त्यांच्या हिमाचल प्रदेशातील फार्महाऊसवर घालवतात. मात्र, तरीही वेळात वेळ काढून ते हेमा मालिनी यांना भेटायला त्यांच्या मुंबईतील बंगल्याला भेट देतात.

Source link

TMKOC Controversy: ‘तारक मेहता’वर निर्माते संतापले! शैलेश लोढा-असित मोदींमधील वाद चिघळला

0
TMKOC Controversy: ‘तारक मेहता’वर निर्माते संतापले! शैलेश लोढा-असित मोदींमधील वाद चिघळला

या विषयावर बोलताना तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘मला काही महिन्यांपूर्वी एक नोटीस मिळाली आहे. मी शैलेशला त्याचे पैसे देण्यास कधीही नकार दिलेला नाही. पण, प्रत्येक कंपनीचे काही नियम असतात. शो सोडल्यानंतर शैलेश यांनी काही औपचारिकता पूर्ण करणे बाकी आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हिशोब पूर्ण केला जाईल. यासाठी दररोज आमची टीम शैलेशला मेल आणि मेसेजद्वारे औपचारिकता पूर्ण करण्याची विनंती करते. पण कदाचित आता शैलेशलाच त्यात रस नाही असे वाटते.’

Source link

Movies Releasing This Week: ‘बलोच’ ते ‘द केरळ स्टोरी’; पाहा या आठवड्यात कोणते चित्रपट होणार रिलीज

0
Movies Releasing This Week: ‘बलोच’ ते ‘द केरळ स्टोरी’; पाहा या आठवड्यात कोणते चित्रपट होणार रिलीज

तेंडल्या

‘तेंडल्या’ या चित्रपटाची कथा ही खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांचं सचिन तेंडुलकरवर असणारं प्रेम आणि क्रिकेट याभोवती फिरणारी आहे. या चित्रपटाला पाच राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती करोना काळापूर्वी झाली होती. मात्र, करोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडलं होतं. ओंकार गायकवाड, स्वप्नील पाडळकर, राज कोळी, हर्षद केसरे, महेश जाधव, आकाश तिकोटी या कलाकारांची मुख्य भूमिका असलेला ‘तेंडल्या’ हा चित्रपट ५ मेला रिलीज होणार आहे.

Source link

Ajinkya Deo Birthday: मराठीच नव्हे, तर हॉलिवूड चित्रपटही गाजवणारे अभिनेते अजिंक्य देव! वाचा अभिनेत्याबद्दल…

0
Ajinkya Deo Birthday: मराठीच नव्हे, तर हॉलिवूड चित्रपटही गाजवणारे अभिनेते अजिंक्य देव! वाचा अभिनेत्याबद्दल…

अतिशय हुशार, हरहुन्नरी असे कलाकार आणि दिमाखदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते अजिंक्य देव. त्यांच्या आवाजातील जडपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खास पैलू होता. मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. केवळ अभिनयच नव्हे, तर त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची देखील प्रेक्षकांना भुरळ पडली.

Source link

Aruna Irani Birthday: ‘या’ कारणामुळे अरुणा इराणींनी घेतला होता कधीही ‘आई’ न होण्याचा निर्णय! वाचा अभिनेत्रीबद्दल…

0
Aruna Irani Birthday: ‘या’ कारणामुळे अरुणा इराणींनी घेतला होता कधीही ‘आई’ न होण्याचा निर्णय! वाचा अभिनेत्रीबद्दल…

Aruna Irani Birthday Special: रील लाईफमध्ये ‘आई’ बनणाऱ्या अरुणा खऱ्या आयुष्यात कधीच आई झाल्या नाहीत. एका कारणामुळे त्यांनी ‘आई’ न होण्याचा निर्णय घेतला होता.

Source link

Rang Maza Vegla: अखेर तो क्षण आलाच! कार्तिकी दीपाची माफी मागणार; ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवे वळण

0
Rang Maza Vegla: अखेर तो क्षण आलाच! कार्तिकी दीपाची माफी मागणार; ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवे वळण

कार्तिक तुरुंगात गेल्याच्या क्षणापासून कार्तिकी दीपाचा तिरस्कार करत आहे. तर, दीपिकाने मात्र नेहमीच आपल्या आईला खंबीर साथ दिली. या १४ वर्षांच्या काळात कार्तिकीला काही पत्र मिळाली, जी कार्तिकने लिहिली आहेत, असा तिचा समज आहे. या पत्रांमधून कार्तिकने कार्तिकीला दीपाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून तिच्या मनातील रागाला आणि तिरस्काराच्या भावनेला आणखी खतपाणी दिलं. या पत्रांमुळेच कार्तिकीच्या मनातील द्वेष आणखी वाढला.

Source link

Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्काराने होणार सन्मान!

0
Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्काराने होणार सन्मान!

व्यावसायिक नाटकांच्या १२५००हून अधिक प्रयोगांचा टप्पा पार करणारे अभिनेते प्रशांत दामले यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. प्रशांत दामले यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. तर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट पदवी देखील देण्यात आली आहे. आता याच पार्श्वभूमीवर त्यांना यंदाचा ‘ब्राह्मण भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आल्याचे ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी सांगितले.

Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’च्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’च्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

चित्रपटासंबंधातील याचिका घेऊन आधी हायकोर्टात जा किंवा सरन्यायाधीशांकडे पाठवा, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.एम.जोसेफ यांनी म्हटले आहे’. ‘द केरळ स्टोरी’ विरोधात याचिकाकर्त्याच्या वकिलाने म्हटले की, हा चित्रपट दृकश्राव्य माध्यमातून द्वेषयुक्त भाषणाचा प्रसार करण्याचा एक मार्ग आहे. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तुम्ही नेहमी थेट येथे मदतीसाठी येऊ शकत नाही, इतर प्रकरणांमध्ये आयए दाखल करून मदत मागता येत नाही. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट येत्या ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर १६ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Source link