Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3060

The Kerala Story: सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय; द केरळ स्टोरी पाहून देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

0
The Kerala Story: सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय; द केरळ स्टोरी पाहून देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया


‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. सुदिप्तो सेनने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.



Source link

The Kerala Story: महाराष्ट्रातील या शहरात मोफत पाहायला मिळणार ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा

0
The Kerala Story: महाराष्ट्रातील या शहरात मोफत पाहायला मिळणार ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा


याविषयी बोलताना महेश लांडगे म्हणाले की, ‘धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या घटना समाजिकदृष्ट्या आव्हानात्मक होत आहेत. याबाबत जाणीव आणि जागृती व्हावी. माता आणि भगिनी अशा कुप्रवृत्तीपासून दूर रहाव्यात.’ पुढे त्यांनी राज्य सरकारला विनंती करत म्हटले की, ‘लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा.’



Source link

Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहून बाळासाहेब थोरातांनी केलं कौतुक! केदार शिंदे म्हणतात…

0
Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहून बाळासाहेब थोरातांनी केलं कौतुक! केदार शिंदे म्हणतात…


‘शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा नुकताच बघितला. केदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या उत्तम कलाकृतीसाठी मनापासून अभिनंदन. अंकुश चौधरी यांनी आपल्या कसदार अभियानातून शाहीर साबळे यांची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. सना शिंदेने साकारलेली भानुमती आणि अन्य कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा स्मरणात राहतात. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अख्खा महाराष्ट्र गुणगुणतोय. हा सिनेमा बघताना इतिहासाचा एक कालखंड नजरेसमोर उभा झाला. अनेक चळवळींच्या आठवणी ताज्या झाल्या, त्या काळातले राजकारण, समाजकारण, साहित्य आणि संस्कृती पुन्हा एकदा अनुभवता आली’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.



Source link

सातारच्या दौर्‍यात शरद पवार बेहद्द खूश! म्हणाले, ‘अजित लक्ष घालतोय यात आनंद’ | पुढारी

0









सातारा; हरीष पाटणे :  अलीकडच्या काही दिवसांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाहीर कौतुक करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत त्यांनी अजितदादांच्या कामाच्या पद्धतीला शाबासकी दिली तर कोरेगावच्या सभेत विरोधी पक्षनेता म्हणून अजितदादांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेबाबतही ‘अजित लक्ष घालतोय याचा आनंद आहे’ असे म्हणत पवारांनी अजितदादांचे सातार्‍यात कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यात तर त्यांनी अजितदादांचा जाहीर सत्कार केला. काकांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना पुतणे अजितदादांच्या गालावर गुलाब फुलल्यासारखी त्यांची कळी खुलली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यामध्ये धुसफुस असल्याचे कायम बोलले जाते. अजितदादा शरद पवारांवर नाराज आहेत, अशा कंड्या पिकवल्या जातात. शरद पवारांच्या राजीनाम्यावेळी अजित पवारांची देहबोली वेगळी होती. त्यावरूनही जोरदार रान उठवले गेले. प्रत्यक्षात मात्र राजीनामा नाट्यावेळी शरद पवार यांनी जे सांगितले होते तीच भूमिका प्रतिभा पवार यांना समोर ठेवत अजितदादा राबवत होते. विशेष म्हणजे त्यावेळीही आक्रमक असलेल्या अजितदादांना शरद पवारांनी अजिबात थांबवले नव्हते. उलट त्यानंतर अजितदादांसंदर्भात मुलाखत देताना शरद पवार म्हणाले, आक्रमक स्वभावामुळे अजितबद्दल गैरसमज होतात. अजितला प्रसिद्धीची अजिबात आवड नाही. तो मीडिया फ्रेंडली नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल गैरसमज होतात. त्याला काम करायला जास्त आवडते. सतत कामात राहणे हा अजितचा स्वभाव आहे. त्याच्याबद्दलचे गैरसमज चुकीचे आहेत, अशा शब्दात पवारांनी अजितदादांचे जाहीर कौतुक केले होते.

सातार्‍यात पत्रकार परिषदेत अजितदादांसंदर्भात प्रश्न आला तेव्हांही शरद पवार यांनी अजितदादांबद्दल कौतुकोद्गार काढले.
कोरेगावच्या सभेत विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी राज्यातील भ्रष्टाचार, अधिकार्‍यांची मनमानी या विषयावर तुफान टीका केली. हे शरद पवारांच्या निदर्शनास आणून देताच ते म्हणाले, राज्याच्या विरोधी पक्षनेत्याचे ते कामच आहे. प्रशासकीय चुकीच्या बाबींवर विरोधी पक्षनेत्याला बोलावे लागते. अजित लक्ष घालत असेल तर मला त्याचा आनंद आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यात रयत शिक्षण संस्थेला देणगी देणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. त्यात रामशेठ ठाकूर यांचा शरद पवार यांनी सत्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रयत शिक्षण संस्थेला देणगी दिल्याबद्दल अजितदादांचे नाव सत्काराला घेतले गेले. शरद पवार यांच्या हस्ते अजितदादांचा सत्कार होत असताना समोरून जोरदार टाळ्या पडल्या. विशेष म्हणजे शरद पवार व अजितदादा दोघेही या सत्कारावेळी खळखळून हसले. काका-पुतण्याच्या नात्यांमधला बदललेला हा नवा रंग पाहताना रयतच्या व्यासपीठासह तोबा गर्दीलाही अप्रूप वाटले.











Source link

Robert De Niro : वयाच्या ७९व्या वर्षी ‘गॉडफादर’ फेम अभिनेता बनला ‘बाबा’; गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म!

0
Robert De Niro : वयाच्या ७९व्या वर्षी ‘गॉडफादर’ फेम अभिनेता बनला ‘बाबा’; गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म!


Robert De Niro Becomes Father: ‘गॉडफादर’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ फेम हॉलिवूड अभिनेते रॉबर्ट डी नीरो वयाच्या ७९व्या वर्षी पिता बनले आहेत.



Source link

‘रयत’ची धुरा पुन्हा शरद पवारांकडेच | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणार्‍या सातारच्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह मॅनेजिंग कौन्सील सदस्य यांच्या मंगळवारी निवडी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची रयतच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. याचबरोबर 5 उपाध्यक्ष, 15सदस्य , 6 लाईफ मेंबर प्रतिनिधी, 3 लाईफ वर्कर प्रतिनिधींची यावेळी निवड करण्यात आली. दरम्यान, संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या दर 3 वर्षांनी निवडी जाहीर केल्या जातात. त्यानुसार विविध पदासाठी अनेकांची रस्सीखेच सुरू होती. सोमवार व मंगळवारी संस्था पदाधिकारी निवडीसंदर्भात शासकीय विश्रामगृह व रयत शिक्षण संस्थेत खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या. बैठकीत संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर संस्था पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. खा. शरद पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले (वाशी), अरूण कडू पाटील, पी.जे. पाटील (उरण), अ‍ॅड. राम कांडगे(पुणे), महेंद्र लाड (पलूस) यांची निवड करण्यात आली. मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यपदी आ. अजित पवार, आ. दिलीप वळसे पाटील, आ.डॉ. विश्वजीत कदम, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, रामशेठ ठाकूर, अ‍ॅड. रविंद्र पवार, मीनाताई जगधने, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित पाटील, राहुल जगताप, जनार्दन जाधव, दादाभाऊ कळमकर, प्रा. सदाशिव कदम. धनाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. लाईफ मेंबर प्रतिनिधीपदी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, विनोदकुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांची निवड करण्यात आली. लाईफ वर्कर प्रतिनिधीपदी नवनाथ जगदाळे, प्रा.डॉ. संजय नगरकर, सौ. ज्योत्स्ना ठाकूर यांची निवड करण्यात आली. संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सचिवपदासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्ष पदाच्या निवडी दि. 27 मे रोजी पुण्यात होणार्‍या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत होणार असल्याची माहिती संस्थेतून देण्यात आली. दरम्यान, आगामी काळात संस्थेच्या सचिवपदी निवृत्त सनदी अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा रयत वर्तुळात सुरू आहे.



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ५ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा!

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ५ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा!


The Kerala Story BO Collection: ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले असून, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची कथा रामदास स्वामींनी लिहिली; अभिनेते योगेश सोमण यांचा व्हिडीओ व्हायरल

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची कथा रामदास स्वामींनी लिहिली; अभिनेते योगेश सोमण यांचा व्हिडीओ व्हायरल


‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असताना आता अभिनेते योगेश सोमण यांनी मात्र ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची कथा समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर, रामदास स्वामी यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची कथा शेकडो वर्षांपूर्वी एका ओळीत लिहून ठेवली आहे, असं योगेश सोमण म्हणाले आहेत. त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे.



Source link

Sirf Ek Bandaa Kaafi Hai: मनोज बाजपेयीचा चित्रपट अडचणीत; आसाराम बापू ट्रस्टकडून कायदेशीर नोटीस! नेमकं प्रकरण काय?

0
Sirf Ek Bandaa Kaafi Hai: मनोज बाजपेयीचा चित्रपट अडचणीत; आसाराम बापू ट्रस्टकडून कायदेशीर नोटीस! नेमकं प्रकरण काय?


अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित, ‘सिर्फ एक बंदा कोफी है’ या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयीने पीसी सोलंकीची भूमिका केली आहे, ज्यांनी अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, एका अध्यात्मिक गुरुवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे आणि त्याला पोक्सो कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. यानंतर मनोज बाजपेयीने साकारलेले पात्र, कोर्टात या मुलीसाठी लढतो आणि प्रक्रियेत त्याला खूप त्रास सहन करावा लागतो. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट २३ मे रोजी झी ५वर रिलीज होणार आहे.



Source link

Chandrika Saha: १५ महिन्यांच्या बाळाला अभिनेत्रीच्या पतीने जमिनीवर आपटलं; CCTV फुटेजमधून धक्कादायक घटना आली समोर

0
Chandrika Saha: १५ महिन्यांच्या बाळाला अभिनेत्रीच्या पतीने जमिनीवर आपटलं; CCTV फुटेजमधून धक्कादायक घटना आली समोर


Actress Chandrika Saha: चंद्रिका साहा हिच्या पतीने त्यांच्या अवघ्या १५ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटून बेदम मारहाण केली आहे.



Source link