Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3059

सातारा : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती करावी- नाना पाटेकर | पुढारी

0


पाचगणी, पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमीन दुरुस्ती करण्यासाठी नाम फौंडेशन च्या मदतीने १०५ गावातील ८५ गावातील १८०० शेतकरी ९०० एकर शेतजमीन आणो २० किमी नदी व ओढे दुरुस्तीचे उत्तम काम झाले. या कामाचा लोकांपर्ण सोहळा नाम फौंडेशनचे प्रमुख विश्वस्त पदमश्री नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत बुधवारी तळदेव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती करावी. राजकारणापासून सामान्य माणसांनी दूर राहावे. राजकीय लोकांकडून विकास करून घ्यावा, आणि समाजासाठी प्रत्येक माणसाने योगदान द्यावे. मला काय मिळते यापेक्षा मी काय देतो याचा विचार करावा, असे मत व्यक्त केले.

१०५ गाव ही सामाजिक संघटना याचे काम चांगले आहे. भविष्यात नाम आणि आपण एकच आहोत. सोबत राहून समाजोपयोगी ,काम करू यासाठी नाम कायम आपल्या बरोबर असेल याची ग्वाही दिली. पाटेकर यांनी शेतकऱ्यांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. यावेळी तळदेव हायस्कूल मध्ये डिजिटल क्लास रूमचे उदघाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

हा सोहळा १०५ गाव समाजाच्या वतीने आयोजित केला होता. या सोहळ्याला कोयना सोळशी कांदाटी आणि बामणोली विभागातील शेतकरी बांधव शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील, इंद्रजित देशमुख, चंद्रशेखर एल एस, क्षिप्रा माथूर, आणि संजय नाईक हे नाम चे विश्वस्त प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

या सोहळा यशस्वी होण्यासाठी १०५ गाव समाजाचे अध्यक्ष घनश्याम सकपाळ, कार्याध्यक्ष डी के जाधव, उपाध्यक्ष सुभाष सोंडकर, सचिव गणेश उतेकर, संजय संकपाळ गुरुजी, बी व्ही शेलार, किसन जाधव, समिती प्रमुख वसंत शेठ शिंदे, जगन्नाथ मोरे, हरिभाऊ कदम, लक्ष्मण दादा जाधव, संजय जाधव, संदीप उतेकर, संजय उतेकर, शांताराम कदम, गोविंद शिंदे, सोमराज शिंदे, राजेश जाधव आणि समाजाचे प्रमुख पदाधिकारी तसेच समाजबांधव यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय संकपाळ आणि संजय जाधव यांनी केले. तर आभार श्री संदीप उतेकर यांनी मानले.

हेही वाचंलत का?



Source link

Kriti Sanon: क्रिती सेनॉनने नेसली २४ कॅरेट सोन्याची साडी, तुम्ही पाहिलीत का?

0
Kriti Sanon: क्रिती सेनॉनने नेसली २४ कॅरेट सोन्याची साडी, तुम्ही पाहिलीत का?



Adipurush Trailer Launch Event: क्रितीने तिचा आगामी चित्रपट आदिपुरुषचा ट्रेलर लॉंच इवेंटच्या वेळी सोन्याची साडी नेसली आहे.



Source link

“तुम्हारा सहाब अभी रिटायर नहीं हुआ….’, सिटी ऑफ ड्रीम्स ३चा टीझर पाहिलात का?

0
“तुम्हारा सहाब अभी रिटायर नहीं हुआ….’, सिटी ऑफ ड्रीम्स ३चा टीझर पाहिलात का?


सिटी ऑफ ड्रीम्सचा तिसरा सीझन १३ मे २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरीज प्रचंड गाजली होती.



Source link

Kareena Kapoor: करीनाने नकार दिलेल्या या चित्रपटाने बदलले कंगनाचे आयुष्य

0
Kareena Kapoor: करीनाने नकार दिलेल्या या चित्रपटाने बदलले कंगनाचे आयुष्य


बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच वरचढ ठरते. तिच्या वक्तव्याची चर्चा असते. ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मते मांडताना दिसते. बराच वेळा तिला या सर्वामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र कंगना याकडे दुर्लक्ष करते. करिअरच्या सुरुवातीचा काळ कंगनासाठी कठीण होता. मात्र, अभिनेत्री करीना कपूर खानने नकार दिलेल्या चित्रपटाची ऑफर कंगनाला मिळाली आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलले.



Source link

Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’मध्ये आशुतोषच्या बहिणीची एण्ट्री, मालिका रंजक वळणावर

0
Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’मध्ये आशुतोषच्या बहिणीची एण्ट्री, मालिका रंजक वळणावर


सुप्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे वीणा ही भूमिका साकारणार असून आई कुठे काय करते मालिकेच्या कुटुंबात सामील होण्यासाठी ती खुपच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना वीणा म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातली पहिली मालिका धर्मकन्या मी स्टार प्रवाहवर केली होती. त्यानंतर जवळपास १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोहत काम करतेय. आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. या लोकप्रिय मालिकेचा भाग होताना अत्यानंद होतोय. वीणाच्या येण्याने अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात बरीच उलथापालथ घडणार आहे. त्यामुळे आई कुठे काय करते मालिकेचे यापुढील भाग आणखी उत्कंठावर्धक होतील यात शंका नाही.



Source link

Sridevi: बोनी कपूर नव्हे तर कमल हासनशी जुळणार होतं श्रीदेवीचं सूत; आईने विनंती केली अन्…

0
Sridevi: बोनी कपूर नव्हे तर कमल हासनशी जुळणार होतं श्रीदेवीचं सूत; आईने विनंती केली अन्…


इतकंच नाही तर, श्रीदेवीच्या आईने आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव कमल हासनसमोर ठेवला होता. मात्र, त्यांनी तो नाकारला. याचा खुलासा खुद्द कमल हासनने केला होता. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर कमल हासनने ‘द २८ अवतार्स ऑफ श्रीदेवी’ नावाची एक नोट लिहिली होती, ज्यामध्ये त्यांनी श्रीदेवी त्यांची जवळची मैत्रीण असल्याचे लिहिले होते. यातच त्यांनी म्हटले होते की, श्रीदेवीच्या आईने आपल्या मुलीसोबत लग्न करण्याची विनंती केली होती. पण, श्रीदेवीच्या आईच्या मागणीला त्यांनी नकार दिला होता.



Source link

Tu Chal Pudha: शिल्पीच्या हट्टापायी अश्विनी घरातून बाहेर पडणार! मालिका रंजक वळणावर

0
Tu Chal Pudha: शिल्पीच्या हट्टापायी अश्विनी घरातून बाहेर पडणार! मालिका रंजक वळणावर


वाघमारेंचं घर आपल्या नावावर करून श्रेयस आणि अश्विनीला घराबाहेर काढायचं हा डाव तिने आखला होता. मात्र, बाबांनी तसे करण्यास नकार दिला आहे. आपलं राहतं घर मी माझ्या दोन्ही मुलांच्या नावावर करणार असा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, संपूर्ण घर एकट्या शिल्पीच्या नावावर करण्यात यावं, असा हट्ट त्यांनी धरला होता. यावर जरी बाबांनी आक्षेप घेतला असला, तरी आईने आपला हट्ट लावून धरला आहे.



Source link

CM help to Jeeva Mahala Descendant : जीवा महालांच्या वंशजांना शिंदेंच्या पत्नीकडून मदत

0



<p>सय्यद बंडाच्या हल्ल्यापासून महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या जीवा महालांच्या वंशजांना सरकारकडून मदत, &nbsp;मुलीच्या लग्नासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून एक लाखांची मदत.&nbsp;</p>



Source link

Astad Kale: अस्ताद काळेची नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Astad Kale: अस्ताद काळेची नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला



Astad Kale Upcoming Serial: या मालिकेत आस्ताद एका नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



Source link

राज्याचा गाळप हंगाम 52 दिवसांनी घटला; साखर उत्पादनावर विपरीत परिणाम | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  देशात गतवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातच साखरेचे उत्पादन उच्चांकी झाले आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 32 लाख टनांनी उत्पादन घटले आहे. यंदा उसाचे घटलेले क्षेत्र, बंद असलेले कारखाने सुरू होणे व ऊस तोडणीचा प्रश्न या कारणांमुळे यंदाचा हंगाम लवकर आटोपला आहे. गतवर्षीचा हंगाम 173 दिवस सुरू होता. मात्र, यंदा हाच हंगाम 121 दिवस चालला आहे. यंदा तब्बल 52 दिवस हंगाम कमी झाल्यानेच उत्पादनावर परिणाम झाला आहे.

यंदाचा हंगाम लवकर सुरू होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. 15 ऑक्टोबरला हंगाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, मध्येच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हंगाम पुन्हा एकदा लांबणीवर पडला. यंदाचा हंगाम दिवाळीनंतरच सुरू झाला. त्यातच तोडणी अपेक्षित गतीने न झाल्याने कारखान्यावर लवकर उस पोहचलाच नाही. त्यामुळे यंदा गाळप क्षमता वाढली असतानाही गाळप 300 लाख टनांनी कमी झाले आहे. तोडणीसोबत उसाचे क्षेत्र कमी झाल्याचा फटकाही यंदाच्या हंगामाला बसला आहे. शेवटच्या टप्प्यात तर अक्षरश: मजुर शोधण्याची वेळ आली. यामुळे अनेक कारखान्यांनी गाळपाचे जे उद्दिष्ट ठेवले होते तेही पूर्ण झालेले नाही.
राज्यात गत हंगामात 173 दिवस गाळप चालले होते. यामध्ये 1 हजार 321 लाख टन उसाचे गाळप होवून 137 लाख टन 36 क्विंटलचे उत्पादन झाले होते. तर उतारा हा 10.40 टक्के पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वत्रच घट झालेली आहे. राज्यात गाळप व उत्पादनात अव्वल असलेला कोल्हापूर विभाग केवण 124 दिवस चालला आहे. या पाठोपाठ पुणे विभाग 132, सोलापूर विभाग 118, अहमदनगर विभाग 121, औरंगाबाद विभाग 121, नांदेड विभाग 117 दिवस, अमरावती विभाग 96 दिवस आणि नागपूर विभागातील कारखान्यांचा हंगाम 117 दिवस चालला आहे.

असा राहिलाय दशकभरातील हंगाम

गत 10 वर्षांची आकडेवारी पाहता, यंदाचा हंगाम हा दुसरा सर्वात कमी दिवसांचा हंगाम असलेले वर्ष आहे. सन 2013- 14 मध्ये 128 दिवस, 2014-15 मध्ये 132 दिवस, 2015-16 मध्ये 150 दिवस, 2016-17 मध्ये 126 दिवस, 2017-18 मध्ये 72 दिवस, 2018-19 मध्ये 142 दिवस, 2019-20 मध्ये 127, 2020-21 मध्ये140 दिवस, 2021-22 मध्ये 173 दिवस आणि यावर्षी केवळ 121 दिवस हंगाम चालला आहे. वर्षानुवर्षे गाळप क्षमतेतही वाढ झाली असून 6.9 लाख टन प्रतिदिन असलेली गाळप क्षमता सद्य:स्थितीत 9.50 लाख टनांवर गेली आहे. त्यामुळेच उत्पादनात वाढ होत आहे.











Source link