Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3058

Maharashtra political crisis : नैतिकतेच्या आधारावर बेकायदेशीर सरकारने त्वरित राजीनामा द्यावा : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : सुप्रीम कोर्टाने आज शिंदे गट पक्षावर दावा करू शकत नाही. तसेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे मत नोंदविले आहे. ज्याअर्थी संवैधानिक पदावर असलेल्या राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांवर ओढलेले ताशेरे, यावरून हे सरकार बेकायदा पद्धतीने अस्तित्त्वात आले आहे, असं स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून दिसतो. यामुळे सुप्रीम कोर्टाने ओढलेले ताशेरे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं ही चूक होती. त्यांनी फ्लोअर टेस्टचा सामना करायला हवा होता, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, कायदेशीर रित्या उद्धव ठाकरेनी राजीनामा देणं चूक असली तरी नैतिकता जपणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी राजीनामा दिला. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सरकार अस्तित्त्वात आलं, त्यानंतर जो घोडेबाजार झाला, हे पाहता सरकार बेकायदा, असंवैधानिक आहे. याकरता पुढची न्यायालयीन कारवाई निश्चितच केली जाईल. पण इतके गंभीर ताशेरे संवैधानिक पदावर बसलेल्या लोकांवर ओढले आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे. न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या यापासून वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा दिला पाहिजे आणि नव्या सरकारचे महाराष्ट्रात गठन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

 











Source link

Tu Chal Pudha: अश्विनी-श्रेयस अखेर घराबाहेर पडले; नवा ठावठिकाणा शोधताना होणार कुटुंबाचे हाल!

0
Tu Chal Pudha: अश्विनी-श्रेयस अखेर घराबाहेर पडले; नवा ठावठिकाणा शोधताना होणार कुटुंबाचे हाल!


अश्विनीला नीचा दाखवण्यासाठी आता शिल्पी रोजच नवनवी कारस्थानं करत आहे. आता तिने विक्रमसोबत राहण्यासाठी विद्युतला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान आता श्रेयस आणि शिल्पीमध्येदेखील वाद सुरू झाले होते. श्रेयसने केवळ एकाच अटीवर शिल्पीला घरात राहण्याची परवानगी दिली होती. त्याने शिल्पीला घरातील कोणत्याही निर्णयात सहभागी होण्याचा अधिकार काढून घेतला होता. मात्र, याच गोष्टीचं हत्यार बनवून शिल्पीने श्रेयसला घराबाहेर काढायचा प्लॅन आखला होता. शिल्पी आपल्या कुटुंबाला त्रास देत असल्याचे पाहून आता अश्विनीनेच घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

Rang Maza Vegla: पुन्हा सुरू होणार बदल्याचा नवा खेळ! ‘रंग माझा वेगळा’ मालिका रंजक वळणावर

0
Rang Maza Vegla: पुन्हा सुरू होणार बदल्याचा नवा खेळ! ‘रंग माझा वेगळा’ मालिका रंजक वळणावर


Rang Maza Vegla Latest Episode: घाडगे वकील पुन्हा एकदा एक डाव खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे दीपाला कार्तिकचा डाव समजल्यामुळे आत ती देखील सावध झाली आहे.



Source link

शेतकर्‍याचा नाद खुळा; डॉल्बीच्या तालावर आले धुण्याचा सपाटा | पुढारी

0


खटाव; अविनाश कदम :  या वर्षी बाजारात वाढलेल्या उच्चांकी मागणीमुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आले पिकाला सर्वाधिक दर मिळत आहे. आल्याच्या 500 किलोच्या प्रति गाडीस मालाच्या प्रतवारीनुसार 55 ते 65 हजार रुपये दर मिळत आहे. बाजारात एक गाडी आल्याचे थेट एक तोळा सोन्याशी टशन सुरू असल्याने आले उत्पादक शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण आहे. शेतातून काढलेले आले धुताना चक्क डॉल्बीच्या तालावर ताल धरला जात असल्याने शेतकर्‍याचा नादच खुळा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

गेली चार ते पाच वर्षे आले पिकाच्या दरात कायम घसरण होत होती. त्यामुळे आले उत्पादकांना सलग आणि मोठा आर्थिक फटका बसला. गेल्या काही कालावधीत शेतकरी चांगला नफा मिळेल या आशेने आले पिकासाठी लाखो रुपयांचा भांडवली खर्च करत होते. मात्र, बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीक आतबट्ट्याच ठरत होते.

चालू वर्षीच्या गेल्या महिन्यापासून आल्याच्या दरात भरघोस वाढ झाल्याने अडचणीत आलेल्या आले उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 500 किलोंच्या एका गाडीला सरासरी 60 ते 65 हजारांचा दर मिळू लागला आहे. गेल्या आठवड्यात हाच दर 68 हजार रुपयांवर गेला होता. बाजारात सध्या सोन्याला एका तोळ्याला 63 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एक तोळा सोने आणि एक गाडी आल्याचे जोरदार टशन सुरु आहे.

एखाद्या पिकाला उच्चांकी दर मिळू लागला की काही अनधिकृत व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना वाढतात. सध्या आल्याच्या गाडीला उच्चांकी 65 हजार रुपये दर मिळत आहे. प्रति एकर सरासरी पंधरा ते वीस गाड्यांचा उतारा धरला तरी एका एकरातील आल्याची रक्कम जवळपास 10 ते 12 लाखांच्या घरात जाते. परिणामी, आले खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे आले उत्पादक शेतकर्‍यांनी ज्या व्यापार्‍यांचे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार चोख असतील आणि जे बाजार समिती व पणन संचलनालयाचे नोंदनोंदणीकृत व्यापारी असतील अशाच खात्रीशीर व्यापार्‍यांना आल्याची विक्री करणे आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य फसवणूक टाळली जाईल.

सध्या उच्च दर्जाच्या आल्याची परदेशात मागणी वाढली आहे. मागच्या वर्षी भारतातून मसाल्याची जेवढी निर्यात झाली, त्यात आल्याचा समावेश जास्त होता. आल्यापासून तयार होणारी सुंठदेखील बाजारात रूबाब दाखवत आहे. देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांतील बाजारपेठांमध्ये आल्याची मागणी कायम आहे. त्यामुळे भविष्यात आले शेती आणखी फायदेशीर ठरणार आहे.

अनेकांची व्यावसायिक आणि राजकीय कारकीर्द घडली…

12 वर्षांपूर्वी आल्याला उच्चाकी दर मिळाला होता. तेव्हा उत्पादनही चांगले निघाले होते. शेतकर्‍यांना त्यावेळी काही लाखांपासून अगदी एक, दोन कोटी रुपयांचे उत्पादन निघाले होते. त्या काळात आल्यातील पैशांच्या जोरावर काहींनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यावर अनेकांची राजकीय कारकीर्दही घडली होती. आज त्यातील काही जण तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करून आहेत. अनेकांनी आल्यातून मिळालेल्या पैशांतून व्यवसाय सुरू केले होते. आज बरेच जण व्यवसायातही स्थिर झाले आहेत.

सन 2012 नंतर प्रथमच आल्याच्या दराने यंदा 60 हजारांचा टप्पा पार केला आहे. सलग चार वर्षे दर कोसळूनही ज्या शेतकर्‍यांनी आल्याचे पिक घेतले आहे, त्यांना भरघोस नफा मिळत आहे. बियाणाच्या आल्याला तर सोन्याहून अधिक दर मिळत आहे. पुढील वर्षी आले लागवड क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे.
– प्रा. एस. वाय. फडतरे (आले उत्पादक , फडतरवाडी )



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा! पाहा सहाव्या दिवसाचे कलेक्शन

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा! पाहा सहाव्या दिवसाचे कलेक्शन


‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. आता चित्रपटाच्या नजरा १०० कोटींच्या क्लबकडे लागल्या आहेत. या वीकेंडपर्यंत हा चित्रपट १०० कोटींहून अधिक कमाई करू शकेल, असे म्हटले जात आहे. याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून, विपुल अमृतलाल शाह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात अदा शर्मा मुख्य भूमिकेत झळकली आहे.



Source link

Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’मधून करण जोहरचा पत्ता कट? पुन्हा सलमान खानच्या हाती येणार धुरा!

0
Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’मधून करण जोहरचा पत्ता कट? पुन्हा सलमान खानच्या हाती येणार धुरा!


बिग बॉस ओटीटी वूटवर स्ट्रीम केला जाईल, असा अंदाज आहे. या शोचे प्री-प्रॉडक्शनही सुरू झाले आहे. या शोचा पहिला सीझन अभिनेत्री दिव्या अग्रवालने जिंकला होता. पहिल्या सीझनमध्ये शमिता शेट्टी, राकेश बापट, उर्फी जावेद जीशान खान, निशांत भट, प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीन यांनी सहभाग घेतला होता. बिग बॉस ओटीटी फिनालेनंतर प्रतीक, शमिता आणि निशांत यांनीही बिग बॉस १५मध्ये देखील भाग घेतला होता. ‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन दिव्या अग्रवाल जिंकली होती.



Source link

Kangana Ranaut: ‘डबल धमाल’, ‘रास्कल’ केल्याचा कंगना रनौतला होतोय पश्चात्ताप? पाहा काय म्हणाली अभिनेत्री…

0
Kangana Ranaut: ‘डबल धमाल’, ‘रास्कल’ केल्याचा कंगना रनौतला होतोय पश्चात्ताप? पाहा काय म्हणाली अभिनेत्री…


चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच कंगना रनौतने आता दिग्दर्शनही सुरू केले आहे. दरम्यान, कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक जुना व्हिडीओ शेअर करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओद्वारे तिने तिच्या चाहत्यांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, ती अधिक चांगल्यासाठी पात्र आहे. पण, तरीही ती कधी विचलित झाली नाही. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कंगना तिच्या जुन्या चित्रपटांबद्दल बोलताना दिसली आहे.



Source link

Raavrambha: ‘रावरंभा’साठी प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार? पाहा नेमकं काय घडलं…

0
Raavrambha: ‘रावरंभा’साठी प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार? पाहा नेमकं काय घडलं…


Raavrambha Film Postponed: नुकतीच ‘रावरंभा’च्या टीमने या चित्रपटाचे रिलीज लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती दिली आहे.



Source link

Adah Sharma Birthday: चित्रपटांसाठी ‘द केरळ स्टोरी’च्या अभिनेत्रीने सोडलं शिक्षण! वाचा अदा शर्माबद्दल..

0
Adah Sharma Birthday: चित्रपटांसाठी ‘द केरळ स्टोरी’च्या अभिनेत्रीने सोडलं शिक्षण! वाचा अदा शर्माबद्दल..


सध्या अदा शर्मा सध्या तिच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली आहे. ‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. केरळसह अनेक राज्यांमध्ये या चित्रपटाच्या कथेला तीव्र विरोध होत आहे.



Source link

Sadashiv Amrapurkar Birthday: मनोरंजन विश्वातील असा खलनायक, ज्यांना धर्मेंद्र मानायचे लकी चार्म!

0
Sadashiv Amrapurkar Birthday: मनोरंजन विश्वातील असा खलनायक, ज्यांना धर्मेंद्र मानायचे लकी चार्म!


ज्या काळात सदाशिव यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली, त्या वेळी धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीतील एक मोठा स्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. मात्र, धर्मेंद्र सदाशिव अमरापूरकर यांना आपला लकी चार्म मानायचे. धर्मेंद्र यांना त्यांचा अभिनय इतका आवडला होता की, ते त्यांच्या प्रत्येक चित्रपटात सदाशिव यांना खलनायक म्हणून कास्ट करायचे. दोघांनी ‘एक फरिश्ते’, ‘हुकूमत’ आणि ‘ऐलान-ए-जंग’ यासह एकूण अकरा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचे हे सगळे चित्रपट सुपरडुपर हिट ठरले होते. सदाशिव चित्रपटात असतील तर चित्रपट गाजतात, अशी धर्मेंद्र यांची धारणा होती. म्हणूनच ते सदाशिव अमरापूरकर यांना ‘लकी चार्म’ मानायचे.



Source link