Friday, July 3, 2026
Home Blog Page 3057

 उद्धव ठाकरेंना नैराश्य तर नरहरी झिरवाळ यांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित :  शंभूराज देसाई | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचे सूतोवाच केला आहे. केवळ नैराश्यातून त्यांनी हे वक्तव्य केले आहे, असे सांगत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. तसेच व्हीप आमचाच चालणार असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी ज्या सल्लागारांचे ऐकून मागील वर्षी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, त्याच सल्लागारांना याबाबत अधिक विचारावे, असा उपरोधिक टोलाही  देसाई यांनी यावेळी लगावला आहे.

मंत्री देसाई यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत बोलण्यास नकार देत त्यांचा दररोज सकाळी दहाचा भोंगा ऐकला की लोक चॅनेल बदलतात. मी त्यांना पहातही नाही आणि ऐकत सुद्धा नाही. ते जे बोलतात, ते आजवर एकदा तरी खरं ठरले आहे का? असा प्रतिप्रश्न करत संजय राऊत उगाच हवा सोडतात अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. तसेच अनिल परब हे मोठे वकील आहेत. ते काहीही दावा करू शकतात, असा टोलाही मंत्री देसाई यांनी आमदार अनिल परब यांना लगावला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सर्वांचे म्हणणे ऐकून घेत आमदार अपात्रतेबाबत योग्य निर्णय देऊ असे सांगितले आहे. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जर न्यायालयाने आपणास निर्णय घेण्याची सूचना केल्यास आपण आमदारांना अपात्र ठरवू, असे सांगितले होते. याकडे लक्ष वेधत त्यांची भूमिका पूर्वग्रहदूषित होती अशा शब्दांत न्यायालयाच्या निर्णयामुळे महायुती सरकार अधिक भक्कम झाल्याचेही मत देसाई यांनी यावेळी व्यक्त केले.

               हेही वाचलंत का ?

 

 

 











Source link

Ashneer Grover: भारतपे प्रकरण अंगाशी येणार; ‘शार्क टँक’ फेम अश्नीर ग्रोव्हरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल!

0
Ashneer Grover: भारतपे प्रकरण अंगाशी येणार; ‘शार्क टँक’ फेम अश्नीर ग्रोव्हरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल!


डिसेंबर २०२२ मध्ये, भारतपेने कंपनीच्या निधीचा प्रचंड गैरवापर केल्याबद्दल अश्नीर ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू केली होती. ग्रोव्हर दाम्पत्यावर कंपनीच्या खात्यातून तब्बल ८१ कोटी रुपये बनावट पावत्या बनवून त्यांच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. आता त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

TMKOC: ते सगळे आरोप खोटे, उलट तीच…; जेनिफर मिस्त्रीच्या आरोपांवर ‘तारक मेहता’चा निर्माता भडकला!

0
TMKOC: ते सगळे आरोप खोटे, उलट तीच…; जेनिफर मिस्त्रीच्या आरोपांवर ‘तारक मेहता’चा निर्माता भडकला!


निर्माते असित कुमार मोदी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘हा फक्त खोटा आणि बिनबुडाचा आरोप आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती फक्त माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. मी ते आरोप कधीच स्वीकारणार नाही. मी माझ्या खऱ्या आयुष्यात कसा आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. आम्हीच तिला शोमधून काढून टाकले आहे. मी आणि माझ्या टीमने तिला हा सोडण्यास सांगितले आहे. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. माझे प्रॉडक्शन लवकरच सर्व पुरावे आणि कागदपत्रे तुम्हा सर्वांना पाठवेल. खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून ती शो आणि माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याने, आम्ही तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू.’



Source link

Dahaad Review: ओटीटीवरही दिसली सोनाक्षी सिन्हाची ‘दबंग’गिरी! वाचा कशी आहे ‘दहाड’ वेब सीरिज…

0
Dahaad Review: ओटीटीवरही दिसली सोनाक्षी सिन्हाची ‘दबंग’गिरी! वाचा कशी आहे ‘दहाड’ वेब सीरिज…


धर्माचा विचार करून त्या मुलाच्या बहिणीचे प्रकरणही राजकारण्याच्या सांगण्यावरून उघडले जाते. दोन्ही प्रकरणांची जबाबदारी एसआय अंजली भाटी (सोनाक्षी सिन्हा), कैलाश पारघी (सोहम शाह) आणि अधिकारी देवीलाल सिंह (गुलशन देवय्या) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. धर्मावरून सुरू झालेले हे प्रकरण असे वळण घेते की, सगळेच चक्रावून जातात. यानंतर २७ मुलींची हत्या करणार्‍या सीरियल किलरचा मांडवा पोलिस पथक कसा पर्दाफाश करते, आणि हा सिरीयल किलर आनंद स्वर्णकर (विजय वर्मा) या मुलींची हत्या का करतो, हे थरारक कथानक जाणून घेण्यासाठी ही वेब सीरिज एकदा पाहावी लागणार आहे.



Source link

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचा नवा विक्रम; अवघ्या २४ तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज!

0
Adipurush : ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचा नवा विक्रम; अवघ्या २४ तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज!


ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच त्याने धुमाकूळ घातला आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा हा ट्रेलर २४ तासांत सर्वाधिक पाहिला गेला आहे. रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळालेला हा पहिला हिंदी ट्रेलर ठरला आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये, चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटाच्या पोस्टरमुळे विवादांना सामोरे जावे लागले होते. चित्रपटाच्या व्हीएफएक्सपासून ते चित्रपटात दाखवलेल्या स्टारच्या लूकपर्यंत लोकांकडून सगळ्याच गोष्टींवर बरीच टीका झाली होती. मात्र, इतक्या वादानंतरही निर्मात्यांनी हार मानली नाही.



Source link

Twinkle Khanna: राजेश खन्नाच्या लेकीला विकावे लागले होते मासे; ट्विंकल खन्नाने केला पहिल्या नोकरीचा खुलासा

0
Twinkle Khanna: राजेश खन्नाच्या लेकीला विकावे लागले होते मासे; ट्विंकल खन्नाने केला पहिल्या नोकरीचा खुलासा


ट्विंकल खन्ना मासे विकताना पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. ट्विंकल खन्नान नुकत्याच एका मुलाखतीत याचा खुलासा केला. ट्विंकलसोबत जॉनी लीव्हरही या शोमध्ये उपस्थित होते. ट्विंकलनंतर, अभिनेता जॉनी लीव्हर यांनीही आपल्या पहिल्या कामाबद्दल बोलताना सांगितले की, त्यांचे आयुष्यातील पहिले काम पेन विकणे होते. या दरम्यान ते चित्रपटातील कलाकारांची मिमिक्री देखील करत असत. सामान्य असो वा खास, प्रत्येकाला आयुष्यभर त्यांची पहिली नोकरी, पहिला पगार, पहिली गाडी अशा अनेक पहिल्या गोष्टी कायम आठवतात.



Source link

TMKOC: ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवर अभिनेत्रीने केले लैंगिक शोषणाचे आरोप; आता ‘भिडे’ गुरुजी म्हणतात…

0
TMKOC: ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवर अभिनेत्रीने केले लैंगिक शोषणाचे आरोप; आता ‘भिडे’ गुरुजी म्हणतात…


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘आत्माराम तुकाराम भिडे’ ही भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर याने जेनिफर मिस्त्री प्रकरणावर भाष्य केले आहे.



Source link

Parineeti Raghav Engagement: परिणीती-राघवच्या साखरपुड्याची तयारी सुरू, सजलेल्या घराचे व्हिडीओ व्हायरल!

0
Parineeti Raghav Engagement: परिणीती-राघवच्या साखरपुड्याची तयारी सुरू, सजलेल्या घराचे व्हिडीओ व्हायरल!


Parineeti Chopra And Raghav Chadha Engagement: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आता तिच्या आयुष्यात एका नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहे.



Source link

Rashmika Mandanna: स्वतःला शाकाहारी म्हणणारी रश्मिका दिसली चिकन बर्गर खाताना! अभिनेत्री होतेय जोरदार ट्रोल

0
Rashmika Mandanna: स्वतःला शाकाहारी म्हणणारी रश्मिका दिसली चिकन बर्गर खाताना! अभिनेत्री होतेय जोरदार ट्रोल


रश्मिका मंदाना काही काळापूर्वी एका बर्गर ब्रँडच्या जाहिरात व्हिडीओमध्ये दिसली होती, ज्यामध्ये ती चिकन बर्गर खाताना दिसली आहे. यावर आता तिचे चाहते संतापले आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे की, आधी रश्मिकाने म्हटले होते की, ती शाकाहारी आहे. पण, आता ती चिकन बर्गर खाताना दिसली आहे. यावरून लोक आता ट्रोल करत आहेत.



Source link

TMKOC: ‘वाटतं तुला पकडून ओठांना kiss करावं’, शोच्या निर्मात्यावर अभिनेत्रीने केले लैंगिक शोषणाचे आरोप

0
TMKOC: ‘वाटतं तुला पकडून ओठांना kiss करावं’,  शोच्या निर्मात्यावर अभिनेत्रीने केले लैंगिक शोषणाचे आरोप


माझ्या होठांची प्रसंशा करत होते मोदी – जेनिफर
रोशन सिंग सोढीची भूमिका करणाऱ्या जेनिफर मिस्त्री हिने माध्यमांशी बोलताना सांगितले की,  ‘असित मोदी मला वारंवार कॉल करून खोलीत बोलवत होते. मी नकार दिल्यानंतर म्हणायचे की, मी तर गंमत करत होतो. मात्र ते नेहमी असे करू लागले. सर्वांसमोर माझ्या होठांचे कौतुक करत मला वैयक्तिक मेसेज करायचे. या प्रकाराकडे मी सुरुवातील दुर्लक्ष केले. मात्र एकदा माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी कॉल केला व म्हटले की, लग्नाचा वाढदिवस तर संपला आता तर खोलीत ये. दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हटले की, तू खूप सुंदर दिसतेस. तुझे ओठ खूप सुंदर आहेत. वाटतं तुला पकडून किस करावं. मला त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटत होते व मी रात्रभर रडत होते. 



Source link