Friday, July 3, 2026
Home Blog Page 3055

साखरपुड्यानंतर का मोडले रवीना टंडनचे लग्न? अक्षयने ठेवली होती ही अट

0
साखरपुड्यानंतर का मोडले रवीना टंडनचे लग्न? अक्षयने ठेवली होती ही अट


बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स आणि ब्रेकअप हे कायम जगजाहीर असतात. ९०च्या दशकातील अशीच एक जोडी म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय आणि अभिनेत्री रवीना टंडन. त्यांचे अफेअर सर्वांना माहिती होते. त्या दोघांनी साखरपुडा देखील केला होता. मात्र, अक्षय कुमारने ठेवलेल्या अटीमुळे रवीनाने लग्न करण्यास नकार दिला.



Source link

Urfi Javed: उर्फीने थेट कॅमेरासमोरच बदलले कपडे Video Viral

0
Urfi Javed: उर्फीने थेट कॅमेरासमोरच बदलले कपडे Video Viral



Urfi Javed Video: उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. आता तिला सर्वांसमोर कपडे बदलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे..



Source link

बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

0


कराड; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात विरोधकांकडून जल्लोष केला जात आहे. काही लोकांना दुसर्‍याचे घर जळताना आनंद होतो. मात्र ते स्वतःचे जळणारे घर वाचवू शकत नाहीत, असा उपरोधिक टोला लगावत नामोल्लेख टाळत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत यांच्यासह विरोधकांचा नामोल्लेख टाळत विरोधकांची अवस्था ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना’ अशी झाल्याची बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर कारखाना कार्यस्थळावरील
विश्रामगृहात उद्योग मंत्री उदय सामंत व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.

कर्नाटक विधानसभेचा निकाल आमचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाने स्विकारला आहे. महारष्ट्रात या निकालामुळे कोणताही फरक पडणार नाही. यापूर्वी काही राज्यातील निवडणुकीसह पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत भाजपासह मित्रपक्षांनी बाजी मारली होती. याकडे लक्ष वेधत एखाद्या निवडणुकीवरून आपण कधीही अनुमान बांधू शकत नाही. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असतानाच त्रिपुरा, मेघालय यासह तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली होती. त्यामुळे एखाद्या निवडणुकीवरून देशावर त्याचा परिणाम होईल असे म्हणणे म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखे आहे. स्वतः स्वतःचे समाधान करून घेण्यासारखे असून या निवडणूक निकालाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. त्याचबरोबर पुढील वर्षी होणार्‍या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपासह मित्रपक्षाचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर विरोधकांचा नामोल्लेख टाळत बेगानी शादी मे अब्दुला दिवाना अशी विरोधकांची अवस्था झाल्याचा उपरोधिक टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

The post बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना : मुख्यमंत्री शिंदे appeared first on पुढारी.



Source link

Shetkarich Navra Hava : शेतकरी मुलाला नवरी मिळणार! सया आणि रेवाचे होणार लग्न

0
Shetkarich Navra Hava : शेतकरी मुलाला नवरी मिळणार! सया आणि रेवाचे होणार लग्न



Shetkarich Navra Hava : ‘शेतकरीच नवरा हवा’ या मालिकेत सया आणि रेवाचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे.



Source link

बाशिंग बांधलेल्या अजित पवारांना नवरीच मिळेना : आ. शहाजीबापू पाटील | पुढारी

0









कराड/सणबूर; पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाचा निकाल सरकारच्या बाजूने लागला तरी विरोधक आम्हाला आमदारकीची भीती दाखवत आहेत. जून महिन्यात गुजरातला जातानाच आम्ही आमदारकी सोडून जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आम्हाला आमदारकीची भीती दाखवू नका, असा सज्जड इशारा आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांना दिला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र, त्यांना अद्याप नवरीच मिळालेली नाही, अशा शब्दात खिल्ली उडवत आमदार पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघातील मरळी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, राज्यात आता पेटवा… आपटलं यासारख्या खालच्या पातळीवरील भाषा विरोधकांकडून ऐकायला मिळत आहे. दोन ते तीन जण अशी भाषा वापरत आहेत. तरण्याताठा गडी तब्येतीचे कारण सांगून अडीच वर्षे घरात होता. आम्ही गुजरातला निघून गेल्यापासून त्यांचा मणक्याचा आजार कुठे गेला ? हेच समजत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंगात आलेल्या बाईसारखी विरोधकांची वागणूक आहे. खा. संजय राऊत व उद्धव ठाकरे यांचे आवाज घुमत असून कर्नाटक निकालानंतर मातोश्रीबाहेर फटाके वाजत आहेत. तर संजय राऊत उड्या मारत आहेत असे सांगत आ. शहाजीबापू पाटील यांनी जोरदार टीका केली.

तसेच खासदार शरद पवार यांचे पुतणे माजी अर्थमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र, त्यांना नवरीच मिळत नाही. आपण महाविकास सरकार काळात गोरगरिबांच्या आजारपणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी म्हणून 165 पत्रे दिली होती. त्यावेळी केवळ सव्वादोन कोटींचा निधी मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 महिन्यांत गोरगरिबांना आजारपणात मदत व्हावी म्हणून 67 कोटी रुपये दिले आहेत. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काम करण्यातील फरक आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हेही विकासकामात कधीच कमी पडत नाहीत. त्यामुळेच आता शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई यांना 1 लाख मताने विजयी करावे, असे आवाहनही आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केले.

हेही वाचा : 











Source link

Waheeda Rehman:मुस्लिम असल्यामुळे भरतनाट्यम शिकवण्यास गुरुजींनी दिला होता नकार, जाणून घ्या वहिदा रहमान विषयी काही गोष्टी

0
Waheeda Rehman:मुस्लिम असल्यामुळे भरतनाट्यम शिकवण्यास गुरुजींनी दिला होता नकार, जाणून घ्या वहिदा रहमान विषयी काही गोष्टी


Waheeda Rehman Birthday: एकेकाळी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे वहीदा रहमान. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिअरची सुरुवात मात्र त्यांनी तेलुगू चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांनी हिंदी, तामिळ, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. वहिदा यांचे त्यावेळी लाखो चाहते होते. अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. आज १४ मे रोजी वहिदा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, कमावले इतके कोटी

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, कमावले इतके कोटी


‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. या चित्रपटाचे बजेट ४० कोटी रुपये आहे. आता चित्रपट लवकरच १०० कोटी रुपयांच्या क्लब हाऊसमध्ये पोहोचणार असल्याचे म्हटले जात आहे.



Source link

Parineeti Raghav Engagement: साखरपुड्यानंतर मीडिया समोर आले परिणिती-राघव, फोटोग्राफर्सला वाटली मिठाई

0
Parineeti Raghav Engagement: साखरपुड्यानंतर मीडिया समोर आले परिणिती-राघव, फोटोग्राफर्सला वाटली मिठाई


साखपुडा पार पडल्यानंतर परिणितीची भाऊ सहज चोप्रा आणि शिवांगी चोप्राने फोटोग्राफर्सला मिठाली वाटली. तसेच मीडियाचे आभार मानले. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.



Source link

Karnataka Results : स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय – पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले बहुमत हे काँग्रेस नेत्यांनी स्थानिक मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळेच साध्य झाले असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Karnataka Results)

कर्नाटक मधील दोन विभागातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतल्या होत्या. तसेच 3 पत्रकार परिषदाही घेतल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस पूर्ण बहुमताने कर्नाटकात सत्ता स्थापन करेल अशीच परिस्थिती होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच हा निकाल लागला आहे, असे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले जर आम्ही काटावर असतो तर भाजपचा सत्तेसाठीचा घोडाबाजार झाला असता. जो महाराष्ट्रासह अनेक राज्यात आपल्याला बघायला मिळाला आहे. ती शक्यता पूर्णपणे मावळली असून कर्नाटकच्या जनतेने भक्कम असे बहुमत काँग्रेसला दिलेले आहे. तरीसुद्धा काळजी घ्यावी लागेल आणि तशी काँग्रेसकडून तयारी सुद्धा दिसत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. (Karnataka Results)

कर्नाटकमधील भाजप सरकार पूर्ण भ्रष्टाचारी स्वरूपाचे सरकार होते आणि त्यांना उघडे करण्यात कर्नाटक काँग्रेसच्या नेत्यांना मोठे यश मिळाले आहे. भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची रेट लिस्टच काँग्रेसने प्रसिद्ध केली होती. कर्नाटकमध्ये स्थानिक मुद्द्यावर निवडणूक काँग्रेसकडून लढविली गेली. बेरोजगारी व महागाई हे सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे विषय होते. त्यासाठी काँग्रेसकडून जाहीरनाम्यातून पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या. ज्यामधून कर्नाटकमधील जनतेला दिलासा मिळेल. या पाच योजना म्हणजे 200 युनिट फ्री मध्ये वीज, महिलांना महिना दोन हजार रुपये भत्ता, बीपील कुटुंबातील प्रती व्यक्ती 10 किलो धान्य, बेरोजगार असलेल्या पदवीधर युवकांना तीन हजार रुपये भत्ता तर डिप्लोमा होल्डरना 1500 रुपये भत्ता ज्यामधून पुढील 2 वर्षात त्या युवकांला नोकरी मिळेपर्यंत ही रक्कम दिली जाईल. तसेच महिलांना राज्यात मोफत बससेवा. अशा योजना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. याला जनतेने चांगली साथ दिली, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

अधिक वाचा :











Source link

Chikat gunde 2: गुंतलेल्या नात्यांचे धागे सुटणार? ‘चिकटगुंडे २’ च्या शेवटच्या भागात मिळणार उत्तर

0
Chikat gunde 2: गुंतलेल्या नात्यांचे धागे सुटणार? ‘चिकटगुंडे २’ च्या शेवटच्या भागात मिळणार उत्तर



Chikat gunde 2 Last Episode: ‘चिकतगुंडे २’ ही सीरिज सध्या चर्चेत आहे. या सीरिज शेवटचा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.



Source link