Friday, July 3, 2026
Home Blog Page 3043

Anurag Kashyap: खरंच चियान विक्रमने ‘केनेडी’साठी अनुराग कश्यपला उत्तर दिलं नाही? अभिनेता म्हणतो…

0
Anurag Kashyap: खरंच चियान विक्रमने ‘केनेडी’साठी अनुराग कश्यपला उत्तर दिलं नाही? अभिनेता म्हणतो…


चियान विक्रमने अनुराग कश्यपला एक मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘प्रिय अनुराग, सोशल मीडियावरील मित्र आणि हितचिंतकांसाठी, माझे आणि तुमचे एक वर्ष जुने संभाषण पुन्हा सांगत आहे. मी एका अभिनेत्याकडून ऐकले होते की, तुम्ही एका चित्रपटासाठी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला वाटतेय की, मी प्रतिसाद देत नाही. मग, मी लगेच तुम्हाला फोन केला.



Source link

Aditya Singh Rajput: आदित्य सिंह राजपूतच्या शरीरावर जखमा; अभिनेत्यासोबत नेमकं घडलं तरी काय?

0
Aditya Singh Rajput: आदित्य सिंह राजपूतच्या शरीरावर जखमा; अभिनेत्यासोबत नेमकं घडलं तरी काय?


आदित्य सिंह राजपूत याच्या कानावर आणि डोक्यावर जखमा दिसत आहेत. मात्र,या दोन्ही जखमा पडल्यामुळे देखील होऊ शकतात. आदित्य सिंह राजपूत त्याच्या दोन मित्रांसह या अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्यापैकी एक जण गेल्या अनेक दिवसांपासून स्वतःच्या घरी गेला होता. तर, त्याचा दुसरा मित्र सकाळी कामावर जाऊन रात्री उशिरा परत यायचा.या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांचे म्हणणे आहे की, आदित्य सिंह राजपूत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. अभिनेत्याला खोकला, सर्दी आणि उलट्या होत असल्याचे मोलकरणीने पोलिसांना सांगितले आहे. असे असूनही आदित्यने रविवारीही पार्टी केली होती.पण, त्या पार्टीत त्याने काही सेवन केले होते का? हे जाणून घेण्यासाठीपोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघितली जात आहे. गरज पडल्यास व्हिसेराचा नमुनाही घेतला जाणार आहे.



Source link

Suhana Khan: शाहरुख खानच्या लाडक्या लेकीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का? नक्की वाचा…

0
Suhana Khan: शाहरुख खानच्या लाडक्या लेकीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का? नक्की वाचा…


वयाच्या अवघ्या २२ वर्षांतच सुहाना खानला तिच्या पहिल्या मेकअप ब्रँड एंडोर्समेंटमध्ये एन्ट्री मिळाली आहे. तिचा आत्मविश्वास आणि बोलण्याने लोकांच्या हृदयात तिचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. सुहाना आता अधिक आत्मविश्वासाने बोलताना दिसते. तिने नेहमीच स्वतःच्या पायावर आणि स्वतःच्या हिंमतीवर मनोरंजन क्षेत्रात येण्याच धाडस दाखवलं आहे. तिच्या या गुणांचं कौतुक स्वतः शाहरुख खानने देखील केलं आहे, त्यामुळे भविष्यात सुहाना देखील वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत सुपरस्टार होणार, हे चित्र आतापासूनच दिसत आहे.



Source link

Anupam Kher: चित्रपटाच्या सेटवर अनुपम खेर जखमी; खांद्याला झाली मोठी दुखापत!

0
Anupam Kher: चित्रपटाच्या सेटवर अनुपम खेर जखमी; खांद्याला झाली मोठी दुखापत!


अनुपम खेर यांनी पुढे लिहिले, ‘फोटोमध्ये हसण्याचा प्रयत्न खरा आहे! दोन दिवसांनंतर शूटिंग सुरू करणार आहे. तसे, आईने ते ऐकले तेव्हा ती म्हणाली, आणखी स्वतःची बॉडी लोकांना दाखव! त्यौलेच नजर लागली आहे. त्यावर मी उत्तर दिले की, ‘आई! युद्धाच्या मैदानात फक्त योद्धेच पडतात. गुडघ्यावर चालणारे कसे पडतील! हे बोलल्यावर मी आईकडून थप्पड खाता खाता वाचलो.’



Source link

Tejaswini Pandit Birthday: मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या तेजस्विनी पंडितने लावणीचे प्रयोग करून केला होता उदरनिर्वाह!

0
Tejaswini Pandit Birthday: मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या तेजस्विनी पंडितने लावणीचे प्रयोग करून केला होता उदरनिर्वाह!


तेजस्विनी पंडित हिच्या आयुष्यात एक काळ इतका संघर्षमय आला होता की, तिला पडेल ते काम करावे लागत होते. आपल्या आयुष्यातील या कठीण काळाबद्दल स्वतः तेजस्विनी पंडित एका कार्यक्रमात बोलली होती. हा काळ तेव्हा होता, जेव्हा तेजस्विनीच्या कुटुंबावर बरंच कर्ज झालं होतं. लोकांचं कर्ज फेडायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. घरातील जुजबी गोष्टींसाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी बील न भरल्याने त्यांच्या घराची वीज देखील कापली गेली होती. यावेळी तेजस्विनी आणि तिच्या कुटुंबाने तब्बल अडीच महिने मेणबत्तीच्या प्रकाशात काढले.



Source link

Cannes Film Festival: सनी लिओनीचा कान्स फेस्टिवलमधील लूक पाहिलात का?

0
Cannes Film Festival: सनी लिओनीचा कान्स फेस्टिवलमधील लूक पाहिलात का?



Cannes Film Festival 2023: सनी लिओनीचा कान्स फिल्म फेस्टिवलमधील लूक समोर आला आहे.



Source link

सातारा: आंबेघर येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भेकराला जीवदान | पुढारी

0









केडंबे: पुढारी वृत्तसेवा: जावली तालुक्यातील आंबेघर तर्फ मेढा येथे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या भेकरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले. जखमी भेकरावर उपचार करून त्याला जीवदान दिले. ही घटना आज (दि.२२) सकाळी ११ वाजता आंबेघर वाडी येथे घडली.

पाण्यासाठी भटकंती करत असलेले एक भेकर पाण्याच्या शोधात आंबेघर वाडी येथे फिरत असताना या भेकरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यावेळी केळघर गावचे माजी सरपंच सुनील जांभळे, दीपक पवार यांनी त्या भेकराची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्याला पाणी पाजून वन विभागाचे कर्मचारी विश्वास बेलोशे, पांडू जवळ यांनी डॉक्टराला बोलावून जखमी भेकरावर उपचार करून जंगलात सोडले.

सध्या उन्हाचा पारा 35 अंश वर गेल्यामुळे जंगलातील झरे आटल्यामुळे ससे , भेकरी इतर जंगली प्राणी हे गावात किंवा गावाजवळ असलेल्या पाणवट्याच्या पाण्याच्या शोधात फिरत असतात. अशावेळी भटक्या कुत्र्यांकडून असे हल्ले होत असतात. त्यामुळे वन विभागाने जंगलात जंगली प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्राणीप्रेमींकडून होत आहे.

हेही वाचा 











Source link

Aditya Singh rajput: ‘गंदी बात’ फेम अभिनेत्याचा मृत्यू, बाथरुममध्ये अढळला मृतदेह

0
Aditya Singh rajput: ‘गंदी बात’ फेम अभिनेत्याचा मृत्यू, बाथरुममध्ये अढळला मृतदेह



Aditya Singh Rajput Death: आदित्य सिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.



Source link

पुस्तकांचे गाव भिलार देशासाठी आदर्शवत: राज्यपाल | पुढारी

0









पाचगणी, भिलार; पुढारी वृत्तसेवा: महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि.२२) केले. भिलार गावाला राज्यपालांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल बैस म्हणाले की, पुस्तकांचे गाव भिलार पाहायला मिळाले, हे माझे भाग्य आहे. या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. आजकालच्या इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे, ही एक आगळीवेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी राज्यपाल बैस यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन पुस्तकाचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली. तसेच गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयास भेट दिली.

हेही वाचा 











Source link

The Kerala Story: तिसऱ्या आठवड्यातही द केरळ स्टोरीची जादू कायम, कमावले इतके कोटी

0
The Kerala Story: तिसऱ्या आठवड्यातही द केरळ स्टोरीची जादू कायम, कमावले इतके कोटी


‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या. ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.



Source link