Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3017

Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या चाहत्यांनी ‘मन्नत’समोरच केला ‘गिनीज रेकॉर्ड’! अभिनेताही झाला सामील

0
Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या चाहत्यांनी ‘मन्नत’समोरच केला ‘गिनीज रेकॉर्ड’! अभिनेताही झाला सामील


ऊन, पाऊस, थंडी सगळं विसरून चाहते ‘मन्नत’ शाहरुखची वाट पाहत उभे असतात. किंग खान देखील ‘मन्नत’च्या बाल्कनीत येऊन त्याच्या चाहत्यांची भेट घेतो. नुकताच शाहरुख खान चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी बाल्कनीत आला होता. मात्र यावेळी चाहत्यांनीच शाहरुखला सरप्राईज दिले.कडक उन्हात शाहरुखच्या बंगल्याबाहेर हजारो चाहते जमले होते. यादरम्यान एक अनोखा विक्रम झाला. १८जून रोजी शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. या निमित्ताने चॅनलचा लोगो असलेले टी-शर्ट परिधान केलेल्या सुमारे ३०० चाहत्यांनी एकाचवेळी शाहरुख खानची आयकॉनिक पोज करत गिनीज रेकॉर्ड नोंदवला आहे.



Source link

सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळ जवळ कंटेनर पेटला | पुढारी

0









पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळच्या अलीकडे धनगरवाडीच्या हद्दीत रात्री बाराच्या सुमारास कंटेनरला आग लागल्याने कंटेनर पूर्णतः जळून खाक झाला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे.

या संदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बाराच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावर धनगरवाडी येथे कंटेनरच्या केबिनमध्ये झालेल्या शॉट सर्किटने कंटेनरला आग लागली. आगीने मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण केले. यामध्ये कंटेनर या लागलेल्या आगीत जळून खाक झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान घटनेनंतर बराच वेळ घटनास्थळावर कोणतीही पोलीस यंत्रणा अथवा ट्रॉफिक पोलस पोहोचले नव्हते. त्यामुळे महामार्गावरील वाहन सुरक्षितेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा : 











Source link

Rajinikanth-Amitabh Bachchan: तब्बल ३२ वर्षांनी एकत्र दिसणार थलायवा अन् बिग बी; चाहतेही झाले उत्सुक!

0
Rajinikanth-Amitabh Bachchan: तब्बल ३२ वर्षांनी एकत्र दिसणार थलायवा अन् बिग बी; चाहतेही झाले उत्सुक!


सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘जेलर’चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात रजनीकांत जेलर मुथुवेल पांड्यानच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रियांका मोहन, शिवा राजकुमार, जॅकी श्रॉफ, राम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी, विनायकन यांच्यासह अनेक कलाकार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. इतकेच नाही तर, मल्याळम अभिनेता मोहनलाल देखील या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. तर, दुसरीकडे रजनीकांत लवकरच ‘थलायवर १७०’चे शूटिंग सुरू करू शकतात, असे देखील म्हटले जात आहे. रजनीकांत यांच्या करिअरमधील हा १७०वा चित्रपट आहे, त्यामुळे चित्रपटाचे नाव ‘थलायवर १७०’ ठेवण्यात आले आहे.



Source link

सातारा : पिस्तुलाच्या धाकाने खंडणी मागणारी टोळी जेरबंद | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  मेणवली (ता. वाई) येथे हॉटेल व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवून 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन दरोडा टाकणार्‍या टोळीस स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व भुईज पोलिसांनी जेरबंद केले. वाई, भुईंज आणि पुण्यातून 11 जणांना अटक केली आहे. 1 जून रोजी दरोड्याची घटना घडली होती.

अनिकेत ऊर्फ बंटी जाधव, आरिफ सिकंदर मुल्ला, सागर तुकाराम मोरे, अभिमन्यू शामराव निंबाळकर, सूरज मुन्ना शेख, संदीप सुरेश पवार,क्षितीज उर्फ सोन्या विरसेन जाधव, गिरीष दिलीप गवळी, प्रज्वल बाळकृष्ण पवार, प्रतीक प्रकाश सूर्यवंशी, रत्नाकर मधुकर क्षीरसागर व निलेश उमेश मोरे ( सर्व रा. भुईंज, ता. वाई), अभिजीत शिवाजी मोरे, निखिल शिवाजी मोरे (रा. गंगापूरी, ता. वाई), अमोल महामुलकर (रा. महामुलकरवाडी, ता. वाई) यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. यातील 11 जणांना अटक करण्यात आली असून तिघे जण कळंबा जेलमध्ये आहेत. तर एकाचा शोध सुरू आहे.











Source link

Taarak Mehta: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर कलाकारांना मारहाणही होते! ‘बावरी’चे गंभीर आरोप

0
Taarak Mehta: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर कलाकारांना मारहाणही होते! ‘बावरी’चे गंभीर आरोप


या मुलाखतीत मोनिकाला तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनामागे कोणाचा हात असू शकतो असा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर तिने क्षणाचाही विलंब न लावता प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी याचे नाव घेतले. अभिनेत्रीचा दावा आहे की, रमाणी खूप वाईट आहे. त्याच्या इतकी वाईट वागणूक देणारा इतर कोणतेही प्रोजेक्ट हेड असूच शकत नाही, असे देखील तिने म्हटले आहे. मोनिका म्हणते की, काही कलाकार देखील चुकीचे असू शकतात आणि तारक मेहता का उल्टा चष्माची टीम देखील चुकीची असू शकते. यावेळी अभिनेत्रीने असा दावाही केला की, सोहेल इतका वाईट वागतो की कधी कधी भांडण हाणामारीपर्यंत पोहोचते.



Source link

आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची भाजपची मागणी | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप महिला मोर्चाध्यक्ष चित्रा वाघ यांची मानहानी आणि बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप महिला आघाडीच्यावतीने पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून चित्रा वाघ यांचे चारित्र्य हनन झाले आहे. चित्रा वाघ यांची बदनामी करून त्रास देण्याचा प्रकार आ. आव्हाड यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुनिशा शहा, शहराध्यक्षा रीना भणगे, तालुकाध्यक्ष मोनाली पवार, जिल्हा उपाध्यक्ष सविता पवार, वैष्णवी कदम, माजी नगरसेविका हेमांगी जोशी, निशा जाधव, संगीता जाधव, कुंजा खंदारे, अश्विनी हुबळीकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.











Source link

वीज पोल शिफ्टिंगचा प्रस्ताव सादर करा | पुढारी

0


लोणंद : पुढारी वृत्तसेवा माऊलींच्या पालखी मार्गावरील लोणंद शहरातून जाणार्‍या रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे पोल शिप्ट करून तारा भूमिगत नेण्याच्या कामाचा प्रस्ताव सादर करावा. विशेष बाब म्हणून प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न केला जाईल. नवीन पालखी तळासाठीही सहकार्य केले जाईल. वारकर्‍यांना सर्व सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ते पूर्ण करून घेण्यासाठी वारकर्‍यांना सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सार्ववनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी दिली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पालखी मार्ग व मुक्काम ठिकाण आदींची पाहणी करताना लोणंद येथील पालखी तळावर ना. रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके-पाटील, तहसिलदार चेतन मोरे, बीडिओ अनिल कुमार वाघमारे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड ,सपोनि विशाल वायकर, उप अभियंता सचिन काळे, ज्येष्ठ नेते सुभाष क्षीरसागर, सतीश भोसले ,बापूराव धायगुडे -पाटील, राहुल घाडगे, ऋषिकेश धायगुडे- पाटील, अतुल पवार, गणेश शेळके-पाटील, विशाल पावसकर, संदीप पावसकर, नगरसेविका तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, संदीप शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ना. रविंद्र चव्हाण म्हणाले, प्रत्येक विभागांना देण्यात आलेल्या जबाबदार्‍या या वेळेवर पूर्ण करून घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा यावेळी यावर्षी जुलै ऐवजी जून महिन्यात येत आहे. उन्हापासून वारकर्‍यांचे सरंक्षण होण्यासाठी पालखी मार्गावर मंडप टाकण्याचे नियोजन केले जात आहे.

माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे वारकर्‍यांना नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून पालखी तळात वाढ व्हावी. यासाठी लोणंदच्या विकास आराखड्यामध्ये नगरपंचायतीने फलटण रोडवर 16 एकर क्षेत्र पालखी तळासाठी आरक्षित केले आहे. या नवीन पालखी तळासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल असेही ना. चव्हाण म्हणाले. दरम्यान, यावेळी हर्षवर्धन शेळके-पाटील, राहुल घाडगे, संदीप शेळके यांनी ना. चव्हाण यांच्याकडे समस्या मांडल्या. याप्रसंगी तेजस क्षीरसागर, रवींद्र भोसले, प्राजीत परदेशी, नवनाथ शेळके उपस्थित होते.



Source link

Rubina Dilaik: रुबिना दिलैकच्या कारचा अपघात; अभिनेत्री थोडक्यात बचावली!

0
Rubina Dilaik: रुबिना दिलैकच्या कारचा अपघात; अभिनेत्री थोडक्यात बचावली!


अभिनव शुक्ला याच्या ट्विटमध्ये त्याने म्हटलेय की, त्यांच्यासोबत आज जे घडले आहे, ते कधीही कुणासोबतही होऊ शकते. ट्रॅफिक टाईममध्ये गाडी चालवत झासताना फोनवर बोलत, सिग्नल मोडणाऱ्या आणि हसत हसत उभे राहणाऱ्या अशा मूर्खांना टाळण्याचा सल्ला अभिनेत्याने दिला आहे. पुढे रुबिनाच्या हेल्थ अपडेटची माहिती देताना त्याने लवकरच आपण संपूर्ण माहिती देऊ असे लिहिले आहे. रुबिना याच गाडीतून प्रवास करत होती, मात्र ती ठीक आहे. अभिनवने तीअल मेडिकल चेकअपसाठी नेले आहे.



Source link

Shah Rukh Khan: ‘मन्नत’ बाहेर जमलेल्या चाहत्यांना शाहरुख खानने दिलं सरप्राईज! व्हिडीओ बघाच…

0
Shah Rukh Khan: ‘मन्नत’ बाहेर जमलेल्या चाहत्यांना शाहरुख खानने दिलं सरप्राईज! व्हिडीओ बघाच…


नुकतेच शाहरुख खानच्या घराबाहेर म्हणजेच ‘मन्नत’चे अनेक चाहते जमले होते. यादरम्यान, चाहते खूप गोंगाट करताना दिसले आणि ते त्यांच्या आवडत्या सुपरस्टारला पाहण्यासाठी खूप उत्सुक दिसत होते. जेव्हा, शाहरुख खानला याची माहिती मिळाली, तेव्हा अभिनेता देखील त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी ‘मन्नत’च्या बाहेर बाल्कनीमध्ये आला. शाहरुख खानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत.



Source link

व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल; पारंपरिक शिक्षणाला फाटा | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यामुळे पुढील उच्च शिक्षणाची प्रवेश सुरु झाले आहेत. परंतु, विद्यार्थ्यांकडून पारंपरिक शिक्षणाला फाटा देत नोकरी देणार्‍या शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्याक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्याद़ृष्टीने विद्यार्थी व पालक ‘पुढारी एज्यु दिशा’ या शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देवून माहिती घेत आहेत. दरम्यान, प्रवेशासाठी सीईटी निकालाची प्रतीक्षा असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व अकृषी विद्यापीठात नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम या वर्षापासून सर्व विद्यापीठात सुरु होणार आहे. त्यामुळे हे नवीन शैक्षणिक धोरण कसे असेल याबाबत कुठे उत्सुकता तर कुठे संभ्रमही आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पदवी प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. पारंपरिक शिक्षणाचे प्रवेश सुरु झाले आहेत.

पारंपरिक शिक्षणात पदवी घेवूनही नोकरीची शाश्वती कमी असल्याने इंजिनिअरिंग, वैद्यकीय, औषध निर्मितीशास्त्र, कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जात आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उद्योजकता विकास आणि नोकरीसाठी आवश्यक असणार्‍या कौशल्य निर्मितीवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. परंतु, हे प्रवेश सीईटी परीक्षेवर आधारित होत असल्याने विद्यार्थ्यांना आता सीईटी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

महाविद्यालये व अभ्यासक्रमासाठी भिरकीट

व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालयांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. करिअरसाठी अभ्यासक्रम निवडताना पालक व विद्यार्थ्यांकडून कॉलेज कॅम्पस, सोयी सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व नोकरीच्या संधी याची खातरजमा करण्यासाठी भिरकीट सुरु आहे.

तुलनेने कमी प्रवेश शुल्कामध्ये बीबीए, बीसीए या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. सर्वोकृष्ट शिक्षण, परिपूर्ण मार्गदर्शन व नोकरीची हमी असल्याने प्रवेशासाठी गर्दी होत आहे.
डॉ.बी. एस. सावंत, संचालक, केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च.











Source link