Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3018

तिशीतच थायरॉईडची व्याधी; रुग्णांत 80 टक्के महिला; बदलत्‍या जीवनशैलीचा परिणाम, व्यायाम, आयोडिनची कमतरता | पुढारी

0









सातारा, मीना शिंदे : प्रदूषण, चुकीचा आहार-विहार, आयोडिनची कमतरता, व्यायामाचा अभाव यामुळे कमी वयातच शरीरातील थायरॉईडच्या घटकांचा असमतोल निर्माण होत आहे. परिणामी तिशीतील तरुणाई थायरॉईडची शिकार होत असून त्यासंबंधित विविध आजार जडत आहेत. व्यक्तिगत आरोग्याकडे महिलांचे दुर्लक्ष होत असल्याने थायरॉईड रुग्णांमध्ये 80 टक्के महिला रुग्ण असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मानवी शरीर विविध ग्रंथी व मांसपेशींनी बनलेले आहे. गळ्याच्या भागात फुलपाखराच्या आकाराची थायरॉईड ग्रंथी असते. डोक्यापासून पायापर्यंत सर्वच अवयवांना आवश्यक असलेले हार्मोन्स (संप्रेरके) तयार करण्याचे काम या थायरॉईड ग्रंथी करतात. शरीरातील थायरॉईडचे असंतुलन इतर अवयवांंच्या कार्यप्रणालीवर परिणाम करतात. यामुळे हृदयविकार, हाडांचे आजार, शरीराची वाढ खुंटणे, वजन जास्त वाढणे किंवा अतिशय कमी होणे, शरीरात गुंतागुंत निर्माण होणे आदी त्रास होतो. महिलांमध्ये पाळी येण्यातली अनियमितता हे थायरॉईडसंबंधी विकाराचे प्रमुख लक्षण आहे. पाळीमधल्या अनियमिततेमुळे अनेक मुलींच्या मनात थायरॉईडचा धसकाच बसत आहे. पुढे गर्भधारणेचा विचार करताना अनेक प्रश्न त्यांना भेडसावतात.

थायरॉईडमुळे उद्भवतात हे आजार

थायरॉईडमुळे ग्रंथीची होणारी अनिर्बंध वाढ म्हणजे गलगंड. हायपो किंवा हायपर थायरॉईडिझममध्ये ही स्थिती येऊ शकते. तसेच आयोडिनची मात्रा कमी झाल्यानेही गलगंड होतो. थायरॉईडच्या पेशीतून स्रवणारे हार्मोन्स कमी पडल्यास त्या त्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. त्यातून त्या अवयवाशी संबंधित आजार जडतात. जर मेंदूला थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडले तर मेंदूशी निगडित आजार उद्भवतात. त्याचप्रमाणे हृदय, पेशी, स्नायू, हाडे अशा विविध अवयवांमध्ये थायरॉईडच्या असंतुलनामुळे संबंधित आजार बळावतात. गरोदर मातांच्या आहारात आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास जन्माला येणार्‍या बाळात थायरॉईड ग्रंथीशी संबंधित समस्याही आढळू शकतात.











Source link

Karad Accident : कराडजवळ अपघात! एका मागून एक पाच कार धडकल्या | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड येथील पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पाच कार एकमेकांना धडकल्याची घटना घडली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवार (दि. १०) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत महेंद्र हॉटेलजवळ सातारा बाजूकडून कराड बाजूकडे भरधाव वेगात वाहने येत होती. अचानकपणे एका कार चालकाने ब्रेक मारल्याने त्या कारच्या पाठोपाठ असलेल्या चार कार एकमेकांवर आदळल्या. या अपघातात अनेक कारच्या पुढील भागाचे तसेच बाॅनेटचे व पाठीमागील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच वाहतूक शाखेच्या सपोनी सरोजिनी पाटील या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अपघातानंतर महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान पुढील वाहन चालकांनी ब्रेक का मारला याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा











Source link

Tu Chal Pudha: प्रतीकची सोबत मिळवण्यासाठी मयुरी उचलणार कठोर पाऊल! अश्विनीच्या संस्कारांना धक्का लागणार?

0
Tu Chal Pudha: प्रतीकची सोबत मिळवण्यासाठी मयुरी उचलणार कठोर पाऊल! अश्विनीच्या संस्कारांना धक्का लागणार?


नाशिकला असलेल्या अश्विनीला फोन करून शिल्पीने तिचे कान भरले. स्वतः रचलेल्या या डावात प्रतीकला अडकवण्यासाठी तिने त्याला एका ठिकाणी बोलवले आणि अश्विनीला देखील तिथेच लपून राहायला सांगितले. तर, यावेळी शिल्पीने स्वतः रचलेल्या डावाचा सगळा दोष प्रतीकवर ढकलून त्याने मयुरीचा कसा गैरफायदा घेतला, असं खोटं चित्र तिने अश्विनीसमोर उभं केलं आहे. प्रतीकबद्दल ऐकताच अश्विनीचा देखील मोठा गैरसमज झाला आहे. प्रतीकचं हे रूप पाहून अश्विनीला देखील धक्का बसला. या पुढे मयुरीच्या आस-पास देखील दिसायचं नाही, अशी तंबीच तिने प्रतीक दिली आहे.



Source link

Rang Maza Vegla: आई-वडिलांना एकत्र आणण्याचा दीपिकाचा प्रयत्न सफल होणार? ‘रंग माझा वेगळा’ नव्या वळणावर…

0
Rang Maza Vegla: आई-वडिलांना एकत्र आणण्याचा दीपिकाचा प्रयत्न सफल होणार? ‘रंग माझा वेगळा’ नव्या वळणावर…


‘रंग माझा वेगळा’या मालिकेचं कथानक आता १४ वर्षांनी पुढे गेलं आहे. या लीपनंतर आता मालिकेचं कथानक पुढे गेलं आहे. दिपामुळे आपल्याला शिक्षा झाली, असा गैरसमज झालेला कार्तिक तिच्यावर सूड उगवत आहे. मात्र, याची कल्पना असून देखील दीपा कार्तिकला पुन्हा एकदा त्याचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करताना दिसणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे कथानक पाहायला मिळणार आहे.



Source link

Kajol: काजोलने ‘या’मुळे केला सोशल मीडियाला रामराम! कारण ऐकून चाहत्यांनी मारला कपाळावर हात

0
Kajol: काजोलने ‘या’मुळे केला सोशल मीडियाला रामराम! कारण ऐकून चाहत्यांनी मारला कपाळावर हात


Kajol Social Media Exit Reason: बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या सोशल मीडियाला रामराम करण्याच्या निर्णयावरून चर्चेत आली आहे. ‘मी माझ्या आयुष्यात सध्या अतिशय कठीण टप्प्यातून जात आहे’, असे म्हणत काजोलने सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता यामागचे कारण स्पष्ट झाले असून, हे कारण जाणून घेतल्यानंतर आता चाहते चांगलेच वैतागले आहेत. काजोल नेहमीच आपला मुद्दे बेधडकपणाने मांडते. लाखोंची कमाई करूनही, भाजी विक्रेत्याशी भाव करणे असो किंवा स्वस्त वस्तू खरेदी करणे असो, तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती नेहमीच चर्चेत असते. यातच काजोलची पोस्ट वाचून चाहत्यांना वाटले होते की, कदाचित अभिनेत्रीच्या आयुष्यात काही मोठी समस्या आहे. पण, आता तिच्या आयुष्यातील तो कठीण टप्पा कोणता होता, हे समोर आले आहे. मात्र, आता चाहते अभिनेत्रीवर जोरदार टीका करत आहेत.



Source link

OMG 2: अक्षय कुमारचं अघोरी रूप! ‘ओएमजी २’च्या पोस्टरवरून पुन्हा नवा वाद उसळणार?

0
OMG 2: अक्षय कुमारचं अघोरी रूप! ‘ओएमजी २’च्या पोस्टरवरून पुन्हा नवा वाद उसळणार?


‘ओएमजी २’मध्ये अक्षय कुमार सोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी हा चित्रपट शिक्षण व्यवस्थेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह, राजेश शाह, अश्विन वर्दे आणि अक्षय कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित राय आहेत. या आधी ‘ओएमजी’ अर्थात ‘ओह माय गॉड’ २०१२ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि परेश रावल मुख्य भूमिकेत झळकले होते.



Source link

Mahabaleshwar Temperature : महाबळेश्वरमध्ये दाट धुक्याची चादर, ऐन उकाड्यात पर्यटकांना मोठा दिलासा.

0



<p>महाबळेश्वरमध्ये दाट धुक्याची चादर, ऐन उन्हाळ्यात धुक्याची चादर पसरल्यानं उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसह पर्यटकांना मोठा दिलासा..&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Varun-Lavanya Engagement: दणक्यात पार पडला वरुण अन् लावण्याचा साखरपुडा; रामचरणसह अल्लू अर्जुनचीही हजेरी

0
Varun-Lavanya Engagement: दणक्यात पार पडला वरुण अन् लावण्याचा साखरपुडा; रामचरणसह अल्लू अर्जुनचीही हजेरी


लावण्या त्रिपाठी या साखरपुड्यासाठी वरुण तेजच्या घरी पोहोचली. यादरम्यान, ती पिवळी साडी नेसून आणि केसात फुलं घालून खूप सुंदर दिसत होती. तर, वरुणचा चुलत भाऊ, सुपरस्टार अल्लू अर्जुन, त्याच्या कुटुंबासह सेलिब्रेशनमध्ये सामील झाला. ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन बेज रंगाचा कुर्ता परिधान केलेला. आता सगळ्यांना या लग्नाची प्रतीक्षा आहे. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील हे ग्रँड वेडिंग असणार आहे. मात्र, साखरपुड्यामध्ये केवळ कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता.



Source link

Kuldeep Pawar : रांगडा नायक अन् बेरकी खलनायक! कुलदीप पवार यांच्या दमदार अभिनयाने जिंकलेलं प्रेक्षकांचं मन!

0
Kuldeep Pawar : रांगडा नायक अन् बेरकी खलनायक! कुलदीप पवार यांच्या दमदार अभिनयाने जिंकलेलं प्रेक्षकांचं मन!


‘दरोडेखोर’ या चित्रपटाने कुलदीप पवार यांच्या कारकिर्दीला नवे वळण दिले. ‘अरे संसार संसार’ या चित्रपटामधील रांगडा शेतकरी त्यांनी जसा साकारला, तितक्याच ताकदीने त्यांनी ‘शापित’ चित्रपटातील खलनायकही गाजवला. ‘जावयाची जात’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘खरा वारसदार’ हे त्यांचे मराठी चित्रपट तुफान गाजले. छोट्या पडद्यावरची त्यांची ‘डिटेक्टीव्ह परमवीर’ ही मालिका देखील खूप गाजली होती.



Source link

Tejasswi Prakash Birthday: इंजिनिअर होण्याचं स्वप्न बाळगलं अन् अभिनेत्री बनली तेजस्वी प्रकाश! ‘असा’ सुरू झाला प्रवास

0
Tejasswi Prakash Birthday: इंजिनिअर होण्याचं स्वप्न बाळगलं अन् अभिनेत्री बनली तेजस्वी प्रकाश! ‘असा’ सुरू झाला प्रवास


तेजस्वी प्रकाश हिचा जन्म १० जून १९९३ रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झाला. मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या तेजस्वीचे कुटुंब संगीताशी जोडलेले. तेजस्वीचे वडील प्रकाश वायंगणकर हे स्वतः संगीतकार आहेत. तर, तेजस्वी देखील अभिनयासाठीच नाही, तर गाण्यासाठीही प्रसिद्ध आहे. तेजस्वी एक भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. तेजस्वीने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. पण, अभिनेत्री बनण्यासाठी तिने अभियांत्रिकी सोडून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला.



Source link