Monday, July 6, 2026
Home Blog Page 3012

सातारा : …तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन करु : सुशांत मोरे | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा शहराचे वैभव असलेला पोवई नाका अर्थात शिवतीर्थाचे नाव केवळ राजकीय दडपशाहीच्या जोरावर बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पायदळी तुडवून नामांतरणाचा घाट घातला जात आहे. ही बाब सातारकरांना बिलकुल मान्य नाही. त्यामुळे हा प्रकार त्वरित थांबवावा अन्यथा सातारकरांच्या अस्मितेसाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन करु. प्रसंगी न्यायालयाचे दरवाजेही ठोठवावे लागतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

निवेदनात, इतिहासात चौथी राजधानी म्हणून सातारा शहराचा नावलौकीक आहे. सातारा शहरातील पोवईनाका येथील शिवछत्रपतींची मूर्ती परिसर हा संपूर्ण महाराष्ट्रात शिवतीर्थ म्हणून ओळखला जातो. हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणा देणारे नांव आणि ओळख सातारकर कदापी संपुष्टात आणणार नाहीत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल समस्त सातारकरांना नितांत आदर व प्रेम आहे.

स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार शिवतीर्थ (पोवईनाका या परिसराला लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामांकरण करणे आणि शिवतीर्थ परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई यांची म्युरोल (तैलचित्र) उभारणेकामी नुकतीच पालकमंत्री महोदयांनी मिटींग घेवून प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हाधिका-यांकडे पाठवला आहे. पोवईनाका येथील शिवतीर्थ परिसराचे सुशोभिकरणावरून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास प्रेमी आणि नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. तरीही अनुदान येत आहे, मात्र प्रत्यक्षात कारवाई नाही. त्यामुळे सातारकरांच्यात तीव्र नाराजी आहे. त्यातच चौकाच्या नामांतराचा प्रस्ताव समोर येत आहे. ही गोष्ट सातारकरांना मान्य आणि कबुल नाही.

कोणत्याही चौकाचे नामांतरण अथवा म्युरोल उभारणी करताना पूर्व सूचना तसेच हरकती मागवणे क्रमप्राप्त आहे. असे असताना राजकीय दडपशाहीच्या जोरावर हा विषय हाताळला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि तेथील नागरिकांचे मत विचारात न घेता कोणतीही कारवाई आपण करू नये. अन्यथा जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारून वेळ पडल्यास आत्मक्लेश आंदोलन करून न्यायालयाचे दार ठोठवावे लागेल आणि होणा-या परिणामास जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र शासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

हेही वाचा :  

 











Source link

Sushant Singh Rajput: ‘एक दिवस मीही शाहरुखच्या बंगल्यात…’, सुशांतची इच्छा राहिली अपूर्ण

0
Sushant Singh Rajput: ‘एक दिवस मीही शाहरुखच्या बंगल्यात…’, सुशांतची इच्छा राहिली अपूर्ण


सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) हे बॉलिवूडमधील असं नाव आहे जे चाहत्यांच्या मनातून कधीही पुसलं जाणार नाही. १४ जून २०२० रोजी सुशांतचा राहत्या घरी मृत्यू झाला. मात्र आजही त्याच्या आठवणी चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. सुशांतने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली होती. त्याची अनोखी स्टाइल प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. कोणताही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये त्याने आपला वेगळा ठसा उमटवला. आपल्या मनमिळावू वागण्याने त्याने चाहत्यांना आपलंस केलं. त्यामुळेच त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता. आज त्याच्या स्मृतिदिनी त्याचे अनेक किस्से सोशल मीडियावर वायरल होत आहेत. परंतु, सुशांतने शाहरुखच्या मन्नत बाहेर बसून व्यक्त केलेली इच्छा त्याने खरी करून दाखवली होती हे तुम्हाला ठाऊक आहे का?



Source link

Kangana Ranaut: कंगना रणौत चढणार बोहल्यावर? लग्नपत्रिका वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल

0
Kangana Ranaut: कंगना रणौत चढणार बोहल्यावर? लग्नपत्रिका वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कंगनाच्या घराला लायटिंग केल्याचे दिसत आहे. त्यानंतर कंगना नटूनथटून घरातून बाहेर येते. तिला अशा लूकमध्ये पाहाताच फोटोग्राफर्स विचारतात “तुम्ही खरोखर लग्नबंधनात अडकणार आहात का?” त्यावर कंगना त्यांना म्हणते की, “बातम्या तर तुम्ही देता. मी फक्त आनंदवार्ता देते.” त्यानंतर ती तिच्या लग्नाची पत्रिका मीडिया रिपोर्टर्सना देते आणि म्हणते, “तुम्ही सगळे नक्की या.”



Source link

Tuja Maja Sapan: वीरूच्या डोळ्यांतलं स्वप्न प्राजक्ता टिपणार; कुस्तीपटूंवर आधारित नवी मालिका येणार

0
Tuja Maja Sapan: वीरूच्या डोळ्यांतलं स्वप्न प्राजक्ता टिपणार; कुस्तीपटूंवर आधारित नवी मालिका येणार


प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मालिकेत प्राजक्ता आणि वीरेंद्र यांच्या प्रेमाचे तुफान कसे येणार, हे पाहायला मिळेल. मालिकेत दोघेही कुस्तीपटू दाखवले आहेत आणि एखाद्या मालिकेत कुस्तीपटूंची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. कुस्ती या दोघांना कशा प्रकारे एकत्र आणेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. वीरूच्या डोळ्यांतले त्याचे स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल का आणि त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांना कशा प्रकारे पाहायला मिळेल, हे आपल्याला मालिकेत दिसणार आहे. मालिका १९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

Tirthanand Rao: फेसबुकवर लाइव्ह येऊन कॉमेडियनचा आत्मकत्या करण्याचा प्रयत्न, काय आहे कारण?

0
Tirthanand Rao: फेसबुकवर लाइव्ह येऊन कॉमेडियनचा आत्मकत्या करण्याचा प्रयत्न, काय आहे कारण?


आत्महत्या करण्यापूर्वी तिर्थानंद फेसबुकवर लाइव्ह आला होता. त्यावेळी त्याने एक महिला सतत धमकी देत असल्याने इतके टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले. ‘काही महिन्यांपूर्वी माझी एका महिलेशी ओळख झाली. हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो आणि लिव्ह इनमध्ये राहू लागलो. काही दिवसांनी मला कळाले की ती प्रॉस्टीट्यूट आहे. मी कसंबसं या सगळ्यातून बाहेर पडलो. मात्र, ती मला धकम्या देऊ लागली. तिने माझ्यावर केस केली आहे. या केसमुळे मी स्वत:च्या घरापासून पळत आहे. फुटपाथवर झोपावे लागत आहे. त्यामुळे मी स्वत:ला संपवत आहे’ असे तिर्थानंद म्हणाला होता.



Source link

Kirron Kher: पहिल्या घटस्फोटानंतर खचलेल्या अनुपम खेरला दिला किरणने आधार, जाणून घ्या लव्हस्टोरी

0
Kirron Kher: पहिल्या घटस्फोटानंतर खचलेल्या अनुपम खेरला दिला किरणने आधार, जाणून घ्या लव्हस्टोरी


अनुपम खेर आणि किरण खेर सुरुवातीला एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. किरण खेर चंदिगडमध्ये ज्या थिएटर ग्रुपशी संबंधित होत्या, त्याच थिएटर ग्रुपमध्ये अनुपम खेर देखील होते. त्यावेळी किरण खेर या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तर, अनुपम हे संघर्ष करत होते. दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले. मात्र, दोघांचे आधीच लग्न झालेले होते. अनुपम खेर यांनी १९७९मध्ये अरेंज मॅरेज केले होते, पण ते या नात्यातून काहीच वर्षात वेगळे झाले होते. तर, किरण यांचे लग्न १९८०मध्ये मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती गौतम बेरी यांच्याशी झाले होते. मात्र, त्यांचा संसार अवघा पाच वर्षेच टिकला.



Source link

सफाई कामगार कॉलनी येथे राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेला टवाळखोर मुलांकडून त्रास

0
सफाई कामगार कॉलनी येथे राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेला टवाळखोर मुलांकडून त्रास

फलटण : सफाई कामगार कॉलनी येथे राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेचा तेथील काही टवाळखोर मुलांकडून त्रास दिला जात आहे. सिंधू साळवे असे वयोवृद्ध महिलेचे नाव असून गेल्या महिन्याभरापासून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

साळवे यांच्या घराशेजारी दिवस रात्र खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या गोंधळामुळे, मोठमोठ्या फटाक्यांच्या आवाजामुळे त्यांची एका कानाची शिर बंद झाली असून त्यामुळे त्यांना बहिरेपणा आला आहे. साळवे यांनी अनेक वेळा मुलांना घराजवळ न खेळण्याचा सल्ला दिला बऱ्याच वेळा समजून सांगितले. मुलांसोबत वाद देखील झाले पण याचा मुलांवर काही परिणाम झाला नाही. या उलट टवाळखोर मुलांनी त्यांच्यापेक्षा लहान मुलांना हाताशी धरून साळवे यांना आणखी जास्त त्रास द्यायला सुरुवात केली.

साळवे यांनी समाजातील काही लोकांना बोलवून मुलांना समजून सांगण्याची विनंती केली. काही दिवस शांत बसून या मुलांनी पुन्हा पहिल्या पेक्षा जास्त त्रास द्यायला सुरुवात केली. रात्री अपरात्री घरावर मोठे मोठे दगड टाकणे, दरवाजा वर जोर जोरात लाथा मारणे, घरात अंधारात घुसून धिंगाना घालणे, काही बोलले तर घरी जाऊन आई वडीलांना त्यांच्या बद्दल खोटी माहिती देऊन भांडण करण्यासाठी पाठविणे, अश्लील हाव भाव करणे. त्यांना पाहून थुंकणे, लाईट गेल्यानंतर घरामध्ये माती टाकणे, त्याच्या अंगावर माती टाकणे रात्रीच्या वेळी अंथरुणावर, अंगावर, तोंडावर माती – कचरा टाकणे असे प्रकार घडत आहेत किंवा घडवून आणले जात आहेत.

या सर्व त्रासाला कंटाळून साळवे यांनी तिथून निघून जावे अशी परिस्थिती आज त्यांच्यावर आली आहे. साळवे यांनी वेळोवेळी सांगून देखील समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांची दखल घेतली नाही. उलट त्या टवाळखोरी करणाऱ्या मुलांचे आई वडील सातत्याने त्यांच्यासोबत भांडण करत आहेत. त्यामुळे साळवे यांनी ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tu Chal Pudha: अखेर मयुरी घर सोडणार! अश्विनीच्या सुखी संसाराला लागणार शिल्पीची नजर

0
Tu Chal Pudha: अखेर मयुरी घर सोडणार! अश्विनीच्या सुखी संसाराला लागणार शिल्पीची नजर


मात्र, यानंतर आता प्रतीकने मयुरीपासून दूर जावं यासाठी अश्विनीने त्याला शहर सोडून जाण्याची अट घातली आहे. या अटीप्रमाणे आता प्रतीक मुंबई सोडून निघून गेला असून, त्याने सगळ्यांशी संपर्क देखील तोडला आहे. मात्र, याच धक्यात आता मयुरीने देखील आपल्याला आईला दोष देत घर सोडलं आहे. शिल्पीच्या डावामुळे आता अश्विनी आणि मायुरीमध्ये मोठी दरी निर्माण होणार आहे. तर, दुसरीकडे शिल्पी याच संधीचा फायदा उचलत सगळ्यांची मन आपल्या बाजूने वळवून घेणार आहे. अश्विनीचा निर्णय कसा चुकला, हे ती आता सगळ्यांना पटवून देणार आहे.



Source link

Sharukh Khan: शाहरुखच्या एका ट्वीटमुळे स्विगीची संपूर्ण टीम पोहोचली मन्नतवर, काय आहे नेमकं प्रकरण?

0
Sharukh Khan: शाहरुखच्या एका ट्वीटमुळे स्विगीची संपूर्ण टीम पोहोचली मन्नतवर, काय आहे नेमकं प्रकरण?


शाहरुखच्या कामाविषयी बोलायचे झाले तर अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये दोघेही आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी एकत्र लढताना दिसणार आहेत. मात्र, या चित्रपटानंतर दोघांमध्ये काय होणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. तसेच त्याचा ‘जवान’ चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त राहुल साळवे यांचा पुढाकार; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पुरवणार मोफत रक्त.

0
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त राहुल साळवे यांचा पुढाकार; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पुरवणार मोफत रक्त.

मुंबई : राहुल सिद्धार्थ साळवे. महाराष्ट्राच्या रक्तदान चळवळीतील हे अग्रेसर असलेले नाव आहे. गेली १२ वर्ष Helping Hands For Blood च्या माध्यमातून, राहुल यांनी हजारो अगणित लोकांचे प्राण वाचवले आहे. रक्त आणि रक्तदान या सगळ्यात होणाऱ्या काळाबाजारा विरोधात आवाज उठवत लोकांच्या हक्कांसाठी झटणारा हा तरुण सामाजिक कार्यकर्ता, त्याच्या काम करण्याच्या शैलीने लोकांसाठी हक्काचा ‘रक्ताचा माणूस’ झाला आहे.

कोविडच्या काळात राहुल साळवे यांनी केलेले काम कमालीचे होते. याचसोबत ब्रेस्ट कॅन्सर असो – थायलेसिमिया असो की सरकारी परिचारिका असो. यांच्यासाठी रक्ताच्या अनुषंगाने राहुल यांनी केलेल्या कामाची माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील दाखल घेतली आहे. महाराष्ट्रात पहिले मोफत खाजगी ब्लड ट्रांसफ्युजन पुण्यात सुरू करणारा पहिला माणूस राहुल साळवे आहे.

असं म्हंटले जाते की, रक्ताची कोणतीही गोष्ट असो. ती एकदा राहुल कडे गेली की, ती मार्गी लागणारच. आणि अशी अनेक उदाहरण महाराष्ट्रात आहेत. जे स्वतः त्यांचा अनुभव सांगतात. केवळ महाराष्ट्राच नाही तर राज्या बाहेरही आपल्या कामाने लोकांना जीवनदान देणारा राहुल म्हणजे माणूसपणाच्या पुस्तकातला एक वेगळा धडा आहे. तसाच एक धडा राहुल यांनी, यंदाच्या जागतिक रक्तदाता दिना निमित्त सेवेस आणला आहे.

राहुल यांच्या सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, “ज्या शेतकऱ्या मुळे आपल्या ताटात भाकर येते. त्या शेतकऱ्या साठी मी काय करू शकतो? हा विचार माझ्या डोक्यात फिरत होता. आणि एका बाजूला शेतकरी दुष्काळ – कर्जबाजारी याने आत्महत्या करत होता. आणि यातूनच ठरले की, आपल्याला भाकर देणारा शेतकरी निराशेने आत्महत्या करत असेल तर, त्याच्या नंतर त्याच्या कुटुंबासाठी मी काय करू शकतो?” आणि या काय चे उत्तर राहुल यांना सापडले. आणि त्यांनी ठरवले की, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना भविष्यात कधीही त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी रक्ताची गरज लागल्यास, ती राहुल साळवे यांच्या Helping Hands For Blood च्या माध्यमातून मोफत पुरवली जाईल.

राहुल साळवे म्हणतात की, “जो शेतकरी राब राब राबून आपल्याला भाकरी देतो. त्याच्या नंतर त्याच्या कुटुंबीयांना मी जे देऊ शकतो ते देईन. तर मी रक्त देईन.” राहुल साळवे यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्यातल्या वेगळ्या माणसाची आणि सामाजिक कार्यकर्त्याची ओळख करून देणारा आहे.

राहुल साळवे यांच्या कार्याला, त्यांच्या माणूसपणाला सलाम.