Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2978

Satyaprem Ki Katha : बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दिसली कार्तिक-कियाराची जादू; ‘सत्यप्रेम की कथा’ची जोरदार कमाई!

0
Satyaprem Ki Katha : बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दिसली कार्तिक-कियाराची जादू; ‘सत्यप्रेम की कथा’ची जोरदार कमाई!


Satyaprem Ki Katha BO collection: ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला वीकेंडचा अधिक फायदा होऊ शकतो. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत जबरदस्त कलेक्शन केले आहे.



Source link

Rasha Thadani: आणखी एका स्टारकिडचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; रवीना टंडनची लेक ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार!

0
Rasha Thadani: आणखी एका स्टारकिडचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; रवीना टंडनची लेक ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार!


Rasha Thadani Bollywood Debut: अवघ्या १८ वर्षांची राशा थडानी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राशा थडानी दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.



Source link

Baipan Bhari Deva: बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो… ‘बाईपण भारी देवा’बघून भारावले आदेश बांदेकर!

0
Baipan Bhari Deva: बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो… ‘बाईपण भारी देवा’बघून भारावले आदेश बांदेकर!


केदार शिंदे यांनी हा फोटो पोस्ट करत लिहिलं की, ‘गेली कित्येक वर्ष ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने, दार उघड बये दार उघड म्हणत, वहिनींना मानाची पैठणी देणारा, त्यांचं मन जाणून घेऊन त्यांना बोलतं करणाऱ्या आदेश बांदेकरने काल बाईपण भारी देवा हा सिनेमा पाहून कडकडून मिठी मारली. बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हाच कळून चुकतं की, आपल्याला बायकांच्या मनातलं नुसतं ऐकू नाही तर समजू लागलंय’. केदार यांनी लिहिलेल्या या पोस्टवर आता चाहते देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.



Source link

Maharashtra Rains: राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा

0
Maharashtra Rains: राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा


मुंबई, नाशिक, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यांना यलो अर्लट देण्यात आला आहे. तर, पुणे, रायगड आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.



Source link

Animal: प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार! रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

0
Animal: प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार! रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर


संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’मध्ये अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘अ‍ॅनिमल’, ‘गदर २’ आणि ‘ओह माय गॉड २’ यांच्यातील बॉक्स ऑफिस टक्करमध्ये कोणाचे जास्त नुकसान होणार, यावर जोरदार चर्चा रंगली होती. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी शनिवारी ट्विटरवर हे अपडेट शेअर केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट आता ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत नवीन रिलीजची तारीख जाहीर केली जाईल.’



Source link

Satara News : कराडमध्ये दुधात भेसळ करणाऱ्यांचा टोळीचा भंडाफोड

0


सातारा : साताऱ्यातील (Satara News) कराडमध्ये दूध भेसळ (Milk Adulteration)   करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कराड येथील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे आणि हेळगाव या भागातील दुध संकलन केंद्रात भेसळ केली जात होती,  त्यांच्याकडून 9 हजार लिटर बनावट दुध  असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 

कराड येथील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे आणि हेळगाव या भागातील दूध संकलन केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.   दुधात भेसळ करणारी एक टोळी कार्यरत होती. ही टोळी दुधामध्ये पॅराफिन,सोयाबिन तेल,व्हाईट लिक्विड,सोया ऑईलसह इतरही केमिकल मिक्स केले जात होते. दूध संकलन केंद्रातच दूध भेसळ करण्यात येत होती. पोलिसांनी  या नऊ जणांना  ताब्यात  घेतले असून नऊ हजार लिटर बनावट दूध जप्त करण्यात आले आहे. तसेच सुमारे 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

बजरंग जाधव (रा. खराडे कराड),गणेश पनासे (रा. हेळगाव कराड), सोमनाथ कदम (रा. गायकवाडवाडी कराड),शरद घार्गे (रा. नवीन कवठे कराड),सचिन यादव (नवीन कवठे कराड), गणेश मसुगडे (रा. नवीन कवठे कराड),अर्जुन कुमार, श्रीकांत गौतम (रा. उत्तरप्रदेश), विवेक कुमार श्रीरामचंद्र कौतम (रा. उत्तरप्रदेश), अजय कुमार गौतम (रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कारवाई करून भेसळ धंदा बंद का होत नाही? नागरिकांचा सवाल

 दरम्यान सदर भेसळ दूध सापडलेले साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे. तसेच एक टाटा छोटा हत्ती,  महिंद्रा जीतो, पियागो अॅपे, छोटा हत्ती, मारुती रिट्स  ही वाहने जप्त करण्यात आली आहे. दूध व्यवसायातील भेसळ करणाऱ्या छोट्या केंद्रावर कारवाई झाली आहे. मात्र, दुधात भेसळ करणाऱ्या अनेक मोठ्या केंद्राकडे अन्न व औषध प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? तिकडे का कारवाई करून भेसळ धंदा बंद होत नाही? असा सवाल नागरिक करत आहेत.

दूध भेसळ करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई 

भेसळयुक्त दुधामुळे जनतेच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. दूध भेसळ करणाऱ्या खासगी किंवा सहकारी दूध संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तसेच मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण दूध कंपन्यांना बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दुधाचे भाव, दुधातील फॅट आणि एस. एन. एफ. च्या प्रमाणानुसार ठरत असतात. फॅट आणि एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर हवे तसे सेट करता येत असल्यानं सेटिंग बदलून दुधाची गुणवत्ता मारली जाते. 



Source link

Bigg Boss OTT 2: सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी २’ सोडणार? ‘या’ स्पर्धकांवर संतापत म्हणाला…

0
Bigg Boss OTT 2: सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी २’ सोडणार? ‘या’ स्पर्धकांवर संतापत म्हणाला…


आता ‘वीकेंड का वार’ भागामध्ये सलमान खान दोघांना फटकारताना दिसणार आहे. ‘वीकेंड का वार’च्या एपिसोडचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये सलमान खान चांगलाच संतापलेला दिसत आहे. यावेळी सलमान खान म्हणाला की, ‘तुम्हा सर्वांना असे वाटते की, हे कृत्य या आठवड्याचे मुख्य आकर्षण होते. हहा टास्क संगोपन, कुटुंब, नैतिकता, तुमच्या सभ्यतेचे दर्शन घडवण्यासाठी होता. तुम्ही लोकांनी माझी माफी मागण्याची गरज नाही. तुम्ही काहीही केले तरी आता मला काही फरक पडत नाही. मी इथून निघून जात आहे. मी हा शो सोडत आहे.’



Source link

Gadar 2: भारतीय लष्कराकडून ‘गदर २’ला हिरवा झेंडा, सनी देओलच्या चित्रपटाला मिळाली एनओसी

0
Gadar 2: भारतीय लष्कराकडून ‘गदर २’ला हिरवा झेंडा, सनी देओलच्या चित्रपटाला मिळाली एनओसी


Gadar 2 New Update: सनी देओल आणि अमिषा पटेलच्या ‘गदर २’ या चित्रपटाला भारतीय लष्कराने एनओसी दिली आहे.



Source link

Satara Milk : दुध भेसळ करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी पकडलं, 9 हजार लिटर बनावट दूध जप्त

0



<p>साताऱ्यातील कराडमध्ये दुध भेसळ करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कराड येथील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे आणि हेळगाव या भागातील दुध संकलन केंद्रात भेसळ केली जात होती, &nbsp;त्यांच्याकडून 9 हजार लिटर बनावट दुध &nbsp;असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.&nbsp;&nbsp;</p>



Source link

सातारा : दूध भेसळ करणार्‍या टोळीचा पदार्फाश; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा (एलसीबी) आणि अन्न औषध विभागाने कराड तालुक्यात कारवाई करत दूध भेसळ करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे. शनिवारी तालुक्यातील उंब्रजमध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे व हेळगाव येथील दूध संकलन केंद्रांमध्ये दुधात भेसळ होत असल्याचा संशय एलसीबीच्या टीमला आला होता. त्यामुळे या संकलन केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून एक पथक यावर वॉच ठेवून होते. संकलन केंद्रावर भेसळ होत असल्याचे निश्चित झाल्यानंतर शनिवारी दुपारी एकाच वेळी छापा टाकला. छापा पडल्यानंतर सर्वच केंद्रांवर एकच खळबळ उडाली.

या कारवाईत पोलिसांनी संशयितांकडून वाहने, हजारो लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले. याप्रकरणी 9 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अन्न औषधचे अधिकारी माहिती घेत होते. या दुधाचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.











Source link