Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2961

“आता मला तर मुख्यमंत्री व्हायचं नाही, ज्यांनी घडवलं, त्या शिल्पकारालाच….” उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला

0
“आता मला तर मुख्यमंत्री व्हायचं नाही, ज्यांनी घडवलं,  त्या शिल्पकारालाच….” उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला


एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चौफेर टोलेबाजी केली. उद्धव म्हणाले की, प्रत्येकांनी विचार करावा,देणाऱ्याने काही तरी दिलं पाहिजे. मला काही तरी व्हायचं. आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. सदगुरू वामनराव पै यांचं वाक्य आठवतं,तूच तुझ्या जिवनाचा शिल्पकार आहे, हल्ली ज्यांनी घडवलं,त्या शिल्पकारालाच पळवून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. स्वत: काही करायचं नाही, पण ज्यानी घडवलं त्याला पळवून न्यायचं, असे विचित्र प्रकार राज्यात सुरू आहेत’असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार व एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.



Source link

Draupadi Murmu In Mumbai: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा VIDEO

0
Draupadi Murmu In Mumbai: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा VIDEO


Draupadi murmur Mumbai visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले.



Source link

सभागृहात कितीही आले तरी बसता येतं…पण मंत्रिमंडळाची क्षमता वाढवता येत नाही; गडकरींची टोलेबाजी

0
सभागृहात कितीही आले तरी बसता येतं…पण मंत्रिमंडळाची क्षमता वाढवता येत नाही; गडकरींची टोलेबाजी


Nitin Gadkari On Maharashtra Politics:  सभागृहाची क्षमता खूप आहे किती ही लोकं आले तरी बसू शकतात… मात्र मंत्रिमंडळाची क्षमता अशी वाढवता येत नाही… वर्तमान राजकीय परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टोला लगावला आहे. राजकारणातील असमाधानी लोकांबद्दल बोलताना आपला देश आणि समाज अतृप्त आत्म्यांचा महासागर असा सूचक वक्तव्य हे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. विद्यापीठ शिक्षण मंचाच्या गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, समाधान हे मानण्यावर असते. आपल्याला आपली क्षमता आणि पात्रतेपेक्षा जास्त मिळाले आहे असे आपण मान्य केले तर समाधान मिळते. नाहीतर आज सर्वच दुःखी आहे. नगरसेवक दु:खी आहे कारण ते आमदार झाले नाही. आमदार दु:खी आहे की ते मंत्री झाले नाहीत. मंत्री यामुळे दु:खी आहे कारण त्यांना चांगलं खातं मिळालं नाही आणि आता जे मंत्री होणार होते ते यामुळे दु:खी आहे की आता त्यांना संधी मिळते की नाही अशी त्यांना शंका आहे.. कारण आता एवढी गर्दी झाली असल्याचे गडकरी यांनी म्हटले.

नितीन गडकरी एवढ्यावरच थांबले नाही तर गेल्या काही दिवसांपासून मंत्री होऊच अशा आविर्भावात फिरणाऱ्या नेत्यांवरही त्यांनी भाष्य केले. मागील काही दिवस सर्व तयारच होते.. सूट शिवून, घालतो आणि जातो असा त्यांचा तोरा होता. मात्र, आता त्या सुटाचा काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. कारण गर्दीच एवढी झाली आहे. या हॉलची क्षमता जास्त आहे, त्यामुळे किती लोकं आले, तरी ते बसू शकतात.. मात्र मंत्रिमंडळाची क्षमता वाढवता येत नाही… त्यामुळे आपला देश आणि समाज दुखी आत्म्यांचा महासागर आहे असे गडकरी मिश्किलपणे म्हणाले.

रविवारी,  राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांची एन्ट्री झाली. अजित पवारांसह 9 मंत्र्यांचा शपथविधीदेखील पार पडला. अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशानंतर शिवसेना-शिंदे गटात नाराजी असल्याचे दिसते.  राज्याचा मंत्रिमंडळ बरेच दिवस रखडला होता. अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. 

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळेल अशी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना अपेक्षा होती. मात्र, आता शिंदे गटाच्या वाट्याला येणारी मंत्रिपदेदेखील कमी होणार आहेत. त्याच्या परिणामी शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. 



Source link

ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर करा; मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

0
ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर करा; मंत्री अतुल सावे यांचे निर्देश


OBC Students Hostel: राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी मंत्री अतुल सावे (Atul Save) पुढे सरसावले आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने वसतीगृहं उपलब्ध करुन द्यावे, असे मंत्री अतुल सावे यांनी म्हटले आहे. इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठीच्या (OBC Students) वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर कराव्या, असे निर्देश त्यांनी दिले. या शैक्षणिक वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध कसे होतील यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी 36 वसतीगृहे सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसेल, तर संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि  जिल्हाधिकाऱ्यांशी समनव्य ठेवून यावर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश मंत्री अतुल सावे यांनी दिले. त्यानुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 नवीन वसतिगृह उभारले जाणार आहेत.

ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची तात्पुरती सोय व्हावी म्हणून 72 वसतिगृहांसाठी भाड्याने इमारती घेण्याचे निर्देश अतुल सावे यांनी दिले. इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी 72 वसतिगृहं सुरू करण्यासाठी इमारती भाड्याने घेण्यासाठी अडचणी येत असतील, तर त्या दूर कराव्या आणि याबाबत जाहिरात देऊन किंवा निविदा काढून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशदेखील मंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिले.

मंत्रालयात गुरुवारी (6 जुलै) सहकार आणि  इतर मागास-बहुजन  मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत मंत्री अतुल सावे यांनी हे निर्देश दिले. मंत्रालयातील आढावा बैठकीत प्रधान सचिवांना अतुल सावे यांनी आदेश दिले आहेत. यावेळी इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, संचालक, प्रादेशिक उपसंचालक आणि सर्व सहाय्यक आयुक्त संबंधित अधिकारी उपस्थित होते.

याशिवाय या बैठकीत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधारणा योजना, आश्रमशाळांच्या संच मान्यता, बंद पडलेल्या आश्रमशाळांचा आढावा, वसतीगृह अधिक्षक यांच्या वेतन श्रेणीच्या माहितीचा आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या यांचाही आढावा घेण्यात आला. 

धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देणे, धनगर समाजाच्या विकासासाठीच्या विशेष योजना, कन्यादान योजना, मॅट्रीकोत्तर आणि मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या प्रलंबित प्रकरणांचा जिल्हानिहाय आणि वर्षनिहाय माहितीसह आढावा, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या इतर योजना याबाबत जिल्हानिहाय आढावाही मंत्री अतुल सावे यांनी बैठकीत घेतला.

हेही वाचा:



Source link

Amruta Subhash: इंटिमेट सीनसाठी अनुरागने मासिक पाळीची तारीख विचारली होती; अमृता सुभाषचा खुलासा

0
Amruta Subhash: इंटिमेट सीनसाठी अनुरागने मासिक पाळीची तारीख विचारली होती; अमृता सुभाषचा खुलासा



Sacred Games 2: अमृता सुभाषने सेक्रेड गेम्स २ या सीरिजमध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत काम केले होते. आता अमृताने तेव्हाचा अनुभव सांगितला आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीमुळे आशुतोषचा राग अनावर, निर्माण होणार दुरावा

0
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीमुळे आशुतोषचा राग अनावर, निर्माण होणार दुरावा


आशुतोषला उत्तर देत अरुंधती म्हणते की, “वीणाच्या लग्नाची गोष्ट मी मुद्दाम सर्वांपासून लपवलेली नाही. वीणाला भीती वाटत होती की ती सर्वांच्या नजरेतून उतरेल.” तरीही आशुतोष अरुंधतीवर नाराज होतो. आशुतोषला वीणाच्या नवऱ्याला राग आलेला आहे. त्यामुळे तो पोलिसांत तक्रार दाखल करतो आणि सुलेखा ताई, अनिल आणि अरुंधतीला तो यासंदर्भात माहिती देतो. पण आशुतोष मात्र अरुंधतीवर खूप चिडलेला आहे.



Source link

पुणे-बंगळूर महामार्गावर विजापूर-सातारा एसटीचा अपघात; चालक वाहकासह १२ प्रवाशी जखमी | Satara Accident | पुढारी

0









उंब्रज; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कराड सातारा दिशेकडे भरधाव वेगाने जाणारी एसटी मांड नदीवरील पूलाच्या कठड्याला धडकून पलटी झाल्याची घटना घडली. या अपघतात चालक व वाहक यांच्यासह जवळपास दहा ते पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि ६ जुलै) दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास कराडहून सातारा दिशेकडे जाणारी विजापूर-सातारा एसटी (क्रमांक केए-२८-२३५०) चालकाचा ताबा सुटल्याने पूलाच्या कठड्याला धडकून महामार्गावर पलटी झाली. एसटी धडकल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे शिवडे तसेच परीसरातील नागरिकांनी व महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशानी जखमींना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. एसटीमध्ये तीस प्रवाशी होते. या अपघातात जवळपास दहा ते पंधरा प्रवाशी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी पोलिस हवालदार आळंदे, निलेश पवार, भोसले, काळे यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.











Source link

Majhi Tujhi Reshimgath: ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा पुढचा सिझन येणार? श्रेयस तळपदेच्या पोस्टने वेधले लक्ष

0
Majhi Tujhi Reshimgath: ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा पुढचा सिझन येणार? श्रेयस तळपदेच्या पोस्टने वेधले लक्ष


झी मराठी वाहिनीवरील सर्वांची आवडती मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ.’ या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, मायरा वायकुळ, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. मात्र या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.



Source link

Maharashtra politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? उदय सामंतांनी आगामी निवडणुकांचा प्लॅनच सांगितला

0
Maharashtra politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? उदय सामंतांनी आगामी निवडणुकांचा प्लॅनच सांगितला


ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या घडल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.  एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसेनेचे ४० आमदार व १० अपक्ष आमदार राजकारणात ज्येष्ठ आहेत. दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याने मुख्यमंत्री मुंबईत परतल्याचे वृत्त चुकीचे आहे. कालच्या बैठकीत राष्ट्रवादी सोबत जायचे नाही, असे भाषण रामदास कदम यांनी केल्याची माहिती खोडसाळ आहे, असा खुलासा सामंत यांनी केला. पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेचे जास्तीत जास्त मंत्री शपथ घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.



Source link

Maharashtra Politics : शिंदे गट अस्वस्थ.. मंत्रिपद हुकलेले ८ ते १० आमदार ठाकरेंच्या संपर्कात? बड्या मंत्र्याचा खुलासा

0
Maharashtra Politics : शिंदे गट अस्वस्थ.. मंत्रिपद हुकलेले ८ ते १० आमदार ठाकरेंच्या संपर्कात? बड्या मंत्र्याचा खुलासा


विनायत राऊत म्हणाले की, राज्यात गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण सुरू आहे. यामुळे महाराष्ट्राची देशात बदनामी होतेय. अजित पवार व समर्थक आमदारांनी सरकामध्ये एंट्री केल्याने शिंदे गटात नाराजी पसरली आहे. त्यांचा समजूत घालताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीत पंचाईत झाली आहे. अजित पवारांच्या सरकारमध्ये सामील होण्यामुळे शिंदे गटातील आमदारांनी आम्ही ज्या घरात होतो तेच बरं आहे. आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीने साद घातली तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, अशी वक्तव्ये केली आहेत.पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लोक म्हणताहेत,जे होतं तेच बरं आहे,पुनश्च एकदा मातोश्रीची क्षमा मागावी असं वाटतंय, अशी चर्चा चालू असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.



Source link