Friday, August 14, 2026
Homeसातारापुणे-बंगळूर महामार्गावर विजापूर-सातारा एसटीचा अपघात; चालक वाहकासह १२ प्रवाशी जखमी | Satara...

पुणे-बंगळूर महामार्गावर विजापूर-सातारा एसटीचा अपघात; चालक वाहकासह १२ प्रवाशी जखमी | Satara Accident | पुढारी

पुणे-बंगळूर महामार्गावर विजापूर-सातारा एसटीचा अपघात; चालक वाहकासह १२ प्रवाशी जखमी | Satara Accident | पुढारी

[ad_1]








उंब्रज; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कराड सातारा दिशेकडे भरधाव वेगाने जाणारी एसटी मांड नदीवरील पूलाच्या कठड्याला धडकून पलटी झाल्याची घटना घडली. या अपघतात चालक व वाहक यांच्यासह जवळपास दहा ते पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि ६ जुलै) दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास कराडहून सातारा दिशेकडे जाणारी विजापूर-सातारा एसटी (क्रमांक केए-२८-२३५०) चालकाचा ताबा सुटल्याने पूलाच्या कठड्याला धडकून महामार्गावर पलटी झाली. एसटी धडकल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे शिवडे तसेच परीसरातील नागरिकांनी व महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशानी जखमींना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. एसटीमध्ये तीस प्रवाशी होते. या अपघातात जवळपास दहा ते पंधरा प्रवाशी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी पोलिस हवालदार आळंदे, निलेश पवार, भोसले, काळे यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments