Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2960

Dilip Kumar Death Anniversary: ‘मुगल-ए-आझम’ ते ‘देवदास’; ‘या’ चित्रपटांतून दिलीप कुमार झाले अजरामर!

0
Dilip Kumar Death Anniversary: ‘मुगल-ए-आझम’ ते ‘देवदास’; ‘या’ चित्रपटांतून दिलीप कुमार झाले अजरामर!


कर्मा

दिलीप कुमार आणि सुभाष घई यांनी ‘विधाता’ चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केले होते. या चित्रपटात दिलीप कुमार पहिल्यांदाच दिग्गज अभिनेत्री नूतन यांच्यासोबत दिसले होते. या चित्रपटात दिलीप कुमार आणि नूतन यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, पूनम ढिल्लन आणि श्रीदेवी हे कलाकार देखील झळकले होते.



Source link

Maharashtra Politics News | महाराष्ट्रातील दोन ‘अँग्री यंग मॅन’ एकत्र येणार | पुढारी

0


सातारा, हरीष पाटणे : महाराष्ट्राच्या राजकारणात आकस्मिक झालेल्या अभूतपूर्व सत्तानाट्याने भविष्यकाळात बरेच उलटफेर पाहायला मिळणार आहेत. राज्यातील हेविवेट व राजकारणातील अँग्री यंग मॅन म्हणून ओळखले जाणारे दोन बलाढ्य नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज, भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना सत्तेच्या सारीपाटाने एकत्र आणले आहे. यापूर्वीचा दोघांच्या तलवारींचा खणखणाट आता देवेंद्र फडणवीसांमुळे म्यानबंद होणार आहे. तर दोघांची आँख मिचौली महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Politics News)

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सातारा जिल्ह्याने सर्वाधिक प्रेम केले ते ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्यावर. सातारा जिल्ह्याचे जेवढे प्रेम शरद पवारांवर, तेवढेच प्रेम छत्रपती घराण्यावरही. राजघराण्यातील कोणत्याही व्यक्तीबाबत सातारा जिल्हावासीयांमध्ये आदराची व आपुलकीची भावना आहे. त्यामुळेच उदयनराजे, शिवेंद्रराजे, रामराजे यांना जिल्ह्यात नेहमीच मानसन्मान मिळत गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप दिले. शरद पवारांनी जेव्हा सातार्‍याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे सूत्रे दिली. तेव्हा 11 ही तालुक्यांमध्ये अजितदादांचे स्नेहसंबंध प्रस्थापित झाले.

कामाचा झपाटा, विकासकामे करण्याची जिद्द, कार्यकर्त्यांना दिलेली आपुलकीची वागणूक यामुळे तरुणांमध्ये अजितदादांची क्रेझ वाढत होती. याच कालावधीत 2002 साली झालेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळाले नाही. मग काँग्रेसला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी अजितदादांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला सोबत घेतले. तेव्हा सातारा विकास आघाडीच्या 6 जागा निवडून आल्या होत्या. त्याकाळी तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या अजितदादा व उदयनराजेंची मैत्री सर्वदूर पसरली. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या; तर उदयनराजेंचे उजवे हात सुनील काटकर हे जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती झाले.

प्रदीर्घ काळ अजितदादा व उदयनराजेंचा मैत्रीचा पैरा जिल्ह्यात सुरू होता. मात्र, नंतरच्या कालवधीत दोघांमध्ये अनेक कारणांवरून मतभेद सुरू झाले. मतभेदाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणांमध्येही झाले. कधी ही भांडणे रस्त्यात तर कधी विश्रामगृहावरही झाली. दोघांमध्ये अनेक काळ शाब्दिक वारही रंगले. अजितदादांनी उदयनराजेंवर तर उदयनराजेंनी अजितदादांवर कडवट टीका केली. त्यामुळे जिगरी दोस्तीचे रूपांतर जानी दुश्मनीत झाले. कित्येक काळ ही मतभेदाची दरी वाढलेलीच होती. उदयनराजे राष्ट्रवादीत आल्यानंतर लोकसभेचे खासदार झालेल्या 10 वर्षांत अजितदादा व उदयनराजेंचे फारसे सख्य नव्हते.

मात्र, पक्षीय चौकटीत एकत्रित असल्यामुळे दोघांना एकमेकांसोबत रहावे लागत होते. त्या काळात ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी दोघांची अवस्था होती. मात्र, संबंधांमध्ये पूर्वीसारखी कटूता नव्हती. अलिकडच्या काळात मात्र अजितदादा व उदयनराजे जेव्हा भेटायचे तेव्हा वेगवेगळ्या पक्षात असूनही त्यांच्यामध्ये हास्य-विनोद रंगायचे. ‘काय राजे कसं काय बर हायं का?’ असा अजितदादांचा तर ‘फिट्ट अँड फाईन’ असा उदयनराजेंचा डायलॉग रंगायचा. त्यामुळे अजितदादा व उदयनराजेंमध्ये असलेले मतभेद संपुष्टात आल्याची पार्श्वभूमी तयार झाली.

आता राज्यात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडींनंतर अनेक उलटफेरांना सुरूवात झाली आहे. उदयनराजे हे राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जीवलग मित्र म्हणून ओळखले जातात. तर तशीच मैत्री देवेंद्र फडणवीसांची अजितदादांबरोबरही आहे. शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेवून भाजपबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी उदयनराजेंनी मुंबईत जावून देवेंद्र फडणवीस यांना तलवार व वाघनखे भेट दिली.

शरद पवारांच्या पावसातील सभेमुळे पराभव झालेल्या उदयनराजेंना पवारांची राष्ट्रवादी फडणवीसांनी फोडल्यानंतर झालेला हा आनंद होता. त्याचवेळी उदयनराजेंनी अजितदादांच्या भूमिकेचीही पाठराखण केली. उदयनराजे हे भाजपचे नेते आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत. तर अजितदादा आता भाजपच्या सोबत आहेत. वर्षभरावर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अजितदादांनी तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाषणांमध्ये जागा वाटप कसे असेल हेही सांगून टाकले आहे. त्यामुळे भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी निवडणुकांमध्येही एकत्र राहणार असेच सध्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातले अजितदादा व उदयनराजे हे दोन्ही ‘अँग्री यंग मॅन’ भविष्यकाळात एकाच व्यासपीठावर प्रचार करताना दिसणार आहेत.

अजितदादांच्या सातारा दौर्‍यातही उदयनराजेंची भेट आता होत राहणार आहे. तर उदयनराजेंच्या मुंबईतल्या भेटीत तेही अजितदादांना भेटत राहणार. त्यामुळे दोन ध्रुवावरचे हे दोघेजण भविष्यकाळात एकत्र दिसले तर नवल वाटायला नको. दोघांमधली ही आँख मिचौली भविष्यकाळात राज्याच्या राजकारणात उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. दोन तलवारींनी यापूर्वी बराच खणखणाट केला आहे. या दोन्ही तलवारी फडणवीसांनी आता म्यानबंद केल्याने जुन्या दोस्तीचा नवा पैरा पुन्हा एकदा पहायला मिळेल.
दोघांच्या वादात शरद पवारांची चुप्पी होती!

अजितदादा पवार व उदयनराजे भोसले यांच्यातला वाद राज्यभर गाजला होता. ज्या अजितदादांशी उदयनराजेंनी पंगा घेतला होता, त्याच उदयनराजेंना लक्ष्मणराव पाटील यांचे तिकीट डावलून शरद पवार यांनी तिकीट दिले होते. उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे फारसे सख्य नव्हतेच. अजितदादा व उदयनराजेंच्या मतभेदाच्या काळात शरद पवार यांनी कधीच कुणाची बाजू घेतली नव्हती. दोघांच्या वादात त्यांची कायम चुप्पी असायची. ती का असायची… याचे संदर्भ आता अनेक जण आठवत आहेत. (Maharashtra Politics News)



Source link

Jalgaon Rain Updates : पहिल्याच पावसात जळगाव जिल्ह्यात पूरस्थिती, तिघांचा मृत्यू, २० जनावरं दगावली

0
Jalgaon Rain Updates : पहिल्याच पावसात जळगाव जिल्ह्यात पूरस्थिती, तिघांचा मृत्यू, २० जनावरं दगावली


Jalgaon Rain Updates : गेल्या आठवड्याभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने उत्तर महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. जळगाव, नाशिक, धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. तसेच धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. परंतु आता मध्यप्रदेशातील सुकी धरण ओव्हरफ्लो झाल्याने नागझिरी, मात्रान आणि रसलपूर नदीला पूर आला आहे. त्यामुळं आतापर्यंत पुरात अडकलेल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच पुरामुळं २० जनावरं देखील दगावली आहे. त्यामुळं आता मान्सूनच्या पहिल्याच पावसात जळगावात नद्यांना पूर आल्याने बळीराजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.



Source link

Abhijeet Khandkekar Birthday: रेडिओ जॉकी असलेला अभिजीत खांडकेकर अभिनय विश्वात कसा आला? वाचा…

0
Abhijeet Khandkekar Birthday: रेडिओ जॉकी असलेला अभिजीत खांडकेकर अभिनय विश्वात कसा आला? वाचा…


या मालिकेनंतर अभिजीत खांडकेकरने अनेक शो होस्ट केले. निवेदनाची धुरा सांभाळली. यानंतर पुन्हा एकदा तो ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या मालिकेत त्याने साकारलेले ‘गुरुनाथ’ हे पात्र चांगलंच गाजलं. सध्या अभिजीत खांडकेकर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत ‘मल्हार’ हे पात्र साकारत असून, त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.



Source link

Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभू अभिनय कारकिर्दीला रामराम ठोकणार? नेमकं सत्य काय जाणून घ्या…

0
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभू अभिनय कारकिर्दीला रामराम ठोकणार? नेमकं सत्य काय जाणून घ्या…


अभिनेत्री समंथा रुथ प्रभू मायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. २०२२मध्ये अभिनेत्रीने स्वतः तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे या आजाराचा खुलासा केला होता. या पोस्टमध्ये, अभिनेत्री समंथा प्रभू हॉस्पिटलमध्ये बसलेली दिसली होती. या फोटोसह, समंथाने तिच्या या आजाराशी संघर्षाबद्दल खुलासा केला होता. तसेच, आपण यातून लवकर बरे होऊ, असे देखील तिने म्हटले होते.



Source link

Kailash Kher Birthday: चौथ्या वर्षापासून गायनाची सुरुवात; नैराश्याचाही केला सामना! कैलाश खेरबद्दल ऐकलंयत का?

0
Kailash Kher Birthday: चौथ्या वर्षापासून गायनाची सुरुवात; नैराश्याचाही केला सामना! कैलाश खेरबद्दल ऐकलंयत का?


आपल्या समकालीन गायकांपेक्षा वेगळी सुफियाना शैली आणि दमदार आवाजाने लाखो हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर ४९ वर्षांचे झाले आहेत. कैलाश खेर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात झाला. त्यांना संगीताचा वारसा कुटुंबाकडूनच मिळाला. त्यांचे वडील पंडित मेहरसिंह खेर हे पुजारी होते आणि घरातील कार्यक्रमात ते अनेकदा पारंपारिक लोकगीते म्हणत असत. कैलाश खेर यांनी बालपणीच वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. आजघडीला कैलाश खेर यांनी आपल्या गायनाने स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले असेल. परंतु, त्यांच्या यशामागे निराशा आणि कठोर संघर्ष आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर कैलाश खेर आतून इतके तुटले होते की, त्यांना जगण्याची आशाच उरली नव्हती.



Source link

‘मी 82 वर्षांचा असो, वा 92 वर्षांचा…’; अजित दादांच्या प्रश्नाला थोरल्या पवारांचं प्रत्युत्तर

0
‘मी 82 वर्षांचा असो, वा 92 वर्षांचा…’; अजित दादांच्या प्रश्नाला थोरल्या पवारांचं प्रत्युत्तर


Maharashtra NCP Crisis: अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपची (BJP) कास धरत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. शिंदेंच्या बंडानंतर आधीच राज्याच्या राजकाणातील समीकरणं बदलली होती. अशातच आता अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातील समीकरणं बदलली आहेत. अशातच अजित पवारांनी एमईटी वांद्रे येथे झालेल्या बैठकीत काका शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्लाबोल केला होता. शरद पवारांवर अनेक आरोपही अजित पवारांनी केले. यावेळी अजित पवारांनी वय 82 वर्ष, आता तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा प्रश्नही विचारला. याला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी काल (6 जुलै) दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आयोजित केली होती. या सभेत त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार प्रहार करत, “मी 82 वर्षांचा असो वा 92 वर्षांचा, मी नेहमीच प्रभावी असीन.”, असं वक्तव्य केलं आहे. 

दिल्लीत झालेल्या या बैठकीत त्यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि अन्य 9 नेत्यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये औपचारिकपणे पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार करत राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष मीच आहे, असं ठणकावून सांगितलं. 

शरद पवारांना त्यांच्या वयावरुन काय म्हणाले होते अजित पवार? 

अजित पवार यांनी बुधवारी (5 जुलै) वांद्रे येथे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 32 आमदारांसह शक्तीप्रदर्शन केलं आणि आपल्या काकांना निवृत्त होण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले होते, “सरकारी अधिकारी वयाच्या 62 व्या वर्षी निवृत्त होतात. भाजप नेते वयाच्या 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होतात, तुमचे वय 83 आहे, तुम्हाला कुठेतरी थांबावं लागेल.”

शरद पवार आजही माझे आदर्श आहेत. मात्र माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो, मात्र माणसानं कधीतरी थांबावं… तरूणांना संधी कधी देणार? तुम्ही आशीर्वाद द्या ना, मार्गदर्शन करा, चुकलं तर तुम्ही आम्हाला दुरूस्त करा, कान धरा… मार्गदर्शन करा, असं अजित पवार म्हणाले. तसेच, शरद पवारांनी जेव्हा पक्षाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आणि नंतर मागे घेतला, तेव्हा सुप्रियाला मी म्हणालो की, पवार साहेबांनी थांबावं तर ती म्हणाली, ते हट्टी आहेत, ऐकणार नाहीत, असंही अजित पवार म्हणाले. 

“राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा कायदेशीर अधिकार नाही”

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावल्यावर अजित पवार यांच्या गटानं आक्षेप घेतला आणि त्यांना तसं करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचं सांगितलं. अजित पवार गटाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शरद पवार यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पण त्यांना अशी बैठक बोलावण्याचा कायदेशीर अधिकार नाही. 

अजित पवार गटानं दावा केलाय की, “अजित पवार यांची 30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनात्मक पदं भूषविलेल्या सदस्यांच्या प्रचंड पाठिंब्यानं त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणालाही नाही.”

दरम्यान, दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच, या परिस्थितीत शरद पवारांसोबत असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra NCP Crisis : अजित पवारांचा थोरल्या पवारांवर हल्लाबोल; केले ‘हे’ 4 गौप्यस्फोट



Source link

संतापजनक! मुलींच्या स्वच्छतागृहात बसवले CCTV कॅमेरे, मावळमधील नामांकित शाळेतील प्रकार

0
संतापजनक! मुलींच्या स्वच्छतागृहात बसवले  CCTV  कॅमेरे, मावळमधील नामांकित शाळेतील प्रकार


संबंधित शाळा ही मावळ तालुक्यातील नावाजलेली शाळा असल्याने या शाळेत अनेक पालक त्यांच्या मुलांना शाळेत घालण्यासाठी प्रयत्न करत असतात. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ही बाब शाळेतील मुलींनी पालकांना सांगितली. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनाला विचारले असता त्यांनी मुख्याध्यापकांच्या सुचनेनुसार कॅमेरे बसविल्याचे सांगितले. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. 



Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…


Uncle-Nephew Battle In Politics: महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातही गाजला आहे काका-पुतण्याचा वाद; कोणाची सरशी आणि कोणाचा पराभव?



Source link

शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीवर फॉर्म्युला ठरला? शिंदे-फडणवीसांमध्ये खलबतं

0
शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीवर फॉर्म्युला ठरला? शिंदे-फडणवीसांमध्ये खलबतं


Maharashtra Politics:  अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी दिसून आली. शिंदे गटाच्या आमदारांना मिळणारी मंत्रिपदे कमी झाल्याने इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले असल्याची चर्चा सुरू झाली. आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज खलबतं झाली. नंदनवन बंगल्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. 

या बैठकीत नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचा दोन्ही नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या आठवड्याभरात विस्तार करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आता होणाऱ्या विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना सर्वाधिक स्थान मिळणार असल्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

महामंडळाचे वाटप होणार

मंत्रिमंडळ विस्तारासोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करत नाराजी दूर करण्याचा  प्रयत्न शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.  हीच बाब दोन्ही गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पटवून देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी? 

लवकरच मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळणार असल्याची अपेक्षा लावून बसलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना अजित पवारांच्या एन्ट्रीने धक्का बसला आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. तर गरज नसतांना राष्ट्रवादीला सोबत का घेण्यात आले असा प्रश्न पडला असल्याचे संजय शिरसाट म्हणाले आहे. तसेच माझ्यासह अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे देखील शिरसाट म्हणाले आहे. त्यामुळे आम्हाला संधी कधी मिळणार? आम्ही देखील बंड केला होता, आम्ही फक्त पालख्या वाहत राहायचे का? असा प्रश्न नाराज आमदारांकडून बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. 

भाजपमध्येही नाराजी? 

मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांनी यापूर्वीच उघडपणे बोलून दाखवले आहेत. तर भाजपमध्ये देखील काही इच्छुक आहेत. मात्र आजपर्यंत भाजपच्या आमदारांकडून उघडपणे यावर भाष्य करण्यात आले नाही. तर अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे भाजपमधील इच्छुकांची देखील धाकधूक वाढली असावी. पण आतापर्यंत भाजपमधील नाराजीची कधीच उघडपणे चर्चा झाली नाही. मात्र भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचे वक्तव्य शिरसाट यांनी केल्याने, भाजप आमदारांच्या नाराजीची चर्चा होऊ लागली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:



Source link