Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2959

Yavatmal Bridge Collapsed : महिन्याभरापूर्वी बांधलेला पूल पहिल्यात पावसात कोसळला; विदर्भातील धक्कादायक प्रकार

0
Yavatmal Bridge Collapsed : महिन्याभरापूर्वी बांधलेला पूल पहिल्यात पावसात कोसळला; विदर्भातील धक्कादायक प्रकार


मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील द्वारव्हा तालुक्यातल्या महागाव ते देवगाव या गावांमधील रत्याचं काम पूर्ण करण्यात आलं होतं. त्याचवेळी या मार्गावरील नदीवर मोठा पूल देखील बांधण्यात आला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला, त्यामुळं जून महिन्यातच बांधण्यात आलेला नवाकोरा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळं आता संतप्त महागाव-देवगाव येथील ग्रामस्थांनी कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पूल वाहून गेल्याने परिसरातील अनेक पिकांचं देखील नुकसान झालं आहे. त्यामुळं शासनाने तातडीने या प्रकरणाचा पंचनामा करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. पूल वाहून गेल्यानं नागरिकांना लोखंडी पाईपच्या सहाय्याने वाट शोधावी लागत आहे.



Source link

Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांनी केलं भाऊरायाचं औक्षण, धनंजय मुंडे ट्वीट करून म्हणाले…

0
Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांनी केलं भाऊरायाचं औक्षण, धनंजय मुंडे ट्वीट करून म्हणाले…


धनंजय मुंडे यांनी त्या संदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात पंकजा या भाऊरायाचं औक्षण करताना दिसत आहेत. तसंच, त्यांना पेढा भरवत आहेत. ‘राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताईनं माझं औक्षण केलं व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे, असं धनंजय यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.



Source link

Raveena Tandon: ताप असतानाही भर पावसात रवीनाने शूट केलं ‘टिप टिप बरसा पानी’! पण अट होती की…

0
Raveena Tandon: ताप असतानाही भर पावसात रवीनाने शूट केलं ‘टिप टिप बरसा पानी’! पण अट होती की…


एका मुलाखतीत, रवीना टंडनने स्वत: याचा खुलासा केला होता की, तिने त्यावेळी या गाण्याच्या शूटिंगपूर्वी मेकर्ससमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे ती सतत वेगवेगळे टेक घेण्यासाठी साडी बदलणार नाही आणि दुसरी अट म्हणजे या गाण्यात ती चुंबन घेणार नाही. तिच्या या दोन्ही अटी मान्य करण्यात आल्या होत्या. या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी रवीना टंडनला खूप ताप आला होता. मात्र, तरीही तिने कुणालाही हे कळू न देता गाण्याचे शूटिंग पूर्ण केले होते.



Source link

Kaavaalaa: रजनीकांतसोबत दिसली तमन्नाची सिझलिंग केमिस्ट्री; ‘जेलर’चं पहिलं गाणं पाहिलंत का?

0
Kaavaalaa: रजनीकांतसोबत दिसली तमन्नाची सिझलिंग केमिस्ट्री; ‘जेलर’चं पहिलं गाणं पाहिलंत का?


Kaavaalaa Song Release: रजनीकांत यांच्या चाहत्यांना त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. त्याचवेळी निर्मात्यांनी ‘जेलर’चे पहिले गाणे ‘कावला’ देखील रिलीज केले आहे.



Source link

Nashik : नाशिकसह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु, भात पिकांना दिलासा, टोमॅटोची लागवड सुरू

0
Nashik : नाशिकसह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु, भात पिकांना दिलासा, टोमॅटोची लागवड सुरू


Nashik Rain Update : तीन दिवसांच्या उपडझापनंतर आज सकाळपासून पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे कमबॅक झाले असून आज सकाळपासून रिपरिप सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिलत असून यंदा काहीअंशी दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तर दुसरीकडे नाशिककरांच्या पाणी कपातीचे संकटही टळले आहे. 

राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईपासून ते राज्यातील सर्वच भागात पाऊस जोरदार कोसळत असून अनेक भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नाशिक (Nashik Rain) शहरासह जिल्ह्यातही मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांसह नागरिक प्रतीक्षेत होते, अखेर लांबणीवर पडलेल्या पावसाने जोरदार आगमन केले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनने जोरदार आगमन करत सर्वाना ओलेचिंब केले. त्याचबरोबर अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या होतंय, त्या पेरण्यांना देखील वेग येऊन आता अनेक भागातील पेरण्यां संपुष्ठात आल्या आहेत. 

तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊसाची बरसात सुरूच असून मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात पावसाने (Nashik Rain Update) उघडीप दिल्याने काहीकाळ नागरिकांना उसंत मिळाली. मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा रिपरिप सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान कालच्या जिल्हाभरातील पावसाची आकडेवारी बघता बागलाण (Baglan) तालुका सोडला तर इतर तालुक्यात अगदी तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. मात्र आज सकाळापासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली असून भात पिकाला साजेसे वातावरण मिळत असल्याने लवकरच भात लावणीला सुरवात होईल असे चित्र आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून इतर पिकांची लागवड देखील सुरु असल्याचे चित्र आहे. 

कोकणासह मुंबईत पाऊस 

मुंबईसह (Mumbai) उपनगरात पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक दोन ते पाच मिनिटं उशिराने सुरु आहे. दक्षिण मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दोन्ही बाजूकडील म्हणजे पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, तर मुंबईसह परिसरात अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 



Source link

Angira Dhar: ‘साँस, बहू और फ्लेमिंगो’ फेम अभिनेत्री अंगीरा धर ठरली ‘आयएमडीबी स्टारमीटर’ पुरस्काराची मानकरी!

0
Angira Dhar: ‘साँस, बहू और फ्लेमिंगो’ फेम अभिनेत्री अंगीरा धर ठरली ‘आयएमडीबी स्टारमीटर’ पुरस्काराची मानकरी!


(4 / 5)

आयएमडीबी युजर्सनी ‘साँस, बहू और फ्लेमिंगो’ला ८ रेटिंग दिले आहे. या आधी अंगीराने ‘बँग बाजा बारात’, ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’, आणि ‘कमांडो ३’मध्ये काम केले आहे.



Source link

Divya Khosla Mother Death: दिव्या खोसलाला मातृशोक; अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

0
Divya Khosla Mother Death: दिव्या खोसलाला मातृशोक; अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट


Divya Khosla Mother Death: दिव्या खोसलाच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. स्वतः दिव्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.



Source link

कराड, पाटण तालुका थोरल्या साहेबांसोबत… | पुढारी

0


कराड, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांनी बंड केल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. मात्र या परिस्थितीत कराड व पाटण तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहिल्याचे दिसून येत आहे. खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांच्या कराड दौर्‍यात शक्तिप्रदर्शन घडवले तर पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर शरद पवार यांच्या भेटीला आले. या दोन्ही तालुक्यातील नेत्यांनी ‘साहेब आम्ही तुमच्या सोबतच आहे‘ हे दाखवून दिले आहे.

रविवारी राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांचे काही ज्येष्ठ सहकारी वेगळी वाट चोखाळल शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले. दुपारी शपथविधीही पार पडला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. आमच्या सोबत चाळीस आमदार आहेत, असा दावा अजित पवार यांनी केला. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत कोण, अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, बुधवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन झाले. अजित पवार यांचा आक्रमक पवित्रा, पक्षावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न यातून कोणत्याही टोकाला जाऊन संघर्ष करण्याची त्यांची तयारी असल्याचे स्पष्ट झाले. तर शरद पवार यांनी सामूहिक शक्तीतून नवीन नेतृत्वाची पिढी तयार करूया अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली.

शरद पवार यांच्या संघर्षाच्या काळात कराड व पाटण हे दोन्ही तालुके शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहिले आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर दुसर्‍याच दिवशी सोमवारी शरद पवार कराड दौर्‍यावर आले. यावेळी कराड, पाटण तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध विभागातून शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी कराडमध्ये दाखल झाले होते. कराड उत्तर व दक्षिण विभानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याचे श्रेय अर्थात खा.श्रीनिवास पाटील,आ.बाळासाहेब पाटील यांना जाते. ‘आम्ही साहेबांसोबत’ असे शेकडो फलक कराड शहरात झळकले. खा. श्रीनिवास पाटील, आ.बाळासाहेब पाटील यांनी उघड भूमिका घेत थोरल्या साहेबांप्रति आपली निष्ठा दाखवून दिली.

दरम्यान, हेच चित्र पाटण तालुक्याच्या बाबतीत पहायला मिळाले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह पाटण तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शरद पवार यांच्या समर्थनार्थ कराडला आले होते. 1999 मध्ये ज्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली, त्यादिवशी विक्रमसिंह पाटणकर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत दाखल झाले होते. आज राष्ट्रवादीच्या पडत्या काळातही पाटणकर पिता, पुत्रांनी संपूर्ण पाटण तालुका राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा केली आहे. सातारा जिल्ह्यात कराड, पाटण तालुक्याने पहिल्यांदा शरद पवार यांच्या पाठिंब्याची भूमिका घेतली आहे.

कटू अनुभव असतानाही..

आ.बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले होते. पण तरीही अपक्ष निवडून आल्यानंतर आ. बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्यासोबत राहिले होते. आज शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत. पण आ. पाटील यांनी थोरल्या साहेबांवर असणारी आपली निष्ठा कायम ठेवली आहे. असाच कटू अनुभव पाटणकर यांच्या गाठीशी आहे. 2009 मध्ये निवडून आल्यानंतर विक्रमसिंह पाटणकर यांना अनुभवी व ज्येष्ठ नेते म्हणून मंत्रीपद मिळणे अपेक्षित होते. यादीत नावही होते. पण, ऐनवेळी त्यांचे नाव वगळण्यात आले. तरीही या दोन्ही नेत्यांनी आज अखेर शरद पवारांची साथ सोडलेली नाही.



Source link

खंडाळ्यात आ. रामराजे की आ. मकरंदआबा | पुढारी

0


लोणंद, शशिकांत जाधव : राज्याप्रमाणे खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादीमध्येही दोन गट निर्माण झाले आहेत. खा. शरद पवार की ना. अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या संघर्षात तालुक्यातील आ. रामराजे व आ. मकरंद पाटील यांचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. रामराजेंनी उघड उघड अजितदादांना पाठिंबा दिला तर मकरंदआबांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोन डगरींवर हात ठेवून राजकारण करणार्‍या कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे.

खंडाळा तालुक्यात आतापर्यंत सुप्त अवस्थेत असलेली आ. रामराजे गट व आ. मकरंदआबा गट यांच्या कार्यकर्त्यांत असलेली दरी यानिमित्ताने समोर आली आहे. या दोन्ही गटांत फूट पडली असल्याचे चित्र आहे. या घडामोडीनंतर रामराजे यांच्याबरोबर कोण व आ. मकरंद पाटील यांच्याबरोबर कोण? याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. एक संघ असणारी राष्ट्रवादी आगामी काळात दोन नेत्यांमध्ये दुभंगल्याचे चित्र खंडाळा तालुक्यातील राजकीय वर्तुळात पहावयास मिळणार आहे. आतापर्यंत एकत्रित असलेले दोन्ही गट एकमेकांपुढे उभे ठाकणार आहेत. त्यामुळे तालुक्यात एकहाती राष्ट्रवादीची असलेल्या सत्तेला सुरुंग लागण्यास वेळ लागणार नाही, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

दोन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे. खंडाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये आतापर्यंत आ. रामराजे ना. निंबाळकर व आ. मकरंद पाटील यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. या दोन्ही गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी म्हणून एकत्रित काम करत होते. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीची सर्वच पातळीवर ताकद वाढत जाऊन विविध संस्थांवर सत्ता काबीज करण्यात आल्या होत्या.

यापूर्वीच्या काळात वाई, खंडाळा व फलटण, खंडाळा अशा दोन विधानसभा मतदारसंघात विभागले गेलेल्या खंडाळा तालुक्यात रामराजे व मकरंद पाटील यांची कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली होती. विधानसभेच्या फेररचनेनंतर संपूर्ण खंडाळा तालुका वाई तालुक्याला जोडला गेला. त्यामुळे फलटणपासून खंडाळा तालुका थोडासा दूर गेला. परंतु, आ. रामराजे यांचे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आजही कायम आहेत. गावागावातील कार्यकर्त्यांना रामराजेंनी त्यांची कामे करून ताकत दिली आहे. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे.

दुसर्‍या बाजूला आ. मकरंद पाटील यांनी खंडाळा तालुक्यातील राजकारणावरील आपली पकड घट्ट बनवत गावागावांत कार्यकर्ते निर्माण करून कार्यकर्त्यांची नवी फळी निर्माण केली. या दोन्ही नेत्यांच्या गटांमध्ये अंतर्गत धुसफुसी आतापर्यंत सुरू होत्या. परंतु त्या सुप्त अवस्थेत होत्या. या दोन्हीही गटांना राष्ट्रवादी म्हणून रामराजे व मकरंद पाटील यांनी एकत्रित राहण्याचा सल्ला देत आले होते.

कार्यकर्त्यांमधील जाहीर वाच्यता फारशी होत नव्हती. एवढेच काय परंतु एका नेत्यांकडे गेलेले दुसर्‍या नेत्याला गेलेले खपत नसत. आता तर एकमेकांसमोर आल्याने वर्चस्व-वादाची लढाई चुरशीच होणार आहे.

गावच्या राजकारणामध्ये दोन्ही गटांमध्ये कुरघोड्या

दोन्ही गटातील कार्यकर्ते कायम एकमेकांवर गावातील, तालुक्यातील राजकारणात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोणंद बाजार समिती निवडणुकीमध्ये आला. आ. रामराजे गटाला उमेदवारीत डावलल्यानंतर त्याचे परिणाम मतदानाच्या आकड्यांमध्ये दिसून आले. आता दोन्ही गट आमने सामने आल्याने तालुक्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई चुरशीची पहायला मिळणार आहे.



Source link

सातारा : हल्ल्याप्रकरणी तिघांना शिक्षा | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : वडूथ (ता. सातारा) येथे वाळू चोरी प्रकरणातून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना सातारा जिल्हा न्यायालयात शिक्षा ठोठावण्यात आली. कुर्‍हाड, लाकडी दांडके, लोखंडी गज या शस्त्राने जबर दुखापत केल्याची घटना 2015 साली घडली होती.

विजय शिवराम साबळे (वय 52), सुदाम शिवराम साबळे (वय 50), अनिल सुदाम साबळे (वय 39 सर्व रा. वडूथ) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राहुल मधुकर साबळे (वय 30, रा.वडूथ) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 14 नोव्हेंबर 2015 रोजी वडूथ येथे घडली होती. तक्रारदार राहुल साबळे यांना संशयितांनी ‘तू आमचा वाळू व्यवसाय व साठा करण्यास आडवा आला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ असे म्हणत दमदाटी केली. याच बाचाबाचीतून तक्रारदार, त्यांचे वडील व भावावर सशस्त्र हल्ला केला.

या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यात जिवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तत्कालीन फौजदार पी. बी. कदम यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायालयात याप्रकरणी 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. एल. के. खाडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधिश मंगला धोटे यांनी आरोपींना 4 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

The post सातारा : हल्ल्याप्रकरणी तिघांना शिक्षा appeared first on पुढारी.



Source link