Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2958

Mithun Chakrabortys Mother Death: मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचे निधन

0
Mithun Chakrabortys Mother Death: मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचे निधन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आई शांतीराणी देवी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. गुरुवारी ६ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिथून यांचा मुलगा नमाशी चक्रवर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

Source link

Mahrashtra Politics : राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

0
Mahrashtra Politics : राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

आज सकाळीचठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य केले होते. दोन्ही भावांमध्ये रक्ताचं नातं आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी इतर कुणाची गरज नाही, असं विधान त्यांनी केलं होते.

Source link

TRP List: ‘या’ मालिकेने दिली आई कुठे काय करतेला टक्कर! पटकावले पहिले स्थान

0
TRP List: ‘या’ मालिकेने दिली आई कुठे काय करतेला टक्कर! पटकावले पहिले स्थान

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता या मालिकांमधील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका कोणती हे समोर आले आहे. या यादीमध्ये सतत आई कुठे काय करते ही मालिका पहिल्या क्रमांकावर असते. मात्र, ही मालिका आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आता पहिल्या क्रमांकावर कोणती मालिका आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Source link

Pankaja Munde : …नंतर माझं तिकीट रद्द केलं, पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट ABP Majha

0
Pankaja Munde : …नंतर माझं तिकीट रद्द केलं, पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट ABP Majha

Pankaja Munde PC : "मी कायमच पक्षाचा आदेश अंतिम मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात जात नाही मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात?" असा सवाल उपस्थित करत "माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणे हे माझ्यासाठी दु:खद आहे," अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली. "मला राजकारणातून ब्रेक हवा आहे. सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत आहे," असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंबईतील (Mumbai) पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या.

Source link

Tamannaah Bhatia: एक्स गर्लफ्रेंडसोबत सेक्स करणार का? तमन्नाच्या प्रश्नावर विजय म्हणाला…

0
Tamannaah Bhatia: एक्स गर्लफ्रेंडसोबत सेक्स करणार का? तमन्नाच्या प्रश्नावर विजय म्हणाला…

मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच लव्ह लाईफमुळे देखील नेहमीच प्रचंड चर्चेत राहत असतात. बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे देखील अशाच कलाकारांपैकी आहेत. बऱ्याच दिवसांपासून दोघांची नावे एकमेकांशी जोडली जात आहेत. दोघे एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकवेळा दोघेही एकत्र दिसले आहेत. नुकताच दोघांनी एका वृत्तवाहिनीला एकत्र मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तमन्नाने विजयला विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Source link

Gautami Patil: महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा परिणाम गौतमीच्या सिनेमावर, प्रदर्शनाची तारीख ढकली पुढे

0
Gautami Patil: महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा परिणाम गौतमीच्या सिनेमावर, प्रदर्शनाची तारीख ढकली पुढे

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. अशातच गौतमीचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहाता चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Source link

Tu Chal Pudha: अश्विनी-विद्युतला शिल्पी देणार नवा धक्का; ‘तू चाल पुढं’ मालिकेमध्ये मोठा ट्वीस्ट

0
Tu Chal Pudha: अश्विनी-विद्युतला शिल्पी देणार नवा धक्का; ‘तू चाल पुढं’ मालिकेमध्ये मोठा ट्वीस्ट

घटस्फोट घेतल्यानंतरही विद्युतचे शिल्पीवरील प्रेम अजिबातही कमी झालेले नाही. तो सतत तिला पुन्हा एकत्र राहण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, शिल्पी यासाठी नकार देताना दिसत आहे. शिल्पी परत येणार नाहीच हा तिचा निर्णय झाल्याचे समजून, आता विद्युतने दुसरे लग्न करून संसार थाटावा यासाठी त्याची बहीण म्हणजेच अश्विनी आग्रह करणार आहे. बहिणीचे बोल आता विद्युतला देखील पटणार असून, तो दुसऱ्या लग्नासाठी तयार होणार आहे. मात्र, त्याचवेळी शिल्पी दोघांनाही एक मोठा धक्का देणार आहे.

Source link

Aaditya Thackeray : नीलम गोऱ्हेंचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ Aaditya Thackerayयांची प्रतिक्रिया

0
Aaditya Thackeray : नीलम गोऱ्हेंचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ Aaditya Thackerayयांची प्रतिक्रिया

नीलम गोऱ्हेंचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ Aaditya Thackeray यांची प्रतिक्रिया

Source link

साताऱ्यात कोळशाच्या काराखान्यात काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार

0

विरार : कोळसा कारखान्यात काम करणाऱ्या एका कातकरी महिलेवर सामूहिक बलात्कर केल्याची धक्कादायक घटना  सातारा (Satara News) जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडली आहे. कोळसा उत्पादन करणाऱ्या मालकासह पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

पीडित महिला  तिचा पती  आणि पाच वर्षाची मुलगी त्या कोळसा कारखान्यातून सुखरुप सुटून रायगडमध्ये आपल्या घरी पोहचल्यावर पीडित महिलेने घडलेला प्रसंग आपल्या मामाला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेच्या मामाने तिला विरार येथे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्याकडे नेलं. त्यानंतर विवेक पंडित यांनी पाठपुरावा केल्यानंतर  आज पहाटे सातारा पोलिसांनी त्या महिलेला आणि तिच्या पतीला साता-याला तक्रार दाखल करण्यास नेलं आहे.

पीडित महिला 28 वर्षांची असून तिला एक मुलगी आणि दोन  मुलं आहेत. ती कातकरी समाजातील असून रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यातील राहण्यास आहे. पीडित महिला आणि तिचा नवरा, सासू-सासरा आणि मुलं हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका कोळसा उत्पादित करणाऱ्या कारखान्यात कामाला लागले होती. कामाच्या ठिकाणी दहा हजाराचे अॅडव्हान्स त्यांनी घेतलं होतं. 18 दिवसांपूर्वी महिलेवर  कोळसा कारखान्याच्या मालकासह पाच जणांनी  बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे.  महिलेच्या नवऱ्याला दुसऱ्या खोलीत डांबून ठेवले होते.  रात्री पीडित महिलेच्या नवऱ्याने महिलेची सुटका करत तेथून पळ काढला आणि थेट पंढरपूर गाठले

महिला आणि तिच्या पतीने रात्री तिच्या नवऱ्याने पाच वर्षाच्या मुलीसह ते पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून पुन्हा रायगडला आपल्या गावी आल्यानंतर त्यांनी मामाला घडलेला प्रसंग सांगितला.त्यानंतर  कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर साता-याचे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कोळसा कारखान्याचा मालक बाळू शेख याला ताब्यात घेतलं. तसेच सातारा पोलिसांच्या एक टिमने पीडित महिलेला आज पहाटे 5.30 वाजता साता-याला गुन्हा दाखल करण्यासाठी घेऊन गेलेत.सातारा पोलिसांनी पीडितेचे सासू सासरे आणि दोन मुलांची कारखान्यातून सुटका केली आहे. मांडवी पोलिसांनी ही  पीडित महिलेचा जबाब नोंदवला असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : पोटच्या लेकीवर वडिलांनीच केला अत्याचार, मुलीची आपबिती ऐकून पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू

Source link

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 च्या तारखा जाहीर

0
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 च्या तारखा जाहीर

2023 साठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (DPIFF) चा भव्य सोहळा नुकताच यशस्वीपणे पार पडला, तर पुढील वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

भारतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार  20 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड येथे मोठ्या थाटामाटात आणि भव्यतेने संपन्न होणार आहे.

अभिषेक मिश्रा यांनी माहिती दिली की, “सिनेमा, चित्रपट आणि चित्रपट उद्योगाच्या इतिहासात अनेक बदल झाले आहेत. DPIFF 2024 ची थीम सिनेमॅटिक इव्होल्यूशन आहे आणि टॅगलाइन अशी आहे: “Cinema has no boundary; it is a ribbon of dream.”

दरम्यान 2023 चा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत आयोजित करण्यात आला होता आणि त्यात अनेक ए-लिस्टर्सनी हजेरी लावली होती.

विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्स आणि एसएस राजामौलीच्या आरआरआरने दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार जिंकला. “RRR” साठी आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि “द काश्मीर फाईल्स” साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2023 मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना हा पुरस्कार मिळाला.

संजय लीला भन्साळी यांच्या “गंगूबाई काठियावाडी” मधील गंगूबाई या प्रसिद्ध पात्राच्या भूमिकेसाठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून, तर रणबीरला “ब्रह्मास्त्र” साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले. त्याचबरोबर ‘कंतारा’ फेम ऋषभ शेट्टीची सर्वोत्कृष्ट प्रॉमिसिंग अॅक्टर म्हणून निवड करण्यात आली.

2023 चे विजेते:

• सर्वोत्कृष्ट चित्रपट – द काश्मीर फाइल्स
• वर्षातील सर्वोत्तम चित्रपट – RRR
• सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र भाग एक: शिव)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी)
• समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता – वरुण धवन (भेडिया)
• समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – विद्या बालन (जलसा)
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आर. बाल्की (मूक)
• सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – पीएस विनोद (विक्रम वेध)
• मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर – ऋषभ शेट्टी (कंटारा)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनीष पॉल (जुग्जग जियो)
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) – सचेत टंडन (महियां मनु-जर्सी)
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) – नीती मोहन (मेरी जान – गंगूबाई काठियावाडी)
• सर्वोत्कृष्ट वेब सिरीज – रुद्र: द एज ऑफ डार्कनेस (हिंदी)
• सर्वात अष्टपैलू अभिनेता – अनुपम खेर (द काश्मीर फाइल्स)
• वर्षातील सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन मालिका – अनुपमा
• टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – फना (इश्क में मरजवान) साठी झैन इमाम
• टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – तेजस्वी प्रकाश (नागिन)
• चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 पुरस्कार: रेखा
• संगीत उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 पुरस्कार: हरिहरन

हेही वाचा

Source link