Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2950

Ramayana: कैकयी नव्हे, सीतेच्या भूमिकेत झळकल्या असत्या पद्मा खन्ना! ‘ती’ एक चूक पडली महागात…

0
Ramayana: कैकयी नव्हे, सीतेच्या भूमिकेत झळकल्या असत्या पद्मा खन्ना! ‘ती’ एक चूक पडली महागात…


Actress Padma Khanna: ‘रामायणा’त अभिनेत्री पद्मा खन्ना यांनी ‘कैकयी’ची भूमिका साकारली होती. मात्र, आधी त्यांच्या वाट्याला सीतेची भूमिका येणार होती. एका चुकीमुळे त्यांच्या हातातून ही संधी निसटली होती.



Source link

जायकवाडी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव; मराठवाड्यातील धरणात 33.48 टक्केच पाणीसाठा

0
जायकवाडी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव; मराठवाड्यातील धरणात 33.48 टक्केच पाणीसाठा


Marathwada Dam Water Storage Update : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली असून, जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस पडला नसल्याने मराठवाड्यातील (Marathwada) धरणातील पाणीसाठी (Dam Water Storage) आता कमी होत आहे. मराठवाड्यातील 11 प्रमुख धरणात आज घडीला 33.48 टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक राहिला आहे. तर मराठवाड्याची तहान भागावणाऱ्या जायकवाडी धरणात 26.93 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणीसाठी आता पिण्यासाठी आरक्षीत करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे जायकवाडी धरण 33 टक्के भरपर्यंत जायकवाडी धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 



Source link

Jawan Prevue: शाहरुख खानने चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘जवान’ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला!

0
Jawan Prevue: शाहरुख खानने चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘जवान’ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला!


Jawan Prevue Release: बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या टीझरची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. या चित्रपटाचा टीझर १० जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, या टीझरच्या ऐवजी निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’चा प्रिव्ह्यू नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा हा प्रिव्ह्यू पाहून चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. या प्रिव्ह्यूमध्ये, शाहरुख खान एका सीनमध्ये त्याच्या चेहऱ्यावरील आणि डोक्यावरील बँडेज उघडताना दिसत आहे. यानंतर जेव्हा त्याचा टक्कल केलेला चेहरा समोर येतो, ते पाहून सगळेच स्तब्ध झाले आहेत.



Source link

Karan Johar: विकी कौशल अन् तृप्ती डिमरीला घेऊन करण जोहर करणार नवा चित्रपट! सोशल मीडियावर केली घोषणा

0
Karan Johar: विकी कौशल अन् तृप्ती डिमरीला घेऊन करण जोहर करणार नवा चित्रपट! सोशल मीडियावर केली घोषणा


या पोस्टसोबत करण जोहरने त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या रिलीजची तारीखही दिली आहे. यावर विकी कौशलनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की, ‘आम्ही खूप प्रेम आणि भरपूर मनोरंजन घेऊन येत आहोत, २३ फेब्रुवारी २०२४ रोजी तुम्हा सर्वांना चित्रपटगृहांमध्ये भेटू…’ . दुसरीकडे, करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ हा चित्रपट २८ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमीसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



Source link

Anupam Kher: साक्षात रवींद्रनाथ टागोरच! अनुपम खेर यांचा नवा लूक पाहून चाहतेही झाले स्तब्ध

0
Anupam Kher: साक्षात रवींद्रनाथ टागोरच! अनुपम खेर यांचा नवा लूक पाहून चाहतेही झाले स्तब्ध


रवींद्रनाथ टागोर १९१३ हे साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांनी भारत आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिले. यासोबतच त्यांनी आणखी अनेक गाणी लिहिली. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेवांसह अनेक नावांनी ओळखले जाते. अनुपम खेर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर, चाहते देखील त्यांच्या या लूकचे खूप कौतुक करत आहेत. अनुपम खेर सध्या प्रचंड व्यस्त आहेत. त्यांच्या आगामी प्रकल्पांमध्ये ‘मेट्रो इन दिनो’, ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘इमर्जन्सी’ या चित्रपटांचा समावेश आहे.



Source link

कराड : डॉक्टरच्या घरात शस्त्राच्या धाकाने जबरी चोरी; १० तोळ्‍याच्या दागिन्यांसह १२ लाख रूपये लंपास | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा कराडलगत असलेल्या शिंदे मळ्यात डॉक्टरच्या घरात शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी जबरी चोरी केली. यामध्ये 10 तोळे दागिन्यासह बारा लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवार दिनांक १० रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.

कराडलगत असलेल्या शिंदे मळ्यामध्ये डॉ. राजेश शिंदे यांचे हॉस्पिटल आहे. तेथेच ते वास्तव्य करत आहेत. रविवारी रात्री डॉ. राजेश शिंदे यांच्यासह इतर नातेवाईक घरात झोपलेले असताना पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्याने पाठीमागील जिन्यावरून त्यांच्या घरात प्रवेश केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉक्टर झोपत असलेल्या रूममध्ये चोरट्याने प्रथम प्रवेश केला. त्यांनी डॉक्टरांना शस्त्राचा धाक दाखविला. त्यानंतर डॉक्टरांच्या रूममधून आवाज येत असल्याने खालील रूममध्ये झोपलेले इतर नातेवाईक डॉक्टरांच्या रूममध्ये गेले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यासह डॉक्टरांना शस्त्राचा धाक दाखवून पैसे व दागिने ठेवलेल्या रूममध्ये आणले. तेथील कपाटातील सुमारे दहा तोळ्याचे दागिने व बारा लाख रुपये घेऊन चोरट्याने तेथून पोभारा केला.

दरम्यान याबाबतची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक सराटे यांनी त्वरित कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारीही त्वरित घटनास्थळी पोहोचले. तसेच जबरी चोरीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. तसेच नेमकी चोरी कशी झाली, दागिने व रोख रक्कम किती गेली आहे, याचीही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. चोरटे नक्की किती होते, ते कोठून आले घरात चिखल पडलेला दिसत होता तो चोरट्यांच्या पायानेच आला आहे का? याचीही माहिती पोलीस घेत होते.

हेही वाचा : 











Source link

सातारा : मायणी येथे साडेदहा किलो गांजा जप्त | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  विक्रीसाठी आणलेला सुमारे साडेदहा किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून एकाला अटक करण्यात आली. जाकीर गुलाम मुजावर (वय 41, रा. सांगोला जि. सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) व वडूज पोलिसांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 6 जुलै रोजी वडूज येथील प्रोबेशनर पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे यांना एकजण मायणी (ता. खटाव) येथील अभयारण्यासमोर अमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून संशयिताला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सुमारे साडेदहा किलोग्रॅम वजनाचा गांजा सापडला. बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत 2 लाख 55 हजार 600 रुपये आहे. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन संशयिताला अटक केली.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष पवार, अमोल माने, रविंद्र भोरे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस आतिश घाडगे, मोहन नाचण, संजय शिर्के, विजय कांबळे, अमित सपकाळ, अनिल खटावकर, राजीव कुंभार, रूद्रायन राऊत, सत्यवान खाडे, शिकलगार, नरळे, दत्तात्रय काळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.



Source link

Bawaal Trailer: लव्ह स्टोरी अन् भरपूर धमाल! वरुण धवन-जान्हवी कपूरच्या ‘बवाल’चा ट्रेलर बघाच!

0
Bawaal Trailer: लव्ह स्टोरी अन् भरपूर धमाल! वरुण धवन-जान्हवी कपूरच्या ‘बवाल’चा ट्रेलर बघाच!


‘बवाल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘बवाल’च्या ट्रेलरच्या सुरुवातीला वरुण धवन लखनौच्या रस्त्यांवर स्टाईलने बाईक चालवताना दिसत आहे. तर, पार्श्वभूमीत एक आवाज ऐकू येतो की, अज्जू म्हणजेच वरुण धवनने लोकांमध्ये आपली खोटी प्रतिमा बनवली आहे. त्यानंतर चित्रपटात महायुद्धाचा तडका लावला जातो. कथेत ट्विस्ट येतो, जेव्हा अज्जू लग्न करून युरोपला पोहोचतो. तिथून प्रेम, भांडण आणि मनातील युद्ध बघायला मिळते.



Source link

Ajit Pawar Rebellion : राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर कोणती कारवाई होणार?, काँग्रेसच्या बड्या नेत्याने नियमच सांगितला

0
Ajit Pawar Rebellion : राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर कोणती कारवाई होणार?, काँग्रेसच्या बड्या नेत्याने नियमच सांगितला


माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादीतून बंड करणाऱ्या अजित पवार यांच्या गटाकडे दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा नाहीये. त्यामुळं त्यांच्या गटावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे सध्या सर्वाधिक आमदार नसल्याने त्यांच्या गटातील सर्व आमदार लवकरच निलंबित होणार असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अजित पवारांकडे ३६ आमदार असते, तर त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं असतं. परंतु त्यांच्याकडे तेवढी संख्या नसल्याने राज्यात आणखी मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतून बंड करणारे आमदार तसेच मंत्र्यांचं सदस्यत्व रद्द होणार असल्याचं भाकित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.



Source link

प्रोत्साहनपर लाभ योजनेपासून 40 टक्के शेतकरी वंचित | पुढारी

0









ढेबेवाडी;  पुढारी वृत्तसेवा : राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीप्रमाणे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले आहे. मात्र, अजूनही महाविकास आघाडी सरकारच्या काळात पीक प्रोत्साहन योजनेचे पैसे सुमारे 40 ते 45 टक्के मिळालेले नाहीत. त्यामुळे या योजनेचा लाभ केव्हा मिळणार ? असा प्रश्न लाखो शेतकर्‍यांच्या मनात कायम आहे.

याबाबत गावोगावच्या सेवा सोसायटींच्या कर्जदार सभासद शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2014 साली सत्तेवर आलेल्या भाजपा – शिवसेना युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेत शेतकरी रांगेत उभे राहून अक्षरशः गाेंंधळलेला पहावयास मिळाला. हे सरकार पाच वर्षांनी पायउतार झाले तरी लाखो शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळालाच नाही. पुढे 2019 साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून नियमितपणे कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजारांची पीक प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाने सगळे जग व्यापले व प्रोत्साहन योजना मागे पडली.

कोरोना महामारीचे संकट संपल्यावर ठाकरे सरकारने 2022 च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आणि सहकार विभाग व जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्यामार्फत सोसायटी व अन्य बँकाकडून 2017 – 2018 पासून सलग 3 वर्षे नियमित कर्ज परतफेड केलेल्या पात्र शेतकर्‍यांच्या याद्याही मागवण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात या योजनेचा लाभ देण्यापूर्वीच महाविकास
आघाडी सरकार कोसळले व प्रोत्साहन पुन्हा लांबतय की काय? असा प्रश्न निर्माण झाला.

सत्तांतरानंतर शिवसेना – भाजपा शासनाने मागील वर्षी दिवाळीवेळी या योजनेचा लाभ शेतकर्‍यांना द्यायला सुरुवात केली. पहिल्या यादीत प्रत्येक गावातील 25 ते 50 नावांचा समावेश होता. त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पैसे दिल्यानंतर दुसरी मग तिसरी अशाप्रकारे याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे शासनाकडून सांगण्यात आले होते. तिसरी यादी आली व पैसे खात्यावर यायला उशीर होऊ लागल्यानंतर याद्या बंद झाल्या. आजपर्यंत फक्त 50 ते 60 टक्के शेतकर्‍यांनाच पैसे मिळाले असून उर्वरित 40 ते 50 टक्के शेतकरी पीक प्रोत्साहन योजनेच्या लाभाची केवळ प्रतीक्षा करत आहेत. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी तरी या योजनेचा लाभ मिळेल का, असा प्रश्न बळीराजाकडून उपस्थित होत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली होती. सत्तेत कोण आहे ? याच्याशी शेतकर्‍यांना देणे घेणे नाही. पण राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकर्‍यांना मिळायलाच हवा.
– रमेश देशमुख, माजी उपसभापती,
पंचायत समिती कराड.











Source link