Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2949

सातारा : पाटण तालुक्यातील पर्यटन स्थळे; दमदार पाऊस, कोयना धरणासह धबधबे | Satara Tourist Places | पुढारी

0



पाटण; गणेशचंद्र पिसाळ


Satara Tourist Places :
पाटण तालुका म्हटलं की निसर्गाची अद्भुत व अद्वितीय अशी साधनसंपत्ती. पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गात शेकडो धबधब्यांचं माहेरघर असणार्‍या या तालुक्यात आता पावसाळी पर्यटनाला अच्छे दिन आल्याचे पहायला मिळत आहे. दमदार पाऊस, कोयना धरण, ओसंडून वाहणार्‍या धबधब्यांसह हिरव्यागार निसर्गात चिंब भिजायला आणि मनमुराद आनंद घ्यायला दैनंदिन हजारो पर्यटकांची पावले आपोआपच कोयनेकडे वळायला लागली आहेत.

पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा), सडा सडावाघापूरचा (Reverse water fall) उलटा धबधबा, बोपोली, कोंडावळे, ढाणकल, घाटमाथा, शिरळ, गाढवराई, कामरगाव, हुंबरळी आधी कोयनेसह मोरणा, तारळे विभागातील स्थानिक अत्यंत आकर्षक असे नयनरम्य धबधबे सध्या ओसंडून वाहत आहेत. त्याचवेळी कोयना धरण जलाशय असो किंवा काठी आयलँड पवनचक्क्यांचा हिरवागार प्रदेश तसेच कोयनानगर येथील नेहरू उद्यानातील सध्याची सौंदर्य हे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. तालुक्यातील मोरणा गुरेघर, तारळी आदी छोट्या-मोठ्या धरणांचे परिसरही सध्या पर्यटकांनी फुलल्याचे पहायला मिळत आहेत . प्रामुख्याने कोयना विभागात पर्यटन सध्या फार मोठ्या प्रमाणात दोर बहरले असून त्यामुळे स्थानिक रिसॉर्टस्, हॉटेल्स ते अगदी छोट्या-मोठ्या चहा, वडापाव, भजीच्या टपर्‍या, स्थानिक वाहतूक व्यवस्था यामुळे पर्यटनासोबतच स्थानिक रोजगार, व्यवसायालाही चांगलीच चालना मिळाल्याचे अनुभवायला येत आहे. पावसाळ्यातील या निसर्गाने नटलेल्या स्थानिक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना अभयारण्य, पश्चिम घाट प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन यामधला जंगलाचा परिसरही सध्या हिरवाईने नटला आहे. निश्चितच पर्यटकांच्यासाठी येथेही दरवर्षी चांगली संधी उपलब्ध होत असल्याने केवळ तालुका, जिल्हा व राज्यातीलच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून परराज्यातीलही बहुसंख्य पर्यटक (Satara Tourist Places)  कोयनेला भेट देत असतात.

निश्चितच गेल्या काही वर्षांत पर्यटकांची ही लाखोंची संख्या येणार्‍या काळात त्याचपटीत वाढण्यासाठी पर्यटन विकासाच्या द़ृष्टीने प्रामुख्याने नवीन महाबळेश्वर प्रकल्प , कोयना जलाशयातील बंद पडलेले बोटिंग आणि पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना होणेही पर्यटन व स्थानिकांच्या द़ृष्टीने तितकेच महत्त्वाचे बनले आहे.



Source link

Appi Amchi Collector: अर्जुनला अप्पी गरोदर असल्याचं कळेल का?, मालिका रंजक वळणावर

0
Appi Amchi Collector: अर्जुनला अप्पी गरोदर असल्याचं कळेल का?, मालिका रंजक वळणावर


नुकताच आपण पहिले की, मनी अप्पीचे बाहेरच्या मुलाशी संबंध असल्याचे बोलल्याने अर्जुन, स्वप्निल व विनायक अप्पीच्या बाजूने उभे राहतात. अर्जुन त्याचा अप्पीवर विश्वास असल्याचे सांगतो. तर दुसरीकडे छकुलीचा अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. आप्पी आणि अर्जुन परत एकत्र येतील का? या सगळ्यात अर्जुनला अप्पी गरोदर आहे असे कळेल का? हे पाहणे रोमांचक असणार आहे.



Source link

Baipan Bhaari Deva: ‘बाईपण भारी देवा’मधील वंदना गुप्ते यांना झाली अटक? काय आहे प्रकरण जाणून घ्या

0
Baipan Bhaari Deva: ‘बाईपण भारी देवा’मधील वंदना गुप्ते यांना झाली अटक? काय आहे प्रकरण जाणून घ्या


केदार शिंदे यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे SOLID आहे. #baipanbhaarideva #बाईपणभारीदेवा .’ आता हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या पोस्टवर कमेंटही करत आहेत.



Source link

Mumbai Online Fraud : ऑनलाईन ऑर्डर करणं पडलं महागात; केईएमच्या डॉक्टरला तब्बल दीड लाखांचा गंडा

0
Mumbai Online Fraud : ऑनलाईन ऑर्डर करणं पडलं महागात; केईएमच्या डॉक्टरला तब्बल दीड लाखांचा गंडा


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील केईएम रुग्णालयातील डॉक्टर शनिवारी काम संपवल्यानंतर मित्रांसोबत कर्जतला फिरण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्यांनी ऑनलाईन फूड ऑर्डर केली. त्यानंतर डॉक्टरांनी ऑनलाईन वेबसाईटवरून हॉटेलचा नंबर मिळवत त्यावर कॉल केला. त्यावेळी २५ समोसे देण्यासाठी समोरील व्यक्तीने उचल रक्कम मागितली. आरोपीने डॉक्टरकडून ओटीपी मिळवत एकाचवेळी त्याच्या खात्यातून दीड लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर आरोपीने ऑनलाईन व्यवहार नको, हॉटेलवर बोलूयात, असं म्हणत फोन ठेवला. त्यावेळी डॉक्टरांना खात्यातून दीड लाख रुपये काढून घेण्यात आल्याचं लक्षात आलं.



Source link

Rang Maza Vegla: आर्यन करणार दीपा आणि कार्तिकची मदत! ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार नवा ट्वीस्ट

0
Rang Maza Vegla: आर्यन करणार दीपा आणि कार्तिकची मदत! ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार नवा ट्वीस्ट


साक्षीच्या मृत्यू प्रकरणाचे पुरावे असलेला पेन ड्राईव्ह आयेशाने नष्ट केला. तर, दुसरीकडे ती वेड लागल्याचं ढोंग करून १४ वर्ष पोलिसांपासून पळ काढत आहे. मात्र, आता तिचं हेच बिंग फुटणार आहे. दीपा, कार्तिक, दीपिका आणि आर्यन मिळून आयेशाचा डाव उधळून लावणार आहेत.



Source link

Dhule : मुख्यमंत्र्यांचं विमान जळगावात उतरलं; ढगाळ हवामान, सिग्नल न मिळाल्याने घेतला निर्णय 

0
Dhule : मुख्यमंत्र्यांचं विमान जळगावात उतरलं; ढगाळ हवामान, सिग्नल न मिळाल्याने घेतला निर्णय 


Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या धुळे दौऱ्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. धुळ्याच्या कार्यक्रमासाठी जात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पावसाच्या वातावरणामुळे विमानाच्या तांत्रिक अडचणीमुळे जळगाव विमानतळावर उतरले आहेत. त्यामुळे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उशिरा होण्याची शक्यता आहे. 

आज धुळे (Dhule) शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. धुळ्याकडे रवाना झाल्यानंतर अचानक पावसाचे सावट आल्याने हेलिकॉप्टरचा मार्ग बदलण्यात आला असून मुख्यमंत्र्याचे विमान जळगावला उतरविण्यात आले आहे. ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे धुळे विमानतळावरून सिग्नल न मिळाल्यामुळे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार यांना जळगाव विमानतळावर उतरावे लागले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुध्दा असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान धुळ्याहून जळगावला गेले. वातावरण खराब असल्यानं विमान जळगावला गेले. जळगाव विमानतळावर उतरून चारचाकीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे धुळ्याकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळते आहे. 



Source link

Veena Jagtap: वीणा जगतापला करायचं लग्न, मेट्रोमोनियल साइटवरची प्रोफाइल व्हायरल?

0
Veena Jagtap: वीणा जगतापला करायचं लग्न, मेट्रोमोनियल साइटवरची प्रोफाइल व्हायरल?


पुढे ती म्हणाली, ‘विशेष म्हणजे मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे याची मलाही कल्पना नाही. मी कधीच कोणत्याही मेट्रोमोनियल साईटवर नव्हते आणि नसेन. मी गेल्या वर्षी देखील अशाचप्रकारे खोटी बातमी ऐकली होती. त्यामुळे अशा खोट्या प्रोफाईलपासून सावध राहा. पण काहीही म्हणा, हे प्रोफाईल बनवणाऱ्या व्यक्तीच्या हिंमतीची मला दाद द्यावीशी वाटते.’



Source link

Ranveer Singh: घटस्फोटाच्या चर्चांवर रणवीरने सोडले मौन, म्हणाला…

0
Ranveer Singh: घटस्फोटाच्या चर्चांवर रणवीरने सोडले मौन, म्हणाला…



Ranveer Singh Divorce rumors: गेल्या काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीर घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.



Source link

Nagpur Accident : कारची उभ्या ट्रकला धडक; दहा महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू, रामटेक-भंडारा मार्गावरील घटना

0
Nagpur Accident : कारची उभ्या ट्रकला धडक; दहा महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू, रामटेक-भंडारा मार्गावरील घटना



Maharashtra Nagpur Accident : नागपुरात रामटेक भंडारा मार्गावर मोठा अपघात झाला आहे. उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे.



Source link

Bigg Boss Ott: बिगबॉस ओटीटी होस्ट करताना सलमान ओढत होता सिगारेट? फोटो व्हायरल

0
Bigg Boss Ott: बिगबॉस ओटीटी होस्ट करताना सलमान ओढत होता सिगारेट? फोटो व्हायरल


बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या चर्चेत आहे. स्पर्धकांमध्ये सतत वाद होताना दिसत आहेत. मात्र, प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होत आहे.आलिया सिद्दीकी, पलक पुरस्वानी आणि पुनीत सुपरस्टारनंतर अलीकडेच आकांक्षा पुरीलाही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. घराबाहेर पडल्यावर मीडियाशी बोलताना आकांक्षा पुरीने जैद हदीदशी किसिंगनंतर झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली.



Source link