Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2940

सातारा : पाटण तालुक्यात खरिपाच्या पेरण्या लांबणीवर | पुढारी

0









मारुल हवेली; धनंजय जगताप :  यावर्षी उशिरा आगमन होऊन देखील पाटण तालुक्यात अद्याप पावसाचा जोर नाही. परिणामी तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यात केवळ 53 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद असून भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी पिकांकडे शेतकर्‍यांचा अधिक कल आहे.

दरम्यान, तालुक्यात सरासरी 135 मि.मी. पावसाची नोंद झाली असून पडलेला पाऊस व झालेली पेरणी ही गत वर्षीच्या तुलनेने कमी आहे. चांगले पर्जन्यमान असलेल्या पाटण तालुक्यात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली आहे. परंतु जुलै महिना सुरू होऊनदेखील अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पुरेशा प्रमाणात पाऊस नसला तरी हंगाम वाया जाऊ नये म्हणून शेतकर्‍यांनी आपल्या पेरण्या उरकण्यावर भर दिला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे 28 हजार हेक्टर क्षेत्रावर हंगामातील खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेने ही आकडेवारी कमी असून एकूण क्षेत्राच्या केवळ 53 टक्केच पेरण्या आटोपण्यात आल्या आहेत.

यामध्ये भात पीक 6213 हेक्टर क्षेत्रावर घेण्यात आले आहे. ज्वारी 3746 हेक्टर, भुईमूग 9223 हेक्टर, सोयाबीन 7568 हेक्टर, नाचणी 105, मका 542 हेक्टर, तुर 209 हेक्टर, उडीद 194 हेक्टर, मूग 76 हेक्टर, सूर्यफुल 26 हेक्टर, अन्य कडधान्ये 304 हेक्टर तर अन्य तृणधान्ये 64 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहेत. तसेच पावटा, घेवडा, मटकी, वरी आदी पिकासह ऊस पीक घेण्यात आले आहे. कोयना धरण परिसरात पावसाची रिपररिप सुरू आहेत. तर तालुक्याच्या पूर्वेला उघडीप आहे. पावसाची उघडझाप सुरू असल्याने काही ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. काही ठिकाणी पेरणी झालेल्या शेतात भांगलण व कोळपणीची कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. ज्यादा क्षेत्रावर खरीप पिके घेतली गेल्याने पालेभाज्या व फळभाजीचे क्षेत्र कमी झाले आहे. बाजारपेठेत येणारी आवक घटल्याने भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे.











Source link

Aamir Khan: १० वर्षांनंतर आमिर खान आणि राजकुमार हिराणी येणार पुन्हा एकत्र

0
Aamir Khan: १० वर्षांनंतर आमिर खान आणि राजकुमार हिराणी येणार पुन्हा एकत्र


सध्या हिराणी हे त्यांचा आगामी चित्रपट ‘डंकी’च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते जवळपास चार-साडेचार वर्षांनी दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नाताळच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



Source link

सातार्‍यात दोघांना ९४ लाखांचा चुना; सौरऊर्जा प्रकल्पाच्या आमिषाने फसवणूक | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सौरऊर्जा प्रकल्प उभारून देतो, असे सांगून त्यासाठी वेळोवेळी 93 लाख 65 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोघे संशयित कर्नाटक व पश्चिम बंगाल राज्यातील असून त्यांनी सातार्‍यातील व्यावसायिकासह आणखी एकाला चुना लावल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संशयित आरोपींची फेसबुकवर ओळख झाली होती.

विशाल सिंग हरी बिरजे (रा. खानापूर, बेळगाव, कर्नाटक) आणि रवी अधिकारी (रा. खाटीक रोड, कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उमेश सदाशिव भोईटे (वय 40, रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे व्यावसायिक तसेच जागा खरेदी, विक्रीचा व्यवसाय करत आहेत. फसवणुकीची घटना दि. 1 मे 2020 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी फेसबुकवर शेंद्रे येथील एका प्लॉटची विक्री करण्याबाबतची पोस्ट टाकली होती. ही पोस्ट पाहून संशयित विशाल याने तक्रारदार यांना संपर्क केला. संपर्क हळूहळू वाढल्यानंतर मे 2020 मध्ये दोघे संशयित सातारा शहरालगत महामार्गावर भेटले. ओळखीदरम्यान दुसरा संशयित अधिकारी हा आरबीआय, दिल्ली येथे कार्यरत असल्याचे सांगितले.

संशयित विशाल याने असे सांगितले की, तो सोलर प्रोजेक्ट उभारत असून यासाठी त्याला जर्मनी येथील कंपनीने 23 हजार कोटी रुपये पाठवले आहेत. संबंधित रक्कम भारतीय रिझर्व बँकेत जमा असून त्याबाबतचे काही कागदपत्रे तक्रारदार यांना दाखवली. तसेच सोलर प्रोजेक्ट उभा करणार असल्यास त्यासाठी मदत करेन, असेही संशयितांनी सांगितले. अशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतर संशयित निघून गेले. पुढे फोनवरुन त्यांचा नेहमी संपर्क राहिला. कंपनीत गुंतवणुकीसाठी तक्रारदार तयार झाल्यानंतर किमान 10 लाख रुपये गुंतवावे लागतील असे संशयितांनी सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी पैशांची जुळवाजुळव केली व पैसे खात्यावर भरले. अशाप्रकारे प्रोजेक्टसाठी टप्याटप्याने संशयितांनी पैसे मागतील तसे ते पैसे पाठवत राहिले. पैसे खात्यावर पाठवत असल्याने त्याचे पुरावे होते. तसेच संशयित यासंबंधी विविध कागदपत्रे व्हॉट्सअपवर पाठवत होते. मात्र गोपनीय काम असल्याचे सांगून संबंधित कागदपत्रे लगेच डिलीट करत होते.

पैशांची वेळोवेळी मागणी होवू लागल्यानंतर तक्रारदार यांनी प्रोजेक्ट करायचा नसल्याचे सांगितले. मात्र त्यावर संशयितांनी प्रोजेक्ट रद्द केला तर पैसे बुडतील असे सांगितले. तोपर्यंत तक्रारदार यांनी हातउसने, दागिने मोडून, जागा विकून संशयितांना पैसे दिले. प्रोजेक्ट होत नसल्याचे पाहून तक्रारदार यांनी पैसे परत मागितल्यानंतर संशयितांनी फोन उचलण्याचे बंद केले. नंबर ब्लॉक केला. अशा प्रकारे तक्रारदार यांचे 56 लाख व तक्रारदार यांचे नातेवाईक महेश पवार यांच्याकडून 37 लाख 65 हजार रुपये घेवून संशयितांनी दोघांची 93 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.











Source link

Maharashtra Rain : पावसाचा जोर कायम! आज पुन्हा दमदार बरसणार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट

0
Maharashtra Rain : पावसाचा जोर कायम! आज पुन्हा दमदार बरसणार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट


विदर्भासह कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत होत असलेल्या पावसामुळं विदर्भातील अनेक नद्या या दुथड्या भरून वाहत आहेत. तर ओढ्या आणि नाल्याला देखील पूर आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड आणि धाराशीव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



Source link

TOP 80 : 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 जुलै 2023 : ABP Majha

0
TOP 80 : 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 जुलै 2023 : ABP Majha



<p>TOP 80 : 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 जुलै 2023 : ABP Majha</p>



Source link

सातार्‍यात कोयता दाखवत जबरी चोरी | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरातील तेली खड्डा येथे अज्ञात तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून एकाला मारहाण करत सोने, मोबाईल व पैसे जबरदस्तीने चोरी केल्याची घटना घडली. तक्रारदार जडीबुटी औषध विक्रेता असून हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर काही जणांनी मदत करण्याचा प्रयत्न केला असता कोयता हवेत फिरवून संशयितांनी दहशत माजवली. दरम्यान, सातार्‍यात जबरी चोरीची सलग दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंदलसिंग रतनसिंग चितोडिया (वय 49, रा. राधिका रोड, सातारा) यांनी अनोळखी तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे. ही घटना दि. 11 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तक्रारदार हे तेली खड्डा परिसरात असताना आडोशाला तिघेजण आले. संशयितांनी तंबाखू आहे का? अशी विचारणा करत त्यांना बाजूला घेतले. यावेळी एका संशयिताने कोयता काढून दहशत माजवली. दुसर्‍या संशयिताने दमदाटी, शिवीगाळ करत मारहाण केली. तिसर्‍या संशयिताने तक्रारदार यांना अंगावरील सोने, पैसे व मोबाईल देण्यास सांगितले. घडलेल्या घटनेने तक्रारदार घाबरले. त्यांनी मदतीसाठी काही लोकांना हाक मारण्याचा प्रयत्न करताच संशयितांनी तोंड रुमालाने दाबले व मारहाण केली. यावेळी संशयितांनी तक्रारदार यांच्या कानातील बाल्या जबरदस्तीने ओढल्याने त्यांच्या कानातून रक्त येवू लागले. याचदरम्यान संशयितांनी 30 हजार रुपये किंमतीची 3 ग्रॅम वजनाच्या बाल्या, 2 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, रोख 500 रुपये असा एकूण 32500 रुपये किंमतीचा मुद्देमाल संशयित तिघांनी जबरदस्तीने घेतला.

ही घटना पाहिल्यानंतर काही नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांनी हवेत कोयता फिरवत धुडगूस घातला. नागरिक जमू लागल्याचे पाहताच संशयितांनी तेथून धूम ठोकली. तक्रारदार जखमी झाल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाहणी करुन जखमी तक्रारदार यांची तक्रार घेतली. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेवून संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली.











Source link

Akshay Kumar: ‘OMG 2’ वर सेन्सॉर बोर्डाने घातली बंदी, काय आहे प्रकरण जाणून घ्या

0
Akshay Kumar: ‘OMG 2’ वर सेन्सॉर बोर्डाने घातली बंदी, काय आहे प्रकरण जाणून घ्या



Stay on ‘OMG 2’ Released: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘OMG 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, आता सेंसॉर बोर्डाने त्यावर बंदी घातली आहे.



Source link

सातारा : माजी उपसभापती बोराटेंच्या मुलाच्या खुनाचा डाव उधळला | पुढारी

0


कराड; पुढारी वृत्तसेवा :  कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांच्या मुलाच्या खुनाचा कट आखणार्‍या चौघांना तळबीड पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. सोमवारी मध्यरात्री पाठलाग करून पोलिसांनी ही कारवाई केली. जेवणाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिस तपासातून समोर आले आहे. प्रीतम चंद्रकांत पाटील (वय 31), सागर अशोक पवार (31), किरण मोहन पवार (31, सर्व रा. वहागाव, ता. कराड) आणि ऋषिकेश अशोक पाटील (22, रा. येणके, ता. कराड) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

बेलवडे हवेली, ता. कराड गावचे हद्दीत प्रीतम पाटील यांनी आनंद हॉटेल चालविण्यास घेतले आहे. या हॉटेलवर 7 जुलै रोजी शिरवडे, ता. कराड येथील माजी उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलगा आयुष्य सुहास बोराटे हा जेवण करण्यासाठी आला होता. त्यावेळी हॉटेल चालक प्रीतम पाटील व आयुष्य बोराटे यांचा जेवणावरून वाद झाला होती. त्यावेळी आयुष्याने त्याचा भाऊ वेदांत तसेच मित्र बाळू यादव
यांना बोलावून घेऊन आनंद हॉटेलची मोडतोड करत दुचाकीचे नुकसान केले होते. याचा राग प्रीतम पाटील यांना आला होता. त्यानंतर प्रीतम पाटील यांने त्याचे मित्र सागर पवार, कामगार किरण पवार व ऋषिकेश पाटील यांना बरोबर घेत 10 जुलै रोजी शिरवडेत आयुष बोराटे हा एकटाच असून त्याचा खुन करण्याचा कट आखला. त्यानुसार सोमवारी मध्यरात्री सागर पवार याच्या दुचाकहीच्या नंबर प्लेटला राख व माती फासून चौघेही शस्त्रासह शिरवडे येथे जाण्यास निघाले होते. त्याचवेळी तळबीड पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कर्मचारी विनया वाघमारे, हवलदार काका पाटील, प्रदीप पाटील, प्रवीण फडतरे, सनी दिक्षित हे रात्रगस्तीस पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांना चौघेही एकाच दुचाकीवर दिसल्याने संशय आला. पोलिसांनी त्यांना दुचाकी थांबवण्यास सांगितली. परंतु त्यांनी दुचाकी भरधाव वेगात नेली. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना तासवडे टोलनाक्याच्या परिसरात पकडले.

दरम्यान, पोलिस त्यांचा पाठलाग करत होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेले चाकू, कुर्‍हाड आणि कोयता ही शस्त्रे रस्त्याच्या कडेला टाकून दिली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शिरवडेत आयुष्य बोराटे याचा खून करण्यासाठी जात असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत त्यांनी रस्त्यात टाकलेली कुर्‍हाड, कोयता, चाकू तसेच दुचाकी ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांना तळबीड पोलिस ठाण्यात नेले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर, सपोनी राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकचा तपास हवालदार आप्पा ओंबोसे करीत आहेत.

The post सातारा : माजी उपसभापती बोराटेंच्या मुलाच्या खुनाचा डाव उधळला appeared first on पुढारी.



Source link

खा. उदयनराजेंकडून मंत्र्यांच्या गाठीभेटी; विकासावर चर्चा | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मुंबईत शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सातारा शहर व जिल्ह्यातील विकासकामांवर चर्चा केली. यावेळी खा. उदयनराजे यांनी मान्यवरांना तलवार भेट दिली.

सातारा शहर व जिल्ह्यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत शहरात विकासकामांच्या अनेक योजना खा. उदयनराजे भोसले यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून राबवल्या. नवीन विकासकामांचे प्रस्ताव तसेच सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना निधी मिळावा, यासाठी गेल्याच आठवड्यात खा. उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली हेाती. शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या बाबतीत तसेच प्रलंबित प्रकल्पांच्या अनुषंगाने त्यांनी ना. फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनाही शुभेच्छा देत खा. उदयनराजे यांनी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही चर्चा केली होती. खा. उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुंबईत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर, चंद्रशेखर बावनकुळे तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. ना. चंद्रकांत पाटील यांना तलवार भेट देण्यात आली. यावेळी राज्यसभेचे खा. धनंजय महाडिक हेही उपस्थित होते. मंत्री केसरकर व मंत्री पाटील यांच्यासोबत खा. उदयनराजे यांनी सातारा शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, पंकज चव्हाण, अतुल हिवाळे, सौरभ सुपेकर उपस्थित होते.

The post खा. उदयनराजेंकडून मंत्र्यांच्या गाठीभेटी; appeared first on पुढारी.



Source link

PVR Cinema: पीव्हीआर आयनॉक्सने केल्या खाद्य पदार्थांच्या किंमती कमी, जाणून घ्या नव्या ऑफर्स

0
PVR Cinema: पीव्हीआर आयनॉक्सने केल्या खाद्य पदार्थांच्या किंमती कमी, जाणून घ्या नव्या ऑफर्स



PVR Cinema Food: आता पीव्हीआरमध्ये प्रेक्षकांना ९९ रुपयांमध्ये पदार्थ खायला मिळणार आहेत. जाणून घ्या कसे आणि कधी?



Source link