Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2941

Pune Superstition News : घरात सुख शांतीसाठी पूजेचा घाट; पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने गमावले तब्बल २८ लाख

0
Pune Superstition News : घरात सुख शांतीसाठी पूजेचा घाट; पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने गमावले तब्बल २८ लाख

पुणे : पुणे हे शिक्षणाचे माहेर घर आहे. या शिक्षणाच्या माहेरघरात अनेक सुशिक्षित तरुण मात्र, अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे चित्र आहे. अशीच एक घटना धानोरी परिसरात उघडकीस आली आहे. घरात सुख शांती नांदावी या नादात एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाने मांत्रिकाला पाचारण केले. या मांत्रिकाने विविध पूजा सांगून या सुशिक्षित तरूणाकडून तब्बल २८ लाख रुपये उकळून फरार झाला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार त्याच्या बायकोच्या भावानेच घडवून आणल्याचे देखील पुढे आले आहे.

Source link

राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट

0
राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट

Maharashtra Rain : राज्यात सध्या तुरळक ठिकाणी पाऊस (Rain) पडत आहे. बहुतांश जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं बळीराजा चिंतेत आहे. राज्यातील पेरणीसाठी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. मात्र, पावसानं चांगलीच ओढ दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यातील कोकणासह मुंबई उपनगर ठाणे या परिसरात चांगला पाऊस पडत आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. अन्य ठिकाणी मात्र म्हणावा तसा पाऊस झाला नाही. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आण विदर्भातह पावसाटा यलो अलर्ट देण्यात आा आहे. त्याचबरोबर कोकणातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे.

अकोल्यात जोरदार पाऊस, चिमुकला गेल्या ओढ्याच्या पाण्यात वाहून

अकोल्यात रात्री धुवांधार पाऊस झाला आहे. या पावसात खैरमोहम्मद प्लॉट भागातील एक चिमुकला ओढ्याच्या पुरात वाहून गेला आहे. जियान अहमद एकबाल अहमद असं या वाहून गेलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. ओढ्याचं पाणी काहीसं वाढल्यानंतर तिथे लहान मुले खेळत होती. त्याचवेळी खेळताना जियान वाहून गेला आहे. त्याचा शोध मध्यरात्री उशिरापर्यंत बचावपथकाकडून सुरू होता.

वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार पाऊस

वाशिमच्या रिसोड तालुक्यात आज अनेक भागात  मुसळधार  पाऊस झाला आहे. तर  कोयाळी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्यानं परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये नुकतीच खरिपाची पेरणी केलेलं सोयाबीन पीक आणि गेल्या महिन्यात लागवड केलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे. आधीच उशिरा पाऊस झाल्याने  पेरणी उशिरा झाली होती. त्यामुळं खरिपाच उत्पन्न घटते की काय अशी चिंता सतावत असतानाच आता ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे.

अहमदनगर जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. बागायत भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र दक्षिण नगर जिल्ह्यातील जिरायत पट्ट्यामध्ये अद्यापही अनेक ठिकाणी पेरणी खोळंबली आहे. नगर तालुक्यातील वाळकी आणि खडकी भागातील फळबागांची होरपळ सुरु झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला आहे, मात्र तरी देखील फळबागा वाचू शकल्या नाहीत.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

सह्याद्रीच्या वाघाला मृत्यूच्या मगरमिठीतून सोडवलं; पन्हाळ्याची घोडखिंड पावन करणारे बांदल सैन्य

0
सह्याद्रीच्या वाघाला मृत्यूच्या मगरमिठीतून सोडवलं; पन्हाळ्याची घोडखिंड पावन करणारे बांदल सैन्य

Chhatrapati Shivaji Maharaj : एकीकडे सिद्दी जौहर त्याच्या हजारो सैन्यासह पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता अन् दुसरीकडे औंरंगजेबचा मामा शाईस्तेखान पुण्यावर चाल करुन येत होता. अशात शिवराय पन्हाळ्याच्या किल्ल्यावर अडकले होते. मग बांदलांच्या आऊसाहेब दीपासाहेब बांदल यांनी बारा मावळाच्या बांदलाना (Maval Bandal) पत्र लिहिले आणि त्यांना एकत्र केले. तुम्ही परत आला नाही तरी चालेल पण शिवाजीराजांना पन्हाळ्यातून सोडवून परत आणा… असा आदेश त्यांनी त्यांचा पुत्र बाजी बांदल आणि नातू रायाजी बांदल यांना दिला आणि 600 बांदलांची शिबंदी वेगवेगळ्या मार्गाने पन्हाळ्यावर धडकली. यांच बांदलांनी आपल्या जीवाची बाजी लावून शिवरायांना पन्हाळ्यावरून सोडवलं आणि विशाळगडावर सुखरूप पोहोचवलं. या बांदलाच्या पराक्रमाचा दिवस म्हणजे 13 जुलै. याच दिवशी बांदलांच्या रक्ताने पावनखिंड पावन झाली आणि सह्याद्रीचा वाघ स्वराज्यात सहीसलामत परत आला.

सिद्दी जौहारला (Siddi Jauhar) चकवून शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निसटले आणि विशाळगडच्या वाटेने निघाले. डोंगर कड्याकपारीत लढणाऱ्या काटक असा 600 बांदलांची शिबंदी त्यांच्यासोबत होती. हे समजतात सिद्दीने त्याचा सरदार, सिद्दी मसूदला पाच हजारांची फौज दिला आणि शिवरायांच्या मागावर पाठवलं. त्यानंतर 300 बांदलांसह बाजीप्रभूंनी खिंड लढवली आणि गनिमाला घोडखिंडीतच (Battle of Pavan Khind) रोखलं. दुसरीकडे रायाजी बांदल यांनी विशाळगडचा वेढा फोडला आणि शिवरायांना विशाळगडावर सुखरूपपणे पोहोचवलं.

Histoty Of Bandal Sardar : बांदलांचा इतिहास

बांदल म्हणजे बाणाचे दल… बाण दल, जे बाण मारण्यात सर्वोत्कृष्ट, त्यावरुनच त्यांना बांदल असं म्हटलं जायचं. बांदल हे मूळचे बुंदेलखंडचे असल्याचं मानलं जातंय. कोलकातावरुन ते मध्य प्रदेश, गुजरात ते महाराष्ट्र असा त्यांच्या पूर्वजांचा प्रवास असल्याचं सांगितलं जातंय. बांदल सरदारांचे वंशज राजेंद्र बांदल यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, बांदलांनी 1625 साली निजामाचा शूर वजीर मलिंक अंबरला हरवलं आणि केंजरगड जिंकला. निजामशाह आणि आदिलशाहला न जुमानता त्यांच्याविरोधात बांदल सैन्य उभे राहिलं.

बांदलांचे प्रमुख कृष्णाजी नाईक बांदल यांच्या पत्नी म्हणजे आऊसाहेब उर्फ दीपाऊसाहेब बांदल. कृष्णाजी बांदलांच्या पश्चात त्यांनी बारा मावळाचे नेतृत्व केलं. नावात बांदल असलं तरी बांदलांनी तलावारीच्या जोरावर चांगलाच दबदबा ठेवला होता. दीपाऊसाहेब बांदल या शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाईसाहेब यांच्या आत्या, त्यांचे मूळचे नाव दिपाऊ निंबाळकर.

बाजीप्रभू हे बांदलांचे (Histoty Of Naik Bandal Sardar) प्रमुख सरदार. स्वराज्याच्या सेवेत आलेल्या बांदलांनी अफजलखानच्या वधाच्या वेळी मोठा पराक्रम गाजवला. पण बांदलांचे सर्वात मोठं काम म्हणजे पन्हाळ्यावरून शिवरायांची सुटका.

शिवाजी महाराज हे पन्हाळ्याच्या सिद्दीच्या वेढ्यात अडकले होते. मार्चमध्ये पडलेला वेढा हा जून संपला तरी कमी झाला नव्हता. वरून धो धो पाऊस कोसळत होता पण तरीही सिद्दी अजगराप्रमाणे आपळा विळखा अधिकच घट्ट करत होता. महाराजांच्या सुटकेसाठी त्यावेळचे सरसेनापती नेताजी पालकर यांनी पन्हाळ्याला धडक मारली. पण त्यांना यश आलं नाही. मग ही जबाबदारी दीपाऊसाहेब बांदलांनी घेतली.

बारा मावळातील बांदल गोळा केले

दीपाऊसाहेब बांदलांनी बारा मावळातील लढाऊ बांदल एकत्र केले. बाजी बांदल हे त्यांचे पुत्र आणि रायाजी बांदल हे त्यांचे नातू. तुम्ही परत आला नाही तरी चालेल पण सह्याद्रीचा वाघ, शिवराय स्वराज्यात सुखरूप परत आले पाहिजेत असा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर बाजीप्रभू, फुलाजीप्रभू यांच्यासह बांदलांची शिबंदी वेगवेगळ्या मार्गाने पन्हाळ्यावर पोहोचली.

दुसरीकडे शिवरायांनी सिद्दीला गाफिल ठेवलं आणि संधी साधली. 12 जुलै 1660 रोजी 600 बांदलांची शिबंदी घेऊन शिवराय पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटले आणि विशाळगडच्या दिशेने निघाले. गजापूरच्या खिंडीत गेल्यानंतर बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली 300 बांदलांची एक तुकडी मागे राहिली. तर रायाजी बांदलांच्या नेतृत्वाखाली 300 बांदलांची तुकडी शिवरायांना घेऊन विशाळगडाच्या दिशेने गेली.

तोफेचा आवाज आल्याशिवाय हा बाजी जीव सोडणार नाही… एकाही गनिमाला खिंडीतून पलिकडे जाऊ देणार नाही असा निश्चय केलेल्या बाजीप्रभूंनी खिंड गाजवली. स्वराज्याच्या पोशिंद्याला विशाळगडावर सुखरूप पोहोचवायचं या विचाराने एका एका मावळ्यात दहा जणाची शक्ती संचारली होती. मावळ्यांच्या तलवारी वीजेप्रमाणे चमकत होत्या आणि गनिमाचे शीर धडावेगळे होत होते.

आधी फुलाजीप्रभू धारातीर्थी पडले… नंतर हैबतराव बांदल पडले… शंभूसिंह जाधवराव.. विठोजी काटे… आणि बाजी बांदलही धारातीर्थी पडले. त्यानंतरही बाजीप्रभू लढत राहिले. शेवटी गनिमाची एक गोळी आली आणि बाजीप्रभूंच्या छातीचा वेध घेतला…. बाजीप्रभू खाली पडले, पण त्यांचं लक्ष विशाळगडाकडील तोफेच्या आवाजाकडे लागलं होतं. एवढं होऊनही बांदल लढत होते… त्यांनी एकाही गनिमाला खिंडीतून पलिकडे सोडलं नाही.

दुसरीकडे रायाजी बांदलांनी आदिलशाहच्या सुर्वे आणि दळवींचा वेढा फोडला आणि शिवरायांना विशाळगडावर सुखरूपपणे पोहोचवलं. विशाळगडावरून पाच तोफांचे आवाज आले आणि बाजीप्रभूंनी प्राण सोडला, इतर बांदल सैन्य जंगलात पसार झाले. पावनखिंडचे घनघोर युद्ध संपले… बांदलांच्या रक्ताने घोडखिंड माखली होती… घोडखिंडीतले प्रत्येक झाड…वाहतं पाणी…. वरून कोसळणारा पाऊस, इथली माती अन् दगडधोंड्यांनी बांदल सैन्याचं शौर्य पाहिलं.

दीपाऊसाहेब बांदलांचे शब्द बांदल सेनेने खरे केले आणि सह्याद्रीच्या वाघाला त्या सिद्दीच्या मगरमिठीतून सोडवलं… अजगराच्या विळख्यातून स्वराज्याचा प्राण सोडवला.

स्वराज्याच्या पहिल्या समशेरीचा मान बांदलांना

बांदल सैन्याने स्वराज्यासाठी दिलेले हे अत्युच्च योगदान लक्षात घेऊन शिवरायांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. स्वराज्याच्या सर्वात मोठ्या धारेच्या पहिल्या समशेरीचा मान हा जेधे घराण्याला होता. शिवरायांनी जेधे घराण्याशी सल्लामसलत केली आणि धारेच्या पहिल्या समशेरीचा मान रायाजी बांदल यांना दिला.

बांदलांनी आपल्या शौर्याने, पराक्रमाने पन्हाळ्याची घोडखिंड पावन केली. त्यांच्या पराक्रमाची दखल घेऊन शिवरायांनी घोडखिंडीचे नाव पावनखिंड ठेवलं. ज्या ज्या वेळी स्वराज्याच्या इतिहासाचं स्मरण केलं जाईल, त्या त्या वेळी बांदलांच्या शौर्याचीही दखल घेतली जाणार हे नक्की.

ही बातमी वाचा:

Source link

MPSC Result : एमपीएससीकडून महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

0
MPSC Result : एमपीएससीकडून महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

अ आणि ब गटाच्या परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून घेतल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. अधिक्षक, डॉक्टर अशा मोठ्या पदांचा यामध्ये समावेश आहे. असे असताना आरोग्य विभागातील क आणि ड गटाच्या परीक्षा या नियमित होतात तशाच असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Source link

महायुतीत ठिणगी? रायगडच्या पालकमंत्रीपदावरून NCP चे दोन आमदार अदिती तटकरेंचा अपमान करणाऱ्या भरत गोगावलेंना भिडले

0
महायुतीत ठिणगी? रायगडच्या पालकमंत्रीपदावरून NCP चे दोन आमदार अदिती तटकरेंचा अपमान करणाऱ्या भरत गोगावलेंना भिडले

bharat gogawale controversial statement :रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीच्या आमदार व मंत्री अदिती तटकरे यांच्यावर टीका केली. या टिकेला आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

Source link

मोठी बातमी! कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदील

0
मोठी बातमी! कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदील

Krishna-Bhima Sthirikaran Project:  पावसाळ्यात सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील महापुरात वाहून जाणारे पाणी पुणे, सोलापूर आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला देणाऱ्या कृष्णा खोरे ‘फ्लड डायवर्जन प्रोजेक्ट’ला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वता  मान्यता दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही माहिती दिली. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातील आमदार जीवन गोरे, राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आदी आमदार उपस्थित होते. त्याशिवाय, जलसंपदा विभागाचे सचिव  दीपक कपूर आणि इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत आज मुंबईतील सागर बंगल्यात बैठक पार पडली.

पावसाळ्यामध्ये कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यातील काही भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून पाणी वाहून जाते. त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. पुराच्या परिणामी जनजीवन आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये  होत असते. यासाठी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे पाणी  सातारा जिल्ह्यातील माण, खटाव फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग, सोलापूर आणि मराठवाडा या भागातील जनतेला दिल्यास मोठ्या प्रमाणात दुष्काळी भागातील जमीन ओलिताखाली येणार असल्याची बाब निदर्शनास खासदार  निंबाळकर यांनी आणून दिली. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक घेतली. सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे.

हा प्रकल्प अंदाजे 20 हजार कोटी रुपयांचा असून  त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद  करण्याचे आदेश आज पारित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेसाठी ही  मोठी भेट असणार आहे. यामुळे  भविष्यात दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटून हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे. यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे. हरित क्रांती बरोबर आर्थिक क्रांती होणार असून महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा व पश्चिम किनारा (कोकण) या पाच प्रमुख नद्यांच्या खोर्‍यांतून उपलब्ध होणार्‍या एकूण 4758 अब्ज घनफूट पाण्यापैकी 1079 अब्ज घनफूट पाणी कृष्णा खोर्‍यातून उपलब्ध होते. महाराष्ट्रातील एकूण प्रमुख पाच नदी खोर्‍यांपैकी एकट्या कृष्णा खोर्‍यातून महाराष्ट्रात 26.58 टक्के म्हणजेच एकूण उपलब्ध पाण्यापैकी एक चतुर्थांशपेक्षा अधिक पाणी उपलब्ध होते. त्यावरून महाराष्ट्रासाठी कृष्णा खोर्‍यातील पाण्याचे महत्व आपल्या लक्षात येते. कृष्णा खोर्‍यात महाराष्ट्राचे 69 लक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्र येते. तर त्यापैकी 6 लक्ष हेक्टर म्हणजे मराठवाड्याचे 10 टक्के भौगोलिक क्षेत्र येते.

महाराष्ट्रातील एकूण 94 अवर्षणप्रवण तालुक्यांपैकी 56 तालुके कृष्णा खोर्‍यात येतात. तर त्यापैकी 12 अवर्षणप्रवण तालुके मराठवाड्यातील आहेत. त्यामुळे मराठवाड्यासारख्या अवर्षणप्रवण विभागासाठी कृष्णा खोर्‍याच्या पाण्याचे महत्त्व अधिक आहे.

महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे खोरे हे प्रामुख्याने  कृष्णा उपखोरे आणि भीमा उपखोरे यामध्ये विभागले आहे. उपखोर्‍याचे क्षेत्र व त्यातून जलनिष्पत्ती म्हणजेच खोरेनिहाय पाणी उपलब्धतेच्या अभ्यासानुसार असे निदर्शनास आले की, 27 टक्के कृष्णा उपखोर्‍यातून 65 टक्के जलनिष्पत्ती उपलब्ध होते. तर 73 टक्के भीमा खोर्‍यातील क्षेत्रातून 35 टक्के जलनिष्पत्ती उपलब्ध होते. त्यामुळे कृष्णा उपखोर्‍यातील जास्तीचे पाणी तीव्र टंचाईचे क्षेत्र असलेल्या असलेल्या भीमा खोर्‍यात वळविण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पास फेब्रुवारी 2004 मध्ये रूपये 4932.00 कोटी किंमतीसाठी प्रशासकीय मान्यता दिली.

Source link

Ambernath MIDC Fire : अंबरनाथ MIDC मधील कंपनीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

0
Ambernath MIDC Fire : अंबरनाथ MIDC मधील कंपनीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

रासायनिक कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताचअग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखलझाल्या आहेत. सध्या अंबरनाथ, बदलापूर भागातील अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीची तीव्रता अधिक असल्याने आणखी गाड्या बोलावण्यात आल्या आहेत.

Source link

Aanibaani Trailer: लग्न न झालेल्या माणसाची नसबंधी…; प्रवीण तरडेंच्या आणीबाणीचा ट्रेलर प्रदर्शित

0
Aanibaani Trailer: लग्न न झालेल्या माणसाची नसबंधी…; प्रवीण तरडेंच्या आणीबाणीचा ट्रेलर प्रदर्शित

उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशी मराठीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहे. कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

Source link

Journey Movie: नात्याचा अर्थ शिकवणारा ‘जर्नी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Journey Movie: नात्याचा अर्थ शिकवणारा ‘जर्नी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Journey: सचिन जीवनराव दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘जर्नी’ चित्रपट येत्या सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Source link