Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2939

‘काल-परवापर्यंत लोक अजित पवारांकडं रांगा लावायचे, आता त्यांनाच दिल्लीत चकरा मारायला लागतायत’

0
‘काल-परवापर्यंत लोक अजित पवारांकडं रांगा लावायचे, आता त्यांनाच दिल्लीत चकरा मारायला लागतायत’


एकनाथ शिंदे यांच्यासमोर आव्हान

ज्यांच्यावर आरोप करत शिंदे समर्थक आमदारांनी बंड केलं, त्याच अजित पवारांनी सरकारमध्ये एन्ट्री केलीय. त्यामुळं शिंदे समर्थक आमदारांना लोकांसमोर तोंड दाखवायला जागा नाही. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार महत्त्वाची खाती घेत असतील तर नाराजी वाढणार आहे. हे सगळं पाहता राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांमधील अस्वस्थता नियंत्रित राखणे, सरकारमधील विविध गटांमध्ये प्रभावीपणे समन्वय साधणे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढचं आव्हान असेल, असं तपासे म्हणाले.



Source link

Kon Honaar Crorepati: खेळाला चढणार हास्यरसाचा फीवर, जॉनी लिव्हर दिसणार ‘कोण होणार करोडपती’मध्ये

0
Kon Honaar Crorepati: खेळाला चढणार हास्यरसाचा फीवर, जॉनी लिव्हर दिसणार ‘कोण होणार करोडपती’मध्ये


जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्या सोबतच सचिन खेडेकर यांच्या विशेष गप्पा रंगल्या. नवीन प्रभाकर, व्ही आय पी, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर या कलाकारांचे विशेष परफॉर्मन्स कोण होणार करोडपतीच्या मंचावर पाहायला मिळणार आहेत. जॉनी लिव्हर मंचावर असणार आणि धमाल होणार नाही हे शक्यच नाही. जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या धमाल तुफानी कॉमेडी अंदाजात विनोद निर्मिती केली. त्यांच्या ह्या पेर्फोमन्स वर सचिन खेडेकर आणि सगळेच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांचा हा पेर्फोमन्स पाहण्याजोगा आहे. जेमी लिव्हर हिने देखील तिच्या अभिनयाची सुंदर अशी झलक दाखवली. तिने चक्क आशा भोसलेंच्या सुरेल आवाजाची नक्कल केली. सचिन खेडेकरांसोबत सगळेच प्रेक्षक थक्क झाले इतका हुबेहूब आवाज तिने काढला. त्याव्यतिरिक्त तिने सांगितले कि जॉनी लिव्हर यांच्या व्यक्तिरेखांतील बाझीगर चित्रपटातील बाबुलाल हि व्यक्तिरेखा तिच्या सगळ्यात आवडीची आहे. त्याची देखील हुबेहूब नक्कल तिने सादर केली. नवीन प्रभाकर, व्ही आय पी, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर यांनी देखील आपली कला या मंचावर सादर केली. या खेळातून जिंकलेली रक्कम जॉनी लिव्हर आणि जेमी मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई यांना देणार आहेत.



Source link

Ajit Pawar Meet Devendra Fadnavis: सागर बंगल्यावर अजित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट

0
Ajit Pawar Meet Devendra Fadnavis: सागर बंगल्यावर अजित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट



<p>Ajit Pawar Meet Devendra Fadnavis: सागर बंगल्यावर अजित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट</p>



Source link

Aai Kuthe Kay Karte: ‘माझ्या साधेपणाचा फायदा घेतलास’ म्हणत वीणाने अनिरुद्धवर उचलला हात

0
Aai Kuthe Kay Karte: ‘माझ्या साधेपणाचा फायदा घेतलास’ म्हणत वीणाने अनिरुद्धवर उचलला हात


सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये हतबल झालेली वीणा अनिरुद्धवर हात उचलते आणि म्हणते, ‘माझ्या साधेपणाचा, लाचारपणाचा तू खूप फायदा घेतला आहेस.’ त्यानंतर आशुतोष अनिरुद्ध विरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचे म्हटतो. ते ऐकून अप्पा आणि कांचलनला धक्काच बसतो.



Source link

Shah Rukh Khan: गुडघे टेकण्याची वेळ अद्याप आलेली नाही; शाहरुख खान असे का म्हणाला?

0
Shah Rukh Khan: गुडघे टेकण्याची वेळ अद्याप आलेली नाही; शाहरुख खान असे का म्हणाला?


चाहत्याने गुडघ्याविषयी का विचारला प्रश्न?

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिथेच त्याच्या नाकावर आणि गुडघ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यानंतर शाहरुला भारतात परत आणण्यात आले. मात्र, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.



Source link

Bachchu Kadu : ‘वाटोळं करेन’ म्हणणारे बच्चू कडू अचानक नरमले! म्हणाले, प्रार्थना ऐकून मत बदललं!

0
Bachchu Kadu : ‘वाटोळं करेन’ म्हणणारे बच्चू कडू अचानक नरमले! म्हणाले, प्रार्थना ऐकून मत बदललं!


bacchu Kadu on minister post : मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना इशारे देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आता नरमले आहेत.



Source link

Ajit Pawar Meet to Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार वर्षा निवासस्थानी दाखल

0
Ajit Pawar Meet to Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार वर्षा निवासस्थानी दाखल



<p>Ajit Pawar Meet to Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार वर्षा निवासस्थानी दाखल</p>



Source link

Tomato Price Hike: टोमॅटो भाववाढीदरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील अभिनेत्याची भन्नाट पोस्ट, ग्राहकांनी दिली ऑफर

0
Tomato Price Hike: टोमॅटो भाववाढीदरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील अभिनेत्याची भन्नाट पोस्ट, ग्राहकांनी दिली ऑफर


टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक हॉटेलांमध्ये देखील टोमॅटोचा वापर कमी करण्यात आला आहे. काहींनी तर टोमॅटोचा वापर करणच बंद केलं आहे. पण आनंद काळे यांनी या टोमॅटोच्या वाढत्या दरातही ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. आनंद काळे यांनी ऑफरमध्ये लिहिले आहे की, ‘मॅकच्या डोनाल्ड काकाला नाही परवडत..पण कोल्हापूरकरांच नाही तटतं… ३३ फ्रेश टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये बनवलेलं बटर चिकन आहे त्याचदरात.’ सध्या सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.



Source link

Abol Pritichi Ajab Kahani: ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’मध्ये नव्या पात्राची एण्ट्री, ही अभिनेत्री साकारणार भूमिका

0
Abol Pritichi Ajab Kahani: ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’मध्ये नव्या पात्राची एण्ट्री, ही अभिनेत्री साकारणार भूमिका


दीप्ती कायमच निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. विविध मालिका आणि चित्रपट यांतून ती नेहमीच आपल्या प्रेक्षकांसमोर येते. आता ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या नव्या मालिकेतून ती एका विशिष्ट व्यक्तिरेखेद्वारे आपल्या भेटीस येते आहे. यामिनी सराफ असे त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून राजवीरच्या आईच्या भूमिकेत ती असणार आहे. यामिनी या मालिकेतून नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आता ही व्यक्तिरेखा ती कशी फुलवते आणि राजवीर आणि मयूरी यांच्या आयुष्यात ती किती ढवळाढवळ करते, हे आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य राऊत, जान्हवी तांबट, सुनील तावडे हे कलाकार या मालिकेतून प्रमुख भूमिकांत पाहायला मिळतील.



Source link

सातारा : जिल्ह्याला साथीच्या आजारांचा ‘ताप’; अतिसाराचे ११०४ रुग्ण | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरु झाल्याने सातारा शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सर्दी ताप, खोकल्याच्या आजाराचे रूग्ण आढळू लागले आहेत. जिल्ह्यातील 3 हजार 878 जणांना ताप तर 1 हजार 104 जण अतिसाराने आजारी आहेत. तर 38 ठिकाणचे पाणी दुषित आढळले आहे.

सध्याच्या बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, आरोग्य वर्धिनी केंद्र, आपला दवाखाना रुग्णालयामधील बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी रूग्णांची संख्या वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या विविध पथकांनी 701 ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी 38 ठिकाणचे पाणी नमुने दुषित असल्याचे आढळून आहे. त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीला आरोग्य विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 153 ठिकाणी टीसीएल पावडरचे नमुने घेण्यात आले. 11017 ओटी टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये 1 हजार 161 ओटी टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यात 1 हजार 104 जणांना अतिसार व 57 जणांना हगवणीची लागण झाली असून 3 हजार 878 रुग्ण तापाने आजारी असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

वातावरणात झालेला बदल, दूषित पाणी यामुळे तापाच्या रूग्णांबरोबरच उलट्या होणे, घसा दुखणे, पोटाचे विकार आदींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता तर पावसाने पुर्णत: उघडीप दिली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होत चालला आहे. पावसाळी पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. बाहेर गेल्यावर अनेकांच्या खाण्या पिण्यात उघड्यावरचे अन्न आणि दुषित पाणी येते. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरील उघड्यावरचे अन्न खाणे आणि दुषित पाणी पिणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट

जिल्ह्यात पावसामुळे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणातील बदल व डासांच्या उत्पत्तीमुळे विविध किटकजन्य आजारांच्या रूग्ण संख्येत वाढ होवू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. जिल्ह्यात डेंग्यू व चिकूनगुन्या या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी रुग्णांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त होताच संबंधित रुग्णावर आरोग्य विभागामार्फत त्वरित उपचार करण्यात येत आहेत. आजाराच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत दैनंदिन कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. डेंग्यू, चिकूनगुन्या व हिवतापबाबत गावोगावी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हास्तरावर पुरेसा औषधसाठा उपलब्ध असून डेंग्यू, चिकूनगुन्या व हिवतापाबाबत नागरिकांनी घाबरून नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी केले.

नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. घराजवळ पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. जुने टायर व भंगार साहित्य नष्ट करावे जेणे करून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारचा ताप अथवा रूग्ण आजारी पडल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून उपचार करावे.
– ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी



Source link