<p>Satara Kaas Pathar: कास पठारावर पर्यटकांच्या संरक्षणासाठी जाळ्या लावण्यास सुरूवात जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराचा संपूर्ण परिसर पुन्हा जाळ्या उभारून केला बंद. पर्यटकांकडून कास परिसरातील फुलांचं नुकसान होत असल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. </p>
Source link
Satara Kaas Pathar: कास पठारावर पर्यटकांच्या संरक्षणासाठी जाळ्या लावण्यास सुरूवात
Saamana : मोदी व शहांनी जागोजाग लोकशाहीला वधस्तंभावर चढवलंय; ‘सामना’तून हल्लाबोल

Saamana Editorial Slams bjp over West Bengal violence : पश्चिम बंगालमधील हिंसाचारासाठी तृणमूल काँग्रेसला दोष देणाऱ्या भाजपवर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून जोरदार हल्ला चढवण्यात आलाय.
Mumbai Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग! पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद. वाहतूक मंदावली

मुंबई : राज्यात काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. दरम्यान, आज मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतूक संथ गतीने पुढे जात असून काही ठिकाणी ट्राफिक जॅम देखील झाले आहे. पावसाचे पाणी सखल भागात साचायला लागले आहे. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे,वाहतूक विलेपार्ले पूल आणि कॅप्टन गोरे मार्ग एस. व्ही रोडकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावणं हे शैक्षणिक परंपरेला गालबोट; शरद पवारांचं राज्य सरकारला पत्र
Sharad Pawar Letter on Maharashtra Education Standard: गेल्या आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स 2.0 म्हणजे पी.जी.आय. अहवाल प्रसिद्ध केला. यात महाराष्ट्राची दुसर्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावणं हे शैक्षणिक परंपरेला लागलेलं गालबोट असल्याचं म्हणत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली आहे.
पी.जी.आय. अहवालात महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा घसरल्याचं समोर आलं आहे. यावरुन शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पवारांनी पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. ज्या निकषांच्या आधारे पीजीआय मूल्यमापन केलं जातं त्यात आपण मागे पडलोय. ‘पीजीआय’मध्ये महाराष्ट्र मागे पडला ही फार चिंताजनक बाब आहे. राज्यातील 2 शिक्षकी 38 हजारी शाळांमधील विद्यार्थीपट कमी झाला आहे. याची सरकारनं गंभीर दखल घेतली पाहिजे. राज्य सरकारनं लवकरच संबंधितांची बैठक बोलावून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असंही शरद पवार पत्रात म्हणाले आहेत.
शरद पवारांनी काय म्हटलंय पत्रात सविस्तर पाहुयात…
सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठेंसारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स 2.0 (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. राज्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ज्या निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, पायाभूत सुविधा, बदलती शैक्षणिक प्रक्रिया आदी मुद्द्यांचा समावेश होतो. परंतु परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स 2.0 (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्रात या महत्वपूर्ण घटकांना गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसून येत नाही.
या कारणास्तव राज्य म्हणून शैक्षणिक गुणवत्तेत खूपच मागे पडलो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने, मागील वर्षी ‘दोन शिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर एक दिवसाची परिषद घेऊन काही निरीक्षणे नोंदविली होती. यासोबतच बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या दृष्टीकोनातून काही सूचना देखील केल्या होत्या. राज्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास 38 हजार दोन शिक्षकी शाळा आहेत. त्या प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर असून विद्यार्थी पट संख्या कमी असल्याने त्या बंद करण्याची चर्चा अधून-मधून होत असते, शासनाने त्याची गंभीर दाखल घेणे अतिशय गरजेचे आहे.
सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या… pic.twitter.com/QM7Bfvf71t
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 14, 2023
त्यामुळे खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात. या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासन आणि विशेषतः शालेय शिक्षण मंत्रीमहोदयांनी याचा गांभीर्याने विचार करावा. याबाबत सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक बोलावून आवश्यक कृती कार्यक्रम तयार करावा. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Janhvi Kapoor:आई श्रीदेवीच्या निधनाला कशी सामोरे गेली? जान्हवीने दिलेल्या उत्तराने डोळ्यात येईल पाणी

Bawaal: लवकरच जान्हवी कपूरचा ‘बवाल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी तिने आईच्या निधनानंतर ओढावलेल्या परिस्थितीवर भाष्य केले.
Source link
IMDb: २०२३मधील सर्वात प्रसिद्ध भारतीय चित्रपट अन् वेब सीरिज जाणून घ्या एका क्लिकवर

सतत अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. काही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसतात तर काही फ्लॉप ठरतात. आता २०२३ हे वर्ष आर्धे संपले आहे. या सहा महिन्यांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपट, टिव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील जगातील सर्वांत प्रसिद्ध माहितीचा स्रोत असलेल्या IMDb या साईटने आत्तापर्यंतच्या सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या १० भारतीय चित्रपट आणि वेब सीरिजच्या यादीची घोषणा केली आहे. चला पाहूया या यादीमध्ये कोणते चित्रपट आणि वेब सीरिज आहेत.
सातारा : धरणे अजूनही निम्म्यावर : पाणीसाठा वाढता वाढेना | पुढारी
धरणे
सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असल्याने कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम, धोम बलकवडी, तारळीसह अन्य छोट्या धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. जिल्ह्यातील धरणात 52.41 टक्केच पाणीसाठा असल्याने ऑगस्टपर्यंत धरणे भरण्याची शक्यता धूसर बनत चालली असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली. मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने पूर्णत: उघडीप दिली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात येणार्या पाण्याचा ओघ कमी झाला आहे. कोयना धरणात गुरुवारची (दि. 13) पाणीपातळी 628.93 मीटर असून धरणात 18.44 टक्के पाणी आहे. धरणात 3 हजार 564 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, गतवर्षी धरणात 33.33 टक्के पाणी होते. धोम धरणात आजची पाणी पातळी 734.04 मीटर असून धरणात 25.15 टक्के पाणी आहे. धरणात 478 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून गतवर्षी धरणात पाणी 35.67 टक्के होते. धोम बलकवडी धरणात 43.18 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात पाणी 50.00 टक्के होते. कण्हेर धरणात 20.44 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात पाणी 33.37 टक्के होते. उरमोडी धरणात 33.26 टक्के पाणी असून 421 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. गतवर्षी 73.37 पाणी टक्के होते. तारळी धरणात 54.45 टक्के पाणी आहे. गतवर्षी 57.88 पाणी टक्के होते.
मध्यम प्रकल्प येरळवाडी धरणात 1.45 टक्के पाणी आहे. गतवर्षी 17.39 टक्के पाणी होते. नेर धरणात 20.19 टक्के पाणी आहे. गतवर्षी 23.08 टक्के पाणी होते. राणंद धरणात 8.85 टक्के पाणी आहे. गतवर्षी 30.97 टक्के पाणी होते. आंधळी धरणात 12.98 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 22.14 टक्के पाणी होते. नागेवाडी धरणात आजची पाणी पातळी 838.20 मीटर असून धरणात 26.67 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 19.05 टक्के पाणी होते. मोरणा धरणात 62.31 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 69.38 टक्के पाणी होते.
उत्तरमांड धरणात आजची पाणी पातळी 676.36 मीटर असून धरणात 27.91 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 44.19 टक्के पाणी होते. महू धरणात 68.81 टक्के पाणी आहे. गतवर्षी 43.85 टक्के पाणी होते. हातगेघर धरणात 18.60 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 24.64 टक्के पाणी होते. वांग मराठवाडी धरणात 13.35 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 24.26 टक्के पाणी होते.
Akshay Kumar: सतत फ्लॉप ठरणाऱ्या चित्रपटांमुळे अक्षयला फटका! ‘OMG 2’साठी घेतले इतके मानधन

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ५० ते १०० कोटी रुपये मानधन घेत होता. सततच्या फ्लॉप ठरत असलेल्या चित्रपटांमुळे अक्षयने आगामी ‘OMG 2’ साठी त्याच्या मानधनात घट केली आहे. या चित्रपटासाठी त्याने ३५ कोटी रुपये घेतले आहेत. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कोयता नाचवून लुटणार्यांना अटक | पुढारी
सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील तेली खड्डा येथे कोयता नाचवत जडीबुटी विक्रेत्याला रक्तबंबाळ करून सोने, मोबाईल व पैसे जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) दोघांना अटक केली. यातील एकजण सराईत गुन्हेगार आहे.
यश सुरेश शिंदे (वय 23, रा. रविवार पेठ, सातारा), अक्षय मधुकर तुपे (वय 21, रा. शनिवार पेठ, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. यातील यश शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार इंदलसिंग चितोडिया (वय 49, रा. राधिका रोड, सातारा) यांना अनोळखी युवकांनी दि. 11 जुलै रोजी सायंकाळी तेली खड्डा परिसरात कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. या घटनेत संशयितांनी दमदाटी, शिवीगाळ करत दहशत माजवली. झटापट करत चितोडिया यांच्या कानातील बाळ्या, मोबाईल व रोख रक्कम असा 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरला. यावेळी मदतीसाठी आलेल्या नागरिकांवर संशयितांनी कोयताही उगारला.
वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेनंतर सातारा शहर पोलिस संशयितांचा शोध घेत होते. संशयितांची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या दोन तासात त्यांची धरपकड करण्यात आली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून जबरदस्तीने चोरलेल्या बाल्या, मोबाईल, पैसे व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. पोनि हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.
Alia Bhatt: तू राणी आहेस; आलिया भट्टने फोटोग्राफरची चप्पल उचलल्याने चाहत्यांनी केले कौतुक

बॉलिवूडची क्यूट गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आलिया भट्ट ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. गुरुवारी संध्याकाळी आलिया आई सोनी राजदन आणि बहिण शाहिन भट्ट सोबत डिनर डेटला गेली होती. वांद्रे येथील हॉटेलमध्ये त्या जेवायला गेल्याचे पाहायला मिळाले. तेथे फोटोग्राफर्स उपस्थित होते. दरम्यान, आलियाने असे काही केले की चाहत्यांनी कौतुक केले आहे.

