
Bulhana Gangrape: बुलढाण्यातील राजूर घाटात पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

Bulhana Gangrape: बुलढाण्यातील राजूर घाटात पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काकी या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रतिभा पवार यांना पक्षाच्या मातृसत्ताक म्हणून पाहिले जाते, जरी त्या राजकारण सक्रीय नव्हत्या. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह १९६७ मध्ये झाला. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून लोकसभा खासदार आहेत. प्रतिभा पवार यांचे वडील सदाशिव शिंदे हे भारतीय क्रिकेट संघात फिरकीपटू होते. सदाशिव शिंदे यांनी १९४६ ते १९५२ दरम्यान सात कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Raj Thackeray Father: ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा दिग्दर्शक केदार शिंदेने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Source link

Maharashtra Cabinet Portfolio : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून खातेवाटपाची चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर अखेर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झालेय. मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 29 मंत्र्यांकडे कोण कोणती खाती आहेत.. याबाबत एका क्लिकवर जाणून घेऊयात.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री – सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमत्री – गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्ट्रचार
अजित पवार, उपमुख्यमंत्री – वित्त व नियोजन
छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव वळसे पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यावसाय विकास
सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, मत्सयव्यवसाय
हसन मुश्रीफ – वैदकीय शिक्षण, विशेष सहाय्य
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
गिरीश महाजन – ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील – पाणी पुरठा व स्वच्छता
दादाजी भुसे – सार्वजनिक बांधकाव (सार्वजनिक उपक्रम)
संजय राठोड – मृद व जलसंधारण
धनंजय मुंडे – कृषी
सुरेश खाडे – कामगार
संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना, फुलोत्पादन
उद्य सामंत – उद्योग
तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रविंद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दिपक केसरकर – शालेय शिक्षण, मराठी भाषा
धर्मरावबाबा आत्रम – अन्न व औषध प्रशासन
अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण
शंभुराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क
आदिती तटकरे – महिलाव बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता
अनिल भाईदास पाटील – मदत पुनर्वस, आपत्ती व्यवस्थापन

बिग बॉस ओटीटीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दीपराज बिग बॉसच्या घरात एण्ट्री करताना दिसत आहे. त्यावेळी घरातील इतर स्पर्धकांना टास्क देण्यात येतो की त्या नव्या स्पर्धकाकडे दुर्लक्ष करणे. जेव्हा दीपराज घरातील सदस्यांबरोबर संवाद साधायला जातो, तेव्हा त्याला कोणीही प्रतिसाद देत नाही.

Pravin Tarde: ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांनी केले आहे.
Source link

मालवणी भूमिका अतिशय चोखपणे पार पाडणारी, कोकणचा चेडू आणि गुणी अभिनेत्री प्राजक्ता वाडये “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत प्राजक्ता ‘बायो’ या पात्राच्या भूमिकेत दिसेल. प्राजक्ताने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांत काम केले आहे. तिने साकारलेल्या भूमिका इतक्या लोकप्रिय झाल्या की प्राजक्ता हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेतील प्राजक्ताचं ‘बायो’ हे मालवणी पात्रं देखील लोकप्रिय ठरेल यात शंका नाही. आता बायो हे पात्रं सकारात्मक आहे की नकारात्मक याचा अंदाज प्रेक्षकांना येईलच, पण हे मात्र नक्की की, प्राजक्ताच्या या भूमिकेमुळे मालिकेचे प्रत्येक भाग रंजक वळणावर पोहोचणार आहेत.

Akola News: अकोला जिल्ह्यात (Akola District) गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर अनेक नदी नाल्यांना पूर आला. झालेल्या पावसातमुळे दोन चिमुकल्यांना आपला जीव गमावावा लागलाय. दरम्यान, अकोला शहरातील शारदानगर, पार्वतीनगर, गुरुदत्तनगर, मेहरेनगर, रेणुकानगरातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले होते. या भागातील जवळपास 250 पेक्षा अधिक घरांना पाण्यानं वेढलं होतं. शहरातील लोणटेक नाल्याचं काँक्रिटीकरण न झाल्यानं ही परिस्थिती दरवर्षीप्रमाणे यंदाही ओढवली आहे. घरात शिरलेलं पाणी जाण्यास मार्ग नसल्यानं या नागरी वस्त्यांमधील जनजीवन प्रभावित झालं होतं. तर पार्वती नगरात घरातील ओलाव्यामुळे शॉक लागून एका 15 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या भागांत दहा वर्षांचा मुलगा नाल्यात वाहून गेला.
बुधवारच्या रात्री अकोला शहरात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील नाले तुडुंब भरून वाहत होते. अकोला शहरातून वाहणारा लोणटेक नाला जवळपास अडीच किलोमीटर लांबीचा आहे. या नाल्याचं काँक्रिटीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या नाल्याचं अद्यापही काँक्रिटीकरण झालेलं नाही. त्यामुळे जोरदार पाऊस झाला की, दरवर्षी या नाल्याला पूर येतो आणि परिसरातील वस्त्यात नाल्याचं पाणी शिरतं. त्यामुळे या नाल्याचं काँक्रिटीकरण केव्हा केलं जाणार? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, जुने शहरातील अकोला पश्चिम आणि अकोला पूर्वमधून वाहणारा लोणटेक नाला ओसंडून वाहत होता. या नाल्याचे पाणी लगतच्या शारदानगर, पार्वतीनगर, गुरुदत्तनगर भागांत शिरल्यानं अनेक घरांना पाण्याचा वेढा होता. तसेच अनेक भाग पाण्यानं वेढलं गेलं होतं. पाणी जाण्यास मार्ग नसल्यानं रस्त्यावर दोन ते तीन फुट पाणी असल्यानं नागरिकांना पाण्यातून जाणं-येणं करावं लागत असून महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले होते. या प्रकारास झालेला जोरदार पाऊस की, फसलेली नालेसफाई? अशी चर्चा या सर्वत्र होत आहे.
मेहरेनगर, रेणुकानगर भागातील श्रीराम चौक भागात शिरल्यानं साधारण शेकडो घरं पाण्यानं वेढली गेली आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. तर वस्तीतील घरांना पाण्यानं वेढा दिल्यानं नागरिकांना घरातून बाहेर पडणं अवघड झालं होतं. अशीच परिस्थिती एमरॉल्ड कॉलनी भागात उद्भवली होती. विशेष म्हणजे, शहराच्या विविध भागांत पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच नसल्यानं पाणी ओसरण्यास उशीर लागला. तर काही भागांतील नागरिक रस्त्यावर साचलेलं पाणी पंपाच्या साहाय्यानं अन्यत्र उपसून फेकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं.
अकोला शहरातील पार्वतीनगर भागात सर्वत्र रस्त्यावर पाणी साचले होते. कच्च्या घरांमध्ये ओलावा होता. घराबाहेर पडायचे असल्यास पहिले पाऊल पाण्यात टाकावे लागल होते. दरम्यान, पार्वतीनगर भागातील रहिवासी दुर्गाप्रसाद यादव यांच्या घरात बाथरुमच्या पाईपमधून पाणी शिरले. यातच विजेचा शॉक लागून त्यांच्या घरातील 15 वर्षीय राज यादव याचा मृत्यू झाला. यासोबतच अकोला शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र रस्त्यावरील खैरमोहम्मद प्लॉट भागात असलेल्या एका नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी रस्त्यावर साचलं होतं. येथे काही मुलं खेळत असताना, एक दहा वर्षीय मुलगा रस्त्या लगत असलेल्या नाल्यात वाहून गेला. जियान अहमद इक्बाल अहमद असं नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव. दरम्यान हा नाला पुढे जाऊन मोर्णा नदीला भेटतो. बुधवारच्या रात्रीपासू त्याची शोध मोहीम सुरू आहे. आज पुन्हा पहाटे मुलाच्या शोधात सर्च मोहीम सुरू झाली, अजूनही त्याचा शोध लागला नाही.
अकोला जिल्ह्यात बुधवारच्या रात्री ढगफुटूसदृश्य पाऊस झाला होता. अकोल्यात बुधवार ते गुरुवार या 24 तासांत 125.5 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. या पावसामुळे शहरातील काही भागांत नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसलंय. यासोबतच डुबकी रोड, गायत्री नगर भागातील घरांमध्ये पाणी घुसलं होतं. यासोबतच अकोला बसस्थानकावरील फलाटावर पाण्याची गळती झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. या पावसाने नुकतीच पेरणी झाल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं नसलं तरी शेतात पाणी साचल्याने जमिनीचं मोठं नुकसान झालं आहे.
अकोला शहरामध्ये पूर सदृश्य परिस्थिती किंवा पूरपरिस्थिती उद्भवल्यास पुरापासून बचावाच्या अनुषंगाने शहरातील नदी, नाला किंवा सखोल भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. कोणतीही आपत्ती आल्यास त्वरित आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क साधावा, असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे. महानगरपालिका प्रशासनाव्दारे अग्निशमन विभागामध्ये 24 तास नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू असून कक्ष टोल फ्री क्रमांक – 18002335733 तसेच फोन नंबर – 101, 0724- 2434460, 2432102 आणि मुख्य अग्निशमन अधिकारी तथा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख हारूण मनियार मोबाईल क्रमांक 8857889575 क्रमांकावर संपर्क साधण्याचं अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारे आवाहन केलं आहे.

Malaika Arora: पुढच्या ५ वर्षांमध्ये अभिनेता अर्जुन कपूरची अवस्था कशी असेल? याबाबत एका अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
Source link

सुनील शेट्टीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो झी ५ वरील ऑप्रेशन फ्रायडेमध्ये काही दिवसांपूर्वी दिसला होता. आता लवकरच त्याचा हेरा फेरी ३ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात तो श्याम हे पात्र साकारणार आहे. चित्रपटात सुनील शेट्टीसोबत अक्षय कुमार आणि परेश रावल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.