Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2934

सातारा : मोकळी राने… कोरडी मने… उदास शेतकरी! | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  तब्बल दीड महिना संपला तरी अद्यापही पावसाने दडी मारली असून, जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाची चांगली नक्षत्रे संपूनही पाऊस न पडल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे.

पावसाळ्याचा दीड महिना संपूनही पाऊस न पडल्याने सध्या नद्या रोडावल्या असून, ओढे-नाले आटले आहेत. खरीप पेरण्यांसाठी शेतकरी बी बियाणे बांधून तयार आहे; पण पावसाअभावी हे बियाणे वाया जाते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. पावसाळ्याचा दीड महिना संपल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, खरीप पेरण्या होतील का याबाबत साशंकता आहे. अर्थात ज्यांच्याकडे सिंचन सुविधा आहे, त्यांनी थोड्या फार पेरण्या केल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणावर पेरण्या झालेल्या नाहीत. जेथे थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला तेथे पेरण्या झालेल्या असल्या तरी त्या कितपत तगतील, हा खरा प्रश्न आहे.

जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी कमी झाली असून यावर्षी धरणे भरली नाहीत तर उसाच्या लागणीही फारशा होणार नाहीत. त्याचा आगामी काळातील साखर कारखानदारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडूनच आता खरीप हंगामाबाबत शेतकर्‍यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

The post सातारा : मोकळी राने… कोरडी मने… उदास शेतकरी! appeared first on पुढारी.



Source link

Manisha Koirala: बाईपण अन् आईपण… भविष्याच्या प्लॅनिंगबद्दल मनीषा कोईराला पहिल्यांदाच बोलली!

0
Manisha Koirala: बाईपण अन् आईपण… भविष्याच्या प्लॅनिंगबद्दल मनीषा कोईराला पहिल्यांदाच बोलली!


Manisha Koirala on Motherhood: बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला एका मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे. बदलत्या काळासोबत आता मनीषाने देखील ओटीटी विश्वाची वाट धरली आहे.



Source link

सातारा जिल्ह्यातील दोघींना शिवछत्रपती पुरस्कार; प्रतीक्षा मोरे, स्नेहल मांढरेचा सन्मान | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक, संघटक यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्ह्यातील कारी (ता. सातारा) येथील प्रतीक्षा मोरे हिला मल्लखांब तर पाचवड (ता. वाई)च्या स्नेहल मांढरे हिला आर्चरी या क्रीडा प्रकारासाठी शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.

मल्लखांबमध्ये उत्तुंग कामगिरी करणार्‍या कारी ता. सातारा येथील प्रतिक्षा लक्ष्मण मोरे हिला सन 2019-20 चा मल्लखांब खेळासाठी शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. तिचे शिक्षण बी.ए.अर्थशास्त्र झाले असून आई-वडील शेतकरी आहेत. ती समर्थ मल्लखांब संघ, कारी या संस्थेची खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माया मोहिते, विश्वतेज मोहिते यांनी मार्गदर्शन केले. तिने पहिली जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा 2018-19 साली खेळली आहे. आजपर्यंत तिने वैयक्तिक 3 रौप्यपदके व 1 सांघिक सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच 6 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून यांमध्ये 7 सुवर्णपदके 4 रौप्यपदके पटकावली आहेत.

आर्चरी खेळात उत्तुंग कामगिरी करणार्‍या स्नेहल विष्णू मांढरेलाही 2019-20 चा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. स्नेहलने वाई येथे चंद्रकांत भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्चरीचे प्रशिक्षण घेतले. आजारपणामुळे ती काही काळ खेळापासून दूरावली गेली होती. परंतु, तिने जिद्दीने आजारावर मात करत खेळातील नैपुण्य सिद्ध केले. स्नेहल मांढरेने विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंडच्या वरिष्ठ संघासाठी कामगिरी बजावली आहे. या दोन्ही शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेल्यांचे सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.











Source link

Cabinet Expansion : भाजप-राष्ट्रवादीचा नेम आणि शिंदे गटाचा गेम?, कॅबिनेट विस्तारावर मोठी अपडेट

0
Cabinet Expansion : भाजप-राष्ट्रवादीचा नेम आणि शिंदे गटाचा गेम?, कॅबिनेट विस्तारावर मोठी अपडेट


Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर शुक्रवारी राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. भाजपच्या सहा आणि शिंदे गटाच्या तीन विद्यमान मंत्र्यांकडील खाती राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातून शिंदे गटाला प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र शपथविधी केवळ राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा झाला. त्यामुळं भाजपसह शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खातं गेल्याने ते देखील नाराज असल्याची चर्चा आहे.



Source link

सातारा : शाळकरी मुलाचे कोयत्याने बोट छाटले | पुढारी

0









शिरवळ; पुढारी वृत्तसेवा :  शिरवळ (ता. खंडाळा) येथे एका शाळेच्या परिसरात दोन शालेय विद्यार्थ्यांवर एका विद्यार्थ्याने कोयत्याने हल्ला केला. एक दिवसापूर्वी झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. एका विद्यार्थ्यावर 7 ते 8 वार झाले आहेत तर मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसर्‍या मित्राचे बोट छाटले आहे. या घटनेमुळे शिरवळमध्ये खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वार करणारा संशयित व ज्याच्यावर वार झाले तो या दोघांमध्ये गुरुवारी काही कारणामुळे वाद झाला होता. यावरून संशयिताने दगडाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालक व शिक्षकांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. या वादाचा राग मनात धरून संशयित हा सकाळीच आईला शाळेत जातो, असे सांगून घराबाहेर पडला. शाळेत तो कोयता घेवून आला होता. हा कोयता त्याने एकाला दाखवलाही होता. शाळा सुटताच काही कळायच्या आतच त्याच्यावर संशयिताने वाद झालेल्या विद्यार्थ्यावर वार केले. हे वार त्याच्या हातावर, पायावर, खांद्यावर झाले. दरम्यान, आपल्या मित्रावर हल्ला होत आहे हे बघून पुढे आलेल्या आणखी एका शालेय विद्यार्थ्यांवर देखील संशयित मुलाने कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचे बोट छाटले गेले. या हल्ल्यात दोन्ही शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यातील एकावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दुसर्‍यावर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नुकतीच शाळा सुटलेली असल्यामुळे शाळेतील मुलांची रस्त्याने गर्दी होती. त्यामुळे बघणार्‍यांना काही समजण्याच्या आतच हा प्रकार रस्त्यावरच घडला. परिसरातील स्थानिक मदतीला धावेपर्यंत हल्लेखोर मुलगा हल्ला करून तिथून पळून गेला होता. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिरवळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्यांच्यावर वार झाले त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

चार दिवसांपूर्वीच घेतले होता प्रवेश
हल्ला करणार्‍या अल्पवयीन मुलाने नुकतेच शिरवळ येथील शाळेत चारच दिवसांपूर्वी प्रवेश घेतला होता. त्याने चारच दिवस शाळेला हजेरी लावली होती. शुक्रवारी सकाळी शाळेत जातो म्हणून आईला सांगून घराबाहेर पडलेला मुलगा शाळेत न जाता मित्रावर दबा धरून शाळेच्या परिसरातच दिवसभर बसला होता. गुरुवारच्या झालेल्या वादाचे इतक्या भयानक घटनेत पर्यवसान होईल, याचा विचारही कुणी केला नव्हता.











Source link

Baipan Bhaari Deva: काय म्हणता! ‘बाईपण भारी देवा’नं शाहरुखच्या ‘पठान’चा विक्रम मोडला? कसा? वाचा…

0
Baipan Bhaari Deva: काय म्हणता! ‘बाईपण भारी देवा’नं शाहरुखच्या ‘पठान’चा विक्रम मोडला? कसा? वाचा…


Baipan Bhaari Deva Break Pathaan Record: ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने थेट शाहरुख खानच्या ‘पठान’चा विक्रम मोडीत काढला आहे.



Source link

सातारा : स्व. मदनअप्पांच्या नातवाचे आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात बंड; विजयसिंह शरद पवारांसोबत | पुढारी

0









वाई; पुढारी वृत्तसेवा :  माजी मंत्री स्व. मदनराव पिसाळ यांचे नातू विजयसिंह पिसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मदनआप्पांच्या नातवानेच आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात बंड केल्याने वाई मतदारसंघात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मदनआप्पांच्या घरात दुफळी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

माजी मंत्री मदनअप्पा पिसाळ यांचे चिरंजीव व वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गटात आहेत. त्यांची पत्नी व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांची भूमिका मात्र आजही गुलदस्त्यात आहे. असे असताना त्यांचे चिरंजीव व मदनअप्पांचे नातू विजयसिंह पिसाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. लवकरच शरद पवारांच्या उपस्थितीत वाईत भव्य मेळावा?घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विजयसिंह पिसाळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून माजी मंत्री स्व.मदनराव पिसाळ आप्पा हे खा. शरद पवार यांच्यासोबत होते. आमच्या कुटुंबावर व वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यावर शरद पवारांनी भरभरून प्रेम केले व ताकद दिली आहे. स्व. आप्पांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षे वाई मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांची निष्ठा पाहून शरद पवार यांनी आप्पांना मंत्री हे पद सुद्धा दिले. या कालखंडा दरम्यान शरद पवार यांच्या पाठिंब्यांच्या जोरावर नागेवाडी धरण तसेच सहकारी सूतगिरणीची उभारणी केली. खंडाळा तालुका सुजलाम सुफलाम करण्यात महत्वाची भूमिका निभावली. यामुळे बावधन आणि आसपासच्या गावातील जमीन ओलिताखाली आली. स्व. आप्पांच्या माघारी वडीलकीचा हात शरद पवार यांनी आमच्या कुटुंबाच्या डोक्यावर ठेवला. पिसाळ कुटुंबाची निष्ठा पाहून सौ. अरुणादेवी पिसाळ यांना जि. प.चे अध्यक्ष पद दिले. आमच्या सारख्या सामान्य कुटुंबाला एवढं मोठं केलंत, प्रेम दिलंत, आपुलकी दिली, आदर दिला मग आणखी काय हवं असतं, असेही विजयसिंह पिसाळ यांनी सांगितले.

आमच्या कुटुंबाने कधीही सत्तेसाठी राजकारण केले नाही किंवा निष्ठेशी तडजोड केली नाही. आम्ही सदैव शरद पवार यांच्या विचारांसोबतच चालत आलो आहोत. सातारा जिल्ह्याचे राजकारण हे यशवंत विचारांचे राजकारण असून या विचारांपासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. तत्त्व व निष्ठा याबाबत आम्ही कधीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत आणि स्व. आप्पांनी आणि तात्यांनी दाखवलेल्या वाटेवरच आम्ही राहणार आहोत, असेही विजयसिंह म्हणाले.विजयसिंह पिसाळ यांनी आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात घेतलेली जाहीर भूमिका त्यांचे आ. मकरंद पाटील यांच्या विरोधात बंड मानले जात आहे.

मदनअप्पा व लक्ष्मणतात्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागतच केले असते…

स्व. मदनराव आप्पांनी रुजवलेल्या विकास व वैचारिक वटवृक्षाच्या मुळ्या या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या, अबालवृद्धांच्या रुपाने रुजलेल्या आहेत. या भाग्यविधात्याच्या वटवृक्षाची सावली पुन्हा तालुक्यात पसरावी हीच प्रत्येक सर्वसामान्य लोकांची मनापासूनची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही पुन्हा लढू आणि जिंकू. मला एवढी खात्री आहे की आज जर आपल्या सर्वांमध्ये स्व.मदनआप्पा आणि स्व. लक्ष्मणतात्या असते तर त्यांनी सुद्धा माझ्या निर्णयाचे स्वागतच केले असते, असेही विजयसिंह पिसाळ म्हणाले.











Source link

राज्यात फळांच्या निर्यातीला चालना मिळणार | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादन प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. मुल्य साखळी विकसीत करणे व त्यात खाजगी गुंतवणूकदार आकर्षित करणे, काढणी पश्चात नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीमध्ये सहभाग वाढविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

पात्र लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था (कंपनी कायदा व सहकारी संस्था कायदा) या अंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकरी संस्था, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत प्रोत्साहित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे प्रोत्साहित लोकसंचलित साधन केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन असोशिएशन्स) आणि मुल्यसाखळी गुंतवणुकदार (शेतकरी उत्पादक कंपनी नसलेल्या मात्र, कोणत्याही फलोत्पादन पिकांच्या उत्पादकाबरोबर तसेच उत्पादकांच्या सहकारी संस्थांबरोबर सक्रियपणे कामकाज करत असलेल्या संस्था जसे अ‍ॅग्रीगेटर/ प्रक्रियादार/निर्यातदार / मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था / कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था) यांचा समावेश आहे. मॅग्नेट प्रकल्पातील पहिल्या दोन टप्प्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व लोकसंचलित साधन केंद्र यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला होता.

मॅग्नेट प्रकल्पाचा कालावधी 6 वर्षाचा असून तिसर्‍या टप्प्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तिसर्‍या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ www.msamb.com या संकेतस्थळावर लिंक देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष, विहीत नमुन्यातील अर्ज, मुल्यांकन निकष व कागदपत्रांची चेकलिस्ट, या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून चेकलिस्टप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून मॅग्नेट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पी.आय. यू) तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, श्री छत्रपती शाहू मार्केट यार्ड, विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे छापील प्रतीत सादर करावेत. अर्ज सादर करण्याचा अंतिम दि. 10 ऑगस्ट 2023 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे, असे विभागीय प्रकल्प उपसंचालक, मॅग्नेट प्रकल्प पी.आयु.यू.कोल्हापूर डॉ. सुभाष घुले यांनी कळवले आहे.

या फळांचा आहे समावेश

तिसर्‍या टप्प्यात मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत केळी, पेरू, डाळिंब, चिक्कू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची (हिरवी / लाल) व फुलपिके या अगोदरच्या 11 पिकांसह नवीन चार पिकांचा (आंबा, काजू, लिंबू आणि पडवळ) यांचा समावेश करण्यात आलेला आहे.



Source link

Ravindra Mahajani: प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन; पुण्यातील घरी आढळला मृतदेह

0
Ravindra Mahajani: प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन; पुण्यातील घरी आढळला मृतदेह


Ravindra Mahajani Death: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.



Source link

खातेवाटप जाहीर होताच अजितदादा सिल्वर ओकवर; तब्बल अर्धा तास भेट

0
खातेवाटप जाहीर होताच अजितदादा सिल्वर ओकवर; तब्बल अर्धा तास भेट


Maharashtra NCP Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) समीकरणंच बदलली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनीही शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर तब्बल 13 दिवसांनी मंत्र्यांचं खातेवाटप झालं. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Crisis) फूट पडल्यानंतर शुक्रवारी अजित पवार यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी रात्री त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटण्यासाठी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर काही तासांनी अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झाले होते.  

काल शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं अधिकृतपणे खातेवाटप जाहीर झालं आणि त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकला भेट दिली. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. पण अखेर कारण समोर आलं. अजित पवार सिल्वर ओकवर काकू प्रतिभा पवार यांना भेटण्यासाठी दाखल झाले होते. 

शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हातावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना भेटण्यासाठीच काल (शुक्रवारी) अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झाले होते. काकू प्रतिभा पवार यांच्या हाताच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर गेल्याची अधिकृत माहिती मिळाली. तब्बल अर्धा तासाच्या भेटीनंतर अजित पवार सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले. 

यापूर्वी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीबाबत बोलताना, मी त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करतो आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो, असं म्हणाले होते. 

दरम्यान, 2 जुलैला अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपची कास धरली आणि उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले. त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याचं बोललं जात आहे. 

पाहा व्हिडीओ : Ajit Pawar Silver Oak : बंडानंतर अजितदादा पहिल्यांदाच सिल्व्हर ओकवर, तब्बल अर्धा तास भेट

अखेर खातेवाप जाहीर, अजित दादांकडे ‘अर्थ’

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केलं. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून खातेवाटपाची चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर अखेर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाला आहे.

अजित पवार गटाला मिळालेल्या खातेवाटपाची यादी… 

अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन
संजय बनसोडे : क्रीडा
आदिती तटकरे : महिला बालविकास मंत्रालय
हसन मुश्रीफ : वैदकीय शिक्षण
अनिल पाटील : मदत पुनर्वसन
दिलीप वळसे पाटील : सहकार
धनजंय मुंडे : कृषी खाते
छगन भुजबळ : अन्न आणि नागरी पुरवठा
धर्मरावबाबा आत्रम : अन्न आणि औषध पुरवठा

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Election Survey: शिंदे फडणवीस युती की, ठाकरेंची शिवसेना? 2024 च्या निवडणुकांमध्ये कोणाची सरशी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष



Source link