Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2933

Kedar Shinde: ‘घरकी मुर्गी डाल बराबर समजून उपयोगाचं नाही’; ‘बाईपण भारी देवा’च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत!

0
Kedar Shinde: ‘घरकी मुर्गी डाल बराबर समजून उपयोगाचं नाही’; ‘बाईपण भारी देवा’च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत!


केदार शिंदे यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, ‘२०१९ पासून ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा ध्यास घेतला होता. निर्माता मिळत नव्हता, त्यावेळीच्या कित्येक रात्री डोळ्यात पाणी यायचं. मनात असंख्य विचार. या सगळ्याला हँडल करण्याचं सामर्थ्य मिळालं, ते स्वामींमुळे आणि या दोघींमुळे. आपण क्रिएटिव्ह असतो, तेव्हा संसार चालतो तो घरच्या गृहिणीमुळेच. बेला तर दोन जबाबदाऱ्या सांभाळते. घर आणि सिनेमा याची निर्मिती!! घरकी मुर्गी डाल बराबर समजून उपयोगाचं नाही. तो मान सन्मान दिलाच पाहिजे. तिने नेहमी मला धीर देण्याचं काम केलंय. बायकांचं मन जाणून घेताना, कित्येक वेळा बायकोचं मन मी विसरून गेलो आहे.’



Source link

Tu Chal Pudha: अखेर शिल्पी अश्विनीला सांगणार आपलं गुपित! ‘तू चाल पुढं’मध्ये येणार नवं वळण

0
Tu Chal Pudha: अखेर शिल्पी अश्विनीला सांगणार आपलं गुपित! ‘तू चाल पुढं’मध्ये येणार नवं वळण


अश्विनीला त्रास देण्यासाठी शिल्पीने विद्युतसोबतचा आपला हसता खेळता संसार देखील मोडला. यानंतर आई आणि मुलात म्हणजे शिल्पी आणि संजू यांच्या नात्यात देखील अंतर पडले. शिल्पीची वागणूक पाहून संजूचा ताबा कोर्टाने त्याच्या वडिलांकडे म्हणजेच विद्युतकडे दिला. मात्र, शिल्पीला केवळ आठवड्यातून एकदा संजूला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. याच दरम्यान एकदा संजूला भेटायला आलेली शिल्पी त्याच्या आजारपणामुळे घरातच थांबली होती. मात्र, याचवेळी विद्युत आणि शिल्पी एकमेकांच्या जवळ आले. यामुळेच शिल्पी आता पुन्हा आई होणार आहे.



Source link

Satara Crime : विद्यार्थ्याकडून दोन मुलांवर कोयत्याने हल्ला; साताऱ्यातील शिरवळमधील घटना

0



<p>Satara Crime : विद्यार्थ्याकडून दोन मुलांवर कोयत्याने हल्ला; साताऱ्यातील शिरवळमधील घटना</p>



Source link

साळुंके विहारमधील एमएनजीएल पाईपलाईनला भीषण आग; कार जळून खाक

0
साळुंके विहारमधील एमएनजीएल पाईपलाईनला भीषण आग; कार जळून खाक



Pune Fire : साळुंके विहारमधील एमएनजीएल पाईपलाईनला भीषण आग; कार जळून खाक



Source link

Ajit Pawar In Mumbai : शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर काय घडलं?, अजित पवारांकडून मोठा खुलासा

0
Ajit Pawar In Mumbai : शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर काय घडलं?, अजित पवारांकडून मोठा खुलासा


पवार कुटुंबियांना आजी-आजोबांनी परंपरा शिकवली आहे. त्यानंतर आई-वडील, काका आणि काकी यांनी आम्हाला ही परंपरा शिकवली. म्हणूनच मी काकींना भेटण्यासाठी गेलो. मी अर्धा तास तिथंच होतो. काकींच्या तब्येतीची विचारपूस केली, खुशाली विचारली. आता त्यांना पुढील २१ दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. माझ्या अंतर्मनाने सांगितलं सांगितल्यामुळंच मी सिल्व्हर ओकवर काकींना भेटण्यासाठी गेल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.



Source link

Golden Fox In Thane : ठाण्यातील नौपाड्यात शिरला सोनेरी कोल्हा; दुर्मिळ प्राणी पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी

0
Golden Fox In Thane : ठाण्यातील नौपाड्यात शिरला सोनेरी कोल्हा; दुर्मिळ प्राणी पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ठाण्यातील नौपाडा येथील भास्कर कॉलनी परिसरात काही लोकांना दुर्मिळ सोनेरी कोल्ह्याचं दर्शन झालं. या घटनेची माहिती कळताच वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्वयंसेवकांनी रेस्क्यू करत सोनेरी कोल्ह्याला जेरबंद केलं आहे. नर जातीचा सोनेरी कोल्हा जेरबंद करण्यात आला असून त्याची सर्वप्रथम वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याला ठाण्याजवळील जंगलात सुखरुप सोडलं जाणार असल्याचं वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी सोनेरी कोल्ह्याला पाहण्यासाठी नौपाड्यातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.



Source link

Pooja Bhatt: बिग बॉस ओटीटीच्या घरात पूजा भट्ट झाली ‘अनकंट्रोल’! ‘या’ अभिनेत्रीला म्हणाली…

0
Pooja Bhatt: बिग बॉस ओटीटीच्या घरात पूजा भट्ट झाली ‘अनकंट्रोल’! ‘या’ अभिनेत्रीला म्हणाली…


‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरात नुकताच एक स्पॉन्सर टास्क खेळण्यात आला. या टास्कमध्ये पूजा भट्ट रडत असलेल्या फलक नाजला समजावत होती. ती फलकला म्हणाली की, ‘जियाची मैत्री दर आठवड्याला बदलते. आधी ती मैत्री करते, नंतर नॉमिनेट करते आणि शेवटी ती भांडते आणि निरागस चेहरा बनवते.’ इतकेच नाही तर, पूजाने अविनाश सचदेव, फलक नाज आणि जेडी हदीद यांच्यासमोर जियाने सर्वांचा वापर केल्याचे म्हटले. पूजाने जियाला फसवी, अस्थिर आणि सतत डील करणारी मुलगी म्हटले आहे. यावरूनच वादाला तोंड फुटले आहे.



Source link

Saroj Ahire: राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे अजित पवारांसोबत

0
Saroj Ahire: राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे अजित पवारांसोबत


Deputy CM Ajit Pawar: अजितदादा म्हणजे ‘कामाचा माणूस’; आम्ही जनरल पब्लिक, आम्हाला तुमच्या बद्दल आदर, वंदे भारतमध्ये अजितदादांचीच क्रेझ



Source link

Samantha Ruth Prabhu: ‘आता पुढच्या वेळी परतून येईपर्यंत…’; समंथाने ब्रेक घेण्यापूर्वी लिहिली भावनिक पोस्ट!

0
Samantha Ruth Prabhu: ‘आता पुढच्या वेळी परतून येईपर्यंत…’; समंथाने ब्रेक घेण्यापूर्वी लिहिली भावनिक पोस्ट!


समंथा रुथ प्रभू ही साऊथमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे चाहते जगभरात आहेत. जेव्हापासून अभिनेत्रीने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून तिच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. आपल्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समंथा दीर्घ विश्रांती घेत आहे. या निर्णयाने अभिनेत्रीची टीम देखील खूपच भावूक झाली आहे. समंथाने नुकतेच ‘सिटाडेल’चे शूटिंग पूर्ण केले आहे. यावेळी तिने मेकर्सचे आभार मानत ही संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर, या पोस्टच्या शेवटला तिने, ‘आता पुढच्या वेळी परतून येईपर्यंत…’ असे म्हटले आहे.



Source link

Rahul Roy: ‘सलमान खान हिरा आहे! त्याच्यामुळेच…’; आशिकी’ फेम राहुल रॉयने का मानले सलमान खानचे आभार?

0
Rahul Roy: ‘सलमान खान हिरा आहे! त्याच्यामुळेच…’; आशिकी’ फेम राहुल रॉयने का मानले सलमान खानचे आभार?


Rahul Roy Says Thanks To Salman Khan: ‘आशिकी’ या चित्रपटातून अवघ्या प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता राहुल रॉय याने त्याच्या आयुष्यात अनेक संघर्षाचा सामना केला. अभिनेता राहुल रॉय याने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सलमान खानचे आभार मानले आहेत. यामध्ये त्याने खुलासा केला की, २०२०मध्ये जेव्हा त्याला ब्रेन स्ट्रोक आला, तेव्हा सलमान खानने त्याच्या हॉस्पिटलचे बिल भरले होते. राहुल रॉयच नव्हे, तर त्याच्या बहिणीने देखील सलमान खानला ‘हिरा’ म्हटले आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्याला दीड महिना रुग्णालयात राहावे लागले होते. त्यातून सावरायलाही त्याला खूप वेळ लागला.



Source link