Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2916

Gadar 2: ‘गदर २’मध्ये अमरीश पुरी यांची जागा भरून काढणार बॉलिवूडचा ‘हा’ प्रसिद्ध खलनायक! वाचा…

0
Gadar 2: ‘गदर २’मध्ये अमरीश पुरी यांची जागा भरून काढणार बॉलिवूडचा ‘हा’ प्रसिद्ध खलनायक! वाचा…

Villain In Gadar 2: तब्बल २२ वर्षांनंतर आता तारा सिंह आणि सकिना ‘गदर २’ मधून मोठ्या पडद्यावर परतत आहेत. ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होत आहे.

Source link

Prabhas: अमिताभ-दीपिकाच्या ‘प्रोजेक्ट के’मध्ये प्रभासचा लूक कसा दिसणार? पाहा चित्रपटाचं पहिलं पोस्टर…

0
Prabhas: अमिताभ-दीपिकाच्या ‘प्रोजेक्ट के’मध्ये प्रभासचा लूक कसा दिसणार? पाहा चित्रपटाचं पहिलं पोस्टर…

अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेते अमिताभ बच्चन आणि प्रभास यांचा ‘प्रोजेक्ट के’ हा चित्रपट २ भागात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात कथेत सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. तर, दुसऱ्या भागात त्यामागची कथा सांगितली जाणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. सध्या या चित्रपटाचा पहिला भाग पूर्णपणे तयार झाल्याचे बोलले जात आहे.

Source link

Ishita Dutta: ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ताच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्याचं आगमन!

0
Ishita Dutta: ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ताच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्याचं आगमन!

मीडिया रिपोर्ट्स नुसार, अभिनेत्री इशिता दत्ताला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी तिने मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीला ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून, शुक्रवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Source link

Kokan Weather Alert : रायगड-पुण्यात पावसाचा रेड अलर्ट; कोकणात अतिवृष्टीचा इशारा, पाहा हवामान अंदाज

0
Kokan Weather Alert : रायगड-पुण्यात पावसाचा रेड अलर्ट; कोकणात अतिवृष्टीचा इशारा, पाहा हवामान अंदाज

maharashtra weather updates : कोकणासह मुंबईतील शाळांना पावसामुळं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Source link

Gracy Singh Birthday: ‘लगान’नंतर ग्रेसीने लावलेली सुपरफ्लॉप चित्रपटांची रांग; ‘ही’ भूमिकाही वाचवू शकली नाही करिअर!

0
Gracy Singh Birthday: ‘लगान’नंतर ग्रेसीने लावलेली सुपरफ्लॉप चित्रपटांची रांग; ‘ही’ भूमिकाही वाचवू शकली नाही करिअर!

मात्र, ग्रेसीचे वडील स्वरण सिंह आणि आई वरजिंदर सिंह यांची इच्छा होती की, आपल्या लेकीने खूप शिकून इंजिनिअर व्हावे. ग्रेसीनेही खूप अभ्यास केला. पण, तिने करिअर म्हणून मॉडेलिंगची निवड केली. मोडेलिंग करत असतानाच तिला टीव्ही सीरियल ‘अमानत’मध्ये काम मिळाले. ‘अमानत’ ही मालिका करत असताना तिने ‘लगान’ चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट दिली आणि तिची निवड झाली. या चित्रपटामुळे तिच्यासाठी बॉलिवूडचा मार्गही खुला झाला. २००३ मध्ये तिने अजय देवगणसोबत ‘गंगाजल’ आणि २००४ मध्ये संजय दत्तसोबत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये काम केले. तिचे हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते.

Source link

पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना

0
पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना

Pune news : हवामान विभागाने (IMD) पावसाच्या संदर्भात पुणे (Pune) जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळं सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (DR Rajesh Deshmukh) यांनी दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 गावे पूरप्रवण आहेत. हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण

मंगळवारपासून घाटमाथ्यावरही पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण गावे आहेत. दरडप्रवण गावात दरडी कोसळण्याची शक्यता तसेच पूरप्रवण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या भागात घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलं आहे .

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयस्थळ सोडू नये

सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील नियत्रंण कक्ष कार्यान्वित असल्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी आपले मुख्यालयस्थळ सोडू नये. नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा आणि वैद्यकीय उपकरणे अद्ययावत असल्याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूकीचे योग्य नियोजन करावे

मान्सूनच्या काळात विशेषत: सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूकीचे योग्य नियोजन करावे. भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या भागातील यंत्रणांनी  सतर्क राहावे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे नदी परिसरात पूरप्रवण गावातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्याची कार्यवाही करावी. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असंही जिल्हाधिकारी  म्हणाले. मुसळधार पाऊसाच्या पार्श्वभूमीवर घाटप्रवण क्षेत्रात दरडी हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली. यावेळी सर्व संबंधित विभागप्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने तसेच आपत्तीच्या काळात करावयाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Source link

Naseeruddin Shah Birthday: अनेक वेळा नकार पचवला, वडिलांचाही विरोध झाल! तरी अभिनयात कसे आले नसीरुद्दीन शाह?

0
Naseeruddin Shah Birthday: अनेक वेळा नकार पचवला, वडिलांचाही विरोध झाल! तरी अभिनयात कसे आले नसीरुद्दीन शाह?

अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल ६० वर्षे चित्रपटसृष्टीला समर्पित केली असून, या काळात त्यांनी १००हून अधिक बॉलिवूड चित्रपट केले आहेत. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर ते बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता आहेत. त्यांनी ‘त्रिदेव’, ‘विश्वात्मा’, ‘जाने भी दो यारों’, ‘अ व्हेनस डे’ आणि ‘कर्मा’ सारखे समीक्षकांनी आवडलेले चित्रपट केले आहेत. तर, दुसरीकडे ‘डर्टी पिक्चर’, ‘इश्किया’ आणि ‘मोहरा’ सारखे चित्रपट देखील त्यांनी यशस्वी केले.

Source link

Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार

0
Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार

Maharashtra Goseva Ayog: फडणवीसांचे आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास, गोवंश योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

पावसात अडकलेल्या प्रवाशांसाठी.. मध्य रेल्वेच्या स्टेशन्सबाहेर १०० बसेस तैनात, BMC कडून चहा, पाणी व बिस्किटांची व्यवस्था

0
पावसात अडकलेल्या प्रवाशांसाठी.. मध्य रेल्वेच्या स्टेशन्सबाहेर १०० बसेस तैनात, BMC  कडून चहा, पाणी व बिस्किटांची व्यवस्था

त्यानुसारएस.टी.च्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाबाहेर १०० पेक्षा जास्त बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. या रेल्वे स्थानकांपासून प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत बसद्वारे मोफत वाहतूक करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहे, कामावरुन घरी निघालेल्या मुंबई परिसरातील चाकरमान्यांना या बससेवेमुळे सुरक्षितपणे, कोणतीही गैरसोय न होता घरी पोहोचणे शक्य झाले आहे.

Source link