Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2915

हिंगोलीत पावसाचा जोर वाढला, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
हिंगोलीत पावसाचा जोर वाढला, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Hingoli Rain Update :  मराठवाड्यासह राज्यात पावसाचे (Rain) वातावरण तयार होत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अतिवृष्टी होतांना पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. दरम्यान हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून सद्यस्थितीत नद्या, नाले, ओढे भरुन वाहत आहेत. यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी हे आवाहन केले आहे.

प्रशासनाने केलेलं आवाहन…

गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.

गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगरपालिका प्रशासनास  कळवावे.

गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.

पूर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.

पूर स्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी , इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये.

कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या.

पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा, पूर स्थितीत घाबरून जाऊ नका, प्रशासनांच्या सुचनांचे पालन करा.

काय करु नये :

पूर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका.

पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका, तसेच पुर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका.

दुषित,उघड्यावरील अन्न-पाणी टाळा. शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.

सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करु नका.

पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका.

पूर परिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करु नका, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 71.30 मिमी पावसाची नोंद; पहिल्यांदाच कयाधू नदीला पूर

Source link

Irshalwadi Landslide: जोरदार पावसामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील बचावकार्य थांबवले

0
Irshalwadi Landslide: जोरदार पावसामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील बचावकार्य थांबवले

बुधवारी रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. ११.३० वाजता जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली. १२ वाजता राज्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानंतर तिथे तात्काळ प्रशासनाचे लोक पोहोचले. माती, दगडांचा ढिगारा, तीव्र उतार, चिखल आणि मुसळधार पाऊस यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक ट्रेकर्स, जवान आणि सिडकोने पाठवलेले मजूर यांच्यामार्फत बचावकार्य सुरू होते. यासह स्नायफर डॉग स्क्वाड घटनास्थळी दाखल झाले.

Source link

Genelia Deshmukh: लग्नानंतर पतीने अभिनय करू दिला नाही? जिनिलीया डिसुजा थेटच बोलली…

0
Genelia Deshmukh: लग्नानंतर पतीने अभिनय करू दिला नाही? जिनिलीया डिसुजा थेटच बोलली…

Genelia Deshmukh Acting Career:बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया डिसुजा-देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांची जोडी बॉलिवूडमधील आदर्श जोडींपैकी एक मानली जाते. दोघांचे एकमेकांवरील प्रेम सर्वश्रुत आहे.पण, असे असतानाही रितेश देशमुखला अनेकदा एक प्रश्न म्हणजे त्याची पत्नी जिनिलीयाच्या अभिनय कारकिर्दीतील ब्रेकचा… केवळ रितेशच नाही तर, जिनिलीयाला देखील हा प्रश्न केला जातो. काहीच दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आले की, रितेशने तिला अभिनय करण्यास मनाई केली आहे का? यावर उत्तर देताना जिनिलीया देशमुख थेट म्हणाली की, अभिनय करायचा की, नाही हा सर्वस्वी तिचा स्वतःचा निर्णय आहे. एका मोठ्या ब्रेकनंतर जिनिलीया पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसली. नुकतेच तिने रितेशसोबत मराठी हिट ‘वेड’मध्ये काम केले आहे.

Source link

Kolhapur: इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील ७६ गावांना धोक्याचा इशारा

0
Kolhapur: इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील ७६ गावांना धोक्याचा इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार सुरू आहे. या पावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने ४३ बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली. इस्रोने केलेल्या सर्वेक्षणातून देशात भूस्खलनचा धोका असलेल्या १४७ जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली, या यादीत कोल्हापूरातील ७६ गावांचा समावेश आहे. यामध्ये राधानगरी (३१ गाव), शाहूवाडी (२० गाव) आणि भुदरगड तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे.

Source link

मविआचं ठरलं! विधानसभेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता, उद्या नव्या विरोधी पक्ष नेत्याची घोषणा होण्याची शक्यता : सूत्र

0
मविआचं ठरलं! विधानसभेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता,  उद्या नव्या विरोधी पक्ष नेत्याची घोषणा होण्याची शक्यता : सूत्र

मविआचं ठरलं! विधानसभेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता, उद्या नव्या विरोधी पक्ष नेत्याची घोषणा होण्याची शक्यता : सूत्र

Source link

Ranbir-Alia: खरंच रणबीर आणि आलियाच्या नात्यात आलाय दुरावा? नीतू कपूरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

0
Ranbir-Alia: खरंच रणबीर आणि आलियाच्या नात्यात आलाय दुरावा? नीतू कपूरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

गेल्या अनेक दिवसांपासून आलिया आणि रणबीर यांच्या नात्यात कुरबुरी सुरू असल्याची चर्चा आहे. तर, अभिनेत्री कंगना रनौतने देखील यावर खोचक वक्तव्य केलं होतं. कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यात लिहिले होते की, ‘असे होते जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लग्न करता, या अभिनेत्याने चित्रपट माफियाच्या दबावाखाली लग्न केले. बदल्यात चित्रपट मिळावा म्हणून त्याने पापा की परीशी लग्न केले, आता त्याला या खोट्या लग्नापासून मुक्ती मिळवायची आहे. पण आता त्याला त्याची बायको आणि मुलीची काळजी घ्यावीच लागणार आहे. हा भारत आहे, इथे एकदा लग्न झाले की संपले.’

Source link

Chiplun Flood News : कोकणात पावसाचं रौद्ररुप, वशिष्ठी धोक्याच्या पातळीवर, चिपळूण, खेडला पुराचा वेढा

0
Chiplun Flood News : कोकणात पावसाचं रौद्ररुप, वशिष्ठी धोक्याच्या पातळीवर, चिपळूण, खेडला पुराचा वेढा

परशुराम आणि कुंभार्ली घाटात दरड कोसळली असून त्यामुळं मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. नदीकिनारी राहणाऱ्या आणि दरडग्रस्त परिसरातील ३९५ गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच राजापूर, कोदवली आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांपासून कोकणातील रत्नागिरी, लांजा, मंडणगड आणि गुहागर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं प्रशानाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Source link

शिवाजी विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित; नवीन तारीख महाविद्यालयांना कळवली जाणार

0

Shivaji University Exam: कोल्हापूर जिल्ह्यासह (kolhapur News) राज्यात सर्वदूर गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी येऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून आज (20 जुलै) होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

परिपत्रक शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांच्या जिल्हाधिकारी सातारा यांनी नैसर्गिक आपत्ती तथा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पारित केलेल्या आदेशास अनुसरुन शिवाजी विद्यापीठाच्या आज 20 जुलै 2023 रोजीच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. याबाबतचे सविस्तर परिपत्रक शिवाजी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात यावे. आजच्या परीक्षांचे सुधारित तारीख यथावकाश महाविद्यालयांना कळवण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्रातील 580 परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. पाच अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे, तर 7 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

519 अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर

चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्रातील परीक्षा या 25 मे ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहेत. एकूण 676 अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. त्यातील 580 अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. 40 परीक्षा सुरु असून 49 परीक्षा नियोजित आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळेत सुरु झाल्या असून, आतापर्यंत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. 519 अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. हे सर्व निकाल 1 ते 22 दिवसात जाहीर केले आहेत.

कोल्हापुरात पावसाने जोर धरला

दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून दमदार पावसाने जोर धरला होता. पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे ओढे, नाल्यांसह ओहळ दुथडी वाहत आहेत. परिणामी जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे विविध पावसाळी पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Source link

महिला कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; जीव मुठीत घेऊन स्वतःला वाचवले

0
महिला कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; जीव मुठीत घेऊन स्वतःला वाचवले

Aurangabad Crime News : औरंगाबादच्या (Aurangabad) सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून, ढाब्यावरील अवैध दारुविक्रीवर छापा मारल्याचा राग अनावर झाल्याने चौघांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनावर पेट्रोल टाकून जाळून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर याचवेळी आरोपींनी पथकातील एका महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिला कर्मचाऱ्याने जीव मुठीत घेऊन स्वतःला वाचवले. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी दोघांना अटक केली असून दोघे फरार आहेत. बद्री महारु राठोड (वय 39 वर्षे), संदीप बद्री राठोड (वय 23 वर्षे), किरण बद्री राठोड (वय 21 वर्षे) आणि राहुल भाईदास राठोड (वय 22 वर्षे) असे आरोपींची नावं आहेत.

अधिक माहिती अशी की, सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातील अधिकारी अनिरुद्ध पाटील, निरीक्षक रोठे, दुय्यम निरीक्षक श्रीमती माने, कृष्णा पाटील, हर्षल बारी, शारेख कादरी, वाहनचालक शिवशंकर मपडे यांच्या पथकाने बुधवारी (19 जुलै) सायंकाळी एका ढाब्यावर छापा टाकला. यावेळी या पथकाने 70 ते 80 लिटर ताडी आणि विनापरवाना देशी दारुचे खोके असा मुद्देमाल जप्त केला. यावेळी ढाबाचालक बद्री महारु राठोड यांच्या घरात झडती घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक वळले. दरम्यान कारवाईसाठी आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या लाल दिव्याच्या शासकीय वाहनावर पेट्रोल टाकून चौघांनी पेटवले.

आरोपी पेट्रोलची बाटली घेऊन महिला कर्मचाऱ्याच्या मागे लागले

चारही आरोपींनी पोलिसांचे शासकीय वाहन पेटवून दिल्यावर, पथकाच्या दिशने मोर्चा वळवला. त्यानंतर पथकातील महिला पोलीस कर्मचारी शारेख कादरी यांच्या मागे राहुल भाईदास राठोड, किरण बद्री राठोड, संदीप राठोड हे तिघेही पेट्रोलची बाटली घेऊन धावत सुटले. त्यामुळे कर्मचारी शारेख कादरी यांनी जीव मुठीत घेऊन स्वतःला वाचवले. यावेळी या पथकाने गावातून सुटका करुन घेत सोयगाव पोलीस ठाणे गाठले. या घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धरपकड मोहीम राबवली. यावेळी संदीप बद्री राठोड आणि राहुल भाईदास राठोड या दोघांना अटक केली. अन्य दोघे फरारच आहेत.

वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातून अधिकची कुमक मागवली

दरम्यान या घटनेनंतर नांदगाव तांड्यात रात्रभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदगाव तांड्यावर सोयगाव, फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड, आदी ठिकाणावरुन पोलिसांची अधिक कुमक मागवून घेण्यात आली. त्यामुळे नांदगाव तांड्यात छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! शाळकरी मुलांमध्ये झालेल्या भांडणातून विद्यार्थ्याचा मृत्यू; औरंगाबादच्या दौलताबादची घटना

Source link

Akshay Kumar: मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवर अक्षय कुमारने व्यक्त केला संताप! ट्वीट करत म्हणाला….

0
Akshay Kumar: मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवर अक्षय कुमारने व्यक्त केला संताप! ट्वीट करत म्हणाला….

Akshay Kumar on Manipur Violence: मणिपूरमधून समोर आलेल्या व्हिडीओवर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Source link