Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2914

सातारा : कोयना भूस्खलन, अतिवृष्टी दुर्घटनेला दोन वर्षे पूर्ण | पुढारी

0


पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  21 जुलै 2021 ची ती काळीकुट्ट रात्र पाटण तालुक्यातील काही गावं व कुटुंबीयांसाठी काळरात्र ठरली. भूस्खलन, महापूर आपत्तीत तब्बल अडतीसहून अधिक जणांचा मातीच्या ढिगार्‍याखाली अडकून तर काहींचा महापुरात वाहून मृत्यू झाला. राहती घरं, काडी काडी गोळा करून उभा केलेला संसार आणि आपल्या पोराबाळांसह अनेक कुटुंबांना निसर्गाने जलसमाधी दिली. हजारो एकर शेती, पिकं जमिनींसह वाहून गेली तर अब्जावधींचे वैयक्तिक, सार्वजनिक नुकसान झाले. कधीही न भरून येणार्‍या हानीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या काळ्या आठवणींच्या जखमा आजही भळभळत आहेत. ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली.. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ याप्रमाणे या आपत्तीग्रस्तांच्या जीवनात बदल होण्यासाठी स्थानिकांसह प्रशासन, शासन अथवा लोकप्रतिनिधींनी नक्की काय धडा घेतला याचे उत्तर मात्र दुर्दैवाने अद्यापही अनुत्तरितच आहे.

आजवर अनेक वर्षे भूकंप,अतिवृष्टी, महापूर पाचवीलाच पूजलेल्या पाटण तालुक्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी व भूस्खलनामध्ये काही गावांतील कुटुंबेच्या कुटुंबे, घरादारांसह अक्षरशः मातीत गाडली गेली. शेवटचा मोकळा श्वासही त्यांच्या नशिबात नव्हता, यासारखे दुःख नाही. निसर्गाचा हा प्रकोप स्थानिकांच्या मुळावर नक्की का उठला याचे उत्तर कोणालाच मिळाले नाही. ज्या भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून याच तालुक्यात अनेक धरणे जन्माला घातली. राज्यातील जनतेची तहान भागवून त्यांच्या जीवनात प्रकाश पाडला, दुर्दैवाने त्याच भूमिपुत्रांच्या बहुसंख्य गावांतील हा अंधार जीवघेणा ठरला.

ढगफुटी, अतिवृष्टी, भूस्खलनामध्ये जीवित व वित्तहानी झाली. यापूर्वीही 11 डिसेंबर 1967 चा विनाशकारी भूकंप या तालुक्याने पचवला होता. त्याकाळातही धरतीने शेकडो भूमिपुत्रांना आपल्या मिठीत घेतले होते. दुर्दैवाने तो भूकंप आणि दोन वर्षांपूर्वीच्या प्रलयामध्ये अनेकांचे संसार, कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक, जीवित व वित्तहानी झाली. निसर्गाच्या या प्रकोपामुळे तालुक्यातील अनेक गावांत ढगफुटीमुळे नद्या, ओढे, नाल्यांचे नैसर्गिक प्रवाहच बदलून गेले. सागरासारखे पाणी आजूबाजूच्या शेतीत घुसल्याने शेकडो एकर शेती, पिके जमिनींसह वाहून गेली. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, कोयना, मोरणा, पाटण, चाफळ, तारळे, ढेबेवाडी आदी भागात अनेक रस्ते खचले, वाहून गेले. तीच अवस्था छोटे पूल, फरशी पुलांचीही झाल्याने अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला .

शासन, प्रशासन, स्थानिक नेते मंडळींनी सार्वत्रिक खबरदारी व उपाययोजनांसाठी आवश्यक ते प्रयत्न केले, वैयक्तिक व सार्वजनिक पंचनामे झाले. मात्र प्रत्यक्षात मदत किती व कोणाला मिळाली याचे सकारात्मक उत्तर दोन वर्षांनंतरही मिळालेले नाही. अब्जावधींच्या हानीसाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित येऊन तालुक्यासाठी खास बाब म्हणून राज्य व केंद्र शासनाकडून भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते; पण दुर्दैवाने आजपर्यंत तसे घडलेच नाही.

कोयना धरण सुरक्षेचा बागुलबुवा करत काही वर्षांपासून धरणातील बोटिंग बंद आहे. या आपत्ती काळात कोयनानरच्या नेहरू उद्यानाच्या पुढे अनेक ठिकाणी रस्ते पूर्णतः खचल्याने उद्यानाच्या मागील बाजूच्या बोटिंग धक्यावरून बोटींच्या आधाराने मिरगाव, नवजा, कामरगाव भागातील आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचवण्याचे काम सुरू होते. स्थानिकांना बोटिंगशिवाय पर्यायच नाही, हे त्या वेळी लक्षात येऊनही दोन वर्षांत मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. (क्रमशः)



Source link

Irshalgad Landslide : दरडग्रस्त इर्शाळवाडीत पुन्हा बचावकार्य सुरू; ढिगाऱ्यातून आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढले

0
Irshalgad Landslide : दरडग्रस्त इर्शाळवाडीत पुन्हा बचावकार्य सुरू; ढिगाऱ्यातून आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढले


इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाल्याची घटना समजताच शिंदे-फडणवीस सरकारमधील तीन मंत्र्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुरुवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाचा दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला. इर्शाळवाडी गावात जाण्यासाठी दोन तासांची पायपीट करावी लागत आहे. तसेच मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी नेण्यास मोठे अडथळे निर्माण होत आहे. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरही घटनास्थळी उतरणं शक्य नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पाऊस सुरू असताना केवळ मनुष्यबळाच्या सहाय्याने इर्शाळवाडीत बचावकार्य सुरू असल्याची माहिती आहे.



Source link

मतदारांच्या नावांची पडताळणी होणार, 20 ऑगस्टपर्यंत अधिकारी घरोघरी भेटी देणार; सहकार्याचं आवाहन

0
मतदारांच्या नावांची पडताळणी होणार, 20 ऑगस्टपर्यंत अधिकारी घरोघरी भेटी देणार; सहकार्याचं आवाहन


Verification of voters : राज्यात 20 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी (Verification of voters) करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे. 

मतदारांच्या भेटीमध्ये नेमकं काय होणार

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या या भेटींमध्ये मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील. मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील. तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि विमुक्त जाती भटक्या जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची आणि मतदार यादीत नाव नसलेल्यांची नोंदणी करण्याचे कामही या काळात केले जाणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. 

18 वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी

या उपक्रमामुळे राज्यातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे. हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये, याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठी मोठी संधी आहे. त्यामुळं जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे. वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करुन घ्यावी असं आवाहन देशपांडे यांनी केलं आहे. मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरुन द्यावेत. लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावे बदलून घ्यावीत. स्थलांतरीत  झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी, असेही आवाहन देखील देशपांडे यांनी केलं आहे. 

मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावं

मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार आहे. त्यामुळं सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन देशपांडे यांनी केलं आहे. तसेच त्यांना विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले. 

महत्त्वाच्या बातम्या:

ABP C Voter Survey: सोनिया गांधी मिशन 2024 साठी अॅक्शन मोडमध्ये, कोणाचं वाढणार टेन्शन? सर्वेक्षणातून लोकांचा कल समोर



Source link

Irshalwadi landslide eye eyewitness : इर्शाळवाडीत कशी घडली दुर्घटना?, तानाजी सावंत जखमींच्या भेटीला

0
Irshalwadi landslide eye eyewitness : इर्शाळवाडीत कशी घडली दुर्घटना?, तानाजी सावंत जखमींच्या भेटीला



<p>इर्शाळवाडीत कशी घडली दुर्घटना? , मंत्री तानाजी सावंत जखमींच्या भेटीला.. स्फोट झाल्यासारखा आवाज झाला, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.. प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया…&nbsp;</p>



Source link

kolhapur Rain : कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार.. पंचगंगा पात्राबाहेर; जिल्ह्यातील ५८ बंधारे पाण्याखाली

0
kolhapur Rain : कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार.. पंचगंगा पात्राबाहेर;  जिल्ह्यातील ५८ बंधारे पाण्याखाली


kolhapur&nbsp;Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आगामी दोन दिवस ऑरेंज अलर्ट असून, पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.



Source link

Irshalwadi Landslide : “आमदार फोडण्यात व्यस्त नसते, तर..”; अमित ठाकरेंचा भाजपला टोला

0
Irshalwadi Landslide : “आमदार फोडण्यात व्यस्त नसते, तर..”; अमित ठाकरेंचा भाजपला टोला


जळगाव दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेवरून भाजपवर टीका केली आहे. अमित ठाकरे म्हणाले की, ही भयंकर दुर्घटना आहे. त्यातून बचावलेल्यांची परिस्थिती फारशी चांगली नाही. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. हे खूप दुर्दैवी असून प्रशासनाचं व सरकारचं याकडं दुर्लक्ष झालं आहे. राज ठाकरे यांनी आधीच इशारा दिला होता की, अशा घटना घडू शकतात. मात्र त्यावर सरकारकडून काहीही पावले उचलण्यात आलेली नाही. आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर याकडं लक्ष देता आलं असतं, अशी टीका अमित ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.



Source link

उल्हास खाडीत वाहून गेलेल्या चिमुकलीसाठीची शोधमोहीम अखेर थांबवली; पोलीस करणार घटनेचा तपास

0
उल्हास खाडीत वाहून गेलेल्या चिमुकलीसाठीची शोधमोहीम अखेर थांबवली; पोलीस करणार घटनेचा तपास


Baby Drown From Local Train: पत्रीपुलाजवळ आजोबांच्या हातामधून नाल्यात पडून उल्हास खाडीत वाहून गेलेल्या चिमुकलीच्या शोधाचे कार्य गुरुवारी संध्याकाळी बचाव पथकांनी थांबविले. राष्ट्रीय आपत्ती दलाचे जवान, कल्याण डोंबिवली पालिका आधारवाडी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी गुरुवारी संकाळपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत आधारवाडी ते दिवा, मुंब्रा परिसरातील खाडी किनारा परिसरात चिमुकलीचा शोध घेतला. कोठेही रिषिका बाळ आढळून न आल्याने अखेर गुरुवारी संध्याकाळी बचाव पथकांनी शोध मोहीम थांबवली. दरम्यान, या घटनेची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

काय होती घटना?

हृद्य पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शोध लागला पाहिजे म्हणून प्रत्येक जण प्रार्थना करत होते. हैदराबादमध्ये राहणाऱ्या योगिता रुमाले भिवंडीमध्ये आपल्या आई-वडिलांकडे प्रसूतीसाठी आल्या आहेत. जन्मजात रिषिकाला आजार असल्याने तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. सहा महिन्यांनी तिला मुंबईत न्यावे लागत होते. मुसळधार पाऊस असूनही बुधवारी आई योगिता, तिचे वडील ज्ञानेश्वर पोगूल रिषिकाला घेऊन मुंबईत गेले. परतत असताना मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होती. अंबरनाथ लोकलमधून परत येत असताना पत्रीपुलाजवळ लोकल बराच उशीर लोकल उभी होती. लोकल कल्याण रेल्वे स्थानकात जाण्याची चिन्हे नव्हती. योगिता, आजोबा सुखरुप पत्रीपुलाजवळ उतरले. इतर प्रवाशांप्रमाणे रेल्वे मार्गातून कल्याण स्थानकाकडे पायी जाऊ लागले. बाळ आजोबांच्या जवळ होते. पत्रीपुलाजवळील अरुंद जागेतून बाजुला नाला असलेल्या भागातून जाताना आजोबांचा पाय घसरला आणि हातामधील रिषिका नाल्यात पडली. 

चिमुकली सापडली नाहीच 

समाज माध्यमात या घटनेची दृश्यचित्रफित फिरू लागल्यानंतर सरकारी यंत्रणांनी या घटनेची माहिती घेतली. बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत अग्निशमन जवान, राष्ट्रीय आपत्ती दलाच्या जवानांनी रिषिकाचा खाडी किनारा परिसरात शोध घेतला. मुसळधार पाऊस, खाडी दुथडी वाहत असल्याने बचाव कार्यालयात अडथळे येत होते. त्यामुळे रात्री ही मोहीम थांबविण्यात आली.

तहसीलदार जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून आपत्ती दल पथकांनी पत्रीपूल, मोठागाव, कोपर, दिवा, मुंब्रा परिसरात खाडीच्या दोन्ही बाजुची झुडपे, किनारे भागात दुपारपर्यंत शोध घेतला. बाळ आढळून न आल्याने त्यांनी बचाव कार्य थांबविले.

पोलिसांकडून घटनेचा तपास होणार

या घटनेची पोलीस उलट तपासणी करणार असल्याची माहिती पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे. काल घडलेली घटना गंभीर आहे या घटनेची उलट तपासणी पोलीस करणार आहेत घटनास्थळाची पाहणी केली असता घडलेल्या घटनेच्या स्थळावरून महिला तो नालापार कसा करू शकते नालापार करणे जिक्रीचे आहे कसरतीचे आहे. त्यामुळे या घटनेमध्ये पोलिसांनी देखील संशय व्यक्त केला आहे.  मात्र या घटनेचा उलट तपास देखील करण्यात येणार आहे. 



Source link

केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही योगासनांचा क्रीडा प्रकारात समावेश होणार!

0
केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही योगासनांचा क्रीडा प्रकारात समावेश होणार!


आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत चर्चेत सहभागी होताना योगासनाचा समावेश शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये करण्याची मागणी केली. ते म्हणाले, शिक्षण क्षेत्र, नोकरी,  पुरस्कार, किंवा राज्यशासनाच्या बाबतीत हे सगळे लाभ योगासन खेळाडूंना मिळाले पाहिजे. योगासन या क्रीडा प्रकाराचा २०२० मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय खेळांमध्ये समावेश केला गेला आहे. सन २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला १४० मेडल मिळाले, त्यामध्ये १६ मेडल योगासनामध्ये मिळाले, त्यामुळे सरकारने या पुरस्कारांमध्ये योगासनाचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे म्हणाले, याबाबत तपासू व निर्णय घेऊ मात्र योगासनाचा अंतर्भाव करायलाच पाहिजे असा वरुन निर्णय आहे. 



Source link

Irshalwadi Land Slide Update : पायथ्यापासून दुर्घटनास्थळापर्यंत, एबीपी माझाच्या कॅमेराने काय पाहिलं?

0
Irshalwadi Land Slide Update : पायथ्यापासून दुर्घटनास्थळापर्यंत, एबीपी माझाच्या कॅमेराने काय पाहिलं?



<p>पायथ्यापासून दुर्घटनास्थळापर्यंत, एबीपी माझाच्या कॅमेराने काय पाहिलं? ढिगाऱ्याखाली माणसं, नातेवाईकांची हाक, ईर्शाळवाडीतून सात रिपोर्टरकडून प्रत्येक अपडेट</p>



Source link

कोयना धरणात 24 तासात सहा टीएमसी पाण्याची वाढ; महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद

0


Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात (Satara Rain Update) सुरु असलेल्या संततधार पावसाने कोयना धरणाच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात धरणात 6 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळत असल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. कोयना धरणात 74 हजार 569 क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात गेल्या 24 तासांत  सहा टीएमसीने वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात पश्चिमेला दमदार पावसाने हजेरी लावली असली, तरी पूर्वेकडे भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दुष्काळी पट्ट्यात अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पाच तालुक्यातील महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शिवाजी विद्यापीठाकडूनही आजच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सोमवारपासून (Satara Rain Update) पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धोम, बलकवडी, कोयना, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठा वाढत चालला आहे. 

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने युद्धपातळीवर मोहीम राबवून दरड हटविली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. कराड-चिपळूण मार्गावर कुंभार्ली घाटातही दरड कोसळली होती. महाबळेश्वर-तापोळा मार्गावरही दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला होता. जावळी, वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोयना, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाटण तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. 

महाबळेश्वरला सर्वाधिक 331 मिलीमीटर पावसाची नोंद

गेल्या 24 तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक 331 मिलीमीटरची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये पाऊस दमदार पावसाने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरसह तापोळा, बामणोली भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही पावसाचा जोर दिसून आला. गुरुवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासात महाबळेश्वरला सर्वाधिक 331 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवजा 272 आणि कोयनेला 253 मिलीमीटर पाऊस पडला आहे. दुसरीकडे, वेण्णा तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link