Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2913

Madhurani Prabhulkar: ‘अरुंधती’चा खरा संसारही मोडणार? मधुराणीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

0
Madhurani Prabhulkar: ‘अरुंधती’चा खरा संसारही मोडणार? मधुराणीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण


Madhurani Gokhale Prabhulkar Divorce: ‘अरुंधती’च्या आयुष्यात उलथापालथ सुरू असताना आता मधुराणीच्या वैयक्तिक आयुष्यात देखील मोठे वादळ आले आहे.



Source link

Bhuibawada Landslide : सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटात दरड कोसळली, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प

0
Bhuibawada Landslide : सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटात दरड कोसळली, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प


कोकणातील रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं वैभववाडी तालुक्यातील शांती, अरूणा, कुसुर, शुक, करूळ आणि गोठणा नद्यांना पूर आला आहे. भुईबावडा गावातील घाणेगडवाडी पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे, त्यामुळं तेथील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. याशिवाय तिरवडे गावातील मुख्य रस्त्यावर पुराचं पाणी शिरल्याने तेथील वाहतुकही बंद करण्यात आल्याची माहिती आहे. कोकणात पुढील दोन ते तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असल्याने नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.



Source link

मराठवाड्यातील ‘या’ पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; दमदार पावसाची शक्यता

0
मराठवाड्यातील ‘या’ पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; दमदार पावसाची शक्यता


Marathwada Rain Yellow Alert : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात ठिकठिकाणी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. दरम्यान मराठवाड्यात (Marathwada) देखील गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. तर आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता असून, उर्वरित जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी बरसतील. राज्यात सर्वत्र दमदार पाऊस होत असताना मराठवाड्यात मात्र कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. 

अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा…

मराठवाड्यात गेल्या तीन-चार दिवसांत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम तर कुठे दमदार पाऊस पडतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. मात्र, असं असले तरीही मराठवाड्यातील अनेक प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. त्यामुळे आगामी काळात लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा परिस्थितीत मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. 

मराठवाड्यातील आतापर्यंतचा पाऊस 












जिल्हा गतवर्षी यावर्षी 24 तासांत पाऊस 
औरंगाबाद 301 मिमी 90 मिमी03.4 मिमी
जालना 365 मिमी203 मिमी2.60 मिमी
परभणी 386 मिमी193 मिमी00 मिमी
नांदेड 370 मिमी262 मिमी3.05 मिमी
हिंगोली 524 मिमी243 मिमी03 मिमी
बीड 667 मिमी172 मिमी0.1 मिमी
धाराशिव 302 मिमी129 मिमी1.9 मिमी
लातूर 384 मिमी222 मिमी4.6 मिमी

प्रशासनाने केलेलं आवाहन…

  1. गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.
  2. गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगरपालिका प्रशासनास  कळवावे.
  3. गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.
  4. पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.
  5. पूरस्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी , इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये.
  6. कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहिल याची काळजी घ्या.
  7. पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा, पूरस्थितीत घाबरुन जाऊ नका, प्रशासनांच्या सूचनांचे पालन करा. 

काय करु नये? 

  1. पूर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका.
  2. पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका, तसेच पूर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका.
  3. दुषित, उघड्यावरील अन्न-पाणी टाळा. शक्यतो उकळलेले पाणी आणि सुरक्षित अन्न सेवन करा.
  4. सुरक्षित ठिकाणी राहा आणि विद्युत् तारांना स्पर्श करु नका.
  5. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरिचीत आणि खोल पाण्यात जाऊ नका.
  6. पूरपरिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करु नका

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maharashtara Rain : कोकणासह विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन; वाचा हवामान विभागाचा अंदाज



Source link

Project K: दीपिका पदुकोण-प्रभासच्या चित्रपटाचं नाव ‘प्रोजेक्ट के’ नाही! खऱ्या शीर्षकाचा झाला खुलासा…

0
Project K: दीपिका पदुकोण-प्रभासच्या चित्रपटाचं नाव ‘प्रोजेक्ट के’ नाही! खऱ्या शीर्षकाचा झाला खुलासा…


Project K Name Revealed: सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये या चित्रपटाच्या नावाचा खुलासा केला आहे. या निमित्ताने ‘प्रोजेक्ट के’ची पहिली झलक देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.



Source link

सातारा : भूस्खलनग्रस्त 369 कुटुंबांचे स्थलांतर : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याने सध्या ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. पाटण, महाबळेश्वर, जावली, सातारा या तालुक्यांतील 41 धोकादायक व संवेदनशील गावांची पाहणी केल्यानंतर पूरपरिस्थिती व भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर 22 गावांतील 369 कुटुंबांचे निवारा शेडमध्ये स्थलांतर केले आहे. संबंधित धोकादायक गावांतील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थिती तातडीने मदत व्हावी यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांची 5 पथके स्थापन केली आहेत. धोकादायक गावांतून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांची गुरुवारी पाहणी केली. त्यांनी महसूल अधिकार्‍यांकडून परिस्थितीची व्हीसीद्वारे माहितीही घेतली. त्यानंतर कार्यालयात पत्रकार परिषदेत जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यात आजअखेर 247.9 मि.मी. पाऊस झाला आहे. कोयना धरणात 74 हजार 569 क्यूसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. जिल्ह्यात 172 पूरप्रवण व 124 दरडप्रवण गावे आहेत. सार्वजनिक विभागामार्फत 6 मार्गांवर व धोकादायक ठिकाणी घाटनिहाय नोडल ऑफिसर नियुक्त केले आहेत. यवतेश्वर तसेच आरे दरे, पोगरवाडी परिसरात कोसळलेल्या दरडी हटवल्या आहेत. कास धरण परिसरात घाटाईदेवी बायपास रस्त्यावर खडी टाकून रस्ता पूर्ववत केला आहे. वाहतूक सुरळीत ठेवली आहे. पुणे एनडीआरएफ जवानांची 25-30 जणांची एक तुकडी शनिवारी दाखल होणार असून ती कराड किंवा पाटण याठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

संभाव्य पूरपरिस्थिती व भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर बाधितांसाठी पाटण तालुक्यातील जिमनवाडी 7, सावरवाडी 2, म्हारवंड 7, बोरगेवाडी 1, कळंबे 1, भैरेवाडी (डेरवण) 1, बाटेवाडी 1, केंजळवाडी 2, मसुगडेवाडी 4 व पाबळवाडी 1; जावली तालुक्यात घोटेघर-रांजणी 3, धनगरपेढा (मोरघर) 2, नरफदेव (मेरूलिंग)2 तर सातारा तालुक्यातील मोरेवाडी 2, टोळेवाडी (मांडवे) 12 अशी 47 निवारा शेड बांधली आहे. येथे सुमारे 369 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील मोरेवाडी 18, भैरवगड 60 व सांडवली 20 कुटुंबे; वाई तालुक्यातील जोर 8, गोळेवाडी-गोळेवस्ती 4 कुटुंबे; पाटण तालुक्यातील मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथील 150 तर म्हारवंड येथील 35 कुटुंबे; महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतुरबेट, मालूसर, येर्णे येथील 65 कुटुंबे; जावली तालुक्यातील बोंडारवाडी 6, भुतेघर येथील 3 कुटुंबे तसेच नरफदेव, रांजणी व धनगरपेढा याठिकाणी स्थलांतर होण्याबाबत सुचना केल्या आहेत. नागरिकांना त्यांचे नातेवाईकांच्या घरी, शाळा, मंदिर याठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, तरीही नागरिक दुर्लक्ष करत असल्यास सक्तीने स्थलांतर करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, पाटण, महाबळेश्वर, जावली, सातारा या तालुक्यांतील 41 धोकदायक गावे, इतर संवेनशील गावांची पाहणी केली असून स्थलांतरित कुटुंबांची तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था, भोजन, शुद्ध पिण्याचे पाणी आदी मदत तात्काळ मिळावी यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची पाच पथके स्थापन केली असून संबंधित अधिकार्‍यांकडे गावांची देखरेख ठेवली आहे. त्यामध्ये भूसंपादन उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले यांच्याकडे पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फे मरळी खालचे, आंबेघर तर्फे मरळी वरचे, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहिर, दिक्षी, खुडूपलेवाडी, मेंढोशी बोर्गेवाडी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती), धनवाडेवाडी/शिंदेवाडी (निगडे), जोशेवाडी (कालगाव), जायगुडेवाडी, कुसावडे (पलसरी) व तालुक्यातील इतर संवेदशनील धोकादायक गावे सोपवली आहेत. जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांच्याकडे महाबळेश्वर तालुक्यातील येरंडल, धावली, दुधोशी, भेकवली वाडी, आचली, कुमठे (कामठवाडी), येर्णे बु॥, येर्णे खुर्द, घावरी, मालुसरे, दरे, चिखली, चतूरबेट, नावली, शिंदोळा व तालुक्यातील इइतर संवेदनशील धोकायदायक गावे सोपवली आहेत. भूसंपादन उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे वाई तालुक्यातील कोंढावळे, जोर व इतर संवेदनशील व धोकादायक गावे आहेत. भूसंपादन उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांच्याकडे जावली तालुक्यातील बोंडारवाडी, भूतेघर, वहिटे व इतर संवेदनशील व धोकादायक गावे आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे सातारा तालुक्यातील सांडवली, केळवली, बोंडारवाडी, भैरवगड (टोळेवाडी), मोरेवाडी व इतर संवेदनशील धोकादायक गावे सोपवली आहेत.

जितेंद्र डुडी म्हणाले, सन 2021 साली झालेल्या सर्व्हेक्षणानंतर 41 गावे दरडप्रवण असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी 19 गावांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा अहवाल जिऑलॉजिकल स्वर्हे ऑफ इंडिया या संस्थेच्या अहवाल स्पष्ट नमूद केले आहे. त्यामध्ये पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी, काहीर, आंबेघर खालचे व वरचे, ढोकावळे, मिरगाव, काटेवाडी-हुंबरळी तसेच सातारा तालुक्यातील भैरवगड या गावांचे पुनर्वसन करण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. पाटणमधील 8 गावांतील 558 कुटुंबासाठी 9 हेक्टर 8 आर क्षेत्र भूसंपादिन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातारा तालुक्यातील भैरवगडमधील 118 कुटुंबांचे पुनर्वसन सरकारी जागेत करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित गावांच्या पुनर्वसनाची कार्यवाही सुरू आहे. 96 गावांचा सर्व्हे करण्यात येणार आहे.

जितेंद्र डुडी म्हणाले, हुल्लडबाज पर्यटकांना आवरण्यासाठी कास तसेच ठोसेघर मार्गावर पोलिस चौक्या उभ्या केल्या जाणार आहेत. सातारा शहर परिसरातील तीव्र डोंगर उतारावरील गावे, वसाहतींच्या सर्व्हेच्या सुचना केल्या जातील. हवामान खात्याने रेड अर्लट दिल्याने सातारा, महाबळेश्वर, जावली, महाबळेश्वर आणि वाई तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, आदेशाचे उल्लंघन करून काही ठिकाणी शाळा व महाविद्यालये सुरु ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यामुळे त्याचा अहवाल शिक्षणाधिकार्‍यांकडून मागवण्यात येणार असून संबंधित शाळा व महाविद्यालयांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदि उपस्थित होते.

आपत्ती नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांच्या मदतीसाठी (02162) 232349/232175, पोलिस मदतीसाठी (02162) 233833/231181 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा..

अतिवृष्टी, दरडी कोसळणे, भूस्खलनग्रस्त गावांतील नागरिकांनी सतर्क राहून स्वत: सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. नागरिकांनी धोकादायक ठिकाणी प्रवास टाळावा. दरडप्रवण परिसरात थांबू नये. नदी, ओढे-नाले यांच्या पुराच्या पाण्यातून प्रवास टाळावा. पुलावरून पाणी वाहत असताना पाण्याचा प्रवाह ओलांडू नये. पर्यटनाच्या ठिकाणी, धबधबे, तलाव व इतर धोकादायक ठिकाणी प्रवेश करू नये. सेल्फीचा मोह टाळावा. अतिवृष्टीच्या काळात तत्काळ नातेवाईकांच्या सुरक्षित घरी, समाजमंदिर, शाळा इतर ठिकाणी स्वत: स्थलांतरित व्हावे. पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी पाणी उकळून गार करून प्यावे. वीज कडकडत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाण्यात असाल तर तत्काळ बाहेर पडावे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.



Source link

Swanandi Tikekar : अखेर यांचही जमलं! अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा होणारा पतीही आहे सुप्रसिद्ध गायक

0
Swanandi Tikekar : अखेर यांचही जमलं! अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा होणारा पतीही आहे सुप्रसिद्ध गायक


स्वानंदी आणि आशिष गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असावेल, असा कयास चाहते बांधत आहेत. मात्र, अद्याप स्वानंदी आणि आशिष या दोघांनी इतर कोणत्याही गोष्टीचा खुलासा केलेला नाही. त्यांनी केवळ आता आपली सिक्रेट रिलेशनशिप जगजाहीर केली आहे.



Source link

सातारा : पतीचा खून; पत्नीसह प्रियकराला जन्मठेप | पुढारी

0









सिध्देश्वर कुरोली; पुढारी वृत्तसेवा :  अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढणार्‍या खटाव तालुक्यातील पत्नी आणि तिच्या प्रियकराला वडूज जिल्हा न्यायलायाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पत्नी स्वाती ब्रह्मदेव तुपे (वय 31, रा. तुपेवाडी) व प्रियकर धनाजी शिवाजी काटकर (रा. मानेवाडी ता. खटाव) अशी शिक्षा लागलेल्या आरोपींची नावे आहेत. ब्रम्हदेव तुपे असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, स्वाती तुपे व धनाजी काटकर यांच्यात प्रेमसंबंध होते. धनाजी वेळोवेळी स्वातीच्या घरी जात होता. स्वातीच्या पतीसह कुटुंबियांनी तिला समजही दिली होती. मात्र त्यांचे भेटणे सुरुच होते. समज दिल्यानंतरही पती ब्रहमदेव यांना ‘तुझ्यावर खोटी केस करण्याची धमकी दिली जात होती.’ अनेकदा तिघांमध्ये यातून वादावादी झाली होती. दि. 3 जून 2016 रोजी सायंकाळी धनाजी हा स्वाती हिला भेटावयास घरी आला होता. त्यावेळी पती ब्रह्मदेव त्यांच्या शेजारी राहणार्‍यांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अचानक गारांचा जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सर्वजण आपापल्या घरी गेले. ब्रम्हदेव, स्वाती व धनाजी हे तिघे ब्रम्हदेव यांच्या घरात होते. त्यावेळी स्वातीने दारास कडी लावून घेतली. त्यांनतर 15 मिनिटांनी स्वाती व धनाजी काटकर हे घराबाहेर येवून आरडाओरडा करून ब्रहमदेव याने गळफास घेवून आत्महत्या केली असा बनाव केला. वडूज पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. खूनाची घटना असल्याने त्या अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली.

टेलिफोन वायरने गळा आवळून खून केलेबाबत तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. या गुन्हयाचा तपास करुन फौजदार पी. एम. जाधव यांनी वडूज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने सहायक जिल्हा सरकारी वकील ए. पी. कदम-साबळे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्यावतीने एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. प्रॉसिक्युशन स्क्वॉड वडूजचे अंमलदार सागर सजगणे, दत्तात्रय जाधव, दडस, जयवंत शिंदे, अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.











Source link

Aditya Srivastava Birthday: सीआयडीच्या ‘इन्स्पेक्टर अभिजीत’बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

0
Aditya Srivastava Birthday: सीआयडीच्या ‘इन्स्पेक्टर अभिजीत’बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?


Happy Birthday Aditya Srivastava: आदित्य श्रीवास्तवने ‘सीआयडी’ आधी आणि नंतर अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केले असले, तरी तो लक्षात राहिला ते ‘इन्स्पेक्टर अभिजीत’ म्हणूनच…



Source link

सातारा : ४८ तासांत कोयना धरणात १० टीएमसी पाणीसाठा | पुढारी

0









पाटण; पुढारी वृत्तसेवा :  कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यातही गुरुवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. तरीही धरणांतर्गत विभागातून प्रतिसेकंद सरासरी 58,591 क्यूसेक पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी पाच पर्यंत गेल्या आठ्ठेचाळीस तासांत कोयना धरणात 10 टीएमसी पाणीवाढ झाली आहे.

कोयना धरणात सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा 39.09 टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा 34.09 टीएमसी इतका झाला आहे. चोवीस तासांत या पाणीसाठ्यात 5.06 टीएमसीने तर पाणी उंचीत 8 फूट 8 इंच वाढ झाली आहे. कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर येथेही पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या एकूण क्षमतेच्या 37.14 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाची जलपातळी 637.794 मीटर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप 66.16 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.











Source link

भय इथले संपत नाही..! सातारा जिल्ह्यातील 124 गावे डोंगर कपारीखाली जीव मुठीत धरून | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : डोंगर कोसळून गडप झालेल्या माळीण गावानंतर अशाच काही दुर्घटना घडल्या असून गुरूवारी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतही भुस्खलन होवून अनेकजण गाढले गेले. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील डोंगर कपारीखाली दडलेल्या अनेक गावकर्‍यांचा थरकाप उडाला. जिल्ह्यातील 124 गावे आजही जीव मुठीत धरून जीवन कंठत आहेत. प्रशासन या गावांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत असले तरी ‘भय इथले संपत नाही’ असे चित्र पहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे डोंगराच्या पहाडी कातळाखाली विसावलेली अन् निर्ढावलेली ही गावं माळीणसारखीच गडप होण्याचा धोका या गावकर्‍यांना वाटत आहे.

अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याशी दुर्घटनेची भीती

जिल्ह्यातील 124 गावांना दरडी कोसळण्याचा धोका असून त्यामध्ये यापूर्वी भुस्खलन झालेल्या अनेक गावांचा समावेश आहे. वाईच्या पश्चिमेकडील गोळेवाडी, गोळेगाव, जोर येथेही भुस्खलन होवून दुर्घटना घडली होती. सातार्‍यालाही भुस्खलनाचा धोका आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी माची पेठ परिसरात अलिकडच्या वर्षांत अनेक बांधकामे झाली असून ती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक ठिकाणी डोंगराचे कडे सुटण्याचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या गावांचे करावे लागणार पुनर्वसन…

सातारा, जावली व पाटण तालुक्यातील 16 गावांमध्ये 199 निवारा शेड उभारण्यात आली आहेत. जुलै, 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या भागातील 41 गावांचा सर्व्हे जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय) या संस्थेकडून करण्यात आला. त्यामध्ये पाटण तालुक्यातील आंबेघर (खालचे), ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, जितकरवाडी, महाबळेश्वर तालुक्यातील दरे, दुधोशी, येरणे बु॥, येरणे खुर्द, धावरी, चतुरबेट, एरंडेल, वाई तालुक्यातील कोंढावळे (देवरुखवाडी), जोर, सातारा तालुक्यातील भैरवगड व जावली तालुक्यातील भुतेघर या गावांचे पूर्णत: व अंशत: पुनर्वसन करावे लागणार आहे.

16 गावांमध्ये उपाययोजना

जिल्ह्यात 124 गावांना दरडींचा धोका असल्याचे आढळले आहे. पाटण, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्यातील भूस्खलनग्रस्त 21 गावांचे काही ठिकाणी संपूर्ण व अंशत: पुनर्वसन करावे लागणार आहे. भविष्यातील धोका ओळखून 16 गावांमध्ये 199 तात्पुरत्या निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे.

भिलारच्या आठवणी थरकाप उडवणार्‍या

जुलै 2005 साली तुफान अतिवृष्टी होवून भिलार येथील नारळी बाग परिसरात जमीन खचली होती. परिसरातील जमिनींना भेगा पडून 38 कुटुंबियांची घरे पत्यांच्या बंगल्यासारखी कोसळली होती आणि एकच हाहाकार उडाला होता. ही थरकाप उडवणारी घटना इर्शाळवाडीच्या दुर्घटनेने ताजी झाली आहे.

डोंगरालगतच्या भागातील घरांना धोका

अजिंक्यतार्‍याच्या कुशीत वसलेल्या सातार्‍याचा काही भाग डोंगरालगत आहे. शाहूनगर, चारभिंती पसिसर, माची पेठ, मंगळवार पेठ, पॉवर हाऊस झोपडपट्टी हा भाग डोंगराच्या टापूत येतो. त्याठिकाणी बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. तरीही त्याठिकाणी बेकायदा बांधकाम झाल्याचे आढळते.

जावलीतही घबराट

जावली तालुक्यातील क्षेत्र मेरूलिंगच्या महाकाय पठाराखालील अनेक घरे तग धरून आहेत. पायथ्याच्या जावळेवाडीलाही दरडी कोसळण्याचा धोका आहेच.



Source link