Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2912

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पुण्यातील पसारवाडीने रात्र काढली जागून…

0
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पुण्यातील पसारवाडीने रात्र काढली जागून…


Landslide News : इर्शाळवाडीत झालेल्या (Khalapur Irshalwadi Landslide) भूस्खलनामुळे राज्य हादरलं. पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये दर काही वर्षांनी भूस्खलनाच्या घटना घडत असतात. त्यामुळे पावासाळा आला की याच परिसरातील नागरिकांना भूस्खलनामुळे धोका निर्माण होतो. इर्शाळवाडीत घटनेनंतर पसारवाडी गावातील नागरिकांना चांगलाच धक्का बसला आहे. पुण्यातील माळीणला खेटून असणारी पसारवाडीने कालची रात्र अक्षरशः जागून काढली आहे. 

इर्शाळवाडीच्या दुर्घनेनंतर हे अख्ख गाव भीतीच्या सावटाखाली आलं. माळीणच्या दुर्घनेनंतरच्या अहवालात पसारवाडी धोकादायक असल्याचं शासनाने जाहीर केलं होतं. आपल्यावर अशी वेळ येऊ नये, म्हणून इथल्या ग्रामस्थांनी पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली. ग्रामस्थांनी स्वतःची अडीच एकर जागा पुनर्वसनासाठी देऊ ही केली. मात्र गेली नऊ वर्ष इथलं पुनर्वसन रखंडलंय, परिणामी दोनशे लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय. माळीण आणि इर्शाळवाडी सारखी वेळ आमच्यावर येण्याची वाट सरकार पाहतंय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

नागरिक धास्तावले…

2014 मध्ये माळीण गावात भूस्खलन झालं होतं. त्यानंतर ते गाव पुनर्वसन  करण्यात आलं. 2014 मध्ये माळीणकरांवर मोठं संकट आलं होतं. अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते आणि शंभरहून जास्त लोकांचा जीव गेला होता. त्यावेळी या गावातील एकमेव शाळा या दुर्घटनेत बचावली होती. त्यानंतर तळीयेमध्येदेखील अशीच घटना घडली होती. दोन्ही गावांचं पुनर्वसन करण्यात आलं मात्र ज्या गावांना भूस्खलनाची भीती आहे त्या गावातील नागरिकांना अशा घटनांनंतर धास्ती बसते. त्यामुळे नागरिक वारंवार सरकारला पुनर्वसनाची मागणी करत आहेत. 

पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण

मंगळवारपासून घाटमाथ्यावरही पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण गावे आहेत. दरडप्रवण गावात दरडी कोसळण्याची शक्यता तसेच पूरप्रवण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या भागात घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलं आहे . 

मान्सूनच्या काळात विशेषत: सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूकीचे योग्य नियोजन करावे. भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या भागातील यंत्रणांनी  सतर्क राहावे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे नदी परिसरात पूरप्रवण गावातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना द्याव्यात असंही सांगण्यात आलं आहे. 

हेही वाचा-

Khalapur Irshalwadi Landslide : पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये दहा वर्षांत शंभर पटीने वाढ; कारणं काय? उपाय काय?

 



Source link

साताऱ्यातील पाटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले; आत्महत्या की घातपात?

0


Satara Crime: सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील संनबुरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि दोन मुलांसह घरात मृतदेह आढळून आले. घरातून कोणी बाहेर येत नसल्यामुळे ग्रामस्थांना शंका आली. यानंतर पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र, आत्महत्या की घातपात याबाबत मात्र स्पष्टता आलेली नाही. आनंदा जाधव (वय 65 वर्षे) त्यांची पत्नी सुनंदा जाधव (वय 60 वर्षे), मुलगा संतोष आनंद जाधव (वय 35 वर्षे) मुलगी पुष्पलता दस (वय 45 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 



Source link

धक्‍कादायक : साताऱ्यात घरात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा पाटण तालुक्यातील सणबूर येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, घटनेचे कारण दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते.

सेवानिवृत्त शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव, सुनंदा आनंदराव जाधव, संतोष जाधव आणि पुष्पा धस अशी मृतांची नावे आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत फोन करूनही कोणताच रिप्लाय येत नसल्याने आनंदा जाधव यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने संबंधितांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता आणि त्यामुळे ग्रामस्थांनी तो दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील चौघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेचे कारण अस्पष्ट असले तरी, घटनेबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडला आणण्यात येणार असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 











Source link

Richest MLAs Maharashtra : महाराष्ट्रातील टॉप अब्जाधीश आमदारांच्या यादीत अमराठी आमदारांची बाजी

0
Richest MLAs Maharashtra : महाराष्ट्रातील टॉप अब्जाधीश आमदारांच्या यादीत अमराठी आमदारांची बाजी


Richest MLAs Maharashtra : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यापासून राज्यातील राजकारणात मोठे राजकीय भूकंप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीची स्थापना, एकनाथ शिंदेंचं बंड, राष्ट्रवादीतील फूट आणि आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार राज्यातील जनतेला पाहायला मिळत आहे. परंतु जेव्हा-जेव्हा राजकारणाचा विषय निघतो तेव्हा राज्यातील सर्वात श्रीमंत आणि अब्जाधीश आमदार कोण?, हा प्रश्न अनेकजण उपस्थित करत असतात. काही दिवसांपूर्वीच एका संस्थेने देशातील सर्वात श्रीमंत आमदारांची यादी जाहीर केली. त्यात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बाजी मारली आहे. परंतु महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोण आहे?, हे तुम्हाला माहितीय का?, चला तर जाणून घेऊयात.



Source link

Bawaal Review: वरुण-जान्हवीचा अभिनय पाहून चाहतेही म्हणाले ‘बवाल’! पाहा नेटकऱ्यांना कसा वाटला चित्रपट…

0
Bawaal Review: वरुण-जान्हवीचा अभिनय पाहून चाहतेही म्हणाले ‘बवाल’! पाहा नेटकऱ्यांना कसा वाटला चित्रपट…


या चित्रपटाविषयी बोलताना एकाने लिहिले की, ‘वरूण धवन नेहमीच आपल्या अभिनयाने आमची मनं जिंकतो.’ तर, दुसर्‍या एकाने चित्रपटाचे कौतुक करताना लिहिले की, ‘मी नुकताच बवाल पाहिला. त्यानंतर मी वरुण आणि जान्हवीच्या अभिनयाचा फॅन झालो आहे. चित्रपटाची कथा खूप चांगली आहे.’ काही लोकांना वरुण आणि जान्हवीच्या ‘बवाल’मधील गोंधळ चांगलाच आवडला आहे. तर, काहींनी चित्रपटाविषयी कुरबुरी देखील केल्या आहेत. या सर्व बाबी पाहता या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



Source link

ठाकरे गटातील नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन वाद; तरुणाने केली आत्महत्या

0
ठाकरे गटातील नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन वाद; तरुणाने केली आत्महत्या


Aurangabad Suicide News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ईसारवाडी गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, ठाकरे गटाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसासाठी लावलेल्या बॅनरवरुन दोन गटात वाद झाला. तर वादाच्यावेळी अपमान झाल्याचे म्हणत एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (19 जुलै) रात्री हा प्रकार घडला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महेश गोरक्षनाथ बोबडे ( वय 25 वर्षे, रा. ईसारवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पैठण तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त ईसारवाडी येथील महेश गोरक्षनाथ बोबडे हा तरुण आपल्या मित्रासोबत बुधवारी रात्री दहा वाजता गावात वाढदिवसाचे बॅनर लावत होता. या बॅनरवर राष्ट्रीय महापुरुषांचा फोटो छापलेला होता. या बॅनरवर महेश बोबडे याने पाय ठेवला म्हणून गावातील दहा ते बारा तरुणांनी महेश व त्याच्या घरच्या मंडळीला देखील मारहाण केली. घरातील संसारोपयोगी वस्तूंची नासधूस करण्यात आली. झालेल्या घटनेबाबत महेश बोबडे याला माफी मागण्यास भाग पाडून, या माफीनाम्याचा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. दरम्यान बुधवारी गावातील एका व्यक्तीने मध्यस्थी करुन या प्रकरणावर पडदा पाडला. 

मात्र रात्री पुन्हा गावातील तरुण मारहाण करतील म्हणून महेश बोबडे शेतात झोपण्यासाठी गेला होता. सकाळ झाली तरी तो घरी न आल्याने त्याच्या भावाने शेताकडे जाऊन पाहिले असता महेशने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. सदरील घटनेची माहिती तात्काळ घरच्यांना देऊन पोलीस ठाण्यात कळवण्यात आले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. सकाळपासूनच गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. 

यांच्यावर गुन्हा दाखल… 

या बॅनरच्या वादातून आपल्याला व आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याचा अपमान झाल्यामुळे महेश बोबड याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याचे वडील गोरक्षनाथ गंगाधर बोबडे यांनी दाखल केली. या प्रकरणी सनी संदीप मिसाळ, सचिन जालिंदर शेळके, अनिकेत योसेफ ताकवले, यश विजय ससाणे, प्रदीप अण्णासाहेब मगरे, किरण अशोक महाले, तुषार संतोष ससाणे, गौरव रमेश ताकवले, ऋषीकेश मच्छिंद्र शेळके, स्वप्निल रमेश मिसाळ, सागर मिसाळ, अविनाश मिसाळ (सर्व रा. ईसारवाडी ता. पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गावात पोलिसांचा बंदोबस्त 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि नीलेश केळे, बिडकीन पोलीस ठाण्याचे गणेश सुराशे, पाचोड पोलीस ठाण्याचे संतोष माने, स्थानिक गुन्हा शाखेचे प्रदीप ठुबे यांच्यासह विविध पोलीस पथकाचा बंदोबस्त गावामध्ये मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. तर याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सपोनि नीलेश केळे हे करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

‘बाबा, मला माफ करा, मी तुमचे पैसे गमावले’; सुसाईड नोट लिहून कर्जबाजारी अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या



Source link

Shah Rukh Khan: शाहरुख खानने का नाकारला होता संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’? समोर आलं कारण

0
Shah Rukh Khan: शाहरुख खानने का नाकारला होता संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’? समोर आलं कारण


आता नेटकऱ्यांना शाहरुख खानची एक जुनी मुलाखत सापडली आहे. यामध्ये अभिनेता म्हणाला होता की, त्याला अनेक व्यक्तिरेखांची ऑफर आली होती, पण त्याने ती सोडली. शाहरुख म्हणालेला की, आपण आता कोणत्या स्थानी आहोत हे लक्षात घेऊन स्क्रिप्टची निवड करावी लागते. तर, सोशल मीडिया युजर्सच्या म्हणण्यानुसार खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीर हाच योग्य पर्याय होता. रणवीर मोठ्या पडद्यावर खिलजीच्या रुपात सर्वांसमोर आला, तेव्हा सगळेच त्याच्या अभिनयाचे चाहते झाले.



Source link

दिव्य मराठी ओपिनियन: कूसच नसती, तर स्त्री जगातल्या प्रत्येक संकटातून मुक्त असती

0
दिव्य मराठी ओपिनियन: कूसच नसती, तर स्त्री जगातल्या प्रत्येक संकटातून मुक्त असती


विशेष संपादकीय : नवनीत गुर्जर16 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

तीन महिने झाले. मणिपूर जळतेय. धावतेय. धावून-धावून मरतेय. तेथील शेतीची मालकांच्या वाटेवर नजर लागली आहे. पाळीव जनावरे खुंट्यावर अस्वस्थ आहेत. लहान मुलांचे गल्लीबोळ रक्तरंजित आहेत. शाळेला टाळे लागलेय. सर्वत्र जणू एक आग धुमसत आहे. पेटत-पसरत आहे. विझण्याचे नाव नाही आणि विझविण्याचे प्रयत्नही अयशस्वी ठरू लागलेत. त्यातच सगळ्या पुरुष समाजाला लाज वाटावी असा व्हिडिआे समोर आला. त्यात महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली जात आहे. खुलेआम अब्रू लुटली जाते.

मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये गुरुवारी महिलांची नग्न परेड केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हजारो लोकांनी काळे कपडे घातलेले लोक निदर्शने करण्यासाठी बाहेर पडले.

हे सगळे पाहून-ऐकून संताप येतो आणि लाजही वाटते. ही घटना घडली ती वेळ थोडी माती खोदून त्यात दफन करून टाकावी, असे मनात येते. मग पुन्हा वाटते जगभरातील प्रत्येक घटना, दुर्घटना, युद्ध आणि संघर्षाची झळ एकट्या महिलेने का सोसावी?

वडील, मुलगा, पती या सर्वांच्या मृत्यूनंतरही स्त्रीची हाडे आणि बांगड्या फोडल्या जातात आणि फायदा-तोट्याच्या प्रत्येक प्रसंगीही तिलाच दूषणे दिली जातात. त्यात तिचे श्रेय नसले तरीही. असे का? मग पुन्हा मनात येते. जगभरातील सगळा संघर्ष, सर्व दूषणे स्त्रीला कूस असल्यामुळेच असतील का? मेली कूस नसती तर स्त्री जगातील प्रत्येक संकटातून मुक्त असली असती. आपण पुरूषांनी नेहमीच महिलेला कधी ढाल, तर कधी तलवार बनवले.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलांनी गुरुवारी इंफाळमधील घटनेच्या विरोधात घोषणाबाजी केली.

वास्तविक लढावेही तिलाच लागले. तुकडेही तिचेच झाले आणि केव्हापासून तरी ती मरतही आहे. रबराच्या झाडांवर आपण तिच्यासाठी सुळावर जाण्याची व्यवस्था केली….आणि ती अनंत काळापासून कधी हसत तर कधी रडत सुळावर चढते आहे. परंतु आपण मात्र खोटेपणा सोडायला तयार नाहीत.

व्हिडिआे हा स्वत:ला लाजिरवाणे वाटावा असा आहे. तो याच दांभिकतेचे उदाहरण ठरतो. संघर्ष मैतेई व कुकींचा आहे. जमिनीचा वाद आहे. मैतेई आदिवासी गट घेऊन कुकींचा डोंगर खरेदी करू इच्छितो आणि कुकी आदिवासी जमीन सोडण्यास तयार नाहीत. जमिनीच्या वादात स्त्री का भरडली जावी? स्वत: पंतप्रधानांनी ही घटना संतापजनक आणि वेदनेने पिळवटून टाकणारी असल्याचे म्हटले आहे.

निश्चितपणे ही वेदना प्रत्येक भारतीय अनुभवत असावा. मणिपूरची ही आग कधी विझणार? देशातील प्रत्येक सकारात्मक शक्ती मिळून लवकरच मार्ग काढेल आणि तेथे शांतता नांदू लागेल, असा विश्वासही आहे. जबाबदार असलेल्या लोकांना आता जागे होऊन तोडगा काढावाच लागेल.



Source link

Karan Johar: करण जोहर बनवणार ‘स्टुडंट ऑफ द इयर ३’! आता ‘या’ स्टारकिडला करणार लाँच

0
Karan Johar: करण जोहर बनवणार ‘स्टुडंट ऑफ द इयर ३’! आता ‘या’ स्टारकिडला करणार लाँच


सध्या करण जोहर आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटानंतर तो एका अॅक्शन चित्रपटाची तयारी करत आहे. या अॅक्शनपटात तो केवळ निर्माता असणार आहे. २०१२मध्ये करणने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ दिग्दर्शित केला होता आणि त्यात आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा लाँच केले होते. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते. ‘स्टुडंट ऑफ द इयर २‘ हा चित्रपट २०१९मध्ये रिलीज झाला होता. याचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा यांनी केले होते. यामध्ये टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यांना करण जोहरने लाँच केले होते.



Source link

Arjun Rampal: वयाच्या ५०व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनला अर्जुन रामपाल; गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म!

0
Arjun Rampal: वयाच्या ५०व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनला अर्जुन रामपाल; गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म!


अभिनेता अर्जुन रामपालने या पोस्टला कॅप्शन देताना लिहिले की, ‘मी आणि माझ्या कुटुंबाने आज एका बाळाचे स्वागत केले आहे. आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत. डॉक्टर आणि परिचारिकांच्या अद्भुत टीमचे आभार. आमचा आनंद आता गगनात मावत नाहीये. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम आणि धन्यवाद. हॅलो वर्ल्ड, २०.०७.२०२३’



Source link