Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2911

रत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन तरुणीसह दलाल ताब्यात

0
रत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन तरुणीसह  दलाल ताब्यात


रत्नागिरीतील शाळा उद्याही राहणार बंद –

२१ ते २५ जुलै दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयांना उद्या शनिवार २२ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी आज दिला.



Source link

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 21 जुलै 2023 : ABP Majha

0
TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 21 जुलै 2023 : ABP Majha



<p>TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 21 जुलै 2023 : ABP Majha</p>



Source link

मोठी बातमी.. राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची महिनाभरात पुन्हा बदली, पाहा संपूर्ण यादी

0
मोठी बातमी.. राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची महिनाभरात पुन्हा बदली, पाहा संपूर्ण यादी


राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी –

1. राजेंद्र शंकर क्षीरसागर – मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. वर्षा ठाकूर-घुगे – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हाधिकारी लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. संजय चव्हाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4.  आयुष प्रसाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. बुवनेश्वरी एस – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची जिल्हाधिकारी, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6.  अजित कुंभार – सह आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची अकोला येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ, – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांची जिल्हाधिकारी, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. डॉ. पंकज आशिया – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. कुमार आशीर्वाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांची जिल्हाधिकारी, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. अभिनव गोयल – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांची जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
11. सौरभ कटियार – मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, अकोला यांची जिल्हाधिकारी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. तृप्ती धोडमिसे – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
13. अंकित,- प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
14. शुभम गुप्ता, – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली SDO, पो.भारमरागड, ITDP, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
15. मीनल करनवाल, – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, नंदुरबार NANDURBAR यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
16. डॉ. मैनाक घोष – प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
17. मनीषा माणिकराव आव्हाळे – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
18. सावन कुमार – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, ITDP, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
19. अनमोल सागर – सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
20. आयुषी सिंह – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, ITDP, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
21. वैष्णवी बीव – सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अकोला.
 



Source link

कोल्हापुरात तलावाकाठी खेळताना मुलांना सापडलं २४ लाखांच्या सोन्याचं घाबड, मात्र पोलिसांनी..

0
कोल्हापुरात तलावाकाठी खेळताना मुलांना सापडलं २४ लाखांच्या सोन्याचं घाबड, मात्र पोलिसांनी..


गांधीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दहा ग्रॅम वजनाची सोन्याची ४ बिस्किटे, १० ग्रामची दोन तर ५ ग्राम वजनाची दोन नाणी असा २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. गांधीनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून जप्त केलेला ऐवज ज्यांचा आहे त्यांनी ओळख पटवून ताब्यात घ्यावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.



Source link

1 ऑगस्टपासून यशवंत नाट्यमंदिर खुले होणार

0
1 ऑगस्टपासून यशवंत नाट्यमंदिर खुले होणार



तीन वर्ष नाट्य प्रयोगांसाठी बंद असलेले यशवंत नाट्यमंदिर १ ऑगस्टपासून रसिकांच्या सेवेला रुजू होत आहे. गेले दोन महिने नूतनीकरण सुरू असलेली ही वास्तू आता कलावंतांसाठी नाट्य प्रयोग सादर करण्यासाठी आणि प्रेक्षकांना नाटके पाहण्यासाठी सज्ज झाली आहे.

यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहाच्या व्यवस्थापकपदी दीपक सावंत यांची नेमणूक झाली असून नाट्य निर्मात्यांनी त्यांच्या नाट्य संस्थांच्या प्रयोगासाठी त्यांच्याकडे रितसर अर्ज सादर करावेत, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नाट्य निर्मात्यांना केले आहे .

१४ जून रोजी गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यशवंत नाट्य मंदिर नाट्यगृहाचे औपचारिक उद्घाटन केले होते. पण थोडे अंतर्गत काम बाकी असल्यामुळे नाट्यगृह प्रयोगांसाठी उपलब्ध करण्यात आले नव्हते.

आता अद्ययावत सोयीसुविधा तसेच तंत्रज्ञानाने सज्ज रंगमंच, ध्वनियंत्रणा, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नव्या वास्तूत पार्किंग स्लॉटची खास व्यवस्था करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले निवडून आल्यानंतर नवीन कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसेच विश्वस्त मंडळ यांनी यशवंतराव नाट्य संकुल लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न केले.

याच प्रयत्नामुळे ते १ ऑगस्टपासून सज्ज होत आहे. नव्याने दिमाखात सुरू झालेले हे नाट्य संकुल रसिक आणि नाट्य कलावंतांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, असे सांगतानाच रंगभूमीच्या हितासाठी जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन प्रशांत दामले यांनी दिले आहे. प्रशांत दामले यांच्या नाटकापासून यशवंत नाट्यमंदिर सुरू होणार असल्याची चर्चा आहे.




Source link

सातारा: सज्जनगडावरील गायमुख मंदिराचा भराव खचला | पुढारी

0









परळी: पुढारी वृत्तसेवा: किल्ले सज्जनगडावरील पायरी मार्गावर असणाऱ्या गायमुख मंदिराच्या पायाचा भराव अतिवृष्टीने खचला. यामुळे गायमुख मंदिराला धोका निर्माण झाला आहे.

सज्जनगडावर जात असताना पायरी मार्गावर गायमुख मंदिर लागते. मंदिरासमोरच मारुती मंदिर आहे. दोन्ही मंदिरे समोर आहेत. गडावर वाई येथील चौंडे महाराज वास्तव्यास असताना त्यांनी गोरक्षक संवर्धन तसेच गाईंचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे. या उद्देशाने सज्जनगडावर गाईचे मंदिर उभारले होते. तर त्या समोरील मारुती मंदिर हे श्रीधर स्वामी स्थापित आहे. या दोन्हीही मंदिराला फार जुना इतिहास आहे. गडावरून परळीला जात असताना बरोबर डाव्या बाजूला हे मंदिर आहे. सुरुवातीस सज्जनगडावरून परळीला जाण्यासाठी पायरी मार्गच असायचा. सर्वांना या गोमातेचे दर्शन व्हावे, या उद्देशाने हे मंदिर पायरी मार्गावर उभारले आहे.

सध्या या परिसरात पर्जन्यमान जास्त असल्याने ठिकठिकाणी भराव खचू लागला आहे. तसाच या मंदिराचा पायऱ्यांच्या वरच्या बाजूस असलेला व मंदिराच्या पाठीमागचा भराव मोठ्या प्रमाणात खचल्याने या मंदिराला धोका निर्माण झाला आहे. या मंदिराच्या सभोवतालचा परिसर तत्काळ भरून घेतला. तर मंदिराचे नुकसान थांबणार आहे. या मंदिराच्या संरक्षणासाठी गडावरील दोन्ही संस्था तसेच परळी ग्रामपंचायतीने तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी इतिहास प्रेमींतून आणि भाविकांकडून होत आहे.

हेही वाचा 











Source link

Kolhapur Panchganga Water level : पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, नृसिंहवाडी मंदिरात पाणी शिरलं

0
Kolhapur Panchganga Water level : पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, नृसिंहवाडी मंदिरात पाणी शिरलं



<p>कृष्णा-पंचगंगा संगमावर असलेल्या नृसिंहवाडी मंदिरात रात्री पाणी शिरलेय. &nbsp;त्यामुळे भाविकांना आता दक्षिनद्वार सोहळा कधी संपन्न होतो याची प्रतीक्षा आहे. &nbsp;दक्षिणद्वार सोहळ्यानंतर दर्शनानंतर दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात स्नान करण्याची मोठी परंपरा आहे. &nbsp;त्यामुळे भाविक हा दक्षिण द्वार सोहळा कधी पार पडतो याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षी साधारण जुलै च्या पहिल्या आठवड्यातच दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला होता . मात्र यावेळी पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे आतापर्यंत दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला नाही. दक्षिण द्वार सोहळा होण्यास अवघ्या काही फुटापर्यंत पाणी शिल्लक असून काही तासांमध्ये पाणी गाभार्&zwj;यात शिरून दक्षिणदार सोहळा संपन्न होऊ शकतो. या मंदीरात महापुराचे पाणी &nbsp;पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. दक्षिणदार सोहळ्यानंतर स्नान करण्यासाठी भाविकांनी देखील मोठ्या संख्येने मंदिर परिसरामध्ये गर्दी केलेली आहे.</p>



Source link

BMC : “महापालिकेतील कार्यालय ताबडतोब रिकामं करा, अन्यथा… ”, आदित्य ठाकरे व काँग्रेसचा लोढा यांना इशारा

0
BMC : “महापालिकेतील कार्यालय ताबडतोब रिकामं करा, अन्यथा… ”, आदित्य ठाकरे व काँग्रेसचा लोढा यांना इशारा


मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका लोढांना आंदण दिली का?

काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले की, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेत कसे काय कार्यालय थाटले? मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका लोढांना आंदण दिली का?? लोढा यांनी महापालिकेतील केबिन ताबडतोब रिकामी करावी, अन्य मुंबईकर तुम्हाला तेथून खेचून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत.



Source link

Pramod Prabhulkar: ‘त्या सगळ्या चर्चा केवळ अफवा!’; मधुराणीसोबतच्या नात्यावर प्रमोद प्रभुलकरांचे स्पष्टीकरण

0
Pramod Prabhulkar: ‘त्या सगळ्या चर्चा केवळ अफवा!’; मधुराणीसोबतच्या नात्यावर प्रमोद प्रभुलकरांचे स्पष्टीकरण


प्रमोद प्रभुलकर म्हणाले की, ‘मधुराणीने असं वेगळं काहीच केलेलं नाही. केवळ सोशल मीडियावर फोटो शेअर केले म्हणजेच नाते आनंदी आहे, असे होते का? फोटो नाहीत म्हणजे आमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या आहेत आणि आमचं नातं तुटणार आहे, असा निष्कर्ष कुणी कसं लावू शकतं? प्रसिद्धी माध्यमांनीही अशा बाबतीत आपल्या मर्यादा सांभाळायला हव्यात. आपल्या देशांत इतर अनेक महत्त्वाच्या घटना घडत आहेत, त्याकडे लक्ष देण्याऐवजी एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी अशाप्रकारे दाखवणं किती योग्य आहे?’, असा सवालही त्यांनी केला.



Source link

Satara News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी एकास फाशीची शिक्षा | पुढारी

0









कराड: पुढारी वृत्तसेवा: आठ वर्षाच्या मुलीवर पाशवी बलात्कार करून तिघाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी रुवले ता. पाटण येथील संतोष चंद्रू थोरात (वय 41) याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी सुनावली. पश्चिम महाराष्ट्रातील चाळीस वर्षातील हा महत्वपूर्ण निकाल मानला जात (Satara News)  आहे.

पाटण तालुक्यातील रुवले येथे 29 डिसेंबर 2021 रोजी ही घटना घडली होती. पिडीत मुलगी व तिची मैत्रिण आरोपीच्या घरासमोर खेळत होत्या. त्यावेळी तिची मैत्रिण घरी गेली व पिडीत मुलगी एकटीच खेळत असताना आरोपींने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी तिच्यावर पाशवी बलात्कार केला व तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलीचा मृतदेह नजीकच्या ओघळीतील झुडपात सुमारे 30 फूट खोल फेकून (Satara News)  दिला.

दरम्यान, पीडित मुलगी उशीरा पर्यंत घरी न आल्याने घरातल्यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची  दखल घेत गावात येऊन चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी संतोष थोरात याच्या सोबत पीडीत मुलगी गेल्याचे निष्पन्न झाले. शिवाय आरोपीबरोबर मुलीला जाताना तिची मैत्रिण, आजी, व नजीक असणाऱ्या दोन महिलांनी शेवटचे पाहिले होते हेही तपासात समोरर आले. यानुसार आरोपीला पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात सरकारपक्षाच्यावतीने एकूण 33 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडीत मुलगीची मैत्रिण, आजी, शेजारील दोन महिला, चॉकलेट दुकानदार, ग्रामसेवक यांच्या साक्षी तसेच सीसीटिव्ही फुटेज व शवविच्छेदन अहवाल महत्वपूर्ण ठरला. साक्षी, पुरावे व सरकार पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी संतोष थोरात याला बलात्कार व खूनप्रकरणी दोषी धरून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील ॲड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले.

हेही वाचा 











Source link