Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2910

सातारा : दरीत ढकलून खून करणारे तिघे जेरबंद | पुढारी

0

सातारा, पुढारी वृत्तसेवा : एकीव (ता. जावली) येथील धबधबा परिसरात एकमेकांना खुन्नस दिल्याने वादावादी होऊन टोळीने दोन मित्रांना दरीत ढकलून देत दुहेरी खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (एलसीबी) ही कारवाई केली असून संशयित सदरबझार, सातारा येथील आहेत. साहिल मेहबूब शेख (वय 18), असिफ माजिद शेख (23), निखिल राजेंद्र कोळेकर (23, तिघे रा. सदरबझार, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दि. 16 जुलै रोजी अक्षय शामराव अंबवले (28, रा. बसाप्पाचीवाडी, ता.सातारा), गणेश अंकुश फडतरे (34, रा. करंजे, सातारा) हे इतर मित्रांसोबत एकीव येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास धबधबा परिसरात आणखी काही युवकही तेथे होते. तेथे एकमेकांकडे पाहण्यावरुन दोन गटात वादावादी झाली. यावेळी अक्षय व गणेश यांना दुसर्‍या गटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यातच अक्षय व गणेश दोघे दरीच्या कठड्याजवळ आले. यावेळी काही संशयित त्या दोघांना दरीत ढकलून दे, असे म्हणत चेतावत होते. अवघ्या काही क्षणात संशयित टोळक्याने दोन्ही युवकांना उंचावरुन खाली फेकून दिले. सर्वांदेखत ही घटना घडल्यानंतर तेथे पळापळ झाली.

या घटनेची माहिती सातार्‍यात उशीरा पसरल्यानंतर बचाव पथक व पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे मृतदेह वर काढण्यात आले. दि. 17 जुलै रोजी अनोळखी युवकांविरुध्द मेढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. मेढा व एलसीबी गेली तीन दिवस सातारा शहरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांना संशयितांबाबत माहिती मिळाली. तोपर्यंत संशयित जिल्ह्यातून पसार झाले होते. पोलिसांनी संशयितांना शोधून अखेर त्यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. एलसीबीने त्यानंतर संशयितांचा ताबा मेढा पोलिसांकडे दिला.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, डीवायएसपी बाळासाहेब भालचिम, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष तासगांवकर, रविंद्र भोरे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, राकेश खांडके, हसन तडवी, अमित झेंडे, अजय जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, मनोज जाधव, मोहन पवार, प्रविण कांबळे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, विकास गंगावणे, दत्तात्रय शिंदे, संभाजी बाबर, अभिजीत वाघमाळे, प्रदिप उदागे, निलेश देशमुख, गणेश घोरपडे, स्नेहल सोमदे, श्रावण राठोड, प्रेमजित शिर्के, प्रशांत ठोंबरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Source link

दोन भिन्न व्यक्तींचा एका अनोख्या U turn पर्यंतचा प्रवास, ‘गुड वाईब्स ऑन्ली’चा ट्रेलर प्रदर्शित

0
दोन भिन्न व्यक्तींचा एका अनोख्या U turn पर्यंतचा प्रवास, ‘गुड वाईब्स ऑन्ली’चा ट्रेलर प्रदर्शित

Good Vibes only Trailer: येत्या २७ जुलैपासून ‘गुड वाईब्स ॲान्ली’ प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहाता येणार आहे.

Source link

मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगणार ‘फौज’ द मराठा बटालियन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगणार ‘फौज’ द मराठा बटालियन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘फौज’ हा शब्द ऐकताच अंगावर शहारा येतो. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान निश्चितच अभिमानास्पद आहे. या फौजेमुळेच आपण इथे सुरक्षित असतो. त्यांची सीमेवरील हिच शौर्यगाथा सांगणारा ‘फौज – द मराठा बटालियन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होईल.

Source link

Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पाऊस! रत्नागिरी, पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियातील शाळांना आज सुट्टी

0
Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पाऊस! रत्नागिरी, पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियातील शाळांना आज सुट्टी

आपत्कालीन परिस्थिती खबरदरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात देखील रत्नागिरी, पालघर, वसई, विरार, रायगड येथील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मोठी दुर्घटना होऊ नये यामुळे सर्व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Source link

घरात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह | पुढारी

0

कराड, पुढारी वृत्तसेवा : सणबूर (ता. पाटण) येथे सेवानिवृत्त शिक्षकासह त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा अशा चौघांचे राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे कारण अस्पष्ट असले तरी आत्महत्या की घातपात? याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सणबूर येथील सेवानिवृत्त शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव (वय 75), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय 65) मुलगा संतोष आनंदा जाधव (वय 45) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंद्रूळ कोळे, ता. पाटण) अशी मृतदेह आढळलेल्या चौघांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेले आनंदा जाधव हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. श्वास घेताना त्रास होऊ नये यासाठी सणबूर येथे राहत्या घरी त्यांना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली होती. तसेच लाईट नसल्याने जनरेटरही आणला होता. आजारी आनंदा जाधव यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनंदा, मुलगा व मुलगी असे चौघे जण गुरूवारी रात्री घरात होते. विवाहित मुलगी पुष्पलता धस यांच्या मुलाने गुरुवारी रात्री फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा केली होती.

शुक्रवारी सकाळी त्यांनी पुन्हा मोबाईलवर फोन करून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही मोबाईल उचलला नाही. वारंवार मोबाईल करूनही कोणीही प्रतिसाद देत नसल्याने पुष्पलता यांच्या मंद्रूळमधील घरातील व्यक्तींनी सणबूरमध्ये फोन करून शेजारील व्यक्तींना जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर काही लोक घरी गेले असता त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून दरवाजा बंद होता. त्यानंतर दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केल्यानंतर चौघांचेही मृतदेह आढळून आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने या घटनेची माहिती ढेबेवाडी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात? याबाबत तर्कविर्तक लढवले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेचे निश्चित कारण पुढे येईल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

पोलिस अधीक्षकांकडून पाहणी व सूचना

सणबूर येथील घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांना तपासाबाबत समीर शेख यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.

Source link

Nagraj Manjule: बाप-लेकाची हलकीफुलकी कहाणी, नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा ‘बापल्योक’

0
Nagraj Manjule: बाप-लेकाची हलकीफुलकी कहाणी, नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा ‘बापल्योक’

Nagraj Manjule New Movie Baplyok: २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘बापल्योक’ या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

Source link

Irshalgad Landslide :Uddhav Thackeray इर्शाळवाडीला भेट देणार,ग्रामस्थांचं सांत्वन करून धीर देणार

0
Irshalgad Landslide :Uddhav Thackeray इर्शाळवाडीला भेट देणार,ग्रामस्थांचं सांत्वन करून  धीर देणार

उद्धव ठाकरे आज इर्शाळवाडीला भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांची जवळच असलेल्या पंचायत मंदिरात भेट घेणार आहेत. दुर्घटना घडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी घटनास्थळाला भेट दिली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरे भेट देणार आहे. दरम्यान, या भेटीत उद्धव ठाकरे ग्रामस्थांना सांत्वन करून त्यांना धीर देणार आहेत.

Source link

राज्यभर आज मुसळधार, पुण्याला रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट, पाहा पावसाचा अंदाज

0
राज्यभर आज मुसळधार, पुण्याला रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट, पाहा पावसाचा अंदाज

Rain Update In Maharashtra In Marathi  : मागील काही दिवसांपासून राज्यात धुवांधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेत तर काही ठिकाणी धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. आजही  राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज कुठे कसा पाऊस, पाहा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

कोकण :

पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी म्हणजेच 204 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. पालघरला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

ठाण्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, ज्यात ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पावसाचा इशारा आहे. ठाण्याला ऑरेंज  अलर्ट देण्यात आलाय.

मुंबईत काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पाऊस होऊ शकेल – आॅरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे. घाट माथ्यावर १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे.

रत्नागिरी – काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ज्यात ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पाऊस होऊ शकेल. हवामान विभागान ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे.

सिंधुदुर्ग – काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा – यलो अलर्ट

मध्य महाराष्ट्र :

पुणे – घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात २०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे. पुण्याला हवामान विभागाने  रेड अलर्ट जारी केला आहे.

साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे.

भीमाशंकर, लोणावळा, खंडाळा, कसारा, इगतपुरी, अंधारबन, ताम्हिणी, कुंडेलिका, भोर  या घाट परिसराच पावसाची शक्यता.
महत्त्वाचे :

संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी सावधगिरीचा इशारा वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दरडी कोसळ्याची शक्यता  आहे. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात फ्लॅश फ्लडचा अंदाज  आहे.

Source link

Raigad Irsalwadi Landslide Live Updates : रायगडमधील इरशाळवाडीवर दरड कोसळली, चार जणांचा मृत्यू

0
Raigad Irsalwadi Landslide Live Updates : रायगडमधील इरशाळवाडीवर दरड कोसळली, चार जणांचा मृत्यू

Raigad Irsalwadi Landslide Live Updates : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalwadi) (इर्शाळगड) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

गावात 50 ते 60 घरांची वस्ती

या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300  मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही लँड्स लाईडची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यामधील इरसालगड इथं ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. आता पर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे.यात 4 जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाली आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Source link

मैत्री जिंदगी के साथ भी.. दोन मित्रांचा अपघाती मृत्यू तर तिसऱ्याने बातमी ऐकून धक्क्याने सोडला जीव

0
मैत्री जिंदगी के साथ भी.. दोन मित्रांचा अपघाती मृत्यू तर तिसऱ्याने बातमी ऐकून धक्क्याने सोडला जीव

जगात सर्वात पवित्र नाते हे रक्ताचं मानलं जातं मात्र कधी कधी रक्ताच्या नात्याहूनही मैत्रीचं नातंश्रेष्ठ ठरतं. याची आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत. मैत्री म्हणजे ना कोणती औपचारिकता, ना नियम अन् ना कुठली बंधनं.  त्यामुळे प्रत्येक सुख  दु:खात धावून येणार मित्र हा नेहमी वणव्यामध्ये गारव्या सारखाच वाटतो. या मैत्रीची प्रचिती देणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. दोन मित्रांच्या अपघाती निधनाचे वृत्त ऐकताच तिसऱ्यानेही आपला प्राण सोडला आहे.

Source link