Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2909

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे लेप्टोच्या संसर्गाचा धोका; पालिकेने दिला ‘हा’ इशारा

0
Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे लेप्टोच्या संसर्गाचा धोका; पालिकेने दिला ‘हा’ इशारा



Mumbai Leptospirosis issue: मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावे लागत आहे. दरम्यान, या पाण्यामुळे लेप्टोचा धोका वाढला असून पुढील ७२ तासांत काळजी घ्यावी लागणार आहे.



Source link

Urfi Javed: फ्लाइटमध्ये काही मुलांनी दारूच्या नशेत … उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा

0
Urfi Javed: फ्लाइटमध्ये काही मुलांनी दारूच्या नशेत … उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा


उर्फी २० जुलै रोजी मुंबई ते गोवा विमानाने प्रवास करत होती. त्यावेळी घडलेला प्रकार तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत सांगितला आहे. ‘मी काल मुंबईहून गोव्याला जात असताना मला शोषणाला सामोरे जावे लागले. व्हिडीओमध्ये ही मुले घाणेरडे बोलत होते आणि विनयभंग करत होते. ते माझे नाव घेत होते. मी त्यांना अडवले तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की, त्याचे मित्र नशेत आहेत. मद्यधुंद असल्यामुळे ते असे आहेत. पण दारू पिऊन स्त्रीशी गैरवर्तन करण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही. मी एक सार्वजनिक व्यक्ती आहे, सार्वजनिक मालमत्ता नाही’ असे उर्फीने म्हटले आहे.



Source link

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधानांची भेट घेणार, रवाना होण्यापूर्वी शिंदे म्हणाले…

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधानांची भेट घेणार, रवाना होण्यापूर्वी शिंदे म्हणाले…


CM-PM Meet : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी निघाले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी असे सर्वजण उपस्थित आहेत. भेटीला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटीविषयी विचारलं असता ते म्हणाले की, “ही सदिच्छा भेट आहे. आल्यावर भेटतो तुम्हाला.”

अधिवेशनाच्या काळात पंतप्रधान मोदींसोबत खासदारांच्या कौटुंबिक भेटी होत असतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत.  पंतप्रधान मोदी यांच्या 7 जनकल्याण इथल्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. तर संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट एकनाथ शिंदे घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक होईल.

राजकीय गदारोळात मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीची चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (21 जुलै) दहाच्या सुमारास अचानक मुंबईहून दिल्लीत दाखल झाले. आठवड्याभरातील मुख्यमंत्र्यांची ही दुसरी दिल्लीवारी आहे. NDA बैठकीपाठोपाठ तीन दिवसात एकनाथ शिंदे पुन्हा पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही. ही कौटुंबिक भेट आहे. त्यामुळे राजकीय गदारोळात मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीची सध्या चर्चा रंगली आहे.

एनडीए बैठकीसाठी एकनाथ शिंदे 18 जुलैला दिल्लीत

याआधी मंगळवारी 18 जुलै रोजी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. त्यावेळी भाजपने आयोजित केलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी ते दिल्लीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दुपारी एकनाथ शिंदे अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

अमोल मिटकरी यांचं ट्वीटने चर्चांना उधाण

दरम्यान एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. अजित पवारांची राजकारणात काम करण्याची स्टाईल, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कार्यशैली त्यातून दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओला ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने खास अंदाजात अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

VIDOE : Delhi Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब दिल्लीत, आठवड्याभरात दुसरा दिल्ली दौरा ABP Majha



Source link

Bigg Boss OTT 2: जाद हदीदच्या त्या कृत्यामुळे एल्विश, मनीषा आणि फुकराने केले डोळे बंद

0
Bigg Boss OTT 2: जाद हदीदच्या त्या कृत्यामुळे एल्विश, मनीषा आणि फुकराने केले डोळे बंद


जाद हा भारतीय स्पर्धक नाही. त्यामुळे त्याला घरातील काही गोष्टी समजत नाहीते. मात्र, घरात हिंदीमध्ये बोलण्याची ताकीद त्याला बिग बॉसने दिली आहे. त्याचे पूजा भट्ट, जिया शंकर यांच्याशी जवळचे नाते आहे.



Source link

Oppenheimer: सेक्स करताना गीता पठण? ‘ओपेनहायमर’मधील सीनवर जोरदार टीका

0
Oppenheimer: सेक्स करताना गीता पठण? ‘ओपेनहायमर’मधील सीनवर जोरदार टीका



Oppenheimer Controversy: नेटकऱ्यांनी ओपेनहायमर या हॉलिवूड चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत भारतीय सेंसॉर बोर्डावर प्रश्न उपस्थित केला आहे.



Source link

Shiv Thakare :एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबद्दल शिव ठाकरेचं मोठं वक्तव्य, ‘तिच्या डोळ्यात अश्रू…’

0
Shiv Thakare :एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबद्दल शिव ठाकरेचं मोठं वक्तव्य, ‘तिच्या डोळ्यात अश्रू…’


शिवने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्या एक्स-गर्लफ्रेंड वीणाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “उगाच कोणत्याही गोष्टी होत नाहीत. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल जाहीरपणे सोशल मीडियावर बोलता, त्यानंतर उगाच होत नाही. कारण तुम्ही भूतकाळात काही गोष्टी केल्या असतात. तुमच्यासाठी तो बाँड, ते नाते खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे नाते संपल्यानंतरही समोरच्याला इजा न होऊ देता तुम्ही ते कसे जपता हे महत्त्वाचे आहे, कारण तो बाँड आणि नाते तुमचे होते, तुमच्या कुटुंबाचे नाही. काही गोष्टी आमच्या दोघांनाच माहीत होत्या, आमच्या कुटुंबाला नाही आणि लोकांनाही नाही. त्या गोष्टी मी जशा हाताळायला हव्या होत्या तशा मी हाताळल्या.”



Source link

Manyata Dutt: “या बाईने माझ्या भावाला फसवलं”, संजय दत्तच्या बहिणीने केले होते मान्यतावर आरोप

0
Manyata Dutt: “या बाईने माझ्या भावाला फसवलं”, संजय दत्तच्या बहिणीने केले होते मान्यतावर आरोप


संजय दत्तला जेव्हा हे कळाले तेव्हा त्याला प्रचंड राग आला होता. त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘प्रिया कुटुंबातील मोठी सदस्य असल्याने त्याने आणि मान्यताने तिला माफ केले आहे. मान्यता ही नर्गिस आणि सुनील दत्त यांची सूनच आहे, यात काही शंका नाही.’



Source link

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला | पुढारी

0









पाटण, पुढारी वृत्तसेवा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद 29 हजार 18 क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा 41.60 टीएमसी इतका झाला आहे. शुक्रवार सायंकाळपर्यंतच्या 24 तासात धरणातील पाणी साठ्यात 2.51 टीएमसीने वाढ झाली आहे. तर पाणी उंचीत 4 फूट 1 इंच वाढ झाली आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात एकूण क्षमतेच्या 39.52 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 36.60 टीएमसी इतका तर धरणाची जळपातळी 639.039 मीटर झाली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच ते शुक्रवारी सायंकाळी पाच या 24 तासात कोयना येथे 51 मिलिमीटर तर आजवर 1 हजार 655 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे 116 मिलीमीटर तर आजवर 2 हजार 378 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरमध्ये 86 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आजवर एकूण 2 हजार 353 मिलिमीटर पाऊस झाला आहे.











Source link

कराड विमानतळाच्या विस्ताराबाबत तीन महिन्यांत बैठक | पुढारी

0









कराड, पुढारी वृत्तसेवा : कराड विमानतळ विस्ताराबाबत आगामी तीन महिन्यात उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात दिली आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी ग्रामस्थांचा विरोध नाही. त्यामुळे निधी मिळणे आवश्यक असून राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. या प्रश्नास उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली आहे.

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले तालुका पातळीवरील विमानतळ स्व. यशवंतराव चव्हाण यांनी उभारले होते. आपल्या मुख्यमंत्री काळात कराड विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर निधीअभावी प्रलंबित असणारा तो प्रश्न लवकर मार्गी लागावा, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये हेलिपॅड करण्यासाठी जागा निश्चितीचे आदेश दिलेले आहेत. हे जर खरे असेल तर शासनाने याबाबत काही धोरण ठरवलेले आहे का? असा राज्याच्या दृष्टीने महत्वाचा तसेच मतदारसंघातील कराड विमानतळाचा प्रश्न विधानसभेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारले.

आ. चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या विमानतळाबाबत जो प्रश्न मांडलेला आहे, त्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय मिटिंग येत्या तीन महिन्यात घेतली जाईल. कराड विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकर्‍यांच्या काही अडचणी नसतील, तर निधीची कोणतीही कमी होणार नाही. कराडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे. त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला, तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो.

पाटण तालुक्यातील मागील पूर काळात विमानतळ आसपास नसल्याने त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये विमानतळच आसपास नसल्याने कनेक्टिव्हिटी त्या भागात होत नव्हती. कोल्हापूर विमानतळावर उतरता येत नव्हतं, कारण तिथं पाण्याचा वेढा होता. त्यामुळे त्याचा सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेच आहे. त्यामुळे एका नोडल एजन्सीच्या अंतर्गत आपणाला आणावे लागेल तशी एक नोडल एजेन्सी आपण तयार करू आणि पुढच्या तीन महिन्यात याचा एक प्लॅन आपण तयार करू, असेही उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.











Source link

मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी 5 कोटी : आ. महेश शिंदे | पुढारी

0









कोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव मतदारसंघातील मागासवर्गीय समाजघटकांच्या विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सामाजिक न्यायमंत्री ना. सुरेश खाडे यांनी 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सहकार्य केले असल्याचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले.

कोरेगाव तालुक्यासाठी 1 कोटी 95 लाख रुपये मंजूर झाले असून, त्यामध्ये सर्वाधिक सातारारोडसाठी 1 कोटी 10 लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. या निधीतून गावातील प्रमुख चौकापासून ते बौध्द वस्तीकडे जाणारा रस्ता, बंदिस्त गटारे बांधली जाणार आहे. तसेच रस्ता ट्रिमिक्स व काँक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी एकंबे व शिरंबेसाठी प्रत्येकी 20 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. याचबरोबर चिमणगाव, भोसे व अंबवडे संमत कोरेगाव येथील बौध्द वस्तीसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खटाव तालुक्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये मंजूर झाले असून खटाव गावासाठी 80 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर बुधसाठी 30 आणि वेटणेसाठी 10 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

सातारा तालुक्यासाठी 1 कोटी 95 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये संभाजीनगरमधील वॉर्ड क्रमांक 4 व 5 मधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. खेडसाठी 20 लाख, महागावसाठी 20 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. या तिन्ही तालुक्यातील 14 कामांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात तातडीने 30 टक्केनिधीची रक्कम म्हणून दीड कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे.











Source link