Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2900

Pooja Bhatt: पूजा भट्टनं ‘बिग बॉस ओटीटी २’चं घर सोडलं? नेमकं कारण तरी काय?

0
Pooja Bhatt: पूजा भट्टनं ‘बिग बॉस ओटीटी २’चं घर सोडलं? नेमकं कारण तरी काय?


पूजा भट्ट वैद्यकीय कारणांमुळे बाहेर जाणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, ती आता जरी या शोमधून बाहेर पडत असली तरी, वैद्यकीय चाचणीनंतर घरात परतणार असल्याचीही चर्चा आहे. आता पूजाची खरोखरच शोमध्ये री-एंट्री होते की, या शोमधून ती कायमची बाहेर पडते याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, पूजा भट्ट या घरातून बाहेर गेल्याच्या वृत्ताची निर्मात्यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही.



Source link

सातारा : कोयनेत 24 तासांत 5.18 टीएमसी पाण्याची आवक | पुढारी

0









गणेशचंद्र पिसाळ

पाटण :  दमदार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता धरणातील पाणीसाठा 53.69 टीएमसी इतका झाला होता. हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 51.56 टीएमसी पाण्याची गरज आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे सोमवार सायंकाळपर्यंतच्या 24 तासांत धरणात तब्बल 5.18 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

1 जूनपासून 15 जुलैपर्यंतच्या 45 दिवसांत धरणात केवळ 15.30 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. मात्र त्यानंतर केवळ नऊ दिवसातच धरणात तब्बल 43.62 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणात सोमवार सायंकाळपर्यंत एकूण 53.69 टीएमसी उपलब्ध पाणीसाठ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 48.69 टीएमसी इतका झाला होता. तर रविवार सायंकाळी पाच वाजल्यापासून सोमवार सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या 24 तासांत धरणात तब्बल 5.18 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्याचवेळी धरणात प्रतिसेकंद 59 हजार 977 क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. सोमवार सायंकाळपर्यंतच्या 24 तासात 151 मिलीमीटर, नवजा येथे 191 मिलिमीटर तर महाबळेश्वरमध्ये 156 मिलिमीटर पाऊस झाला होता.

गेल्या काही वर्षांत बदललेले निसर्ग चक्र लक्षात घेता साधारणतः जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यातच अपेक्षित व दमदार पावसाला सुरुवात होते आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरते असे दिसून येते. धरण भरल्यानंतर अथवा धरणातील पाणी साठवण क्षमता आणि पडणारा पाऊस पाहून मोठ्या प्रमाणावर कोयना नदीत विनावापर पाणी सोडावे लागते आणि त्यामुळे महापूर येतो. त्यामुळे यावर्षीही तशीच परिस्थिती उद्भवण्याच्या शक्यता गृहीत धरूनच धरण व्यवस्थापनाकडूनही उपाययोजना व नियोजन सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

मागील वर्षीपेक्षा 9 टीएमसी पाणी कमी

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी 100 मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. धरणातील पाणीसाठ्याचा विचार करता मागील वर्षीपेक्षा यंदा 9 टीएमसी पाणी कमी आहे.

पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू…

धरणाच्या पायथा वीजगृहातील 20 मेगॅवॅट क्षमतेचे एक जनित्र सुरू करून वीज निर्मितीनंतर कोयना नदीत प्रतिसेकंद 1 हजार 50 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कराडसह पाटण तालुक्यात पडणारा पाऊस आणि पायथा वीजगृहातून सुरू करण्यात आलेला विसर्ग यामुळेे कोयना नदीसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळेच नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : 











Source link

Barbie: ‘बार्बी’ चित्रपट पाहून संतापली अभिनेत्री जुही परमार; म्हणाली ’१० मिनिटाला मी मुलीला घेऊन…’

0
Barbie: ‘बार्बी’ चित्रपट पाहून संतापली अभिनेत्री जुही परमार; म्हणाली ’१० मिनिटाला मी मुलीला घेऊन…’


‘बार्बी’ या चित्रपटात अभिनेत्री मार्गोट रॉबीने बार्बीची भूमिका केली आहे. सिमू लिऊ, केट मॅककिनन, इसा रे, रिया पर्लमन आणि विल फेरेल यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या संपूर्ण चित्रपटात तुम्हाला सस्पेन्स, उत्तम संवाद आणि सुंदर लोकेशन्स पाहायला मिळतील. हा चित्रपट बार्बी लँड आणि वास्तविक जग यांच्यामध्ये अडकलेल्या बार्बीची कथा आहे.



Source link

TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 25 जुलै 2022 : ABP Majha

0
TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 25 जुलै 2022 : ABP Majha



<p>TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 25 जुलै 2022 : ABP Majha</p>



Source link

KBC 15: पुन्हा एकदा रंगणार कोटींचा खेळ! ‘या’ दिवशीपासून सुरू होणार ‘कौन बनेगा करोडपती’चं नवं पर्व!

0
KBC 15: पुन्हा एकदा रंगणार कोटींचा खेळ! ‘या’ दिवशीपासून सुरू होणार ‘कौन बनेगा करोडपती’चं नवं पर्व!


Kaun Banega Crorepati Season 15: ‘यंदा केबीसीमध्ये सर्व काही बदलेल’ असे वचन महानायक अमिताभ बच्चन यांनी आधीच प्रेक्षकांना दिले आहे. त्यामुळे या शोच्या नव्या सीझनसाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.



Source link

Jawan: शाहरुखसोबत भिडणार विजय सेतुपती! ‘जवान’च्या व्हिलनचा जबरदस्त लूक पाहिलात का?

0
Jawan: शाहरुखसोबत भिडणार विजय सेतुपती! ‘जवान’च्या व्हिलनचा जबरदस्त लूक पाहिलात का?


‘जवान’मध्ये विजय सेतुपतीच्या एन्ट्रीमुळे चित्रपट रसिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा विजय सेतुपती या चित्रपटात असल्याने एक नवा थरार पाहायला मिळणार आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित, अॅटली दिग्दर्शित, गौरी खान निर्मित ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



Source link

जयंत पाटलांची तटकरेंना मिठी, आव्हाड-फडणवीसांची गुजगोष्ट; कार्यकर्त्यांनो शहाणे व्हा….

0
जयंत पाटलांची तटकरेंना मिठी, आव्हाड-फडणवीसांची गुजगोष्ट; कार्यकर्त्यांनो शहाणे व्हा….


Maharashtra Monsoon Session : महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही इतर राज्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहे आणि त्याची अनेकदा प्रचिती येते. उत्तरेकडील राज्यांत किंवा दक्षिणेकडील राज्यांत राजकीय विरोधकांचे वैर हे इतक्या टोकाला जातं की ते एकमेकांचा जीवही घ्यायला मागेपुढे बघत नाहीत. पण महाराष्ट्र त्याला अपवाद आहे आणि आताही ते दिसून आलं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि सुनील तटकरे एकमेकांच्या गळ्यात पडले आणि दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि फडणवीस हसायला लागले.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भिडत असतात. मात्र सभागृहाबाहेर आपसातले संबंधही जपत असतात. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आज जयंत पाटील आणि सुनील तटकरे पहिल्यांदाच चर्चा करताना आढळून आले. विधान भवनातील इमारतीत एका कोपऱ्यात दोघांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. हे दोघेही हसत-हसत चर्चेत रंगले होते. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, आमची मैत्री ही राजकारणापुढील आहे. माझे महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांमध्ये चांगले मित्र आहेत. 

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुरूवातीला दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर टीका सुरू झाली. त्यानंतर मात्र दोन्ही बाजूंनी सबुरीची भूमिका घेतल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाने दोन वेळा शरद पवारांची भेट घेऊन चर्चेची दारं खुली असल्याचे संकेत दिले. 

आव्हाडांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगितलं… 

दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर राजकीय विरोधक. राजकारणापलिकडे जाऊन यांचा विचारधारेचाही विरोध पहायला मिळतोय. आज अधिवेशनाच्या दरम्यान हे दोन नेते एकमेकांसमोर आले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि फडणवीस जोरजोरात हसायला लागले. याची भेटगाठ अवघ्या काही सेकंदाची होती, पण हे चित्र महाराष्ट्राला सुखावणारं होतं, राजकारणापलिकडे जावून महाराष्ट्राची संस्कृती जपणारं होतं. 

कार्यकर्त्यांचं काय? 

राजकारणात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत असं सांगत हे नेते सोयीनुसार एकत्र येतात आणि सोयीनुसार बाजूला होतात. पण बारीकसारीक गोष्टीवरून, नेत्याच्या आदेशावरून एकमेकांची टाळकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय असा सवाल पडतो. 

नेत्यांनी आपली राजकीय संस्कृती जपलीय. ते कुठेही गेले तरी, कितीही राजकीय टीका केली तरी समोर आल्यानंतर एकमेकांना आदर देणं, चर्चा कायम ठेवणं किंवा परतीचे मार्ग खुले ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आणि त्याची प्रचिती या नेत्यांना रोज येते. त्यामुळे त्यांनी संयम ठेवला. पण कार्यकर्त्यांचं काय? 

आपल्या नेत्याने पक्ष बदलला तर कार्यकर्त्यांचा उत्साह हा बघण्यासारखा असतो. तो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी आपले साहेब कसे बरोबर आहेत याची गणितं सांगत बसतो. पण हे करताना नेत्याला होणारा विरोध किंवा त्याच्यावर होणारी टीका याला सहन होत नाही. त्यामुळे हा कार्यकर्ता कधी दगड उचलेल आणि विरोधक कार्यकर्त्यांचं डोकं फोडेल याचा काही नेम नाही. आपल्या नेत्याने एखाद्याला विरोध केला म्हणजे विरोधकाच्या ऑफिसच्या काचा फुटल्याच म्हणून समजा… असाच प्रकार गावागावात दिसतोय. 

महाराष्ट्राची वरच्या स्तरावरील राजकीय संस्कृती पाहता तिकडे उद्या ठाकरे गट आणि शिंदे गटही एकत्र येतील… राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मग या नेत्यांसाठी रस्त्यावर एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय होणार? यांच्या मतभेदाचा ओरखडा ओढलेला नसतो…. यांच्या मतभेदाची दरी निर्माण झालेली असते, ती कशी बुजणार? 

त्यामुळे… कार्यकर्त्यांनो शहाणे व्हा… तुमच्या नेत्यांप्रमाणे डिप्लोमॅटिक व्हा आणि राजकारण करा. नेत्याने पक्ष बदलला म्हणून एकमेकांच्या उरावर बसू नका… संवादाची आणि चर्चेची दारं कायम खुली ठेवा. नाहीतर सध्याचं राजकारणात तुम्ही बाद झालाच म्हणून समजा. 

 

 



Source link

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर पाहिजे; शेतकरी महिलेच्या अनोख्या मागणीची शिरूरमध्ये सर्वत्र चर्चा, कारण काय?

0
शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर पाहिजे; शेतकरी महिलेच्या अनोख्या मागणीची शिरूरमध्ये सर्वत्र चर्चा, कारण काय?


एकदा मंडल अधिकारी भेटले मात्र मी नवीन बदली होऊन आलोय, मला वेळ मिळाला की येऊन बघतो अशी कारणे देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. हिंगे यांच्या शेतामध्ये पिक काढणीला आलेले असतानाही त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे तयार शेतमाल बाहेर काढायचा कसा असा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळे नाईलाजाने शेतकरी लताबाई हिंगे शेतमाल बाहेर काढण्यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी त्यांनी शिरूर तहसिदार यांचेकडे शासकीय अनुदान किंवा आर्थिक मदत मिळावी असा अर्ज केला आहे. दरम्यान या मागणीची सर्वत्र चर्चा होत आहे. 



Source link

Latur Rain : दीड तासात 60 मिमी पाऊस… . महाराष्ट्र-कर्नाटकाला जोडणारा पर्यायी पूल गेला वाहून

0
Latur Rain : दीड तासात 60 मिमी पाऊस… . महाराष्ट्र-कर्नाटकाला जोडणारा पर्यायी पूल गेला वाहून


Maharashtra Rain Update : लातूरसह जिल्ह्याभरात आज पावसाची तुफान हजेरी लागल्याचं दिसून आलं. औराद शहाजानी परिसरात संध्याकाळी जोरदार पाऊस पडला असून दीड तासात 60 मिमी पावसाची नोंद झाली. लातूर-जहिराबाद महामार्गावरील पूल वाहून गेल्याने तीन तासांसाठी वाहतूक बंद होती. अनेक गावांना जोडणाऱ्या छोट्या मोठ्या पुलावरूनही पाणी आल्याने तीन ते चार तास वाहतूक ठप्प होती.

लातूर जिल्ह्यात संध्याकाळच्या वेळेला अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती. लातूर, औसा, लामजना, किल्लारी, निलंगा या भागात पावसाने पंधरा ते वीस मिनिट जोरदार हजेरी लावली होती. मात्र निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी ,तगरखेडा, हालसी, सावरी, बोरसुरी ,माने, जवळगा सारख्या भागात तुफान पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपले आहे. दीड तासात तब्बल 60 मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे या भागातील चित्र अक्षरशः पालटून गेले होते.

लातूर- जहिराबाद महामार्गावरील शेजारील कर्नाटक हद्दीतील जामखंडी येथील पर्यायी पूल वाहून गेला. त्यासोबतच औराद शहाजनी परिसरातील तगरखेडा, हालसी, सावरी, बोरसुरी गावांतील ओढ्याच्या पुलावर पाणी आल्याने या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले झाले होते. औराद शहाजानी ,तगरखेडा, हालसी, सावरी, बोरसुरी या भागातील नागरिकांनी शेतकरी हे वाहतूक बंद असल्याने अडकून पडले होते.

कमी कालावधीत झालेल्या तुफान पावसामुळे पुलावरून पाणी जात होतं. पुलावरून पाणी जात असल्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली. तीन तास या भागात वाहतूक ठप्प होती. कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे या भागातील ओढ्यांना नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं. तीन तासानंतर पाणी ओसरलं आणि वाहतूक सुरळीत झाली. शेतावरून संध्याकाळी घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांना पुलावरून पाणी गेल्यामुळे तब्बल तीन साडेतीन तास घरी जाता आलं नाही.

ही बातमी वाचा: 



Source link

Rain Alert : मुंबई-पुण्यासह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोल्हापूरकरांच्या मनात धडकी

0
Rain Alert : मुंबई-पुण्यासह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोल्हापूरकरांच्या मनात धडकी


हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सातारा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई, संभाजीनगर, जालना,परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



Source link