
कॉलेजियमने म्हटले की, सर्व गोष्टींचा विचार करून कॉलेजियमने निर्णय घेतला आहे की, जस्टिस धीरज सिंह ठाकूर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात चीफ जस्टिस पदी नियुक्त होण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत.

कॉलेजियमने म्हटले की, सर्व गोष्टींचा विचार करून कॉलेजियमने निर्णय घेतला आहे की, जस्टिस धीरज सिंह ठाकूर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात चीफ जस्टिस पदी नियुक्त होण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत.

Mumbai Potholes : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील पूर्व व पश्चिम असे दोन्ही द्रुतगती महामार्ग आणि इतरही सर्व रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर पावसाळ्यात होणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी अनेक उपाययोजना महानगरपालिकेकडून करण्यात आल्या आहेत. रस्ते देखभाल करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने पथक आणि कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षात 1 एप्रिल ते 24 जुलै 2023 या कालावधीत महानगरपालिकेने विविध रस्त्यांवर मिळून सुमारे 6 हजार 45 खड्डे बुजवले असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे 11 हजार 38 चौरस मीटर इतके असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने पावसाळापूर्व कामांचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेच्या सर्व विभागात तातडीने खड्डे भरण्यासाठीच्या उपाययोजना अतिशय चोखपणे पार पाडण्यात येत आहेत.
मुंबईतील द्रुतगती महामार्गासह सर्व रस्त्यांवर खड्डे आढळल्यास ते तातडीने भरण्यासाठी संपूर्ण मुंबईत यंत्रणा कार्यरत आहे. मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेणारा पाहणी दौरा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी वेलरासू यांनी काल (रविवार, दिनांक 23 जुलै 2023) केला. मुंबई महानगरात रस्ते देखभाल व दुरूस्तीसाठी झालेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच आवश्यक त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशदेखील दिले आहेत.
पश्चिम उपनगरात दक्षिण दिशेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हे अतिशय उत्तम प्रकारे केले आहे. मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्याच्या निमित्ताने यंदा झालेल्या कामांपैकी हे एक उत्तमरितीने झालेले असे काम आहे. काही ठिकाणी रस्ता दुभाजकांच्या ठिकाणी पाणी निचरा होण्याचा विषय असला तरीही रस्त्यांवरील खड्डे मात्र उत्तमरित्या बुजविण्यात आले आहेत. संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्गावर पावसाळापूर्व रस्ता दुरूस्तीचे झालेले काम कौतुकास्पद आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी गोदरेज परिसरात काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे तातडीने पूर्ण करण्यात यावे, त्याचप्रमाणे पूर्व उन्नत द्रुतगती महामार्गावरही काही ठिकाणी आढळलेले खड्डे वाहतुकीला अडथळा न होता लवकरात लवकर भरावेत, अशी सूचनाही या दौऱ्यात वेलरासू यांनी रस्ते विभागाला केली.
मुंबई महानगरात सुमारे 2050 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी एक हजार 58 किलोमीटर डांबरी तर 992 किलोमीटरचे काँक्रिट रस्ते आहेत. डांबराच्या रस्त्या (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे, ही नेहमीची बाब आहे. ही बाब लक्षात घेता, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने दरवर्षी विविध उपाययोजना करण्यात येतात.
मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डे शोधून ते भरण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक तयार केले आहेत. या पथकाद्वारे खड्डे शोधून ते भरण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येते. खड्डे विषयक तक्रार प्राप्त झाल्यानंतर तो भरण्यासाठी 48 तासांची मुदत असली तरी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाद्वारे 24 तासाच्या आतमध्ये खड्डे भरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ही पथकं समन्वय साधतात. रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे काम महानगरपालिका करत असते. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित कोल्ड मिक्स महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो. आतापर्यंत 24 प्रशासकीय विभागांना मिळून सुमारे 512 मेट्रिक टन ड्राय कोल्ड मिक्स पुरवण्यात आले आहे.
रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा आमंत्रित करून महानगरपालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट द्विवार्षिक स्वरुपाचे आहेत. संबंधित कंत्राटदारांकडून त्यांना नेमून दिलेल्या रस्त्यावरील खड्डे तातडीने भरले जातील, यासाठी देखील महानगरपालिकेने नेमलेली पथके लक्ष ठेवून आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांविषयक तक्रार नोंदविण्यासाठी खालीलप्रमाणे पर्याय नागरिकांना उपलब्ध आहेत.
मुंबई महापालिकेचे ऑनलाइन पोर्टल/अॅप MyBMCpotholefixit ॲपवर तक्रार दाखल करता येऊ शकते. त्याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक 1916 वर संपर्क साधता येईल. सर्व 24 प्रशासकीय विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात (CFC) लेखी तक्रार दाखल करता येईल. मुंबई महापालिकेचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1800221293 वर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रार दाखल करता येईल. मुंबई महापालिकेचे @mybmcroads हे ट्विटर हॅण्डल आणि बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक: 91-8999-22-8999 वर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रारी करू शकता.
<p> कोयनेच्या पायथा विद्युतगृहातून 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होणार. कोयना धरण 50 टक्के भरलं, बंद पडलेली वीजनिर्मिती सुरु होणार</p>
Source link

Baipan Bhaari Deva Box Office Collection: केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन २४ दिवस झाले आहेत. तरी देखील चित्रपटाची जादू कमी झालेली नाही.
Source link

गली बॉयनंतर आलिया आणि रणवीर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसत आहे. टीझरवरुन सिनेमात भव्य-दिव्य सेट, रोशनाई, करण जोहरे आतापर्यंत गाजलेले सीन पुन्हा रिक्रिएट झालेले पाहायला मिळणार आहेत. रणवीर-आलियाचा रोमॅन्स पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरेन केले आहे. करण जौहर सात वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा नाशिकमधील असल्याचे म्हटले जात आहे. एक व्यक्ती दुचाकीवर बसून ‘अजय देवगणसाठी भीक मांगो आंदोलन’ करत आहे. “मी आज ऑनलाइन गेम्सच्या विरोधात आंदोलन करत आहे. ऑनलाइन गेम्स आपल्या पिढ्या बरबाद करत आहेत. या लोकांना देवाने भरपूर दिलंय, पण तरीही ते अशा जाहिराती करून आपल्या पिढ्या खराब करत आहेत. त्यामुळे मी या भीक मांगो आंदोलनातून मिळणारे पैसे अजय देवगणला पाठवणार आहे. तसेच गांधीगिरी स्टाइलने त्याला अशा जाहिराती न करण्याची विनंती करणार आहे. तुला पैशांची आवश्यकता असेल तर मी पुन्हा भीक मागेन आणि तुला पैसे पाठवेन पण अशा जाहिराती करू नकोस,” तो असे म्हणाला आहे.

Pune News : राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून (Survey of State Intelligence Agencies) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील काही वर्षात पुण्यात पाच हजार बांगलादेशी नागरिक वाढले असून इतरही जिल्ह्यात ही संख्या वाढल्याचं बोललं जातंय. पोलिसांकडून (Pune Police) बांग्लादेशींवर कारवाई होताना दिसत नसल्याने घुसखोरांचे फावल्याचे दिसत आहे. त्यामुळे बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान बांग्लादेशी नागरिकांची (Bangladesh) घुसखोरी रोखण्यात यावी, तसेच त्यासाठी विशेष शोध मोहीम प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत राबवण्यात यावी, असे पोलिसांना खरं तर आदेश आहेत. यात बांग्लादेशी व्यक्ती शोधणे, त्यांची कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे साथीदार शोधणे तसेच त्यांची पाठवण करणे आदी कामे वेळखाऊ असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम म्ह्णून सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात बांग्लादेशी घुसखोर मोठ्या संख्येने स्थायिक झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात गेल्या काही वर्षात तब्बल 5 हजार बांग्लादेशी कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र त्या तुलनेत मागील तीन वर्षात फक्त 5 बांग्लादेशीना पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले आहे.
पुण्यातील हडपसर (Hadapasar) परिसरातील ससाणेनगर, वाघोली, चाकण औद्योगिक क्षेत्र, लोणीकाळभोर (lono Kalbhor) या भागात बांग्लादेशानी आपले बस्तान बसवले आहे. सीमारेषा ओलांडत हे नागरिक भारतात येताच हॉटेल वेटर, बांधकाम मजूर, फेरीवाले आणि ईतर कामे करतात आणि हळू हळू एक करत कुटुंबासह ते ईथे स्थायिक होतात, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व भाड्याची खोली घेऊन राहतात. तसेच आम्ही मूळचे पश्चिम बंगालचे आहोत असं ते सांगतात. पुण्यासह नवी मुंबईत (Mumbai) देखील बांग्लादेशी नागरिकांचे प्रमाण हे वाढल्याचं बघायला मिळत आहे. नवी मुंबई पोलिसांकडून चालू वर्षी 22 जणांवर कारवाई करण्यात आली असून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे नागरिक रहात असल्याने कारवाईत अडचण देखिल निर्माण होते आहे. विशेष म्हणजे पुणे, नवी मुंबईतच नाही तर राज्यभर विविध जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घुसखोर वास्तव्य करत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान पोलिसांना विशेष शोध मोहीम राबविण्याचे आदेश असून त्यानंतर्गत बांगलादेशी घुसखोर शोधणे, त्याची ओळख पटवणे तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? या सर्वांचा तपास करणे अशा कामांना वेळ लागत असल्याने पोलिसांकडून या कारवाईकडे डोळेझाक केली जाते आहे का? असाच प्रश्न आता उपस्थित होतोय. सध्या महाराष्ट्रातील विविध भागात धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना या घडत असतांनाच बांगलादेशी घुसखोरांमुळे आगामी काळात पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर उदभवणार नाही ना? याकडेही पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे..
इतर संबंधित बातम्या :
भारताने घुसखोर बांगलादेशींची यादी द्यावी, आम्ही त्यांना मायदेशी बोलावू : बांगलादेश
<p>कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृह केंद्राचे दरवाजा उघडले जाणार आहेत. त्यामुळे, पायथा विद्युत गृहातून १ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होणारेय. दरम्यान, कोयना धरण ५० टक्के भरले असून, आता बंद पडलेली वीजनिर्मिती पुन्हा सुरू होणारेय. त्याचसोबत, पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय.</p>
<p> </p>
Source link

सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीला एक व्यक्ती कपड्यांवरुन सुनावत आहे. ‘तू भारताचे नाव खराब करत आहेस’ असे त्या व्यक्तीने म्हटले आहे.