Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2899

दोन दिवसांत नांदेडमधील 9 हजार हेक्टर शेती खरडून गेली; 2 लाख हेक्टरवरील पिके आडवी

0
दोन दिवसांत नांदेडमधील 9 हजार हेक्टर शेती खरडून गेली; 2 लाख हेक्टरवरील पिके आडवी


Crops Damage in Nanded : मराठवाड्यात अपेक्षित पाऊस (Marathwada Rains) नसल्याने अनेक भागात भर पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. मात्र याच मराठवाड्यात असलेल्या नांदेड (Nanded) जिल्ह्यात मात्र पावसामुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. कारण 21 आणि 22 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. एवढच नाही तर पावसाच्या पाण्यामुळे तब्बल 9 हजार हेक्टर शेती खरडून गेली आहे. तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 2 लाख हेक्टरवरील पिके (Crop) आडवी झाली आहेत. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे. 

नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. दरम्यान 21 आणि 22 जुलै रोजी जिल्ह्यात धुंवाधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर 21 जुलै रोजी झालेल्या पावसात 36 आणि 22 जुलैला 13 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. त्यातच पैनगंगा नदीसह छोट्या-मोठ्या नद्यांना देखील पूर आला. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले. ज्यात खरिपाचे पिके अक्षरशः वाहून गेली. सोबतच शेतातील जमीन देखील खरडून गेली. 

नांदेडमध्ये तब्बल 757 गावांना तडाखा, 411 घरांची पडझड…

नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला आहे. 21 आणि 22 जुलै दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण 757 गावांना याचा फटका बसला आहे. तर या गावांतील 2 लाख 42 हजार 457 पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर याचवेळी 411 पक्क्या घरांची पूर्णत: आणि 820 पक्क्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. तर नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 13 कच्च्या घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर 23 लहान आणि 27 मोठी अशी 50 जनावरे पुराच्या पाण्याने दगावली. तसेच मुखेड तालुक्यातील माकणी आणि हदगाव तालुक्यातील कोथळ येथे पुरात वाहून दोघांचा मृत्यू झाला आहे. 

असे झाले नुकसान… 

खरडून गेलेली जमीन 








अ. क्र. तालुका खरडून गेलेली जमीन 
1हदगाव 286 हेक्टर 
2माहूर 176 हेक्टर 
3देगलूर 5537 हेक्टर 
4मुखेड 2860 हेक्टर 

पिकांचे नुकसान…













अ. क्र. तालुका पिकांचे नुकसान
1हदगाव 23,198 हेक्टर 
2धर्माबाद 743 हेक्टर 
3उमरी 16 हेक्टर 
4हदगाव 23,198 हेक्टर 
5देगलूर 65,198 हेक्टर 
6मुखेड 41,198 हेक्टर 
7हिमायतनगर 397 हेक्टर 
8किनवट 13,246 हेक्टर 
9माहूर 13,445 हेक्टर 

इतर महत्वाच्या बातम्या: 

व्हिडिओ: सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय, पाहा ड्रोनद्वारे घेतलेले धबधब्याचे विहंगम दृश्य



Source link

सातारा : कास तलाव ओव्हर फ्लो; पाण्याला भुशी डॅमचा फील | पुढारी

0









बामणोली; पुढारी वृत्तसेवा : सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सोमवारी सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कास तलाव परिसरात गेली काही दिवस संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अखेर कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या परिसरात पर्यटन वाढावे, या द़ृष्टिकोनातून सातारा नगरपालिकेने कासच्या सांडव्यावर चांगल्याप्रकारे टप्पे देऊन तेथे पाण्याला भुशी डॅमचा फील दिला आहे.

कास तलाव भरल्याने येथे सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून येणार्‍या पर्यटकांची रेलचेल वाढणार आहे. कास, बामणोली परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच आता कास तलाव भरल्याने या परिसरातील पर्यटन चांगल्या प्रकारे बहरणार आहे. कासच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने येथे आता पर्यटकांची चांगलीच गर्दी वाढणार आहे. कास पुष्प पठारावरून सांडव्याकडे न जाता पर्यटक घाटाई फाट्यावरून घाटाई मार्गे कास सांडव्याकडे पर्यटनास आले तर ते सोयीस्कर ठरणार आहे.

आता कास परिसरात फिरायला जाणार्‍या पर्यटकांना कास नजीकचा सातार्‍याचा भुशी डॅम, भांबवली वजराई धबधबा, मुनावळेचा केदारेश्वर धबधबा, एकीवचा पाबळ धबधबा, बामणोली, शेंबडी, मुनावळे या पर्यटन स्थळी पावसाळी पर्यटनासाठी जाता येणार आहे.
दरम्यान कास तलाव भरल्याने आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी तरी मिटली असून यामुळे सातारकरांनी सुस्कारा सोडला आहे.

हेही वाचा : 











Source link

सातारा : फलटणमध्ये शाळकरी मुलींच्या वादातून माय-लेकींना मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

0









फलटण; पुढारी वृत्तसेवा :  फलटण तालुक्यातील एका गावामध्ये रविवार दि. 23 रोजी दोन शाळकरी मुलींमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून एका कुटुंबातील व्यक्तींनी माय-लेकीला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी विनयभंगासह ‘पोक्सों’तर्गत चौघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या व पीडित महिलेच्या तक्रारीवरून मिळालेली माहिती अशी, फलटण तालुक्यातील संबंधित गावामध्ये पीडित महिला व संशयित दोन्ही कुटुंबे राहण्यास आहेत. या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींमध्ये गावातील वृद्धाश्रमासमोर रविवार दि. 23 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास भांडण झाले. मुलींच्या भांडणाच्या कारणावरून पालकांमध्ये प्रथम वादावादी झाली. हमरीतुमरीवरून प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले. संशयित व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडित महिला व त्यांची अल्पवयीन मुलगी यांना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करून पीडित महिलेचा व अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्या तक्रारीनुसार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. सध्या गावात शांततेचे वातावरण आहे. सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस तपास करत आहेत.

फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात दोन मुली खेळत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. मुलींच्या वादानंतर त्या ठिकाणी आलेल्या त्यांच्या पालकांमध्येही वादावादी झाली. याबाबत मारहाण, जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग झाल्याची तक्रार झाली असून योग्य दिशेने तपास चालू आहे. तपासात जे पुरावे हाती येतील ते न्यायालयासमोर सादर करण्यात येतील. या घटनेबाबत कोणीही अफवा पसरवू नये, अन्यथा स्वतंत्रपणे कारवाई करू.
– समीर शेख, जिल्हा पोलिस अधीक्षक, सातारा.

 











Source link

Hum Hain Rahi Pyar Ke: एक सीनसाठी दिवसभर आमिर खानला किस करत राहिली अभिनेत्री!

0
Hum Hain Rahi Pyar Ke: एक सीनसाठी दिवसभर आमिर खानला किस करत राहिली अभिनेत्री!


नवनीत निशान या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली की, जेव्हा तिला या चित्रपटाची ऑफर मिळाली, तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटलं होतं. आपण या चित्रपटाचा भाग होणार आहे, यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. आमिर खान आणि जुही चावला यांसारख्या बड्या स्टार्ससोबत सेटवर काम करताना ती खूप घाबरली होती. नवनीतने ‘तुम बिन’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘ये लम्हे जुदाई के’ आणि ‘जान तेरे नाम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘ कसौटी जिंदगी की’ आणि ‘चाणक्य’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.



Source link

सातारा : यवतेश्वर घाटातील 5 टनी दरड हटवली | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घटातील धोकादायक दरडी महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त मोहीम राबवून सोमवारी हटवल्या. डोंगरमाथ्यावरील सुमारे 5 टनांहून अधिक वजन असलेल्या दरडींचा सुळका पडून मार्गावर सुमारे 3 फूट खोल खड्डा पडला. जोरदार दणक्यामुळे मार्ग दुभंगला. संरक्षक कठडा तोडून ही दरड दरीमध्ये कोसळली. यवतेश्वरजवळील डोंगरमाथ्यावरील 5-6 दरडी प्रशासनाने सोमवारी हटवल्याने दिलासा मिळाला.

जिल्ह्याच्या पश्चिमेस पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या दोन-चार वर्षांत या भागात अतिवृष्टी होऊन भूस्खलन, जमीन खचणे, दरडी कोसळणे असे प्रकार वाढले आहेत. विशेष: 2019 साली अतिवृष्टी होऊन महापूर आला होता. त्यानंतर 2021 साली जुलै महिन्यात दोन-तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने डोंगरमाथ्यावरील कड्यांचे भाग निसटू लागले आहेत. घाट मार्गावरील झीज झालेले मोठमोठे दगड दरडी बनून मार्गावर कोसळत आहेत. घाटातील कामांसाठी ब्लास्टिंग, ब्रेकरचा वापर झाल्याने रस्त्याकडील भाग ठिसूळ होऊन तो मलबा रस्त्यावर येत आहे.

या दरडींचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी यवतेश्वर घाटात मोहीम राबवली. भर पावसात महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सांबरवाडी डोंगराच्या बाजूने चढाई केली. पोकलेनच्या 40 फुटी बकेटच्या सहाय्याने दरडी हटवण्याचे काम सकाळी 10 वाजता सुरू झाले. खाणीजवळ कड्याचा सुटत चाललेला सुळका पॉकलेनच्या सहाय्याने खाली दरीत ढकलून देण्यात आला. सुमारे 5 टनाहून अधिक वजन असलेली ही दरड खाली पडून मार्ग सुमारे 3 फूट खोल खचला. दरडीचा दणका इतका प्रचंड होता की त्यामुळे सुमारे 10-15 फूट मार्ग दुभंगला. ही दरड वेगाने खाली येऊन संरक्षक कठडा तोडून दरीत गेली.

सांबरवाडी डोंगर माथ्यावरील इतर दरडीही दरीत ढकलून देण्यात आल्या. मार्गावर पडून राहिलेल्या दरडी जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आल्या. छोट्या दरडी पॉकलेनच्या सहाय्याने उचलून डोंगरमाथ्यावर व्यवस्थित ठेवण्यात आल्या. दरडींमुळे सातारा-कास या नव्या मार्गाची व संरक्षक भिंतीची काही ठिकाणी दुरवस्था झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरूस्तीचे कामहाती घेतले आहे. दरडी हटवण्यात येणार असल्याने हा मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवला होता. त्यामुळे सांबरवाडी, यवतेश्वर, कास तसेच बामणोली परिसरातील नागरिकांना एकीव व इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला. या मोहिमेची प्रशासनाकडून पूर्व कल्पना देण्यात आल्याने नागरिकांची फार गैरसोय झाली नाही. दरम्यान, दूरवस्था झालेला रस्ता सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने दुरुस्त करण्यात आला.

हेही वाचा : 











Source link

सातारा : लोकसभा-विधानसभा निवडणुकीची चाहूल | पुढारी

0


सातारा : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 4 हजार 800 मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. या मतदान यंत्रणांचे फर्स्ट लेव्हल चेकिंग (एफएलसी) दि. 25 रोजी सकाळी 9 वाजता एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी मतदान यंत्रांची पाहणी सोमवारी केली.

जिल्ह्यात विधानसभा मतदार संघाची सुमारे 2 हजार 996 मतदान केंद्रे असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात बेंगलोर येथून भारत इलेक्ट्रिक लिमिटेड (बेल) या कंपनीकडून सातार्‍यात मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. ही मतदान यंत्रे सातारा एमआयडीसीत वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. मतदान यंत्रांमध्ये 7 हजार 791 बॅलेट युनिट, 4 हजार 673 कंट्रोल युनिट, 4 हजार 837 व्हीव्हीपॅट मशिनचा समावेश आहे. या मतदान यंत्रांच्या तपासणीचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी नीता शिंदे यांच्या सुचनेनुसार मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी होत आहे. त्यासाठी 20 अभियंते दाखल होणार आहेत. शिवाय उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, अव्वल कारकून यांच्याही टीमची व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान, गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मतदान यंत्रांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, सातारा तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे उपस्थित होते.

राजकीय पक्ष प्रतिनिधींना आवाहन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे सातार्‍यात दाखल झाली आहेत. मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपासणीसाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे व माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

       हेही वाचा : 

 

The post सातारा : लोकसभा-विधानसभा निवडणुकीची चाहूल appeared first on पुढारी.



Source link

Gadar 2: ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’मध्ये बॉक्स ऑफिस क्लॅश होणार? सनी देओल चिडून म्हणाला….

0
Gadar 2: ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’मध्ये बॉक्स ऑफिस क्लॅश होणार? सनी देओल चिडून म्हणाला….


‘गदर’ रिलीज होण्याआधीच लोक याबद्दल खूप बोलले होते. मात्र, नंतर हा चित्रपट लोकांची पहिली पसंती ठरला. लोकांनी चित्रपटाला मनापासून प्रेम दिले आणि चित्रपटावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला, असे सनी देओल म्हणाला. प्रत्येक चित्रपटाची स्वतःची अशी वेगळी कथा असते, त्यांची बरोबरी होणे कठीण आहे. तरी लोक तुलना का करतात, हेच कळत नाही, असे सनी म्हणाला. प्रेक्षकांनी अशाप्रकारे दोन चित्रपटांची तुलना करणे आपल्याला आवडत नसल्याचे देखील सनी देओल म्हणाला.



Source link

Pune koyta gang : पुण्यात कोयता गॅंगची दहशत थांबेना; बहणीची छेड काढली म्हणून तरुणावर कोयत्याने वार

0
Pune koyta gang : पुण्यात कोयता गॅंगची दहशत थांबेना; बहणीची छेड काढली म्हणून तरुणावर कोयत्याने वार



Pune koyta gang : पुण्यात कोयता गॅंगची दहशत काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाही. एका मुलीची छेड काढल्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना दांडेकर पूल परिसरात घडली आहे.



Source link

Rakesh Roshan: राकेश रोशन यांची २० लाखांची फसवणूक! ठगांना हायकोर्टाने बजावली नोटीस

0
Rakesh Roshan: राकेश रोशन यांची २० लाखांची फसवणूक! ठगांना हायकोर्टाने बजावली नोटीस


मात्र, न्यायालयाने डिसेंबर २०२१मध्ये राकेश रोशन यांचा अर्ज फेटाळला. यात २०१२च्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, यावर सत्र न्यायालयाने म्हटले होते की, राकेश यांचा अर्ज राखता येणार नाही, कारण चित्रपट निर्मात्याने २०१२च्या आदेशाला तेव्हा आव्हान दिले नव्हते. त्यानंतर राकेशने २०१२ आणि २०२१मध्ये सत्र न्यायालयाने दिलेले आदेश रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.



Source link

सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने दि. 28 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागासह धरण परिसरात पावसाची संततधार कायम असून नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाने शुक्रवार दि. 28 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या कोयना धरणातही वेगाने पाणीसाठा वाढत आहे. रविवारी रात्रीपासून सातार्‍यात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. पश्चिम भागात तर जोरदार पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांना पुरसद़ृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. डोंगरदर्‍यामध्ये छोटे-मोठे धबधबे खळाळू लागले आहेत.

पावसाअभावी खोळंबलेली भात लागणीची कामे सातारा, जावली, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली व खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात युध्दपातळीवर सुरू आहेत. पावसामुळे पश्चिम भागातील डोंगरदर्‍या व घाटरस्त्यावर दरडी पडण्याचे प्रकार सुरू आहेत. प्रशासनामार्फत रस्त्यावर पडलेल्या दरडी त्वरित हटवण्यात येत आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील धावरी-एरणे रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पश्चिम भागात जोरदार पाऊस असला तरी जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. फलटण, माण व खटाव तालुक्यात ओढे, नाले, तलाव अजूनही कोरडे ठणठणीत आहेत. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे सातारा 23.5 मि.मी., जावली 44.0 मि.मी., पाटण 66.3 मि.मी., कराड 20.2 मि.मी., कोरेगाव 8.6 मि.मी., खटाव 6.9 मि.मी., माण 6. 1 मि.मी., फलटण 1.2 मि.मी., खंडाळा 6.2 मि.मी., वाई 19.3 मि.मी. महाबळेश्वर 104.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यात सरासरी 25.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत सरासरी 309.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून एकूण सरासरीच्या 30.4 टक्के इतका पाऊस झाला आहे.

धरणातील पाणीसाठा 50.61 टक्क्यांवर

सातारा जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली असून धरणातील पाणीसाठा 50.61 टक्के झाला आहे. कोयना धरणात 48.51 टक्के पाणीसाठा असून धरणात 59 हजार 977 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. धोम धरण 50.47 टक्के भरले असून धरणात 7 हजार 152 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. धोम बलकवडी धरणात 84.34 टक्के पाणीसाठा झाला असून धरणात 1 हजार 393 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. कण्हेर धरणात 44.11 टक्के पाणी साठले असून धरणात 5 हजार 430 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. उरमोडी धरणात 46.53 टक्के पाणीसाठा झाला असून 3 हजार 600 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. तारळी धरणात 81.51 टटक्के पाणीसाठा असून 4 हजार 22 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. मध्यम प्रकल्प असणारे येरळवाडी 3.47 टक्के, नेर 19.47 टक्के, राणंद 4.42 टक्के, आंधळी 22.14 टक्के, नागेवाडी 26.67 टक्के, मोरणा 70.46 टक्के, उत्तरमांड 39.77 टक्के, महू 77.06टक्के, हातगेघर 32.00 टक्के, वांग (मराठवाडी)मध्ये 37.87 टक्के पाणीसाठा झाला आहे.

       हेही वाचा : 



Source link