Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2897

शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर : अजित पवार

0
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर : अजित पवार

Ajit Pawar : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (dcm Ajit Pawar) यांनी दिली. विधानसभेत पुरवणी मागण्या बहुमताने मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर अजित पवार बोलत होते.

या अधिवेशनात एकूण 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळासमोर मांडण्यात आल्या आहेत. यापैकी 13 हजार 91 कोटी 21 लाख रुपयांच्या मागण्या या अनिवार्य, 25 हजार 611 कोटी 38 लाख रुपयांच्या मागण्या या कार्यक्रमांतर्गत आणि 2 हजार 540 कोटी 62 लाख रुपयांच्या मागण्या या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने मांडलेल्या आहेत. 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या स्थूल पुरवणी मागण्या दिसत असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 35 हजार 883 कोटी 31 लाख एवढाच असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरवणी मागणीतील महत्वाच्या तरतुदी

• जलजीवन मिशन-सर्वसाधारण घटक आणि गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण व सहाय्यिकृत बाबींकरिता राज्य हिस्सा म्हणून 5 हजार 856 कोटी रुपये
• प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थींना राज्याच्या ‘नमो शेतकरी’ महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी चार हजार कोटी रुपये
• अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची थकबाकी आणि चौथा अनुज्ञेय हप्ता देण्यासाठी 3 हजार 563 कोटी 16 लाख रुपये
• मेट्रो रेल्वे प्रकल्प मुद्रांक शुल्क अधिभाराचे प्रदान करण्यासाठी 2 हजार 100 कोटी रुपये

• लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी 1 हजार 500 कोटी रुपये
• केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांकरिता राज्य हिस्सा 1 हजार 415 कोटी रुपये
• पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान देण्यासाठी 1 हजार 398 कोटी 50 लाख रुपये
• केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेसाठी 1 हजार 200 कोटी रुपये
• श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरिता 1 हजार 100 कोटी रुपये
• महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतमूल्य व अर्थसहाय्याकरिता 1 हजार कोटी रुपये
• महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत व वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी 1 हजार कोटी रुपये
• नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रकल्प अंमलबजावणीसाठी बाह्य हिस्सा व राज्य हिस्सा 969 कोटी रुपये
• अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र हिस्सा, राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सा 939 कोटी रुपये
• केंद्र पुरस्कृत जल जीवन मिशन योजना (राज्य हिस्सा) 800 कोटी रुपये
• शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपदान, अंशराशीकरण आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते अदा करण्यासाठी 789 कोटी 41 लाख रुपये
• केंद्र शासनाकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी 798 कोटी 1 लाख रुपये
• संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरिता 600 कोटी रुपये
• लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान 550 कोटी रुपये
• पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन उपलब्ध करुन देण्यासाठी 549 कोटी 54 लाख रुपये
• केंद्रिय आधारभूत किंमत योजनेखालील तूट भरुन काढण्यासाठी 523 कोटी 23 लाख रुपये यांचा समावेश आहे

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Politics Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री! अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाही याची त्यांना पूर्वकल्पना: देवेंद्र फडणवीस

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

Mumbai Politics : सात वेळा नगरसेविका निवडून आलेल्या तसेच माजी सभागृह नेत्या ठाकरे गटातून शिवसेनेत दाखल

0
Mumbai Politics : सात वेळा नगरसेविका निवडून आलेल्या तसेच माजी सभागृह नेत्या ठाकरे गटातून शिवसेनेत दाखल

म्हणून शिवसेनेत प्रवेश..

तृष्णा विश्वासराव म्हणाल्या की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहिले आहे. इर्शाळवाडीमध्ये पहाटे पोहचून ५ तास डोंगर चढून गेले. तेथील अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतले. म्हणून प्रभावित होऊन मी पक्षप्रवेश करत आहे, असं तृष्णा विश्वासराव यांनी सांगितलं

Source link

Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होण्यापूर्वीच राजकीय घमासान

0
Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होण्यापूर्वीच राजकीय घमासान

Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होण्यापूर्वीच राजकीय घमासान

उद्धव ठाकरेंची मुलाखत महाराष्ट्रासमोर येणारेय. ही मुलाखत किती चर्चेत आहे त्याचा अंदाज आज विधीमंडळात झालेल्या चर्चेतूनच झाला. काल शिवसेनेकडून ठाकरेंच्या मुलाखतीचा ट्रेलर रिलीज झाला आणि आज त्यावरच शिंदेसह भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांनी जोरदार टीका केली. काय आहे त्या मुलाखतीत आणि ठाकरे कुणावर टीकेचे बाण सोडणार पाहूया या रिपोर्टमधून.

Source link

हृदयद्रावक! रस्ता नसल्याने झोळीतून रुग्णालयात नेताना गर्भवतीने रस्त्यातच सोडला जीव, अर्भकाचाही मृत्यू

0
हृदयद्रावक! रस्ता नसल्याने झोळीतून रुग्णालयात नेताना गर्भवतीने रस्त्यातच सोडला जीव, अर्भकाचाही मृत्यू

आज विधीमंडळ अधिवेशनात नाशिक मधील खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर आमदारांनी जोरदार चर्चा केली, मात्र याच दरम्यान नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रस्त्याअभावी गरोदर मातेला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्ता नसल्याने महिलेल्या झोळीतून साडे तीन किलोमीटर पायपीट करण्यात आली. मात्र रुग्णालयात पोहोण्यास उशीर झाल्यानं वाटेतच महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Source link

Team India: टीम इंडियाचे देशांतर्गत वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे आणि कोणत्या संघासोबत खेळणार क्रिकेट?

0
Team India: टीम इंडियाचे देशांतर्गत वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे आणि कोणत्या संघासोबत खेळणार क्रिकेट?

भारतीय संघ विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २४ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबरला होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका मोहाली, इंदूर आणि राजकोट येथे खेळले जाणार आहे. विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे.

Source link

गणेशोत्सव मंडळांना दिलासा; कार्यकर्त्यांची धावपळ संपणार, परवानगीसाठी ऑनलाईन ‘एक खिडकी’ची सुविधा

0
गणेशोत्सव मंडळांना दिलासा; कार्यकर्त्यांची धावपळ संपणार, परवानगीसाठी ऑनलाईन ‘एक खिडकी’ची सुविधा

Ganeshotsav 2023:   आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) गणेशोत्सव मंडळांना (Ganesh Mandal) मोठा दिलासा दिला आहे. मु्ंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून (single window system) ऑनलाईन अर्जाची (Online Application) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी 1 ऑगस्ट 2023 पासून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे  गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही.

विविध उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजित केले जावेत आणि याबाबतची परवानगी प्रक्रिया अधिकाधिक सुटसुटीत व्हावे, या उद्देशाने  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. याच अंतर्गत गणेशोत्सवासाठी श्री गणेश मंडळांच्या मंडप परवानगीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘एक खिडकी’ योजना येत्या 1 ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ – 2)  रमाकांत बिरादार यांनी दिली.

असा करा ऑनलाईन अर्ज

गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधे अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > नागरिकांकरिता टॅब >अर्ज करा >मंडप (गणेश/नवरात्रोत्सव) > Ganpati/Navaraytri Mandap Application मध्ये नमूद केलेल्या लिंकवर एक ऑगस्टपासून 13 सप्टेंबर 2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

एकाच ठिकाणी अर्ज, कार्यकर्त्यांची धावपळ वाचणार

याठिकाणी पोलीस, वाहतूक पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या परवानगीचेही अर्ज असल्याने यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसेल. सदर मंडपांसाठी मंडळांना परवानगीकरिता शुल्क भरणे आवश्यक नाही. मंडप परवानगी नि:शुल्क देण्यात येणार आहे. मात्र, एक हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. तसेच यावर्षीदेखील गणेश मंडळांना अर्जासोबत हमीपत्रही द्यावे लागणार आहे. या हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून संबंधितांच्या स्वाक्षरीसह अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. गणेश मंडळांना मंडप उभारणी परवानगीबाबत काही अडचण आल्यास आपापल्या विभागातील सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा, असेही उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी कळविले आहे.

Source link

“उद्या तिथं थुंकायलाही..”, विधानसभेतील ‘तो’ व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचा अब्दुल सत्तारांना टोला

0
“उद्या तिथं थुंकायलाही..”, विधानसभेतील ‘तो’ व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचा अब्दुल सत्तारांना टोला

हा व्हिडिओ शेअर करताना महाराष्ट्र काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. “विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्तार महोदयांनी थेट पुडी काढून तोंडात टाकली आणि निर्धास्तपणे चघळत बसले. आज विधानसभेत पुडी खाऊन चघळतायत, उद्या तिथे थुंकायलाही कमी करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांना विधानसभा पानाची टपरी वाटते का?”, असं ट्वीट काँग्रेसने केलं आहे.

Source link

वेल्ह्यात भररस्त्यात बिबट्याचा गाय अन् कुत्र्यावर हल्ला; नागरिकांना सावधगिरीचा इशारा

0
वेल्ह्यात भररस्त्यात बिबट्याचा गाय अन् कुत्र्यावर हल्ला; नागरिकांना सावधगिरीचा इशारा

leopard attack : पुणे जिल्ह्यात वाघांच्या आणि बिबट्यांच्या हल्ल्यात चांगलीच (leopard attack) वाढ झाली आहे. आतापर्यंत पुण्याजवळील अनेक परिसरात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पाबे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय आणि दोन कुत्रे मृत्यूमुखी पडले आहेत. गावातील विठ्ठलवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप यश आलेले नाही.

पाबे परिक्षेत्र वन अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास एका वाघाने केलेल्या हल्ल्यात गाय आणि दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावच्या सरपंच ज्योती रेणूसे, ग्रामपंचायत सदस्य सुनील रेणुसे पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी शेतकऱ्याची एक गाय आणि  दोन कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याचे लक्षात येताच याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली.

मात्र आतापर्यंत येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे गावातील गावकरी दहशतीच्या वातावरणात आहेत. घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. दिवसाही भीती वाटत आहे. तातडीने या वाघाला जेरबंद करावे, अशी विनंती गावकरी करत आहेत. घरातून बाहेर निघताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी कोणत्याच शेतकऱ्यांनी आपले प्राणी वेगवेगळ्या परिसरात सोडू नका. स्वत: बाहेर पडताना शांततेत बाहेर न पडता आवाज करत बाहेर पडा. शिवाय टॉर्ज सोबत ठेवावा. रात्रीच्या वेळी सामसूम परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असाही सल्ला परिक्षेत्र वन अधिकारी यांनी पाबेमधील नागरिकांना दिला आहे.

सिंहगडाच्या परिसरात बिबट्याचा वावर

काही दिवसांपूर्वी पुण्यातील पर्यटकांचं हक्काचं ठिकाण असलेल्या सिंहगडाच्या परिसरात बिबट्या आढळून आला होते. त्यामुळे पर्यटनासाठी आणि वर्षाविहारासाठी जाताना आता पर्यटकांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरुन हे फोटो घेण्यात आले होते. मोरदरी गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला होता. पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर हा परिसर प्रामुख्याने बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. मात्र आता बिबट्या पुण्याच्या वेशीवर आल्याने चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचा-

Pune news : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासला धरणात 70% पाणीसाठा, संध्याकाळी 5 नंतर नदीपात्रात विसर्ग करणार

Source link

Pathaan: ‘पठाण’ ते ‘द मार्व्हल्स’, २०२३मधील महिलांनी गाजवले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

0
Pathaan: ‘पठाण’ ते ‘द मार्व्हल्स’, २०२३मधील महिलांनी गाजवले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

‘द मार्व्हल्स’ (दिवाळीत प्रदर्शित होणार)

यंदाच्या दिवाळीतील आतषबाजी आणखी आकर्षक करण्यासाठी ३ महिला सुपरहिरो एकत्र येणार आहेत. द मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्सचा ‘द मार्व्हल्स’ दिवाळीत प्रदर्शित होणार असून यामध्ये कॅप्टन मार्व्हल (ब्री लार्सन), मिस मार्व्हल ( इमान वेलानी) आणि मोनिका रॅम्ब्यू (टेयोना पॅरीस) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात या तिघींच्या शक्तीची एकमेकींच्या शक्तींसोबत अदलाबदल होते. या गोंधळातून सावरता सावरता त्यांना दुष्ट शक्तींशी मुकाबला करावा लागतो. या तिघींना ‘क्री’च्या दुष्ट आणि शक्तिशाली डार-बेन (झावी अॅश्टन)शी मुकाबला करावा लागणार आहे. डार-बेनने कॅप्टन मार्व्हलचा नायनाट करण्याचा विडा उचललेला असतो. या खलनायिकेचा तिघी मिळून कसा मुकाबला करतात हे पाहणं धमाकेदार ठरणार आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Source link