Mumbai Pune Expressway Block डोंगरावर अडकलेले दगड काढण्याचं काम संपलं; दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत

Source link

Mumbai Pune Expressway Block डोंगरावर अडकलेले दगड काढण्याचं काम संपलं; दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत

Source link

मुंबईच्या अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या परिसरात सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर, काही भागात वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मुंबईची लाईफलाईन लोकलही काही मिनिटे उशीरा धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. याचदरम्यान, मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुसळधार असो, की अतिमुसळधार…सुरक्षित मुंबईकर हाच निर्धार…अशा आशायाचे ट्वीट करण्यात आले. तसेच अतिवृष्टी असूनही मुंबई महानगरपालिका नागिरकांची काळजी घेण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र अंभिरे असे समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. भूपेंद्र अंभिरे हा त्याचा सहकारी संजय पाटील यांच्यासोबत डहाणूच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले. मात्र, बोट पलटल्याने दोघेही पाण्यात पडले. भूपेंद्र अंभिर हा पाण्यात बुडाला. संजय पाटील हा तरुण पोहत कसाबसा समुद्रकिनाऱ्यावर आल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस प्रशासन आणि तटरक्षक दलाला देण्यात आली. यानंतर बेपत्ता भूपेंद्र अंभिरेला शोधण्यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली. मात्र, त्याचा कुठेही शोध लागला नाही. काही वेळानंतर भुपेंद्रचा मृतदेह समुद्रकिनारी आढळून आला.

Hingoli News : मागील काही वर्षात अनेक गावांत अनधिकृतरीत्या महापुरुषांचा पुतळा बसवण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेकदा यावरून गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात देखील अशाच काही घटना समोर आल्या आहे. अशा घटना गावात घडल्यावर पोलीस पाटलांकडून पोलिसांना आणि प्रशासनाला याची माहिती देणे बंधनकारक असते. मात्र हिंगोली जिल्ह्यातील एका गावात अनधिकृतरीत्या महापुरुषांचा पुतळा बसवल्याची माहिती पोलिसांना न देणे एका पोलीस पाटलाला महागात पडले आहे. कारण या प्रकरणात या पोलीस पाटलाला तीन महिन्यांसाठी शासन सेवेतून निलंबित करण्यात आले.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील पोलिस पाटील विलास माणिकराव चव्हाण यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तीन महिन्यांसाठी शासन सेवेतून निलंबित करण्यात आले. याबाबतचे आदेश वसमतचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी काढले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव रंजे येथे 7 जून रोजी महापुरुषांचा पुतळा अनधिकृतरीत्या बसवण्यात आला. या अनुषंगाने सदरची माहिती प्रशासनाला कळविणे गरजेचे होते. मात्र पोलिस पाटील चव्हाण यांनी ही माहिती प्रशासनाला कळविली नाही.
गावात अनधिकृतरीत्या महापुरुषांचा पुतळा बसवण्यात आल्यावर देखील पोलिसांना पोलीस पाटील चव्हाण यांनी माहिती कळवली नाही. त्यामुळे हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी पोलिस पाटील चव्हाण यांना सदरची माहिती न देण्याबाबत विचारणा केली. यावर त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावरून सपोनि बोराटे यांनी त्यांचा कसुरी रिपोर्ट उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांच्याकडे पाठविला होता. उपविभागीय अधिकारी कार्यालयानेही त्यांना खुलासा सादर करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र दिलेला खुलासाही समाधानकारक नसल्याने चव्हाण यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. खल्लाळ यांनी चव्हाण यांना तीन महिन्यासाठी निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत.
प्रत्येक गावात शासनाकडून एका पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. यासाठी त्यांना मानधन देखील जाते. गावातील कायदा सुव्यवस्था आणि गावातील अवैध धंदे याची माहिती पोलिसांना मिळावी यासाठी पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. मात्र, अनेकदा पोलीस पाटलांवर गावातील राजकीय लोकांचा दबाव असतो. त्यात पोलीस पाटील याला गावातच राहावे लागते, त्यामुळे अनेकदा अनेक गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात.
इतर महत्वाच्या बातम्या:

Pune ISIS Terrorist News: पुण्यात इसिसच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे.

Mumbai Rains Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढला असून नागरिकांना पुढील काही तास काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले.

Mumbai Pune Expressway Block Ended : मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरील ब्लॉक संपला

Source link

पाटण-कोयना मार्गावर खड्डेच खड्डे, खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत..

Source link

Irshalwadi landslide help: मराठीतील सध्याची आघाडीची नाटकं आपल्या प्रयोगातून गोळा होणारे पैसे इर्शाळवाडीच्या मदतीसाठी पुढे करणार आहेत.

गडचिरोली : राज्याच्या वाहतुकीचा कणा म्हणून एसटी महामंडळाच्या लालपरीला ओळखले जाते. दुर्गम गावात पोहचण्यासाठी या बसचा आधार आजही नागरिक घेत असतात. मात्र, या लाल परीची दुरवस्था सांगणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गडचिरोली येथील आहे. छप्पर तुटलेली एक बस रस्त्यावर धावतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाडीचे छप्पर धोकादायकरित्या हवेत उडत असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.