Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 2870

सातारा : तळबीड एमआयडीसी परिसरात बिबट्याचा हल्ला; दोन वासरे ठार | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा पुणे – बंगळूर महामार्गालगत असणाऱ्या तळबीड गावच्या हद्दीत एमआयडीसी परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन गीर जातीची वासरे ठार झाली आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

एमआयडीसी परिसरात राजस्थान येथील आठ ते दहा लोक सुमारे 50 ते 60 गाई घेऊन काही महिन्यांपूर्वी आले आहेत. एमआयडीसी परिसरातील डोंगरालगत त्‍यांचे वास्तव्य आहे. याच लोकांच्या दोन वासरांचा बिंबट्याने फडशा पाडला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांसह परिसरातील विविध गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : 











Source link

Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 04 ऑगस्ट 2023 : शुक्रवार : ABP Majha

0
Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 04 ऑगस्ट 2023 : शुक्रवार : ABP Majha


फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन NEWS हद्दपार; मेटाचा सोशल मीडिया युजर्सना मोठा धक्का, ‘या’ देशापासून सुरुवात



Source link

Nitin Desai Funeral: नितीन देसाईंवर आज होणार अंत्यसंस्कार; एनडी स्टुडिओमध्ये पार पडणार अखेरचे सोपस्कार

0
Nitin Desai Funeral: नितीन देसाईंवर आज होणार अंत्यसंस्कार; एनडी स्टुडिओमध्ये पार पडणार अखेरचे सोपस्कार


मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी दुपारी १२ ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओ येथे ठेवण्यात येणार आहे. सध्या नितीन यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर मुंबईतील जेजे रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आज सकाळी जेजे हॉस्पिटलमध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली.



Source link

सातारा : ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’ विद्यार्थ्यांसाठी पर्वणी | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दै. ‘पुढारी’ व गणेश बेकरी नांदणी यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी 2024 मध्ये घेण्यात येणारी ‘पुढारी’ टॅलेंट सर्च एक्झाम’ विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असून या स्पर्धेकडे कल वाढला आहे. खटाव तालुक्यातील विद्यार्थ्यांची सहभागासाठी झुंबड उडाली. पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले असून दिवसेंदिवस मोठ्या संख्येने विद्यार्थी या स्पर्धेत उतरु लागले आहेत.

‘पुढारी’ टॅलेंट सर्च एक्झाम’ चा सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात धडाका सुरू आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड व रूची निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारपासून प्रश्नावलीला सुरूवात झाली. खटाव तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री यमाई श्रीनिवास विद्यालय, औंध, श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मीडियम स्कूल औंध, हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज, महात्मा जोतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा वडूज,कात्रेश्वर विद्यालय कातरखटाव, महर्षी शिंदे विद्यालय एनकुळ आदी शाळांमध्ये विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. जानेवारी 2024 मधील तिसरा किंवा चौथ्या रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे. परीक्षेचा निकाल फेब—ुवारीमध्ये जाहीर केला जाईल.

सहभागी होण्यासाठी येथे करा संपर्क

सातारा शहर व तालुका, कोरेगाव व खटाव तालुका : 9405207193.
माण, फलटण तालुका : 8805007204. वाई, जावली, महाबळेश्वर खंडाळा तालुका : 8805007268.कराड शहर, तालुका व पाटण तालुका : 9922913664.

दै.‘पुढारी’ टॅलेंट सर्च एक्झाममुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारिरीक विकासास निश्चितच चालना मिळण्यास मदत होणार आहे. ‘पुढारी’ने राबवलेल्या उपक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.
– एस. बी. घाडगे, मुख्याध्यापक श्री.श्री. विद्यालय व राजा भगवंतराव ज्यु.कॉलेज, औंध











Source link

घनकचरा व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर; महाबळेश्वर राज्यातील पहिली नगरपालिका | पुढारी

0









महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर नगरपालिका ही घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणारी राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून हिलदारी अभियानाअंतर्गत स्त्री मुक्ती संघटना व रिसीटी नेटवर्क प्रा.लि. यांच्या सहकार्याने महाबळेश्वर पालिका इतर गावांमध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबवत आहे. यात स्थानिक लोकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत नावीन्यपूर्ण माध्यमातून जनजागृती करणे, सफाई मित्रांसाठी विविध प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबिर, सुरक्षा साधनांचे वाटप, स्वच्छता मोहीम असे उपक्रम समाविष्ट आहेत.

रिसीटी नेटवर्कद्वारे पालिकेने शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठीसुद्धा तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. तंत्रज्ञानाद्वारे शहरातील सर्व आस्थापनांचा डिजिटल सर्वे करण्यात आला. प्रत्येक घर, दुकान, हॉटेल यांना क्यू.आर. कोडने जोडण्यात आले. यानंतर घंटागाडीच्या ड्रायव्हर व हेल्पर यांना मोबाईल फोन देऊन यात रिसीटीच्या वेस्ट इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापराबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
आता दररोज कचरा गोळा करताना घंटागाडीवरील ड्रायव्हरमार्फत शहरात लावलेले क्यू.आर. कोड स्कॅन करण्यात येतात यातून संबंधित भागधारकाने कचरा दिला अथवा नाही आणि दिला असेल तर तो वर्गीकृत आहे अथवा नाही, याची नोंद रिसीटी अ‍ॅप्लिकेशनमध्ये होते. यामुळे शहरातील कचर्‍याचे संकलन व वर्गीकरण याबाबत प्रशासनाला एका क्लिकवर माहिती मिळते. हिलदारीचे डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी सांगितले की, रिसीटीचे तंत्रज्ञान यशस्वीपणे उपयोगात आणणारी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे.

गत दोन वर्षांपासून नगरपालिका रिसीटी वेस्ट इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने शहरातून गोळा होणार्‍या कचर्‍याचे मॉनिटरिंग
करते आहे.
– पल्लवी पाटील, मुख्याधिकारी, महाबळेश्वर पालिका











Source link

Dada Kondke : ‘असे’ होते खरे दादा कोंडके! शक्ती कपूर यांनी सांगितली दादांची खास आठवण

0
Dada Kondke : ‘असे’ होते खरे दादा कोंडके! शक्ती कपूर यांनी सांगितली दादांची खास आठवण


ॲडव्हान्स इन्कम टॅक्स भरणारे दादा कोंडके एकमेव कलाकार असतील. दादा कोंडके नेहमी ज्यादाची रक्कम टॅक्स भरून ठेवायचे, जेणेकरून त्यावरून त्यांच्याकडे कुणी बोट दाखवू नये, असे त्यांना वाटायचे. ‘एक अत्यंत काटेकोर, शिस्तबध्द आणि तितकेच संवेदनशील माणूस असलेल्या दादा कोंडके यांनी मराठी सिनेसृष्टीला जे चित्रपट दिले आहेत, ते कधीच जुने होणार नाहीत इतका त्यात उत्साह आहे’, असे शक्ती कपूर म्हणाले.



Source link

सातारा : घोणसपूर येथील वृद्ध रुग्णाला डालग्यातून नेले रुग्णालयात | पुढारी

0


प्रतापगड; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर तालुक्यातील घोणसपूर गाव हे मधुमकरंदगडाच्या पायथ्याशी असून स्वातंत्र्याची 75 वर्षे होऊनही मूलभूत सुविधांअभावी येथील रुग्णांचा आजही डालग्यातून प्रवास सुरू आहे. गुरुवारी एका वृद्ध महिलेला 12 किलोमीटर डालग्यातून उपचारासाठी न्यावे लागले. 4 तासांची पायपीट केल्यानंतर या वृद्धेला उपचार मिळाले.

गुरुवारी रस्त्याअभावी या गावातील अर्धांगवायूने आजारी असलेल्या श्रीमती कुसुम संभाजी जंगम (वय 65) यांना डालग्यात बसवून 12 किलोमीटर अंतरावरील महाबळेश्वरापर्यंतचा प्रवास भर पावसात करावा लागला. यासाठी सुमारे चार तास पायपीट ग्रामस्थांना करावी लागली. महाबळेश्वर तालुक्यात हे गाव असून या गावातील लोकांनी रस्त्याची मागणी करूनही त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. आजपर्यंत गावाला हक्काचा रहदारीचा कायमस्वरूपी रस्ता नाही. वन खात्याची अडचण सांगून प्रत्येक वेळी लोकांचा मुलभूत हक्क आजवर राजकारण्यांनी डावलला आहे.

येथील लोकांनी गेल्या 15 वर्षांमध्ये स्वत: श्रमदान करून कच्चा रस्ता तयार केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी सुद्धा घोणसपूर रस्त्यावाचून आजही उपेक्षितच आहे. ग्रामीण भागातील सर्व गावे, वाडी, वस्ती जोडणारा कायमस्वरूपी डांबरी रस्ता नाही. चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पण, येथे माणसाला चालण्यासाठी रस्ता नाही, हे दुर्दैव आहे. नव्याने पाचशे, हजार एकरमध्ये होणार्‍या सहारा सिटी, लवासा सिटी उभारतांना धनिक लोक व व्यावसायिक भांडवलदारांना कधीही वन खात्याच्या परवानगीला अडचण आली नाही. परंतु, ग्रामीण भागात ज्यांनी अनेक वर्षे जंगल संपत्ती जीवापाड जपली त्यांना मात्र हक्काची रहदारीची व्यवस्था करायला लोकप्रतिनिधींना अडचण का येते? वनखात्याच्या परवानगीची आमची लक्षवेधी कोणत्यातरी अधिवेशनामध्ये कोण मांडेल का? असा सवाल घोणसपूर ग्रामस्थांनी केला आहे.

येथील दुधगाव सोसायटीच्या मध्यवर्ती ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची मंजुरी असलेली पण फक्त स्थलांतराच्या परवानगीसाठीची फाईल सरकारी उदासीनतेमुळे मंत्रालयात धुळखात पडून आहे.

कोयना खोर्‍याचा हा भाग स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अजून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करताना दिसतोय. यामुळेच येथील युवक स्थलांतरित होत आहेत. महाबळेश्वर शहर आणि ग्रामीण भाग यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.
– डॉ कुलदीप यादव, सामाजिक कार्यकर्ते

घोणसपूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ अजूनही आदिवासींचेच जगणं
जगत आहेत. या अतिवृष्टीत जवळचा दवाखाना नसल्याने व रस्त्याअभावी डालग्यात रुग्ण टाकून महाबळेश्वरपर्यंत न्यावे लागत असेल, तर मग
आमच्यासारखे दुर्दैवी कोण असेल?
– किरण जंगम, स्थानिक ग्रामस्थ



Source link

Mumbai Local Train : कर्जत-कल्याण लोकल सेवा खोळंबली; ट्रॅकवर खड्डा पडल्याने रेल्वे वाहतूक बंद

0
Mumbai Local Train : कर्जत-कल्याण लोकल सेवा खोळंबली; ट्रॅकवर खड्डा पडल्याने रेल्वे वाहतूक बंद


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी भिवपुरी स्थानकाजवळील हेडमास्तर कार्यालयाजवळ अप ट्रॅकवर मोठा खड्डा पडल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या सर्व लोकल थांबवण्यात आल्या आहे. त्यामुळं सेन्ट्रल लाईनवरील रेल्वेंचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कल्याण-कर्जत मार्गावरील सर्व लोकल आणि अन्य रेल्वे पुढील सूचनेपर्यंत स्थगित रद्द आल्या आहे. परिणामी गेल्या तासाभरापासून या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळं आता सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.



Source link

Nitin Desai: नितीन देसाईंनी ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये प्रसिद्ध कंपनीवर केले गंभीर आरोप! सरकारकडे केली विनंती

0
Nitin Desai: नितीन देसाईंनी ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये प्रसिद्ध कंपनीवर केले गंभीर आरोप! सरकारकडे केली विनंती


मीडिया रिपोर्टनुसार, नितीन देसाई यांनी एडलवाईस या कंपनीमुळे आपण कसे अडचणीत आलो, तसेच आपली फसवणूक कशी झाली आणि यामुळे आपली अवस्था कशी बिकट झाली, या सगळ्याची माहिती ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये दिली आहे. या क्लिपमध्ये त्यांनी आपल्यासोबत झालेल्या विश्वासघाताबाबत बोलताना आपल्या मृत्यूला ही कंपनीच दोषी असल्याचे म्हटल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.



Source link

Karjat-Kalyan Railway Delay : सकाळी 7 पासून कर्जत- कल्याण रेल्वे वाहतूक विस्कळीत Abp Majha

0
Karjat-Kalyan Railway Delay : सकाळी 7 पासून कर्जत- कल्याण रेल्वे वाहतूक विस्कळीत Abp Majha



<p>कर्जत – कल्याण रेल्वे वाहतूक विस्कळीत , सकाळी 7 पासून कर्जत- कल्याण रेल्वे वाहतूक विस्कळीत&nbsp;</p>



Source link