Monday, July 13, 2026
Home Blog Page 2871

“माझ्या गाडीचे नट-बोल्ट सैल केले होते, माझा जीव जाता जाता वाचला”, भाजप बड्या नेत्याचं खळबळजनक विधान

0
“माझ्या गाडीचे नट-बोल्ट सैल केले होते, माझा जीव जाता जाता वाचला”, भाजप बड्या नेत्याचं खळबळजनक विधान


एटीएसनेही अनेक मंत्र्यांना सांगितलंय की, तुम्ही तुमच्या लोकांना सावध करा. कारण काही विदेशी शत्रू तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा मित्र, निकटवर्तीय किंवा कार्यालयातील कर्मचारी यांचा वापर करतात. त्यांना काही क्लिप पाठवल्या जातात, संबंधित क्लिप डाऊनलोड करायला सांगितलं जातं, त्यानंतर संबंधित मोबाईल तुमच्या आसपास असला तरी तुमची प्रत्येक गोष्ट पाकिस्तानपर्यंत पोहोचते. त्यामुळे अनेक लोकांना सावधान केलं आहे, अशी खळबळजनक माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.



Source link

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती स्थापन करावी: गोपीचंद पडळकर

0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती स्थापन करावी: गोपीचंद पडळकर


मुंबई : महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे हजारो वर्षांचा सांस्कृतीक वारसा घेवून उभी आहेत, अनेक प्राचीन मंदिरांच्या जिर्णोद्धाराची गरज आहे. यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार समिती’ स्थापन व्हावी अशी मागणी विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून ही मागणी केली. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्याचं संपूर्ण आयुष्य मंदिर जिर्णोद्धार कार्यात वाहिलं, त्यामुळे राज्यातील प्राचीन मंदिरांच्या जिर्णोद्धाचे कार्य सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या नावाची समिती स्थापन करावी. या समितीच्या कार्यात डेक्कन महाविद्यालय आणि पुरातत्व खात्याची घेता येईल असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. 

 

काय आहे निवेदनात? 

हिंदोस्थानचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. आधुनिकतेची शिखरं महाराष्ट्र मोठ्या दिमाखाने मिरवतोय. हा सर्व डोलारा उभा आहे तो महाराष्ट्राच्या प्राचिन संपन्नतेवर. या इतिहासाची साक्षं देणारी हजारो वर्षांपूर्वीची मंदिरं आजही उभी आहेत. आपल्या भव्य दिव्य संस्कृती परंपरेची साक्ष देत आहेत. या मंदिरांकडे पाहिलं तरी नव्या काळात उर्जा मिळते.

सध्या पवित्र श्रावण महिना सुरु आहे. त्या निमित्तानं राज्यभरातील शिव मंदिरांना भेटी देण्यासाठी भाविक लाखोंची गर्दी करतायत. शिव मंदिरांसह हेमाडपंथी वास्तूरचना असलेल्या अनेक प्राचीन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याची गरज समोर येते आहे. यासाठी डेक्कन महाविद्यालय, तसेच पुरातत्त्व विभागाची मदत घेता येईल. मंदिर जिर्णोद्धारासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती’ गठीत करावी. या समितीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व प्राचीन मंदिराचे सर्वेक्षण करता येईल. राज्यशासनापुढे समितीने अहवाल सादर केल्यानंतर जिर्णोद्धाराच्या दिशेने योग्य पावलं टाकता येतील.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मॉंसाहेबांनी संपूर्ण आयुष्य मंदिर जिर्णोद्धार कार्यात वाहिलं. मंदिरांसोबत त्या नवभारताची निर्मितीही करत होत्या. देशाच्या सीमानिश्चिती करत होत्या. जिर्णोद्धार कार्यातून स्थानिक स्तरावर त्यामार्गे मोठे उद्योग निर्माण झाले. बाजारपेठा तयार झाल्या. त्यातून तत्कालीन अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. अहिल्यादेवींची दूरदृष्टी आम्हाला आपणात दिसते. त्यामुळे आपल्या हातून हे जिर्णोद्धार कार्य नक्की पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. 

ही बातमी वाचा: 

 





Source link

Aditya Thackeray : “..हा तर खोके सरकारच्या नाकर्तेपणाचा ढळढळीत पुरावा..!” श्वेतपत्रिकेवर आदित्य ठाकरेंचा संताप

0
Aditya Thackeray : “..हा तर खोके सरकारच्या नाकर्तेपणाचा ढळढळीत पुरावा..!” श्वेतपत्रिकेवर आदित्य ठाकरेंचा संताप


श्वेतपत्रिकेत वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस-टाटा, बल्क ड्रग पार्क, सेफ्रॉन उद्योगांचा उल्लेख असताना, महाराष्ट्रापासून दूर ढकललेल्या इतर उद्योगांचा उल्लेख करण्यात आलेला नाही – वैद्यकीय उपकरण पार्क वसौर ऊर्जा उपकरणे पार्क बल्क ड्रग पार्क बद्दलच्या उल्लेखावरून तर हे सिद्ध होते की, मोठ्या प्रमाणात औषध उत्पादनासाठी महाराष्ट्र हा सर्वतोपरी सर्वोत्तम पर्याय असूनही हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले गेले.



Source link

हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला चांगलंच भोवलं, तात्काळ निलंबन आणि अटक

0
हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला चांगलंच भोवलं, तात्काळ निलंबन आणि अटक


विद्यार्थ्यांना शिकवताना व त्यांना एखादं उदाहरण देताना किती काळजीपूर्वक दिलं पाहिजे, याचे प्रत्यंतर देणारी घटना समोर आली आहे. एखादं चुकीचं उदाहरण सबंधित शिक्षकाला किती महागात पडू शकतं याचाच प्रत्यय पुण्यात आला आहे. हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं एका प्राध्यापकाला चांगलच भोवलं आहे. देव-देवतांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्राध्यापकाला अखेर कॉलेजमधून निलंबित कऱण्यात आलं आहे. अशोक ढोले असं या प्राध्यापकाचं नाव आहे. पुण्यातील सिम्बायोसिस महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे.



Source link

उजव्या पायातला काढायचा होता रॉड; रुग्णाच्या डाव्या पायावरच केली शस्त्रक्रिया, नाशिकमधील डॉक्टरचा प्रताप

0
उजव्या पायातला काढायचा होता रॉड; रुग्णाच्या डाव्या पायावरच केली शस्त्रक्रिया, नाशिकमधील डॉक्टरचा प्रताप


Nashik news : रुग्णाच्या उजव्या पायात घातलेला रॉड काढायचा होता. मात्र डॉक्टरांनी त्याच्या डाव्या पायावरच शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे.



Source link

Raj Thackeray on Na Dho Mahanor : ना. धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं

0
Raj Thackeray on Na Dho Mahanor : ना. धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं



Raj Thackeray on Na Dho Mahanor : ना. धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं

“ना.धो. महानोर ह्यांचं आज निधन झालं. बहिणाबाई चौधरी आणि बालकवी ह्यांच्या कवितेचा वारसा ना.धो. नी समृद्ध केला. ना.धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ ही आणि अशी अनेक ना.धों. महानोरांची गीतं महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.  २०१९ ला माझ्या एका भाषणानंतर ना.धो. नी मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जे लिहिलं होतं, ती माझ्या आयुष्यात मला मिळालेली मोठी पोचपावती. ना.धो. महानोरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.” अशा शब्दात राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.



Source link

‘प्रिय महानोर..’

0
‘प्रिय महानोर..’


BLOG : महानोर तुम्हीच सांगा आता, या भुईच्या दानाचे करायचे काय?   

तुम्ही गेलात आणि शिवारं उदासली.
रानामळ्यातली हातातोंडाशी आलेली तेजतर्रार पिकं मलूल झाली.

गोठ्यातल्या गायी मौन झाल्या, 
माना तुकवून उभी असलेली कुसुंबी झाडं थिजली

उजाड माळांवरुन भिरभिरणारं वारं सुन्न झालं!
हिरव्याकंच घनदाट आमराईने शांततेचं काळीज चिरणारी किंकाळी फोडली!
विहिरींच्या कडाकपारीत घुमणारे पारवे स्तब्ध झाले

गावाकडच्या वाटेवरल्या पाऊलखुणा गहिवरल्या
घरट्यांतल्या पाखरांचा किलबिलाट निमाला

उंच गगनात विहरणारे पक्षांचे थवे एकाएकी विखुरले
पाऊसओल्या मातीस गलबलून आले

तुम्ही गेलात अन् वसुंधरेची हिरवाईही रुसली
अजिंठ्यातली चित्रे गदगदली, 
वेरूळच्या लेण्यांचे हुंदके दाटले
पाऊसधाराही गहिवरल्या

सखीच्या चांदणगोंदणातली नक्षी फिकी झाली
रानातल्या पाऊलवाटांवर रुळणारा पैंजणनाद विरुनी गेला

आकाश पांघरोनी मन दूरदूर गेले
भरदुपारीच रानात झाली एककल्ली सुनसान सांजवेळ

‘डोळ्यांच्या गलबतांतले मनमोर’ निघून गेले
गात्रात कापणारा ओला पिसारा सावनी हवेआधीच घुसमटला
केसांत मोकळ्या या वेटाळुनी फुलांना, उमलून कुणी न येई आता!
 
‘मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यांत गुंतलेले’ आता शोधायचे कोठे?
गाण्यात सांडलेलं काचबिंदी नभ उभं वेचायचे कसे?

मातीच्या गर्भातल्या बीजांचे, सांगा आता अश्रू कुणी पुसावे?
गहिवरल्या बांधांनी कुठे पहावे?

पाऊस सरता पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटेल, 
त्याच्याशी खेळायचे कसे?

आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपेनासा होईल 
तेव्हा त्याला सावरायचे कसे?

गाभुळ्या चिंचेला नवतीचा भर पोटी धरवणार नाही 
तिला झुलवायचे कसे?

सरते शेवटी इतके तरी सांगा, 
अक्का गेल्यानंतर तुम्ही उदास झालात अन् त्यांच्या वाटेवर निघून गेलात
यंदाच्या मौसमात जुंधळयास चांदणे लगडलेच नाही तर तुम्हाला शोधायचे कुठे?

आम्हाला तुमच्याशी बोलायचे नाही, आम्ही रूसलोय तुमच्यावर. 
आम्ही हे बोलू तरी शकतो पण, पण – 

गोठ्यातल्या गायींच्या अश्रुंना तर आवाजही नाही 
काळ्यातांबड्या मातीतल्या हिरवाईला तर वाणी ही नाही!

महानोर तुम्हीच सांगा आता, त्यांनी रडायचे तरी कुणाच्या कुशीत?
ते सारे हमसून हमसून रडताहेत, त्यांचे सांत्वन तरी करायचे कुणी?
सांगा त्यांचे सांत्वन करायचे कुणी?

पळसखेडची गाणी आता मुकी होतील, ती गायची कुणी
रातझडीचा पाऊस काळजात घर करुन राहील, त्याला निरोप द्यायचा कुणी?

या भुईच्या दानाचे करायचे काय, दान अर्ध्यावर टाकून गेलात तुम्ही!
तुम्ही असे जायला नको होते. नको होते..   

– समीर गायकवाड



Source link

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या व ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्षा करुणा फुटाणे यांचं निधन

0
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या व ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्षा करुणा फुटाणे यांचं निधन


त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ कृषीज्ज्ञ व सर्वोदयी कार्यकर्ते वसंतराव फुटाणे, मुले विनय व चिन्मय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या शेवटपर्यंत लढत राहिल्या. 



Source link

Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिक घटस्फोट घेणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार धक्कादायक वळण

0
Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिक घटस्फोट घेणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार धक्कादायक वळण


एकीकडे दीपा आणि कार्तिकच्या नात्यात दुरावा निर्माण होत असताना आता त्यांच्या मुलींच्या आयुष्यात देखील वादळ आलं आहे. दीपिका आणि कार्तिकी यांच्या आयुष्यात आलेला मुलगा हा कच असून, त्याने दोघींची फसवणूक केल्याचे देखील समोर आले आहे. आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन हाच दीपिका आणि कार्तिकी या दोघींनाही एकाच वेळी प्रेमात पाडून त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करत आहे. मात्र, ही गोष्ट आता दोघींच्याही लक्षात आली आहे. तर, आर्यन हा केवळ माझा आहे, असा हट्ट कार्तिकीने धरला आहे. तर, दीपिका आपल्या नात्यात मध्ये आल्याचा तिचा समज झाला आहे.



Source link

Solapur: सोलापुरात शतपावलीला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची भररस्त्यात हत्या

0
Solapur: सोलापुरात शतपावलीला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची भररस्त्यात हत्या


मिळालेल्या माहितीनुसार, सुरज विष्णू चंदनशिवे (वय, ४२) असे हत्या झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चंदनशिवे हे सांगोला तालुक्यातील वासूद- केदारवाडी येथे वास्तव्यास होते. ते बुधवारी रात्री जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराजवळ केदारवाडी रोडवर गेले. मात्र, या ठिकाणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून जाऊन त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी वार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री शतपावली करण्यासाठी गेलेले चंदनशिवे दिवस उजडला तरी घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी चंदनशिवे यांचा मृतदेह वासूद- केदारवाडी रोडनजीक आढळून आला.



Source link