Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2866

Nashik: १५ लाख दे, दंडाची रक्कम कमी करतो; लाच घेणाऱ्या तहसीलदाराला घडली जन्माची अद्दल!

0
Nashik: १५ लाख दे, दंडाची रक्कम कमी करतो; लाच घेणाऱ्या तहसीलदाराला घडली जन्माची अद्दल!


नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम एक कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपये दंड ठोठावण्यात आला. परंतु, सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याच्या जमिनीच्या मालक यांनी स्पष्ट केले. जमीन मालकाने सांगितल्यानुसार याच्या पडताळणीसाठी संशयित बहिरम यांनी जमिनीच्या मालकांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षणसाठी बोलावले. एकदा झालेला आदेश फेरतपासणीसाठी घेण्यासाठी मागणी करण्यात आली. त्यावेळी बहिरम यांनी जमीनीच्या मालकाकडे १५ लाखांची मागणी केली.



Source link

Pune terrorist arrest : पुण्यात अटक करण्यात आलेले ते दहशतवादी देशात अनेक ठिकाणी करणार होते घातपात; तपासात उघड

0
Pune terrorist arrest : पुण्यात अटक करण्यात आलेले ते दहशतवादी देशात अनेक ठिकाणी करणार होते घातपात; तपासात उघड


कोथरूड येथे दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली होती. हे दोघे एनआयएला हवे होते. या दोघांना अटक केल्यावर त्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले. या दोघांना पुण्यातील कोंढवा भागात राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२ रा, कोंढवा) याला तसेच आर्थिक मदत करणारा रत्नागिरी येथील मेकॅनिकल इंजिनीअर सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७) याला देखील अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरात घातपाताचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कटात झुल्फिकार अली बडोदावाल्याचा सहभाग निष्पन्न झाल्यावर त्याला देखील एटीएसने ताब्यात घेतले.



Source link

Benke VS Sonawane: अतुल बेनके, शरद सोनवणे आमने-सामने; दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

0
Benke VS Sonawane: अतुल बेनके, शरद सोनवणे आमने-सामने; दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी



<p>Benke VS Sonawane: अतुल बेनके, शरद सोनवणे आमने-सामने; दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी</p>



Source link

ISIS: ‘आयसिस’ कनेक्शनप्रकरणी सहाव्या आरोपीला अटक; एनआयएची कारवाई

0
ISIS: ‘आयसिस’ कनेक्शनप्रकरणी सहाव्या आरोपीला अटक; एनआयएची कारवाई


ISIS Maharashtra Module Case: एनआयएने ठाण्याच्या भिवंडी येथून महाराष्ट्रामध्ये आयसिस मोड्यूलशी संबंध असल्याच्या आरोपाखाली आणखी एकाला अटक केली.



Source link

Nashik: नाशिकमध्ये पोलीस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
Nashik: नाशिकमध्ये पोलीस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, भरत पोपट जाधव असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भरत हा शुक्रवारी पहाटे त्याच्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी गेला. मात्र, भरत धावत असताना त्याच्या छातीत दुखू लागले. यानंतर तो जमीनीवर कोसळला. यावेळी सोबतच्या मित्रांनी त्याला तत्काळ सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. पोलीस दलात भरतीचे स्वप्न घेऊन दररोज सरावाला जाणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली.



Source link

Kishor Patil Call Recording : होय मी पत्रकाराला शिव्या दिल्या, आमदार किशोर पाटील यांची कबुली

0
Kishor Patil Call Recording : होय मी पत्रकाराला शिव्या दिल्या, आमदार किशोर पाटील यांची कबुली



Kishor Patil Call Recording : होय मी पत्रकाराला शिव्या दिल्या,  आमदार किशोर पाटील यांची कबुली

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एका स्थानिक पत्रकाराला फोनवरून शिवीगाळ केलीय. त्याची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. भडगाव तालुक्यातील एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून, हत्या केल्याची घडना घडलीय. या मुलीच्या पालकांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली. बातमीत त्याचाच उल्लेख मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी असा केल्याने, किशोर पाटील यांनी पत्रकाराला अश्लील शिवीगाळ केलीय. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ केल्याची कबुलीही दिलीय.



Source link

Mrunal Kulkarni: ‘या’ चित्रपटात दिसणार मृणाल कुलकर्णीचे संपूर्ण कुटुंब

0
Mrunal Kulkarni: ‘या’ चित्रपटात दिसणार मृणाल कुलकर्णीचे संपूर्ण कुटुंब



Subhedar Movie: दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

Kannad Ghat : कन्नड घाटात ११ ऑगस्टपासून अवजड वाहतुक बंद; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

0
Kannad Ghat : कन्नड घाटात ११ ऑगस्टपासून अवजड वाहतुक बंद; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश


अॅड. ज्ञानेश्वर बागूल, अॅड. निलेश देसले आणि अॅड. श्रीकृष्ण चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी हा निर्णय कोर्टाने दिला. दरम्यान, या निर्णयामुळे आता औट्रम घाटातून यापुढे फक्त दुचाकी, चारचाकी वाहने, राज्यातील आणि परराज्यातील महामंडळाच्या प्रवासी बस, लक्झरी बस, आवश्यकता भासल्यास क्रेन, फायर ब्रिगेड गाड्या, शेती उपयोगी ट्रॅक्टर, एम्ब्युलन्स, विशेष परिस्थितीत संरक्षक दलाची वाहने येथून प्रवास करू शकणार आहे.



Source link

भिवंडीच्या पडघ्यात NIA चा छापा; दहशतवाद्यांचा कॅशिअर अकीब नाचनला घेतलं ताब्यात

0
भिवंडीच्या पडघ्यात NIA चा छापा; दहशतवाद्यांचा कॅशिअर अकीब नाचनला घेतलं ताब्यात


NIA Raid Bhiwandi : ATS आणि NIA कडून सध्या महाराष्ट्रात (NIA Raid Bhiwandi) छापेमारी केली (Maharashtra ATS, NIA module) जात आहे. त्याच आज भिवंडीतील पडघा येथे छापेमारी करण्यात आली. आयएसआयशी संबध असल्या प्रकरणी अकीब नाचन यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. अकीब नाचन (Aqib Nachan) याला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

काही दिवसांपासून NIA चं मॉड्यूल (Maharashtra ATS, NIA module)) महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे. या मोड्यूलचा भाग म्हणून भिवंडीतील पडघा येथे छापेमारी करण्यात आली आहे. यापूर्वी पाच जणांना NIA ने अटक केली आहे. त्यात मुंबईतून एक, पडघ्यातून दोन, पुण्यातून दोन अशा पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. भिवंडीतील पडघ्यातून अटक केलेले झुल्फिकार अली बरोडावाला आणि जुबेर खान हे दोघे पडघ्यात भाड्याने राहत होते. या दोघांना अकीब नाचन याने आर्थिक मदत केल्याचा दावा NIA ने केला आहे. त्यामुळे अकीब नाचन याच्या घरावर NIA ने छापेमारी करुन त्याला ताब्यात घेतलं आहे. 

अकीब नाचन कोण आहे?

अकीब नाचन याला गुजरात ATS ने 2022 मध्ये ताब्यात घेतलं होतं. ISIS च्या काही संस्था आहेत त्यातील अल सुफा या संघटनेशी त्याचा संबंध होता. त्यानंतर 2023 मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्याने झुल्फिकार अली बरोडावाला आणि जुबेर खान यांना राहण्यासाठी भाड्याने फ्लॅट दिला होता आणि दोघांना आर्थिक मदतही करत होता. गुजरात ATS ने 2022मध्ये ताब्यात घेण्यापूर्वी त्याने आलिशान बंगला बांधला होता, या बंगल्यासाठी त्याच्याकडे पैसे आले कुठून याचा आता NIA कडून तपास केला जात आहे.

NIA, ATS ने पडकलेले एकमेकांच्या संपर्कात असल्याचं समोर

एनआयए आणि एटीएस या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी उद्ध्वस्त केलेली पुण्याच्या कोंढवा भागातील दहशतवाद्यांची मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात होती आणि एकमेकांना मदतही करत होती, हे आता स्पष्ट झालं आहे. कारण एनआयएने अटक केलेला झुल्फीकार अली बरोडावाला हा एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनुस साकी या दोघांना पैसै पुरवत असल्याच स्पष्ट झालं आहे. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बरोडावालाचा ताबा घेऊन त्याची चौकशी सुरु केली.  

हेही वाचा-

महाराष्ट्रातून एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला, 15 ऑगस्टला देशात घातपाताचा होता कट



Source link

Sindhutai Mazi Mai: “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची”, नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Sindhutai Mazi Mai: “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची”, नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला



Colors marathi new Serial: चिंधी अभिमान साठे पासून सिंधुताई सपकाळ कश्या घडल्या हे “सिंधुताई माझी माई” या मालिकेत पाहायला मिळणार आहे.



Source link