Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रPune terrorist arrest : पुण्यात अटक करण्यात आलेले ते दहशतवादी देशात अनेक...

Pune terrorist arrest : पुण्यात अटक करण्यात आलेले ते दहशतवादी देशात अनेक ठिकाणी करणार होते घातपात; तपासात उघड

Pune terrorist arrest : पुण्यात अटक करण्यात आलेले ते दहशतवादी देशात अनेक ठिकाणी करणार होते घातपात; तपासात उघड

[ad_1]

कोथरूड येथे दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली होती. हे दोघे एनआयएला हवे होते. या दोघांना अटक केल्यावर त्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले. या दोघांना पुण्यातील कोंढवा भागात राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२ रा, कोंढवा) याला तसेच आर्थिक मदत करणारा रत्नागिरी येथील मेकॅनिकल इंजिनीअर सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७) याला देखील अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरात घातपाताचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कटात झुल्फिकार अली बडोदावाल्याचा सहभाग निष्पन्न झाल्यावर त्याला देखील एटीएसने ताब्यात घेतले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments