Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2865

माझ्या हिश्श्याचे किस्से: शर्तें लगाई नहीं जातीं, दोस्ती के साथ; कीजिए मुझे क़ुबूल, मेरी हर कमी के साथ…

0
माझ्या हिश्श्याचे किस्से: शर्तें लगाई नहीं जातीं, दोस्ती के साथ; कीजिए मुझे क़ुबूल, मेरी हर कमी के साथ…


रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक31 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

चित्रपट निर्माता राहुल रवैल यांच्यासमवेत ऋषी कपूर.

  • ऋषी कपूर आणि राहुल रवैल यांच्या मैत्रीची गोष्ट

ऋषी कपूर आणि राहुल रवैल यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. एक किस्सा त्यावेळचा आहे, जेव्हा राहुल काही कारणाने ऋषी कपूर यांच्यावर नाराज झाले होते. त्यांना राजी करण्यासाठी ऋषी यांनी काय केले, त्याची ही गोष्ट…

वडीलधारे लोक नेहमी असं सांगतात की, तुम्हाला एखाद्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याकडचे कर्मचारी आणि त्याचे मित्र किती जुने आहेत ते पाहा. चित्रपटसृष्टीतील मैत्रीचे मला दिसलेले अनोखे उदाहरण म्हणजे ऋषी कपूर आणि राहुल रवैल यांच्या जिवलग दोस्तीचे. खरं तर ऋषी कपूर आता या जगात नाहीत, तरीदेखील या दोघांच्या मैत्रीचे आजही उदाहरण दिले जाते.

राहुलजी आणि ऋषी कपूर हे ३३ वर्षांपासूनचे माझेही खूप जवळचे मित्र. सकाळी उठल्याबरोबर एकमेकांना फोन करणे हा राहुल आणि ऋषी कपूर या दोघांचा आयुष्यभराचा दिनक्रमच होता. दोघांच्याही स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक होता. दोघांचे अनेक गोष्टींवर एकमेकांशी फारसे पटत नसे, काही वेळा त्यांच्यात इतका वाद व्हायचा की, दोघांपैकी एक जण फाेन ठेवून द्यायचा. पण, परस्परविरोधी विचार असूनही त्यांच्या मैत्रीत मात्र कधीही फरक पडला नाही. राहुलजींनी दिग्दर्शनाला सुरुवात केली तेव्हा ‘गुनेहगार’ हा पहिला चित्रपट ऋषी कपूर यांच्यासोबत केला. हा चित्रपट चालला नाही, पण तरीही या दोघांच्या मैत्रीत अंतर आले नाही.

या दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. राहुलजींचा मुलगा भरत याचा साखरपुडा होता, पण ऋषी कपूर येऊ शकले नाहीत. ते गोव्यात डेव्हिड धवन यांच्या ‘चश्मेबद्दूर’च्या चित्रीकरणात व्यग्र होते. बस्स, त्यामुळे राहुलजी नाराज झाले आणि त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत बोलणे बंद केले. ऋषी कपूर यांनी खूप प्रयत्न केले. बऱ्याच मित्रांनीदेखील राहुलजींना समजावले, पण त्यांनी ऐकले नाही. आम्ही सगळे जवळचे लोक ऋषी कपूर यांना ‘चिंटूजी’ म्हणायचो. चिंटूजींचा मला फोन आला आणि म्हणाले, “रूमी, तू तुझ्या घरी डिनर पार्टी ठेव. सगळ्या मित्रांना बोलव. राहुल आणि मलाही बोलव. पण, जर राहुलने विचारले की चिंटू येणार आहे का? तर तो नाही म्हणाला, असं सांग.’ असं का करायचं हे विचारल्यावर ते म्हणाले, ‘यार, तो माझ्यावर नाराज आहे. तो तुझ्या घरी येईल तेव्हा समोरासमोर भेट होईल आणि त्याची माफी मागेन. आमचा पॅचअप होऊन जाईल. खूप मिस करतोय मी त्याला..’

मी डिनर पार्टी ठेवली. मला चांगलं आठवतंय, त्या वेळी सगळ्यात आधी ऋषी कपूर आले होते. ते राहुलजींसोबत पुन्हा मैत्री करण्यासाठी खूप आतुर होते. त्यानंतर बोनी कपूर साहेब, टूटू शर्मा, डेव्हिड धवन, साजिद नाडियादवाला, श्रीदेवीजींसह माझे २०-२५ मित्र आले. हॉलबाहेरच्या टेरेसवर आम्ही सगळे गप्पा मारत होतो. जशी डोअर बेल वाजायची, चिंटूजी सगळ्यात आधी वळून मुख्य दरवाजाकडं बघायचे, राहुल तर आला नसेल ना? शेवटी राहुलजी आले. ते जसे आले, तसे चिंटूजी त्यांना आणायला गेले. चिंटूजींना पाहून ते रागाने माझ्या रायटिंग रूममध्ये निघून गेले. चिंटूजी रायटिंग रूममध्ये आले, तर ते दुसऱ्या दाराने बाहेर पडले. नंतर ते बेडरूममध्ये गेले, तर चिंटूजीही तिथं गेले. तिथून राहुलजी घराच्या टेरेसवर आले. पार्टीमध्ये आलेले सगळे जण आश्चर्यचकित होऊन पाहत होते की चिंटूजी राहुलजींच्या मागे-मागे फिरत आहेत आणि राहुलजी त्यांच्याशी बोलायचे टाळत होते.

थोड्या वेळाने राहुलजी मला म्हणाले, ‘तू मला का नाही सांगितलंस की चिंटूदेखील येणार आहे, मी रागावलोय तुझ्यावर..’ मी त्यांना, ‘राहुलजी, आता झालं गेलं विसरा..’ म्हणालो, तर ते रागारागात हॉलमध्ये गेले आणि तिथे बसलेल्या माझ्या धाकट्या मुलीशी गप्पा मारू लागले. चिंटूजीही हॉलमध्ये गेले, मी आणि माझी पत्नीदेखील तिथे गेलो. ज्या सोफ्यावर राहुलजी बसले होते, तो बराच दबला असल्यामुळे राहुलजी उठू शकले नाही. चिंटूजी पटकन् आले अन् त्यांच्याजवळ बसले. त्यांनी राहुलजींना उठू दिले नाही. मी पण समोर येऊन बसलो. चिंटूजी म्हणाले, ‘यार रूमी, समजाव ना राहुलला. सगळं आयुष्य सोबत घालवलंय. आता म्हातारपणात एकमेकांवर रागवायचं, याला काही अर्थ आहे का? कोणावरही या जगातून जाण्याची वेळ येऊ शकते आणि ज्याला आधी मृत्यू येईल, त्याला म्हातारपणात मैत्री तोडल्याची कायमची सल राहील.’ यावर राहुलजी मला म्हणाले, ‘हा बघ, इमोशनल करतोय मला.’ मीही म्हणालो, ‘हो, ते तुमच्यावर प्रेम करतात, म्हणूनच इमोशनल करताहेत..’ मग तेथे ऋषी कपूर आणि राहुल रवैल यांच्यात पॅचअप झाला. ऋषी कपूर इतके मोठे स्टार, एका स्टारचे वडील अन् स्टारचे पुत्र, तरीही ते मैत्रीला किती महत्त्व देत होते. यावर वसीम बरेलवी यांचा एक शेर…

शर्तें लगाई नहीं जातीं, दोस्ती के साथ कीजिए मुझे क़ुबूल, मेरी हर कमी के साथ।

राहुलजींचे वडील एच. एस. रवैल लाहोरहून आले होते, तेव्हा त्यांच्या बाबतीतही असेच घडले होते. तेसुद्धा तीन मित्र होते. एक विनोदवीर सुंदरजी, एक रिडकूजी आणि स्वतः एच. एस. रवैलजी. रिडकूजींची उंची अडीच ते तीन फूट होती. ते ठेंगणे होते आणि त्यांचे या जगात कोणीही नव्हते. त्यामुळे ते रैवल साहेबांच्या घरी सख्ख्या भावाप्रमाणे राहात होते. राहुलजी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. राहुलजी त्यांना चाचाजी म्हणत. रिडकूजी, एच. एस.रवैलजींच्या चित्रपटातही काम करायचे. राहुलजींनी मला सांगितले, की त्यांना एक आजार होता.. एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना दिसायचेच नाही, कधी ऐकू यायचे नाही, तर कधी बोलता यायचे नाही. मी राहुलजींना म्हणालो, ‘हे तर मजेदार पात्र आहे, याचा उपयोग सिनेमात करायला पाहिजे.’

जेव्हा मी ‘मुझसे शादी करोगी’ची पटकथा लिहायला बसलो, तेव्हा हे पात्र मी त्यात घेतले. साजिद आणि डेव्हिड साहेबांनाही आवडले. कादर खान यांना त्याबद्दल ऐकवल्यावर तेही खुश झाले. पण एकेदिवशी माझा धाकटा भाऊ अमान जाफरी, जो राहुल रवैल यांच्या ‘जो बोले सो निहाल’ चित्रपटाची कथा लिहित होता, त्याने सांगितले की, राहुलजींनीही त्यांच्या ‘जो बोले सो निहाल’मध्ये असेच पात्र घेतले आहे. मी साजिद आणि डेव्हिड साहेबांना हे सांगितले तेव्हा ते म्हणाले की, रिडकू अंकल राहुलजींचे आहेत. पहिला अधिकार त्यांचा आहे, पण एकदा बोलून बघा. मी राहुलजींना फोन केला आणि म्हणालो, ‘अमानने मला सांगितलं की त्याने तुमच्या चित्रपटात रिडकू अंकलचे पात्र घेतले आहे आणि मी पण ते ‘मुझसे शादी करोगी’मध्ये लिहिले आहे. बघा, इतकी वर्षे ना तुम्ही लिहिलं ना मी. आता दोघांनी लिहिलंय. काय करायचं राहुलजी? तुम्ही म्हणाल तसे मी करेन.’ राहुलजींनी मला विचारले की, तुझ्या चित्रपटात हे पात्र कथा आणि पटकथा पुढे नेण्यास मदत करतेय की नाही? मी त्याला होकारार्थी उत्तर दिल्यावर ते म्हणाले की, मी फक्त कॉमेडी ट्रॅक टाकला आहे. त्यामुळं माझ्या चित्रपटातून ते काढून टाकतो. आणि अशा प्रकारे एवढे मोठे काम त्यांनी फोनवरूनच हलके केले. अशी असते मैत्री आणि नाते जपण्याची गोष्ट. त्यानंतर ‘मुझसे शादी करोगी’ प्रदर्शित झाला आणि त्यात कादर खान यांनी साकारलेली दुग्गल साहब ही व्यक्तिरेखा सुपरहिट झाली, हे साऱ्या जगाला माहीत आहे. पण, याचं श्रेय राहुलजींच्या भलेपणाला आणि त्यांच्यासोबतच्या माझ्या मैत्रीला जातं.

या वळणावर, राहुलजींनी दिग्दर्शित केलेल्या आणि मी लिहिलेल्या ‘अंजाम’ चित्रपटातील हे गाणे ऐका…

बड़ी मुश्किल है, खोया मेरा दिल है.. कोई उसे ढूंढ़ के लाए ना…

स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

समकाल: निनांदीला बारा बुद्ध्या…

0
समकाल: निनांदीला बारा बुद्ध्या…




समकाल:निनांदीला बारा बुद्ध्या…



Source link

पुस्तकामागच्या गोष्टी: टिपलेल्या विसंगती अन् न माजवलेले अवडंबर

0
पुस्तकामागच्या गोष्टी: टिपलेल्या विसंगती अन् न माजवलेले अवडंबर


आदूबाळ6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रत्येक भाषेचं आपापलं वैशिष्ट्य असतं. त्या भाषेतले काही काही शब्द ‘अ-भाषांतरणीय’ असतात. कितीही प्रयत्न केला तरी मूळ शब्दाचा स्वाद भाषांतरित शब्दाला येत नाही. इंग्रजीमधला ‘Irreverant’ हा असाच एक शब्द आहे. कोशात त्याचा अर्थ ‘अनादर करणारा’ असा आहे, पण ज्या संदर्भात तो वापरला जातो त्या दृष्टीने विचार करता ‘देव्हारे न माजवणारा’ असा भावार्थ अधिक समर्पक आहे. साहित्यात अशा प्रकारच्या लेखनाला विशेष स्थान आहे, कारण अशी पुस्तकं प्रस्थापित समजुतींना, धारणांना, समाजमान्यतांना धक्का देत काही मूलभूत प्रश्न विचारतात. जोसेफ हेलर यांचं सुप्रसिद्ध ‘कॅच-२२’ हे पुस्तक अशा देव्हारे न माजवणाऱ्या साहित्याचं उत्तम उदाहरण समजलं जातं.

हेलरचा साहित्यिक वंशज शोभावा असा लेखक नव्या सहस्रकाच्या सुरूवातीला उदयाला आला. मोहम्मद हनीफ त्यांचं नाव. हनीफ यांचा जन्म पाकिस्तानातला. त्यांनी पाकिस्तानी हवाई दलात प्रवेश मिळवला आणि वैमानिकाचं प्रशिक्षण घेतलं. पण लवकरच त्यांच्या ध्यानात आलं की, आपला ओढा पुस्तकांकडे आहे. इंग्लंडमध्ये येऊन त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि बीबीसीमध्ये रुजू झाले.

२००८ मध्ये मोहम्मद हनीफ यांची ‘अ केस ऑफ एक्सप्लोडिंग मँगोज’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीची तुलना अनेकांनी जोसेफ हेलर यांच्या ‘कॅच-२२’शी केली. यात मोहम्मद हनीफ यांनी आपल्या वैमानिकी प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. झिया-उल-हक यांच्या ‘अपघाती’ निधनाभोवती रचलेलं हे एक मनोरंजक कथानक आहे. कादंबरीचा नायक अली शिग्री हा वैमानिक होण्याचं प्रशिक्षण घेत असतो. त्याचा मित्र ओबेद पळून जातो आणि अली संशयाच्या जाळ्यात अडकतो. झिया-उल-हक त्यांच्या सैनिकी अकादमीत प्रमुख पाहुणे म्हणून येणार असतात. त्यांच्या सुरक्षारक्षकांना अली शिग्री अनेक कारणांनी संशयास्पद वाटत राहतो. पण, झिया-उल-हक यांना ठार करायला अनेक लोक उत्सुक असतात – रशियन केजीबी ते तेव्हा उदयोन्मुख असलेलं तालिबान ते (चक्क) एक कावळा! कसलेल्या लेखकाप्रमाणे मोहम्मद हनीफ संशयाची सुई फिरवत ठेवतात. झिया-उल-हक यांचा मृत्यू हा खरंच अपघात होता का? त्यात अलीचा किंवा ओबेदचा हात होता का? या सगळ्या घटनाक्रमात कावळ्याचा काय सहभाग होता? हे सगळे प्रश्न कादंबरीत तुफान मनोरंजक पद्धतीने सुटतात. ही कादंबरी हे एक तपशिलात काढलेलं व्यंगचित्र आहे. २००८ च्या बुकर ‘लाँग लिस्ट’मध्ये या कादंबरीचा समावेश झाला होता. (या लाँग लिस्टमधले आणखी दोन लेखक या लेखमालेत भेटणार आहेत!)

त्यानंतर दहा वर्षांनी प्रकाशित झालेली ‘रेड बर्ड्स’ ही कादंबरी खरं तर ‘..एक्सप्लोडिंग मँगोज’पेक्षा श्रेष्ठ आहे. गेल्या तीस वर्षांतल्या अमेरिकेच्या परराष्ट्र (आणि / किंवा युद्ध) धोरणाची मनमुराद खिल्ली मोहम्मद हनीफ या कादंबरीतून उडवतात. मध्य-पूर्वेमधील एका (मुद्दाम अनाम ठेवलेल्या) देशातल्या एका निर्वासित छावणीवर बॉम्ब टाकायची जबाबदारी एका अमेरिकी वैमानिकाला दिली जाते. पण, त्याचं विमान अपघातग्रस्त होतं आणि त्याच छावणीतला ‘मोमो’ नावाचा टीन एजर मुलगा त्याला वाचवतो. मोमो परिस्थितीमुळे चलाख बनला आहे. त्याला या छावणीतून सुटून जायचं आहे, शक्यतो अमेरिकेला. त्याने प्रयत्नपूर्वक अमेरिकी उच्चारही घोटवले आहेत. पण, घरी दुःखात असलेली आई आहे. तिचा थोरला मुलगा (मोमोचा भाऊ) काही महिन्यांपूर्वी एकाएकी गायब झाला आहे आणि त्यामागे अमेरिकी सैनिक असावेत, असा मोमोला संशय आहे. या कादंबरीतली दोन महत्त्वाची पात्रं सांगितल्याशिवाय राहवत नाही. पहिला आहे मोमोचा कुत्रा ‘मट’. कादंबरीतला काही भाग आपल्याला मटच्या ‘सर्वज्ञानी तत्त्वज्ञ’ दृष्टिकोनातून वाचायला मिळतो. दुसरी आहे, सतत छापील असंबद्ध बकबक करणारी एक अमेरिकी मनोवैज्ञानिक सल्लागार. चलाख मोमो तिचा कावा बरोबर ओळखतो. तो वैमानिक आपल्या देशी परततो का? मोमो आणि मट युद्धातून सुखरूप सुटतात का? अशा प्रश्नांच्या उत्तरासह या विविधरंगी पात्रांच्या अनुभवांतून मध्य-पूर्वेतील वास्तवाचे चटके वाचकाला समजू शकतात. एकूणातच, मोहम्मद हनीफ यांचं लेखन विनोदी, प्रहसनात्मक, प्रसंगी अतर्क्य असं आहे. पण, फक्त तितकंच नाही. विसंगती दाखवत मूलभूत प्रश्न विचारण्याचा त्यांनी शोधलेला तो एक अफलातून मार्ग आहे.

aadubaal@gmail.com



Source link

Ileana D’Cruz: इलियाना डिक्रूझने दिला गोंडस बाळा जन्म, शेअर केले नाव

0
Ileana D’Cruz: इलियाना डिक्रूझने दिला गोंडस बाळा जन्म, शेअर केले नाव


यापूर्वी इलियाने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर करत प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते. यातील पहिल्या फोटोत लहान मुलाचे कपडे होते. या छोट्याशा ड्रेसवर लिहिले होते की ‘आता साहसी प्रवास सुरू होणार आहे.’ तर, यातील दुसऱ्या फोटोत तिच्या गळ्यातील क्युट लॉकेट होते.ज्यावर ‘ममा’ असे लिहिले होते. अभिनेत्री इलियाना डिक्रूझने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘लवकरच येत आहे. माझ्या प्रिय बाळा, तुला भेटण्यासाठी आता मी फार काळ वाट पाहू शकत नाही.’ आता इलिया आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.



Source link

संभ्रमाचे मिथक: दोलायमान मध्यावर

0
संभ्रमाचे मिथक: दोलायमान मध्यावर


दत्ता पाटील11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘सत्तेला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही, विरोध करणारेच सत्तेत येऊ घातल्यावर हे राष्ट्र प्रगतीच्या शिखरावर आहे, असे समजावे,’ हा सरांना त्यांच्या विद्वान ग्रुपवरून आलेला मेसेज कालच त्यांनी फॉरवर्ड केला होता. त्यावरही जोडीदारांमध्ये चर्चा झाली. टीव्हीवर ऐकलेलं एकमेकांना ऐकवताना ते सगळे आनंदी दिसत होते.. कुठल्याही घामाशिवायचा, मोबदल्याशिवायचा हा आनंद, मलाही आपलं वर्तमान नि भविष्य भिरकावून देवून निवांत गाफील होऊन जाण्यासाठी उद्युक्त करत होता…

या गावाच्या पलीकडं फार मोठं वगैरे जग किंवा राष्ट्र असण्याची शक्यता नाही. राष्ट्र राष्ट्र म्हणून जे बोललं जातं ते आधी पटकन् डोळ्यापुढं देश म्हणून यायचं. नकाशा आणि गांधी-नेहरूंसह. म्हंजे मी खूप म्हातारा झाल्यामुळं जुन्या काळाला उगाळत बसतोय, असा समज झाला असंल, तर तो चुकीचाआहे. एकतीस लागलंय आता. वडील एक सहा चौसष्टचे. साठीचे झाले नुकतेच. पण, गेल्या पाच वर्षांपासून ‘साठ पासट आसंल आता वय आप्पाचं’ असं अनेक वेळा वेगवेगळ्या नातलगांच्या तोंडून ऐकत आलोय. जे जास्तीचं वाट्याला येईल, ते आधी पदरात पाडून घ्यावं, या विचारातून वडिलांनीही पाच वर्षांपूर्वीच पासष्ट वय स्वीकारून टाकलंय. ते लगेच तसे दिसायलाही लागले. त्यांचे गावातले, शिवारातले जोडीदार व्हाट्स ॲपवर येणाऱ्या राष्ट्राच्या वैश्विक प्रगतीबद्दलच्या माहितीवर रोज संध्याकाळी उत्साहानं बोलत राहतात. ‘भारत अमेरिकेच्या फक्त एक पाऊल मागे,’ हा लेख वाचून एक पाऊल म्हणजे नेमका किती कालावधी? एक दिवस की एक किलोमीटर की एक वर्ष की दहा वर्ष? यावर परवा सायंकाळी खूप तावातावानं चर्चा झाली होती. अनेक फेक बातम्यांवर वडील आणि त्यांच्या पिढीचा चटकन् विश्वास बसतो. दुसऱ्या दिवशी मी त्याबाबत पुराव्यासह गैरसमज दूर करण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी फेक बातमी ही मूळ सत्य म्हणून त्यांच्या मेंदूत घर करून बसते.

आता हळूहळू असं लक्षात येत चाललंय की, त्यांना हा खोटानाटा, भडक, अविचारी, अतिरंजित भवताल आवडू लागलाय. किंवा मूळ विदारक सत्यापासून कायम दूर राहण्यासाठीचं गुंगीचं आयतं औषध यंत्रणेनं त्यांना उपलब्ध करून दिलंय. हे आताचं राजकारण, हे आताचं धर्मकारण ही या राष्ट्राला तीव्र प्रगतिपथावर नेण्यासाठीची युक्ती आहे, असं त्यांना ठाम वाटतंय. खरं तर, पोट भरण्यासाठी करावं लागणारं शेतीकाम, धंदा हे त्यांच्या दृष्टीनं राष्ट्रावरच्या अखंड चर्चेत फार अडथळा ठरू लागलंय. पण, ‘आपण विश्वाचे म्होरके होणार म्हणल्यावर घोडामैदान जवळच आहे. त्यानंतरचं निवांत बसून खायचं आयुष्य हे अखंड चर्चेतून फक्त राष्ट्रशेवेकरता अर्पण करायचं भौ आप्पौ,’ असं कालच धान्याचा व्यापार करणारे वडिलांचे मित्र आमच्याकडं थकलेल्या उधारीतील निम्मे पैसे घेऊन जाण्याआधी बोलले होते.

आताही कडूलिंबाच्या झाडाखाली प्लास्टिकच्या खुर्चीत मी बसलेलोआहे. आतून टीव्हीचा खणखणीत आवाज येतोय. उजवीकडून शिवारातून बेडकांचा आणि डावीकडून टीव्हीत भसाभसा बोलणाऱ्या, भांडणाऱ्या माणसांचा. सारे सारखंच बोलत असल्यानं सगळी हळूहळू सारखीच ऐकायला यायला लागलीयत. स्वतः बहुसंख्येनं असतानाही थोड्याच शिल्लक राहिलेल्या विरोधकांवर सतत संतापून किंचाळताहेत. ‘हे राष्ट्र महान आहे. विश्वाचे म्होरके बनलो आहोत आपण..’ असंही रागारागाने सांगताना दिसताहेत. असेल नसेल तसं. पण, अभिमानानं सांगण्याच्या अशा गोष्टी जणू राष्ट्राच्या पारंपरिक शत्रूराष्ट्राला ऐकवाव्यात, या पद्धतीनं का तुटून पडतात हे लोक? आपल्याच माणसांना का ऐकवत असतील? आपल्याला या राष्ट्रात खूप शत्रू असल्यासारखे का वागतायत? पण, मग ते ज्या वैश्विक प्रगतीचं सांगताहेत, त्याच्या तं काय पन खाणाखुणा गावात दिसल्या नाहीत कधी. जे जे सरकारकडून गावाला कालपर्यंत रितसर मिळत होतं, तेच आजपण मिळतंय. आधी पण धा गोष्टी मिळत होत्या. आता पण त्याच धा गोष्टी जरा चांगल्या पिशवीतून मिळताहेत इतकंच. मग जुन्या पिशव्यांपेक्षा नव्या पिशव्यांचे रंग चांगले असल्याकारणानं ही वैश्विक झेप की काय ते आसंल का? असावी बा! वस्तू महागल्या बऱ्याच. पण, ‘जगाकडून मागणी वाढल्यानं वस्तूंच्या किमती महागणारच. काय करायचं ते करा. काही तक्रार नाय गड्यांनो..’

तरी पण सगळं ताब्यात असतानाही सतत आपल्या ताब्यातून सगळं काही निसटून चालल्यागत कावसून का गेलेली दिसतात ही मान्सं? मिळवल्याचाआनंदही घेता येत नाही ह्या टीव्हीतल्या नेते लोकांना? हजारदा सांगितलं वडिलांना, की ते न्यूज च्यानल लावून बसत नका जाऊ. जरा बरा पाऊस पडलाय. थोडं रान निळं दिसाया लागलंय. पिकांचं नियोजन चाललंय. संध्याकाळ होऊनही उजेड दिसतोय जरा. वर आभाळात पावसाळी ढग आहेत. पण, मावळतीला जरा तंबू उचकवून खाली जाताना सूर्य डोकावून गावाकडं बघतोय. त्यामुळं हिरवं रान मजेशीर दिसतंय. पण, हा राष्ट्रीय कालवा कशाकडंच लक्ष नीट देवू देत नाही… पूर्वी पाखरांचा आवाज वावरातला संध्याकाळचा एक भाग वाटायचा. मुद्दाम निराळा ऐकायची गरजच नसायची. पण, टीव्हीतल्या बाहेर ऐकू येणाऱ्या गदारोळात कान देवूनही तो नीट ऐकू येईना झालाय. बरं टीव्ही संपला की मोबाइल धरून बसतात सगळे त्यांचे दोस्त. एकामागून एक लड लावतात रिळांची. हसत एकमेकांनाआग्रह करत आपापल्या मोबाइलातला रीळ दाखवत राहतात.. पोटापुरतं पिकूनही रान सुनं, निर्जीव वाटाय लागलंय हल्ली… अशी गुंतून गेलीत मान्सं कशात तरी.. ध्येय न गाठतात अचानक निवृत्त झाल्यागत निवांत होऊन गेलीय मधली पिढी.. आज्जा ८८ वयापर्यंत काम करत होता.. मी त्याच्याकडून शिकलो काम. आधी आज्जा नि मग तो गेल्यावर मी असल्यानं वडिलांना जुन्या नि नव्या गोष्टी शिकण्याची फार गरज पडली नाही. आज्ज्याच्या तोंडून गांधीबाबाचं, नेहरूंचं नाव ऐकलं होतं. ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला उभे राहिले होते वडील. आज्ज्यानं विरोध करताना, “जणू गांधी, नेहरूच लागून गेला समाजशेवा करायला!” असं वाक्य ऐकवलं होतं त्यांना.

वडिलांनी नि त्यांच्या दोस्तांनी ‘राष्ट्रसेवा हेच कृषिधन’ नावाचा ग्रुप जॉइन केलाय. निवृत्तीनंतर हरिपाठ अन् सत्संगाला नेमाने जाणाऱ्या गावातील सरांनी सुरू केलाय हा ग्रुप. सरांची त्यांच्या मूळ गावी असलेली शेती भाऊबंदकीच्या तंट्यात विकावी लागली. त्यामुळं शेतीत वाहून घेतलेली पिढी ही राष्ट्रीय कार्यातील सर्वात मोठी हानी असल्याचे त्यांचे स्पष्ट मत होते. नोकरीतील बराच काळ त्यांच्या घरी विद्यार्थी आपल्या शेतातून भाजीपाला, धान्य आणून देत. त्यामुळे शेतमालाला रास्त भाव वगैरेंच्या ते विरोधात आहेत. जे माणसाला जगवते, त्याचा भाव करू नये वा त्यासाठी भांडू नये, असे त्यांचे स्पष्ट मत होते. वडील आणि त्यांच्या पिढीतले त्यांचे जोडीदार सरांकडून येणाऱ्या राष्ट्रभक्तिपर तत्त्वज्ञानाने भारावून गेले आहेत. ‘सत्तेला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही, विरोध करणारेच सत्तेत येऊ घातल्यावर हे राष्ट्र प्रगतीच्या शिखरावर आहे, असे समजावे,’ हा सरांना त्यांच्या विद्वान ग्रुपवरून आलेला मेसेज कालच त्यांनी फॉरवर्ड केला होता. त्यावरही जोडीदारांमध्ये चर्चा झाली. टीव्हीवर ऐकलेलं एकमेकांना ऐकवताना ते सगळे आनंदी दिसत होते.. कुठल्याही घामाशिवायचा, कष्टाशिवायचा, मोबदल्याशिवायचा हा आनंद, मलाही आपलं वर्तमान नि भविष्य भिरकावून देवून निवांत गाफील होऊन जाण्यासाठी उद्युक्त करत होता…

तेवढ्यात लाइट गेले.. अंधार पडलाच होता.. काही क्षण शांतता.. रातकिडे आणि घर शोधणाऱ्या चुकार पक्ष्यांचे आवाज येऊ लागले.. मम्मीनं तुळशीजवळ दिवा लावला.. वर ढगांच्या फटींमधून चांदण्या दिसू लागल्या.. मोबाइलची बॅटरी लावत वडील बाहेर आले.. खाटेवर बसले.. ही क्षण चुळबुळत राहिले. त्यांना त्यांच्या या अशा एकटेपणावर मात करता येत नाही आताशा, हे माझ्या लक्षात आलं. मग त्यांनी फोन लावला. जरा वेळानं एकेक करत जोडीदार येऊन बसले. मग त्यांचे नि अनेक राजकीय स्टोऱ्यांचे आवाज वावरात दुमदुमू लागले.. पाऊस आल्यावर खिडकीतून आत शिंतोडे येतात, असं मम्मी म्हणली होती.. तिथं प्लास्टिकचा कागद लावून मी कांद्याच्या चाळीकडं झोपायलानिघून आलो.. तोवर पाणी नसलेले काही पातळ ढग अर्ध्यामुर्ध्या चंद्राशी खेळत बसले होते…

संपर्क : ९४२२७६२७७७ dattapatilnsk@gmail.com



Source link

7 सर्वोत्तम शेवट: मैत्रीची एक अधुरी कहाणी…

0
7 सर्वोत्तम शेवट: मैत्रीची एक अधुरी कहाणी…


दिव्य मराठी14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आज मैत्री सेलिब्रेट करण्याचा दिवस. या विशेष दिवसानिमित्त आम्ही दोन आठवड्यांपूर्वी ‘उधारीवाला दोस्त’ ही मैत्रीची एक अधुरी कहाणी प्रसिद्ध करून ती पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. वाचकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आणि 9,508 वेगवेगळे शेवट आम्हाला पाठवले. वाचा पुरस्कारप्राप्त सर्वोत्तम 7 शेवट…

उधारीवाला मित्र

‘पुढल्या सोमवारपर्यंत पैसे परत कर, नाही तर तुझ्या गावी जाऊन तुझ्या वडिलांकडून ते वसूल करीन..’

गोंधळ ऐकून मी सीटवरून उठून पाहिले तर बाहेर गॅलरीत अंकुशला अडवून तिवारी उभा असल्याचे दिसले. तिवारी म्हणजे अंकुशचा घरमालक. तो नेहमीच ऑफिसमध्ये येत होता. त्यामुळे सगळे त्याला आेळखू लागले होते. अंकुशला अनेक महिन्यांपासून त्याचे भाडे देता आले नाही. ऑफिसमधील प्रत्येकाकडे अंकुशची उधार-उसनवारी होती. ऑफिस बॉयदेखील त्याला पाहून रस्ता बदलायचे. त्यांनाही पैसे मागताना त्याला लाज वाटत नव्हती. मी थोडा नशीबवान होतो. अंकुश माझा मित्र होता… त्याहीपेक्षा उधारीत देण्याइतके माझ्याकडे पैसे नसायचे. अंकुशकडे माझेही पैसे अडकले होते. परंतु, तिवारीएवढे नाही. त्याने अंकुशकडील सोन्याची चेनही गहाण ठेवली होती.

असो. अपमानित होऊन अंकुश थेट माझ्याकडे आला. येताच तो म्हणाला, ‘चल दीपक, चहा पिऊन येऊ.’ मी उठत म्हणालो, ‘अरे यार.. तुला इज्जतच नाही, पण तुझ्या घरच्यांची तरी आहे. तिवारीचे पैसे देऊन का टाकत नाहीस?’ अंकुश हसत म्हणाला, ‘देऊन टाकतो भावा. पण, तू लेक्चर देऊ नकोस. आणखी तीन-चार दिवस थांब. तुझ्यासाठी मोठे सरप्राइज आहे.’ ‘सरप्राइज? कशाचे सरप्राइज?’ असे विचारून मी अंकुशसोबत बाहेर पडताच तीन-चार मुले आमच्याकडे इशारा करून म्हणाली, ‘तोच हा बदमाश. पकडा त्याला..’ मला काही समजायच्या आतच अंकुशची धुलाई सुरू झाली होती. खूप प्रयत्न करून त्याची सुटका करू शकलो. मग कळले. महाशयांनी महाविद्यालयाच्या काही मुलांचेही पैसे गट्टम केले होते. हे तरुण जाता-जाता धमकावून गेले… उद्यापर्यंत पैसे देऊन टाक, नाही तर तंगडे तोडून टाकू. हे सगळं पाहून मी विचारात पडलो.

1) हौतात्म्य आणि मैत्री…

(प्रथम पुरस्कार – 21 हजार रुपये | सुधा कुमारी, वैशाली, बिहार)

माझ्या मनात विचार आला की, आता आपण अंकुशपासून जरा अंतर राखूनच राहायला हवं, नाहीतर त्याने उसने घेतलेले पैसे लोक उद्या आपल्याला मागायला लागतील. तीन-चार दिवसांनी अंकुश मला भेटायला आला. त्याच्या हातात लग्नपत्रिका होती. ‘अच्छा.. म्हणजे ‘पोरीचा मामला’ होता म्हणून महाशयांची लोकांकडून उसनवारी चाललीय..’ असं माझ्या मनात आलं.

पण, लग्नपत्रिका उघडून बघतली अन् मी स्तब्ध झालो. ती पत्रिका अंकुशच्या लग्नाची नव्हती, तर आमचा मित्र भावेशची बहीण भाव्या हिच्या लग्नाची होती. दोन वर्षांपूर्वी भावेश गलवान खोऱ्यात शहीद झाला होता. अंकुशने सांगितलं की, भावेशच्या हौतात्म्यानंतर गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचंही निधन झालं, आईलाही अर्धांगवायू झाला. ओव्हरटाइम करूनसुद्धा त्यांच्या उपचारासांसाठी पैसे उसने घ्यावे लागत होते. मात्र, आता भावेशच्या आईच्या तब्येतीत सुधारणा होतेय आणि भाव्यासाठीदेखील चांगले स्थळही मिळाले आहे.

अंकुशचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. भावेशच्या निधनानंतर माझं त्याच्या घरी जाण्याचं, त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याचं धाडसच झालं नव्हतं. मात्र, अंकुशने कुटुंबातील मुलाप्रमाणे भावेशच्या कुटुंबीयांची काळजी घेतली होती. मला स्वत:ला अंकुशच्या समोर खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. ‘फ्रेंडशिप डे’ला मी अंकुशला चहासाठी घरी बोलावलं. तो आल्यावर त्याच्या हातात एक चेक देत म्हणालो, ‘मी तुझ्याइतका मोठा तर नाही होऊ शकत. पण, मित्रत्वाचं नातं तर आहेच ना? या पैशातून तुला कमीत कमी तिवारीच्या आणि त्या मुलांकडून घेतलेल्या उसन्या पैशांची परतफेड करता येईल.’

मी माझी मोटारसायकल विकली होती. अंकुशने मला मिठी मारली. कायम हसतमुख असणाऱ्या अंकुशचे डोळे आज पाणावले होते…

————–

2) केवळ बहिणीसाठी…

(द्वितीय पुरस्कार – 11 हजार रु. | अनुष्का विजय, जयपूर, राजस्थान)

शेवटी असं काय घडलं होतं की, अंकुशला इतकी उधार-उसनवारी करावी लागत होती? गावात असलेलं त्याच्या वडिलांचं दुकानही ठिकठाक चाललेलं होतं. मी याच संभ्रमात असताना अंकुश आपले विस्कटलेले कपडे नीट करीत म्हणाला, ‘मला माहितीय तू काय विचार करतोयस ते.. थोडे दिवस थांब. मी तुला सांगेन सगळं.’

अंकुशच्या बोलण्यावर मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि आम्ही चहा न पिताच ऑफिसच्या रस्त्याला लागलो. पुढचे चार-पाच दिवस कामाचा व्यापात असेच निघून गेले. एका संध्याकाळी दारावरची घंटी वाजली. दार उघडलं तर समोर अंकुश उभा होता आणि त्याच्यासोबत होती दीप्ती.

‘दीप्ती तू?’ दीप्तीला बघून मी आश्चर्यचकित झालो. दीप्ती माझी छोटी बहीण. पण, गेल्या चार-पाच वर्षांत आमची भेटगाठ नव्हती. मी भूतकाळात हरवलो. रोहन, अंकुश आणि मी चांगले मित्र होतो. पण, एक दिवस रोहन आणि दीप्ती यांनी पळून जाऊन लग्न केलं. त्यामुळे रोहन आणि आमचे कुटुंब त्यांच्यावर नाराज होते. याच कारणामुळे रोहन आणि दीप्ती शहर सोडून निघून गेले होते आणि त्यानंतर आमची पुन्हा कधी भेट झालीच नव्हती.

माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव बघून अंकुश म्हणाला, ‘वर्षभरापूर्वी रस्ते अपघातात रोहनचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची कंपनी तोट्यात जाऊ लागली. यातून सावरण्याची दीप्तीची सगळी धडपड व्यर्थ ठरल्यावर ती माझ्याशी बोलली. मी माझी सगळी बचत त्या कंपनीत गुंतवली. मात्र, तोटा एवढा मोठा होता की, लोकांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. पण, आता कंपनी त्या मोठ्या तोट्यातून हळूहळू बाहेर येतेय. एक मोठी ऑर्डरसुद्धा मिळाली आहे आणि त्यातून सगळं कर्ज तर चुकवता येईलच, पण चांगला नफादेखील होईल असं वाटतंय..’ मी अंकुश आणि दीप्तीला मिठी मारली. मनात साठलेले राग-द्वेषाचे सारे मळभ अश्रूंनी धुऊन गेले…

————-

3) ती अ‌ॅसिड दुर्घटना…

(तृतीय पुरस्कार – 5100 रु. | मोनी सिंह, भोपाळ, मध्य प्रदेश)

‘दीपक, गेट रेडी.. आज तुला एका नव्या जगाची सफर घडवून आणतो..’

‘अरे व्वा… क्या बात है! स्वप्नंसुद्धा उधारीवर बघायला लागलास की काय?’

मारामारीची घटना झाल्यानंतरच्या तीन दिवसांनी अंकुश मला हे म्हणाला, तेव्हा त्याला असा प्रतिप्रश्न केल्याशिवाय मला राहवले नाही.

मात्र, माझ्या या प्रश्नाचा अंकुशवर जरादेखील परिणाम झाला नाही. त्याने एक निमंत्रण पत्रिका दाखवली. आम्ही निघालो. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पोहोचलो, ज्यामध्ये यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार सुरू होता. ‘इथं आपलं काय काम?’ मी विचारलं अन् चालू लागलो. तेवढ्यात तिथे एका नावाची घोषणा झाली.. दीपिका, दीपिका शाह. हे नाव ओळखीचं वाटत होतं. मी मागे वळून बघितलं तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझी दीपिका…सहा वर्षांपूर्वी जिच्या चेहऱ्यावर काही नराधमांनी अॅसिड फेकलं होतं आणि लोकांच्या टोमण्यांनी त्रासलेली माझी ही बहीण अशी गायब झाली की आम्ही खूप शोधूनही ती सापडली नाही. नंतर आम्हीदेखील आमचं गाव सोडलं होतं.

सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर जाताच दीपिकाने पहिलंच वाक्य उच्चारलं.. ‘आज मी जी काही आहे त्याचं श्रेय माझ्या अंकुशदादाला आहे..’ मी गोंधळून गेलो होतो. अंकुशने मला स्टेजसमोर नेऊन उभं केलं. मला बघून आता दीपिकालाही धक्का बसला होता. तिला काय करावं कळत नव्हतं. स्टेजवरून उतरत ती सरळ माझ्या गळ्यात पडली. तिथं उपस्थित असलेले लोक आमच्याकडं पाहत होते आणि मी प्रश्नार्थक चेहऱ्याने अंकुशकडं…

अंकुश मला एका बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला, तुझी डायरी आणि त्यातील फोटोमुळे मला दीपिकाबद्दल कळलं होतं.’ मला काय बोलावं काही सुचत नव्हतं. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते अन् समोर देवाच्या रूपात उभा असलेला अंकुश. तीन वर्षांपूर्वी एका पार्कमध्ये हातातली पुस्तके सावरत साफसफाई करताना अंकुशला दीपिका भेटली होती. तेव्हापासूनच सुरू झाला होता अंकुशच्या उधार-उसनवारीचा सिलसिला अन् दीपिकाच्या नव्या आयुष्याचा प्रारंभही…

प्रोत्साहनपर पुरस्कार – प्रत्येकी 3100 रुपये

4) कवितेचं पुस्तक…

(रवीना रतन नेहरा, चुरू, राजस्थान)

ती मुलं गेल्यावर मी म्हणालो, ‘चल, सांग काय आहे सरप्राइज?’

अंकुश हसत म्हणाला, ‘अरे यार! आताच सांगितलं तर मग ते सरप्राइज कसे राहील?’

तीन दिवस गेले. आज चौथा दिवस होता. मी ऑफिसला पोहोचलो तेव्हा तिथं गर्दी जमली होती. प्रत्येकाच्या हातात कसलं तरी पुस्तक होतं. या लोकांना मी दिसताच ते माझ्या दिशेने धावत आले आणि माझे अभिनंदन करू लागले.

माझे सहकारी मेहरा म्हणाले, ‘खूप छान दीपक! तू इतक्या चांगल्या कविताही लिहितोस, हे आम्हाला माहीतच नव्हतं.’

मला काही समजण्यापूर्वीच अंकुश तिथं पोहोचला आणि त्याने सगळ्यांजवळ असलेले ते पुस्तक माझ्याही हातात दिले.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माझे नाव लिहिले होते आणि आत मी लिहिलेल्या विविध कविता संकलित केल्या होत्या.

मी आश्चर्यचकित झालो. खरं तर मला कविता लिहिण्यात खूप रस होता. आपले साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी मी अनेक प्रयत्न केले, पण त्यासाठी खूप पैसे लागणार होते. बरेच दिवस मी त्यासाठी लोकांना भेटत राहिलो. शेवटी हार मानली आणि प्रयत्न करणे सोडून दिले. अंकुशला हे माहीत होतं. त्यामुळेच त्याने पैसे उसने घेऊन हे सगळे घडवून आणले. तेवढ्यात तिथे एक गाडी येऊन थांबली. त्यात हिंदीतील प्रसिद्ध कवी मनोहरजी अग्रवाल होते. ते म्हणाले, ‘दीपक, मला सकाळी सकाळी अंकुश नावाचा कुणी मुलगा तुझे हे पुस्तक देऊन गेला होता. व्वा! काय लिहिले आहेस. या कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी लागणारा सगळा खर्च करण्याची माझी इच्छा आहे.’

एवढे बोलून त्यांनी मला ५० हजार रुपयांचा चेक दिला. अचानक घडलेल्या या गोष्टीमुळे मी भारावून गेलो होतो. मनोहरजी गेल्यानंतर मी भरल्या डोळ्यांनी अंकुशला मिठी मारली.

—————–

5) एकमेकांना सरप्राइज

(विभूती प्रकाशभाई दवे, भावनगर, गुजरात)

अंकुशला मारहाण झाल्याच्या घटनेला तीन-चार दिवस उलटले होते, त्या दिवशीची गोष्ट.

मी आमच्या ऑफिसमध्ये काम करत होतो. तेवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने माझ्याकडे एक फाइल दिली आणि म्हणाला, ‘साहेब, तुमच्या घराची कागदपत्रे घ्या..’

“पण.. माझं घर…?’

‘होय, लिलाव थांबवण्यात आला आहे. हे घर गहाण ठेवून तुम्ही जे पैसे घेतले होते ते कुणीतरी परत केले आहेत. आता तुमचे घर कर्जमुक्त झाले आहे.’

मी खुर्चीवरून उठलो. विचार करू लागलो..

‘माझ्या गहाण ठेवलेल्या घराचे पैसे कोणी दिले असतील? कदाचित अंकुशला काहीतरी माहीत असेल..’

मी अंकुशला फोन लावला, पण त्याने उचलला नाही. त्याचा परत प्रतिसादही आला नाही.

माझा संभ्रम अन् अस्वस्थता वाढत चालली होती. मग थेट अंकुशच्या घरीच जायला निघालो.

मी निघालो खरं, पण तिकडं अंकुश मात्र कायमस्वरूपी गावी जाण्यासाठी बसस्थानकावर पोहोचला होता.

‘गावात जाऊन शेती करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीन. अजून दोन एकर जमीन शिल्लक आहे..’ असा काहीसा विचार तो मनातल्या मनात करीत होता. तेवढ्यात तिवारीचा फोन आला. त्याने विचारलं, ‘अंकुश, कुठे आहेस?’

अंकुश म्हणाला, ‘माझ्याकडे आता पैसे नाहीत. एक वर्षाचे भाडे आधीच थकले आहे. त्यामुळं गावाकडं परतण्याशिवाय आता माझ्यापुढं मार्ग उरलेला नाही. पण, तुमचे पैसे मी लवकरच देईन.’

तिवारीने सांगितलं, ‘अंकुश, अरे कुठल्या पैशाबद्दल बोलतोयस? मला तर दोन दिवसांपूर्वीच भाड्याचे सगळे पैसे मिळाले आहेत.’

अंकुश लगेच घरी परतला तर तिथं पोहोचलेला दीपक त्याचीच वाट पाहत होता. दोघांनाही काहीही न बोलता सगळे समजले होते. दोन्ही मित्रांनी एकमेकांना सरप्राइज दिले होते.

——-

6) …आणि पूर्ण झालं स्वप्न

(तन्मय किशोर खंडाळे, यवतमाळ, महाराष्ट्र)

अंकुश आणि मी कसेबसे चहाच्या टपरीवर पोहोचलो. चहा घेताना मी त्याला विचारलं, ‘तू मला सरप्राइज द्यायचं म्हणत होतास, काय आहे ते?’ त्यावर अंकुश म्हणाला, ‘अरे वेड्या, आधीच सांगितलं, तर ते कसलं सरप्राइज? तीन-चार दिवसांनी तुला ते नक्की कळेल.’ मी मानेनेच ‘हो’ म्हटलं आणि आम्ही पुन्हा ऑफिसकडे परतलो.

तो रविवारचा दिवस होता. दुपारी अचानकच अंकुश माझ्या रूमवर आला आणि मला तयार होऊन सोबत चल म्हणाला. माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून आपल्या बाइकवरून कुठेतरी घेऊन गेला. ते ठिकाण येताच त्याने बाईक थांबवली, मला खाली उतरवत डोळ्यावरची पट्टी काढली. समोर बघताच मी आश्चर्याने स्तब्ध झालो. क्षणभरातच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी अंकुशला मिठी मारत विचारलं, ‘हेच का रे तुझे सरप्राइज?’ ‘हो रे’, तो भावुक होऊन म्हणाला. अंकुशचं हे सरप्राइज म्हणजे एक ‘अनाथाश्रम’ होता. मी ही एक अनाथ होतो आणि अनाथाश्रमातच लहानाचा मोठा झालो होतो. त्यामुळे अनाथ मुलांबद्दल माझ्या मनात खूप जिव्हाळा होता. त्यांच्यासाठी काही करावं हे माझं स्वप्न होतं. पण, डोक्यावर आधीच उच्च शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज होतं. त्यामुळे माझं हे स्वप्न केवळ स्वप्नच राहिलं होतं. पण, अंकुशला त्याबद्दल माहीत होतं. मला न सांगता तो त्यासाठी पैसे जमवत होता. उधार-उसनवारीमुळे लोकांकडून अपमान सहन करीत राहिला, प्रसंगी मारही खात होता. एवढा त्रास सहन करून त्याने मला माझ्या स्वप्नपूर्तीचे सरप्राइज दिले.

माझा हात हातात घेऊन म्हणाला, ‘चल, तुझ्याच हातांनी या नव्या अनाथाश्रमाचे उद्घाटन करायचे आहे.’

मी कपाळावर आठ्या आणत विचारलं, ‘पण, तू तुझी उसनवारी कशी फेडशील..?’ अंकुश हसत म्हणाला, ‘अरे, त्याची काळजी नको करू. काही संस्था आणि उद्योजकांशी माझे बोलणे झाले आहे. या भल्या कामात तेसुद्धा माझ्यासोबत आहेत.’

मी मनोमन विचार करीत राहिलो की, या सच्चा मित्राने ‘फ्रेंडशिप डे’च्या मुहूर्तावर मला माझ्या स्वप्नपूर्तीचे जे गिफ्ट दिले आहे त्याची उधारी कदाचित मी कधीच फेडू शकणार नाही.

—————-

7) मित्राचं प्रमोशन

(सविता मिश्रा ‘अक्षजा’, खंदारी, आग्रा, उ. प्र.)

त्या मुलांनी मारहाण करून धमकी दिल्याच्या घटनेनंतर काही दिवस उलटले. एक दिवस अंकुश त्याच मुलांसोबत ऑफिसमधील इतर लोकांची उधारी फेडताना पाहून मला आश्चर्य वाटले.

मी विचारले, ‘आजपर्यंत तर तुझ्याकडे एक पैसाही नव्हता आणि आता हे कुठून आले?’

अंकुश फक्त हसला आणि निघून गेला.

नंतर मी कामात व्यग्र असताना सीईओंच्या केबिनमधून मला फोन आला.

‘सर, तुम्ही मला बोलावलंत?’ असं विचारतच मी आत शिरलो.

सीईओची पाठमोरी खुर्ची समोर वळताच माझे डोळे विस्फारले अन् मी जवळपास ओरडलोच.. ‘तू?’

अंकुश हसत म्हणाला, ‘मी तुला सांगितलं होतं ना, चार दिवस थांब, मी तुला सरप्राइज देईन म्हणून..’

‘अरे, पण ही खुर्ची..?’ मला त्याच्या करामतीचा धक्का बसला होता.

‘तुमचे सीईओ माझे वडील आहेत. त्यांनी माझ्यासमोर दोन अटी ठेवल्या होत्या. एक तर लग्न करून घरात सून आण किंवा घर सोड.. मी पण हटून बसलो. इतक्यात मला लग्नाच्या भानगडीत तर पडायचे नव्हते. मी न ऐकल्यामुळे त्यांनी मला घर सोडण्याचा आदेश दिला. होय, माझ्या आईच्या सांगण्यावरून त्यांनी मला याच ऑफिसमध्ये कामावर ठेवले. पण, एवढ्या पैशात माझ्या आवडीनिवडी तर सोड; पण रोजच्या गरजाही पूर्ण होत नव्हत्या. आणि आता गरिबी जवळून पाहिल्यानंतर मला जगण्याचा मंत्र मिळाला. फक्त पहिले दोन महिने कही कळतच नव्हतं, म्हणून सगळ्यांकडून उधार घेत राहिलो. शिवाय एकटा राहायची वेळ आल्याने मला सहजीवनाचे महत्त्व समजले आणि लग्नाला तयार झालो. मी बदलल्यामुळे आता वडीलही खुश आहेत. मित्रा, तुझ्यासारखा स्वत: गरिबीत जगणारा, पण इतरांना त्यांच्या आनंदासाठी उधार देणारा आणि त्याची परत मागणीही न करणारा माणूस मिळणे कठीण आहे.’

मी चकित होऊन अंकुशचं सगळं बोलणं ऐकत होतो.

नेहमीसारखं खट्याळ हसत तो पुढं म्हणाला, ‘तर आता तुझं सरप्राइज.. तुला प्रमोशन देण्यात येत आहे! तर मग आता मला चहाला घेऊन चल..’

मी या उधारीवाल्या मित्राचं हे नवं सोज्वळ रूप पाहून खूप आनंदून गेलो.



Source link

Aditya Narayan: करिअर यशाच्या शिखरावर असताना आदित्य नारायणने ठोकला होता सोशल मीडियाला रामराम

0
Aditya Narayan: करिअर यशाच्या शिखरावर असताना आदित्य नारायणने ठोकला होता सोशल मीडियाला रामराम


या पोस्टमध्ये आदित्य म्हणाला, ‘कोणी काही विचार करण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगू इच्छीतो की मी ठीक आहे. मला डिजिटल विश्वातून ब्रेक घ्यायचा आहे. आनंदाने मुलगी, पत्नी, आई-वडीलाना वेळ देऊ इच्छितो. मी इन्स्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट का डिलिट केल्या आहेत? कारण हे माझ्या डिजिटल कॅनवास प्रमाणे आहेत. मला माझे आधीचे फोटो डिलिट करायचे होते आणि मला नव्याने सुरुवात करायची आहे. जसे की एक नवे पेंटिंग सुरु केले आहे.’



Source link

Panvel-Nanded Train : झुरळांनी रोखली पनवेल-नांदेड एक्सप्रेस; पुणे स्टेशनवर तब्बल दोन तास रखडली ट्रेन

0
Panvel-Nanded Train : झुरळांनी रोखली पनवेल-नांदेड एक्सप्रेस; पुणे स्टेशनवर तब्बल दोन तास रखडली ट्रेन


Panvel To Nanded Train 17613 : पनवेलवरुन नांदेडला जाणाऱ्या ट्रेनमध्ये झुरळांचा सुळसुळाट असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. त्यांनी ही रेल्वे पुणे स्थानकावर तब्बल दोन तास थांबून ठेवली. प्रवाशांनी संतप्त भूमिका घेत जोपर्यंत झुरळांचा बंदोबस्त केला जाणार नाही, तोपर्यंत ट्रेन पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. यामुळे तब्बल दोन तास ही गाडी पुणे स्थानकावर खोळंबली होती. दरम्यान, प्रशासाने प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रवाशी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बोगी बदलण्याचे आश्वासन देऊन मग ही रेल्वे रवाना करण्यात आली.



Source link

अमित शाह आज पिंपरी चिंचवडमध्ये, ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा; आज दिवसभरात

0
अमित शाह आज पिंपरी चिंचवडमध्ये, ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा; आज दिवसभरात


6th August Headline :  आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेले पोर्टल लाँच करण्यासाठी शाह येणार आहेत. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे ऑनलाईन पद्धतीने एकत्र भूमिपूजन पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडची संयुक्त बैठक आज पार पडणार आहे. 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सहकारच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लॉंच करण्यासाठी अमित शाह पिंपरी चिंचवडमध्ये असतील. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शाहांचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री उपस्थित राहणार आहेत. शिवाय राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील , छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.

 
शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडची संयुक्त बैठक

 

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत संयुक्त बैठक पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडची पहिलीच संयुक्त पदाधिकारी बैठक आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सुभास देसाई, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुख, जिल्हा सचिव उपस्थित राहणार आहेत.

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे ऑनलाईन पद्धतीने एकत्र भूमिपूजन

दिल्ली – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे ऑनलाईन पद्धतीने एकत्र भूमिपूजन करण्यात येणार आहे. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत 508 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थान प्रत्येकी 55, बिहार 49, महाराष्ट्र 44, पश्चिम बंगाल 37, मध्य प्रदेश 34, आसाम 32, ओडिशा 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणा प्रत्येकी 21, झारखंड 20, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधील प्रत्येकी 18 , हरियाणातील 15 आणि कर्नाटकातील 13 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या पुनर्विकास प्रकल्पासाठी 24,470 कोटी रुपये खर्च येणार असून त्यातून प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. 
 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत वाराणसीच्या दौऱ्यावर
 

वाराणसी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून दोन दिवसाच्या दौ-यावर वाराणसीत येणार आहेत. यावेळी मोहन भागवत हे श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगतगुरु शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती महाराज यांची भेट घेणार आहेत.



Source link

Bhalchandra Nemade यांनी चुकीचा इतिहास सांगू नये, महंत सुधीरदास यांचा आंदोलनाचा इशारा

0
Bhalchandra Nemade यांनी चुकीचा इतिहास सांगू नये, महंत सुधीरदास यांचा आंदोलनाचा इशारा



Bhalchandra Nemade यांनी चुकीचा इतिहास सांगू नये, महंत सुधीरदास यांचा आंदोलनाचा इशारा

नाशिक-  भालचंद्र नेमाडे यांनी चुकीचा इतिहास सांगू नये,  औरंगजेबच्या पत्नी काशी विश्वेश्वरच्या दर्शनाला गेल्याचा आणि त्यांना भ्रष्ट केल्याचा कुठेही संदर्भ नाही. नेमाडे यांनी हिंदू धर्माच्या विरोधात चुकीचा इतिहास सांगून गलिच्छ आरोप करू नये. अन्यथा, त्यांच्या विरोधात आंदोलन छेडणार. भालचंद्र नेमाडे यांनी वक्तव्य केल्याचा वाद चिघळणार असल्याची शक्यता आहे.



Source link