Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2864

नाशिकच्या लाचखोर तहसीलदारांकडे लाखोंचं घबाड; 5 लाखांची रोकड, 40 तोळे सोनं, 15 तोळे चांदी

0
नाशिकच्या लाचखोर तहसीलदारांकडे लाखोंचं घबाड; 5 लाखांची रोकड, 40 तोळे सोनं, 15 तोळे चांदी


Nashik Bribe : अनेक सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करत 5 लाखांची सुद्धा सेव्हिंग होत नाही, मात्र दुसरीकडे सरकारी अधिकारी कुठे 30 लाख तर कुठे 15 लाखांची लाच घेताना एसीबीकडून (ACB) पकडले जात असल्याने लाचखोरी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकचा यात पहिला क्रमांक लागला आहे. 

सध्या राज्यात 01 ऑगस्ट ते 07 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे (Revnue Week) आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, शासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या मनात विश्वास वाढावा, हा यामागील उद्देश आहे. मात्र याच महसूल सप्ताहात एका तहसीलदाराने केलेला पराक्रम सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरतो आहे. नाशिकचे (Nashik) तहसीलदार नरेशकुमार बहिरम (Nareshkumar Bahiram) यांनी तक्रारदाराची गौण खनिज प्रकरणातील जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल 15 लाखांची लाच मागितली होती आणि तिच लाच स्वीकारतांना स्वतः राहत असलेल्या कर्मयोगी नगर परिसरातील मेरिडियम गोल्ड अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शनिवारी सायंकाळी एसीबीने (Nashik ACB) बहिरमला सापळा रचत रंगेहाथ अटक केली. 

त्यानंतर संध्याकाळ पासून सुरु असलेली त्यांच्या घराची झाडाझडती पहाटेपर्यंत सुरु होती. ज्यात एसीबीला 4 लाख 80 हजार रोख रक्कम, 40 तोळे सोनं आणि 15 तोळे चांदीचे दागिने आणि इतर कागदपत्रे असा जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल प्राथमिक तपासात आढळून आला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात लाचखोरीचा विषय हा गाजला होता. ज्यात घरात 85 लाखांची रोकड सापडलेल्या नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची ईडी चौकशी करण्याची घोषणाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विशेष म्हणजे, नाशिक दौऱ्यावर असलेले फडणवीस शनिवारी सकाळी माघारी फिरत नाहीत, तोच सायंकाळी नरेशकुमार बहिरम एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने हा चर्चेचा विषय ठरतो आहे. 

तहसीलदाराच्या घरी कोट्यवधींचं घबाड हस्तगत

नाशिक अँटी करप्शन ब्युरोची (Anty Corruption) सध्या धडाकेबाज कारवाई सुरु आहे. एकट्या नाशिक विभागातच चालू वर्षी 104 गुन्ह्यांमध्ये तब्बल 151 लाचखोरांवर कारवाई करण्यात आल्याने राज्यात लाच घेण्यात नाशिक सध्या पहिल्या क्रमांकाचा विभाग बनला आहे. अनेक सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करत 5 लाखांची सुद्धा सेव्हिंग होत नाही, मात्र दुसरीकडे सरकारी अधिकारी मात्र कुठे 30 लाख तर कुठे 15 लाखांची लाच घेतांना एसीबीकडून पकडले जात असून त्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड हस्तगत केलं जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

लाचखोर एसीबीच्या जाळ्यात 

नाशिकमध्ये एका मागोमाग एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकत असले तरी मात्र दुसरीकडे लाचखोरीच प्रमाण कमी होण्याचं नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे, पोलीस खाते वगळता लाचखोर अधिकारी किंवा कर्मचारी ज्या विभागात कार्यरत आहे. त्या विभागाकडून निलंबन म्हणा किंवा ईतर सहकार्य लवकर मिळत नसल्याने पुढील कारवाई करण्यात एसीबीला अडचणी येत असल्याचंही बघायला मिळत असल्याने शासन स्तरावरून याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे.

इतर संबंधित बातम्या : 

15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, नाशिकमध्ये ACB मोठी कारवाई



Source link

Ajit Pawar : ‘अमित शाह हे गुजरातचे असले तरी त्यांच महाराष्ट्रावर प्रेम, कारण…’, अजित पवारांची अमित शहांवर स्तुतिसुमने

0
Ajit Pawar : ‘अमित शाह हे गुजरातचे असले तरी त्यांच महाराष्ट्रावर प्रेम, कारण…’, अजित पवारांची अमित शहांवर स्तुतिसुमने


अजित पवार म्हणाले, “अमित शाह हे मूळचे गुजरात येथील आहे. मात्र, त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावाई आहेत असे म्हणताच उपस्थितांमद्धे हशा पिकला. पवार म्हणाले, प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे.



Source link

India In Pics : या आठवड्यातील भारत फोटोंमध्ये पाहा

0
India In Pics : या आठवड्यातील भारत फोटोंमध्ये पाहा



India In Pics : या आठवड्यातील भारत फोटोंमध्ये पाहा



Source link

Friendship Day: तू चाल पुढंमधील आदित्यने सांगितला खऱ्या आयुष्यातील मित्र-मैत्रिणींचा किस्सा

0
Friendship Day: तू चाल पुढंमधील आदित्यने सांगितला खऱ्या आयुष्यातील मित्र-मैत्रिणींचा किस्सा


पुढे मित्राविषयी बोलताना आदित्य म्हणाला, “माझा आणखीन एक मित्र म्हणजे गणेश सरकटे आहे जो ‘तू चाल पुढं’ या आमच्या मालिकेत पांड्याची भूमिका करतो. मालिकेत त्याला माझा प्रिय मित्र दाखवण्यात आला आहे, पण ऑफस्क्रीनवरही आम्ही दोघांनीही अशीच मैत्री जपली आहे. मी व्यावसायिकता आणि मैत्री यांच्यातील समतोल चांगल्या प्रकारे व्यवस्थित हाताळतो. अर्थात मी कामाच्या बाबतीत व्यावसायिक खूप आहे आणि कामाच्या व्यतिरिक्त खूप मैत्रीपूर्ण आहे. माझे हे मित्र माझ्यासाठी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये खूप महत्वाचे आहेत. मी त्यांना माझे जवळच मानतो.”



Source link

Adah Sharma: ‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्रीने घेतला इंडस्ट्रीतून ब्रेक, काय आहे कारण?

0
Adah Sharma: ‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्रीने घेतला इंडस्ट्रीतून ब्रेक, काय आहे कारण?


काय आहे अदाची पोस्ट?

सगळ्यांना धन्यवाद ज्यांनी मला काळजीने मेसेज केले. तिने तिच्या फोटोंसह डिस्क्लेमर दिला, त्वचेवर अॅलर्जीचे फोटो पाहून घाबरत असाल तर स्वाइप करू नका. हे थोडे भयानक आहे आणि मला वाटते की फक्त इंस्टाग्रामवर चांगलेच फोटो का पोस्ट करावे. हे एक भयानक प्रकारचे पुरळ आहेत. जे मी फुल स्लीव्ह कपडे घालून लपवत होते पण तणावामुळे ते आता माझ्या चेहऱ्यावर दिसू लागले आहे. यासाठी मी औषध घेतले आणि मला औषधाची ऍलर्जी असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे माझी तब्येत अजून बिघडली. त्यामुळे आता मी इतर औषधे आणि इंजेक्शन घेत आहे.



Source link

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: आलिया भट्टच्या सिनेमाची हवा! ९व्या दिवशी कमावले इतके कोटी

0
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: आलिया भट्टच्या सिनेमाची हवा! ९व्या दिवशी कमावले इतके कोटी



Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box office: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे.



Source link

Pune News: पुण्यात राजकीय घडामोडींना वेग ! शिंदे-अजित पवारांशी शहांची चर्चा झाल्यावर शहांनी फडणवीसांना बोलावलं

0
Pune News: पुण्यात राजकीय घडामोडींना वेग ! शिंदे-अजित पवारांशी शहांची चर्चा झाल्यावर शहांनी फडणवीसांना बोलावलं


पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहकार परिषदेसाठी पुण्यात शनिवारी रात्री दाखल झले आहे. दरम्यान, त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला. यानंतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील तातडीने बोलावून घेतल्याचे समजते. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मंत्रिमंडळाच्या विस्तारासह आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात चर्चा केली असावी असा अंदाज लावला जात आहे.



Source link

Nashik Nareshkumar Bahiram : नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या घराची एसीबीकडून झाडाझडती

0
Nashik Nareshkumar Bahiram : नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या घराची एसीबीकडून झाडाझडती



<p>१५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या घराची एसीबीकडून झाडाझडती, कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं&nbsp;<br />एसीबीच्या हाती</p>



Source link

Priya Bapat: प्रिया बापट आणि उमेश कामतच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ

0
Priya Bapat: प्रिया बापट आणि उमेश कामतच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ


सुमारे एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील ‘क्यूट आणि परफेक्ट कपल’ म्हणजेच प्रिया बापट आणि उमेश कामत रंगभूमीवर एकत्र आले आहेत. या कपलची पडद्यामागील केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते तितकीच रंगभूमीवर पाहायलाही आवडते. हीच सुंदर केमिस्ट्री नाट्यरसिकांना आजपासून नाट्यगृहात पाहायला मिळणार आहे. सोनल प्रॅाडक्शन्स निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचा आज शुभारंभ झाला असून पहिल्याच प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत तर नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत.



Source link

Tejashree Pradhan: ‘या’ अभिनेत्यासोबत दोन वर्षांनंतर दिसणार तेजश्री प्रधान

0
Tejashree Pradhan: ‘या’ अभिनेत्यासोबत दोन वर्षांनंतर दिसणार तेजश्री प्रधान



Tejashree Pradhan Upcoming Serial: ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत काम केल्यानंतर तेजश्री प्रधानने जवळपास दोन वर्षे ब्रेक घेतला होता. आता ती एका नव्या मालिकेत कोणत्या अभिनेत्यासोबत दिसणार हे समोर आले आहे.



Source link