Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2867

Ananya Panday: अनन्या आदित्य रॉय कपूरला डेट करतेय का? वडील चंकी पांडेने सोडले मौन, म्हणाले…

0
Ananya Panday: अनन्या आदित्य रॉय कपूरला डेट करतेय का? वडील चंकी पांडेने सोडले मौन, म्हणाले…


गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांचे एकत्र फिरताने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, दोघांनीही अद्याप प्रेमाची कबूली दिलेली नाही. आता अनन्याचे वडील अभिनेते चंकी पांडे यांनी मुलीच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

Scam 2003 Teaser: खेल बडा था, और खिलाडी! तेलगी घोटाळ्यावरील ‘स्कॅम २००३’चा टीझर प्रदर्शित

0
Scam 2003 Teaser: खेल बडा था, और खिलाडी! तेलगी घोटाळ्यावरील ‘स्कॅम २००३’चा टीझर प्रदर्शित


स्कॅम २००३ सीरिजच्या टीझरची सुरुवात ही मनोज वाजपेयीच्या दमदार आवाजाने होते. बॅकग्राऊंडमध्ये त्याचा आवाज ऐकू येतो. १ मिनिटे २६ सेकंदाच्या टीझरमध्ये स्कॅम १९९२चा देखील उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये हर्षद मेहताने ५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. त्यानंतर २००३मधील कथा दाखवण्यात आली आहे. यावेळी “स्कॅम खूप मोठा आहे, ३ नाही तर ३० हजार कोटी. खेल बडा था और खिलाडी” असा आवाज बॅकग्राऊंडमध्ये येतो.



Source link

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पाच विधेयक, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती 

0
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पाच विधेयक, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती 


Dhananjay Munde : बोगस बियाणे, खते, कीटकनाशके तसेच शेतकऱ्यांची फसवणूक यावर आळा घालणारी विधेयके राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी (Agriculture Minister Dhananjay Munde) विधानसभेत सादर केली आहेत. यासंदर्भात एकूण पाच विधयेके मांडली आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच धनंजय मुंडेंनी केली याबाबतची घोषणा केली होती. बोगसगिरी करणाऱ्यांना दंड लावण्यापासून ते जाणीवपूर्वक असे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीए सारखे कलम लावण्याची तरतूद या विधेयकांमध्ये करण्यात आल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. 

ही पाच विधेयके सादर 

कायदे व्यापक शेतकरी हितार्थ व्हावेत यादृष्टीने अधिक चर्चा होऊन मंजूर केले जावेत, यासाठी ही पाचही विधेयके दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आली आहेत. आगामी अधिवेशनात हे कायदे पारित केले जातील. या कायद्यांद्वारे प्रामाणिक निर्माते आणि विक्रेते यांना कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल असेही धनंजय मुंडेंनी सांगितले. धनंजय मुंडे यांनी एकूण 5 विधेयके विधानसभेत सादर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्र भेसळयुक्त, अप्रमाणित किंवा गैर छापाची बियाणे, खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीमुळे झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक – 2023, महाराष्ट्र कीटकनाशके कायदा 1968 मध्ये सुधारणा विधेयक – 2023, महाराष्ट्र बियाणे अधिनियम 1966 मध्ये सुधारणा विधेयक – 2023, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मध्ये सुधारणा करणे याचबरोबर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हात भट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, वाळू तस्कर, अत्यावश्यक सेवा वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती यावर आळा घालण्यासाठी अधिनियम 1981 (MPDA) या मध्ये सुधारणा करणे ही पाच विधेयके सादर करण्यात आली आहेत.

विधेयके विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे 

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच बोगस बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या विक्रीवर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणारा कायदा आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी काल (4 ऑगस्ट) ही पाचही विधेयके विधानसभेत सादर केली आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये बोगस बियाणे, खते, कीटकनाशके आदींची विक्री हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात मांडण्यात आलेली पाचही विधेयके व्यापक आहेत. याचा सर्वार्थाने विचार करुन आणि सखोल चर्चा करुन शेतकऱ्यांच्या हितार्थ कायदे अंमलात आणले गेले पाहिजेत असे मुंडे म्हणाले. या दृष्टीने ही विधेयके विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या 25 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे मान्यतेस्तव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष कृषीमंत्री असतील तर संयुक्त समितीत विधानसभेचे 17 तर विधानपरिषदेचे 8 सर्वपक्षीय सदस्य असतील. 

चर्चा करुन आवश्यक ते बदल करण्यात येणार

संयुक्त समिती या पाचही विधेयकांबाबत बैठका घेऊन प्रस्तावित बदल किंवा यात अतिरिक्त आवश्यक बदल यावर साधक बाधक चर्चा करणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रतील बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशके यांचा काळाबाजार रोखण्यासाठी आवश्यक असा प्रभावी आणि सक्षम कायदा हिवाळी अधिवेशनापूर्वी तयार करणार आहे. परंतू, हे करताना जे प्रामाणिक उत्पादक किंवा विक्रेते आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Crop Insurance : शेतकऱ्यांना आता कमीत कमी एक हजार रुपये पीकविमा मिळणार, विमा कंपनीची रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार!



Source link

Cardi B: भर कार्यक्रमात गायिकेने चाहतीच्या अंगावर फेकलेल्या माइकचा झाला लिलाव, लाखो रुपयांना गेला विकला

0
Cardi B: भर कार्यक्रमात गायिकेने चाहतीच्या अंगावर फेकलेल्या माइकचा झाला लिलाव, लाखो रुपयांना गेला विकला


चाहते अनेकदा आपल्या आवडत्या गायकाच्या, रॅपरच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी उत्सुक असतात. लाइव्ह गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ते तुफान गर्दी करतात. या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अनेक विचित्र प्रकार घडल्याचे समोर येते. असेच काहीसे प्रसिद्ध रॅपर कार्डी बीसोबत झाले होते. तिने थेट रागाच्या भरात चाहतीच्या अंगावर माइक फेकून मारला होता. आता या माइकचा लिलाव झाला असून तो कोट्यावधी रुपयांना विकला गेला आहे.



Source link

Dharmendra: धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनवर हेमा मालिनीची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

0
Dharmendra: धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनवर हेमा मालिनीची प्रतिक्रिया, म्हणाल्या…


‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण जोहरने मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एण्ट्री केली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसोबत अनेक उत्तम कलाकारांची टीम दिसत आहे. त्याने या चित्रपटासाठी जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेंद्र यांसारख्या दिग्गज मंडळींचे कास्टिंग केले. त्यात चित्रपट प्रदर्शित होताच शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांचा किसिंग सीन समोर आला आहे. हा सीन पाहून काही चाहत्यांनी कौतुक केले तर काहींनी ट्रोल केले.



Source link

सातारा : शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांना बीआरएसची भुरळ | पुढारी

0









अशोक मोहने

कराड :  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पश्चिम महाराष्ट्रात भारत राष्ट्र विकास आघाडी (बीआरएस) मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बैठका, मेळाव्यांच्या माध्यमातून पक्ष गाव पातळीवर सक्रिय झाला आहे. याचा परिणाम म्हणून विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी बीआरएसमध्ये प्रवेश करू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात विविध शेतकरी संघटनांमध्ये बीआरएस प्रवेशाचे लोण पसरले आहे.

कोल्हापूर, सांगली नंतर सातारा जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीने आपला विस्तार वाढविण्यास सुरुवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून विविध शेतकरी संघटनांचे काही पदाधिकारी बीआरएसमध्ये प्रवेश करू लागले आहेत. बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये फूट पडली असून संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बी. जी. पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, कराड तालुका अध्यक्ष उत्तमराव खबाले यांच्यासह काही पदाधिकारी बीआरएसमध्ये सक्रिय झाले आहेत.

रयत शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी बीआरएसच्या वाटेवर असल्याचे समजते. स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनाही बीआरएसने ऑफर दिली आहे. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गोडसे यांनी बीआरएसमध्ये काम सुरू केले आहे. संघटना बांधनीची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्या संघटनेचे अनेक पदाधिकारी बीआरएसमध्ये प्रवेश करून गावोगावी बीआरएसची ध्येय धोरणे पोहोचवू लागले आहेत.

दोन दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारीही बीआरएसमध्ये सामील झाले आहेत. के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये शेती व शेतकर्‍यांच्या विकासासाठी भरीव काम केले आहे. याचाच प्रभाव प. महाराष्ट्रात विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर पडला आहे. सातारा जिल्ह्यात ज्या पद्धतीने बीआरएसची बांधणी सुरू आहे त्यावरून शेतकरी संघटनांचे अन्य पदाधिकारीही लवकरच त्या पक्षात प्रवेश करतील अशी चिन्हे आहेत. त्याचा पहिला झटका बळीराजा शेतकरी संघटनेला बसला आहे. यानंतर अन्य काही शेतकरी संघटनांचे पदाधिकारी बीआरएसमध्ये सक्रिय झाले आहेत. पदाधिकार्‍यांना महत्वाची पदे, जबाबदार्‍या व गावोगाव कार्यक्रम राबवण्यासाठी आर्थिक मदतही केली जात आहे. त्यामुळे पदाधिकारी गावोगावी काम करताना दिसत आहेत. याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार का हे यशावकाश कळेल पण सध्या तरी बीआरएसची हवा आहे.

बीआरएसमध्ये जाण्याची कारणे

  • तेलंगणामध्ये शेतकर्‍यांना खरीप व रब्बी पेरणीसाठी एकरी पाच हजार रुपये. 
  • शेतीसाठी वीज व पाणी मोफत 
  • शेतमालाला सरकारकडून हमीभाव 
  • जन्माला आलेल्या लहान मुलाचे नावे बारा हजार रुपये तर मुलीच्या नावे 13 हजार रुपये ठेव

तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांनी शेती व शेतकर्‍यांसाठी भरीव काम केले आहे. शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी व शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शेतकर्‍यांना सन्मान मिळवून देण्याबरोबर त्याचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. हेच काम महाराष्ट्रात उभे करायचे आहे.

– विश्वास जाधव,

सातारा जिल्हा समन्वयक बीआरएस











Source link

हे चंद्रावरील खड्डे नाहीत बरं का..! जगप्रसिद्ध महाबळेश्वर खड्ड्यांनी वेढले | पुढारी

0









प्रेषित गांधी

महाबळेश्वर : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले महाबळेश्वर सध्या वर्षा पर्यटकांनी गजबजले असून, या निसर्गरम्य पर्यटनस्थळाचा प्रवास पर्यटकांसह स्थानिकांनाही धक्के खात करावा लागत आहे. केवळ राज्यपाल व मुख्यमंत्री दौर्‍यावेळी तात्पुरती मलमपट्टी करून खड्डेमुक्त करण्यात आलेल्या या पर्यटनस्थळाकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्ड्यांचेच साम्राज्य आहे.

महाबळेश्वरमधील या खड्ड्यांबाबत सोशल मिडीयावरुनही मिम्स व्हायरल होत आहेत. चंद्रावरचे खड्डे समजून तुम्ही जिथे उतरलात तो चंद्र नसून पृथ्वीवरील महाबळेश्वर शहराकडे जाणारा रस्ता आहे.. चला पावती फाडा, अशा आशयाचे मिम्स सर्वत्र फिरत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मायभूमितील रस्त्यांची ही दयनीय अवस्था या पर्यटनस्थळाची शोभा वाढवत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाबळेश्वर- पाचगणी या मुख्य रस्त्यासह ठिकठिकाणी खड्ड्यात गेलेले रस्ते हे अपघातांना निमंत्रण देत आहेत. यामुळे स्थानिकांसह पर्यटकही हैराण झाले आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याआधी काहीअंशी खड्डेयुक्त रस्ते खड्डेमुक्त झाले ते काही कालावधीपुरते. गतवर्षीही या रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेतच राहिली. यानंतर एप्रिल महिन्यात महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर ठेकेदाराने धो धो पावसात डांबरीकरण केल्याचा प्रकार घडला. अशा दर्जाच्या कामाने खड्डेमुक्त महाबळेश्वर होईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पर्यटनस्थळाकडे जाणारे ठिकठिकाणचे हे रस्ते खड्ड्यातच हरवले आहेत. या पर्यटन नगरीत प्रवेश करतानाच या जगप्रसिद्ध महाबळेश्वरला चहूबाजूंनी खड्ड्यांनी वेढले आहे की काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

महाबळेश्वर ते पाचगणी हा अंदाजे 20 कि मी चा प्रवास सर्वांना धक्के खातच करावा लागत आहे. प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत. दाट धुक्यात प्रवास करताना तर पर्यटकांसह स्थानिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्डयांमुळे रोज एक अपघात होत असून एखाद्याचा जीव गेल्यानंतरच संबंधितांना जाग येईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाबळेश्वरहून पाचगणी, वाई येथे शिक्षणासाठी येजा करणार्‍या विद्यार्थ्यांसह नोकरदारांचे देखील मोठे हाल होत आहेत. सध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांसाठी खड्डेच प्रमुख आकर्षणाचे ठिकाण बनले आहे?

महाबळेश्वर -पाचगणी या मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून सर्वांनाच या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते खड्डेमुक्त करावेत.

-संतोष शिंदे माजी नगरसेवक महाबळेश्वर











Source link

Arvind Shekar: वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अडकलेल्या अभिनेत्रीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
Arvind Shekar: वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अडकलेल्या अभिनेत्रीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन



Shruti Shanmuga Priya Husband: अभिनेत्रीने पतीच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.



Source link

स्व. खाशाबा जाधवांचा इतिहास बायोपिकवर; २०२४ च्या ऑलिम्पिकनंतर होणार प्रदर्शित | पुढारी

0









विशाल गुजर

सातारा :  स्व. खाशाबा जाधव नावाच्या सातार्‍याच्या सुपुत्राने 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. या मराठमोळ्या कुस्तीपटूने भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक (कांस्य) जिंकून देण्याचा भीम पराक्रम केला. अलीकडच्या काळात अनेक खेळ किंवा खेळाडूंवर चित्रपट आले; पण दुर्दैवाने देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिकपदक जिंकून देणारे स्व. खाशाबा जाधव काहीसे दुर्लक्षित राहिले. मात्र, आता मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले नागराज मंजुळे यांनी खाशाबांवर चित्रपट तयार करण्यासाठी शड्डू ठोकला आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकनंतर खाशाबांचा बायोपिक पडद्यावर झळकणार आहे.

स्व. खाशाबा जाधव 1952 मध्ये झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होते. जाधव यांनी आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मैदान मारताना कांस्यपदक मिळवले. वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. खाशाबा जाधव यांचा जन्म दि. 15 जानेवारी 1926 रोजी कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे झाला तर 14 ऑगस्ट 1984 मध्ये निधन झाले. निधनानंतर तब्बल 16 वर्षांनी त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देण्यात आला. गेली 14 वर्षे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळावा यासाठी लढा सुरू आहे. 2010 मध्ये दिल्लीत स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने भव्य स्टेडियम उभारले गेले. त्याचवेळीस खाशाबांना पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त झाला पाहिजे, असा निर्धार मुलगा रणजित जाधव यांनी उद्घाटनावेळी केला. देशात अनेक खेळाडूंवर मराठी, हिंदीमध्ये चित्रपट प्रदर्शित झाले. स्व. खाशाबा जाधव यांच्या बायोपिक तयार करण्याचा मानस नागराज मंजुळे यांनी केला. नागराज मंजुळे सध्या फक्त खाशाबामय आणि कुस्तीमय झाले आहेत. जिओ स्टुडिओज् आणि आटपाटनिर्मित खाशाबा जाधव यांच्या बायोपिकसाठी सर्वस्व त्यांनी पणाला लावले आहे. ज्याला मराठी समजत नाही, त्यालाही हा खाशाबांचा चित्रपट समजेल. अशा ताकदीचा सिनेमा तयार केला जाणार आहे. नागराज मंजुळेंनी पटकथा तयार केली आहे. ही पटकथा लिहित असताना खाशाबांसारख्या महान खेळाडूवर तर कधीच चित्रपट व्हायला हवा होता, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. माझे वडील आणि भाऊ भारत हे चांगले कुस्तीपटू होते. त्यामुळे लहानपणापासूनच या मर्दानी खेळाशी तशी माझी नाळ जोडली गेलेली असल्याचे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले आहे.

अखेरच्या श्वासापर्यंत कुस्ती जगलेला… तांबड्या मातीत घाम गाळलेला…अन् भारताच्या वैभवशाली कुस्ती परंपरेला ऑलिम्पिकच्या नकाशावर गौरव मिळवून देणार्‍या खर्‍या मराठमोळ्या हिरोची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून जगापुढे येणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन तर करणारच आहे; मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च क्रीडा महोत्सवात देशाचा तिरंगा आकाशात फडकवणार्‍या मल्लाची खरी ओळख यानिमित्ताने लोकांपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्राचे भूषण आणि देशाचा गौरव असलेल्या दुर्लक्षित खाशाबा जाधव नावाच्या व्यक्तिमत्त्वाची जगाला खरी ओळख या बायोपिकने होणार आहे.

चित्रपटात दिसणार मातीतली मुले…

स्व. खाशाबा जाधव या मराठमोळ्या कुस्तीपटूवर बायोपिक बनवण्याचे शिवधनुष्य नागराज मंजुळे यांनी आता उचलले आहे. या चित्रपटाचे ऑडिशन लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटासाठी मातीतल्या मुलांची गरज आहे. आगामी वर्षी होणार्‍या पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘खाशाबा’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन होणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर क्रीडा रसिकांमधील ऑलिम्पिकची झिंग उतरण्यापूर्वीच हा बहुचर्चित सिनेमा पडद्यावर झळकणार आहे.











Source link

Ghoomer Trailer: एका हाताने मैदान गाजवणारी मुलगी, अभिषेक आणि सैय्यमीच्या ‘घुमर’चा ट्रेलर पाहिलात का?

0
Ghoomer Trailer: एका हाताने मैदान गाजवणारी मुलगी, अभिषेक आणि सैय्यमीच्या ‘घुमर’चा ट्रेलर पाहिलात का?


बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री सैय्यमी खैरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘घुमर’चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. टीझर आणि पोस्टर आल्यापासून हा चित्रपट काय असणार याचा सोशल मीडिया वर चर्चा होताना दिसल्या आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता अभिषेक बच्चन, दिग्दर्शक आर. बाल्की आणि अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री सैयामी खेर यांच्या दमदार भूमिका “घूमर” मधून अनुभवयाला मिळणार आहेत. भारतातील स्पोर्ट्स चित्रपटांच्या यादीत आता अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे.



Source link