Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2868

सातारा : अतिउत्साह बेततोय पर्यटकांच्या जीवावर; रिल्समुळे जीव येतो धोक्यात | पुढारी

0

विशाल गुजर

सातारा : जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. पण पर्यटनाला अनोळखी ठिकाणी जाणे, रिल्स काढणे, धोकादायक ठिकाणे न पाहता त्या ठिकाणी जाणे हा अतिउत्साह पर्यटकांच्या जीवावर बेतू लागला आहे. निर्जन ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेणार्‍यांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे रिल्स तयार करताना आयुष्य धोक्यात घालू नका, असे आवाहन करण्यात येते.

काही दिवसांपूर्वी एकीव धबधबा येथे पर्यटकांच्या वादावादीने पर्यटनास गालबोट लागले. या घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे निसर्ग पर्यटनास जाताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.तसेच घरी आपले स्वकीय वाट पाहत आहेत, हे न विसरता पर्यटन करावे, असे आवाहनही दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमी संस्था तसेच स्थानिक पोलिसांकडूनही वारंवार करण्यात येते. पावसाळ्यातील भटकंती करताना सुरक्षेच्या नियमांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. हिरव्यागार डोंगररांगा आणि त्यावरून वाहणारे धबधबे, खाली उतरणारे ढग अशा विहंगम दृश्यावेळी फोटोसेशन करताना दरवर्षी अपघाताच्या घटना घडत असतात. धोकादायकरित्या सेल्फी आणि फोटोसेशन केले जाते. मात्र, पर्यटकांचे स्वतःच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. त्यामुळे अशा अपघातांची संख्या वाढत आहे.

रिल्सवीरांवर हवा वॉच…

अनेक धोकादायक ठिकाणी रिल्स करत असलेल्या तरुणाईला कोणी रोखावे? असा प्रश्न पडत आहे. कारण, पोलिस यंत्रणा आणि पर्यटन विभाग यांचा तसा थेट संबंध येत नाही. पर्यटन विकास महामंडळाने सूचना दिली किंवा पोलिस संरक्षण मागितले तरच ते दिले जाते.
एरवी पर्यटनस्थळांवर पोलिस येत नाहीत. त्यामुळे दुर्गम भागात दुर्घटना घडल्यावरच पोलिसांना कळते. यामुळे त्या रिल्सवीरांना आवरण्याची प्रमुख जबाबदारी पर्यटन विकास महामंडळाची आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज आहे.

• अनोळखी ठिकाणी पोहायला किंवा फिरायला जाऊ नये.
• मोठ्या ग्रुपमध्ये फिरायला जाणे टाळावे.
•  धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा.
• दरी, उंच कडे, पाण्याची खोली जास्त असलेली ठिकाणे टाळावीत.

हे ठेवा लक्षात…

एकटे फिरायला जात असाल तर त्या ठिकाणाची पूर्ण माहिती घ्यावी. अनेकदा अपघात झाल्यानंतर सोबत कोणी नसल्याने मदत मिळत नाही. रस्ता चुकण्याची शक्यता असते.

Source link

Yashwantrao Natya Sankul: प्रशांत दामले आणि अशोक सराफ यांच्या या नाटकाने उघडणार यशवंत रंगमंदिराचा पडदा

0
Yashwantrao Natya Sankul: प्रशांत दामले आणि अशोक सराफ यांच्या या नाटकाने उघडणार यशवंत रंगमंदिराचा पडदा

नूतनीकरण करण्यात आल्यानंतर हे नाट्यगृह १ ऑगस्ट पासून नव्या रंगरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नाटयपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ ह्यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं ह्यासाठी प्रयत्न केले होते. या नाट्यगृहाचा पडदा उघडल्याने नाट्यरसिक सुखावले आहेत.

Source link

Genelia Dsouza: रितेशकडे पाहून मुरडलं होतं नाक; जिनिलियाने सांगितला होता पहिल्या भेटीचा किस्सा

0
Genelia Dsouza: रितेशकडे पाहून मुरडलं होतं नाक; जिनिलियाने सांगितला होता पहिल्या भेटीचा किस्सा

Genelia Dsouza Birthday: रितेश देशमुख आणि जिनिलिया डीसूजा यांची पहिली भेट ही हैदराबाद विमानतळावर झाली होती.

Source link

Maharashtra Rain : रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; असे राहील आजचे हवामान, वाचा अपडेट

0
Maharashtra Rain : रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; असे राहील आजचे हवामान, वाचा अपडेट

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.

Source link

Kajol Birthday: बॉयफ्रेंडची तक्रार अजयकडे करायची, जाणून घ्या काजोलची लव्हस्टोरी

0
Kajol Birthday: बॉयफ्रेंडची तक्रार अजयकडे करायची, जाणून घ्या काजोलची लव्हस्टोरी

पुढे ती म्हणाली, ‘जेव्हा मी अजयच्या आयुष्यात आले तेव्हा तो दुसऱ्या मुलीला डेट करत होता. तसेच मी देखील माझ्या बॉयफ्रेंडची तक्रार त्याच्याकडे करायची. त्यानंतर माझा ब्रेकअप झाला. आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलेले नाही. पण आम्ही एकत्र असल्याचे आम्हाला वाटायचे.’

Source link

ना. धों. महानोर हे पाणी आडवा पाणी जिरवा योजनेचे जनक, उद्योजक अशोक जैन यांनी दिला आठवणींना उजाळा

0
ना. धों. महानोर हे पाणी आडवा पाणी जिरवा योजनेचे जनक, उद्योजक अशोक जैन यांनी दिला आठवणींना उजाळा

N D Mahanor : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर   (N D Mahanor) यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय. ना.धो. महानोर यांच्या रुपाने आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा निसर्ग कवी, भूमिपुत्र हरपल्याची भावना जैन उद्योग समुहाचे प्रसिद्ध उद्योजक अशोक जैन (Ashok Jain) यांनी व्यक्त केली. महानोर हे दोन टर्म विधान परिषदेचे आमदार होते. याकाळात महानोर यांनी पाणी आडवा पाणी जिरवा अतिशय अभिनव अशी संकल्पना राबवली. या योजनेचे जनक म्हणूनही महानोर यांना ओळखलं जातं, असे जैन म्हणाले. तसेच 1986 साली देशात ठिबक सिंचनाचा पहिला संच हा महानोर यांच्या जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील शेतीत लावण्यात आल्याचे जैन म्हणाले.

ना धों महानोर हे आत्याधुनिक शेतीचे पुरस्कर्ते

जैन उद्योग समुहाचे उद्योजक अशोक जैन यांनी ना धों महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेती संदर्भातील त्यांची आस्था आणि प्रेम त्यांनी सांगितले. महानोर हे दोन टर्म विधानपरिषदेचे आमदार होते. या आमदारकीच्या कार्यकाळात महानोर यांनी पाणी आडवा पाणी जिरवा अतिशय अभिनव अशी संकल्पना राबवली. त्यांना या योजनेचे जनक म्हणूनही ओळखलं जातं असे जैन म्हणाले. ना. धो. महानोर हे शास्त्रीय तसेच अत्याधुनिक शेतीचे पुरस्कर्ते देखील होते. 1986 ला देशात ठिबक सिंचनाचा पहिला संच हा महानोर यांच्या जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील शेतीत लावण्यात आल्याची माहिती जैन यांनी दिली. कांताबाई भवरलाल जैन आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे ते सल्लागार समितीचे सदस्य देखील होते. बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टचे देखील ते विश्वस्त होते.

शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा निसर्ग कवी आणि भूमिपुत्र हरपला

अशोक जैन यांचं वाकोद हे मुळगाव. या गावापासून दोन किलोमीटरच्या अंतरावरच पळासखेडा हे गाव आहे. त्यामुळं स्वर्गीय भवरलाल जैन आणि ना. धों. महानोर यांची निरागस मैत्री ही सर्वश्रुत होती असेही जैन म्हणाले. ना धों महानोर यांच्या रुपाने आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा निसर्ग कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे मोठे दुःख असल्याची भावना अशोक जैन यांनी व्यक्त केली. आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असलेल्या ना धो महानोर यांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात 3 ऑगस्टला सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ते सातत्याने आजारी होते. तर हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना 20 दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर गुरुवारी (3 ऑगस्टला) त्यांची प्राणज्योत मालवली.

महत्त्वाच्या बातम्या:

N D Mahanor Passes Away : ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास

Source link

Assembly Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढचं अधिवेशन नागपुरात, तारीखही ठरली

0
Assembly Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढचं अधिवेशन नागपुरात, तारीखही ठरली

मुंबई- महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधासनभेत केली. यापुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. नागपूर येथे गुरुवार ७ डिसेंबर २०२३ पासून हे अधिवेशन सुरु होईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात दिली.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

Ahmednagar Police Dance Video : सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा गुन्हेगाराच्या खांद्यावर बसून डान्स

0
Ahmednagar Police Dance Video : सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा गुन्हेगाराच्या खांद्यावर बसून डान्स

Ahmednagar Police Dance Video : सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा गुन्हेगाराच्या खांद्यावर बसून डान्स

Source link

Eknath shinde : “आम्हाला ५० खोके म्हणून हिणवता अन् आमच्याकडेच ५० कोटी मागता?” ‘त्या’ पत्रावरून मुख्यमंत्र्यांचा टोला

0
Eknath shinde : “आम्हाला ५० खोके म्हणून हिणवता अन् आमच्याकडेच ५० कोटी मागता?” ‘त्या’ पत्रावरून मुख्यमंत्र्यांचा टोला

मुख्यमंत्री म्हणाले की, खूप गोष्टी आहेत, बोलता येतील, पण एक संयम आम्ही बाळगतो, आम्हाला बोलता येत नाही हे कुणी समजू नये. ५० खोके म्हणून आम्हाला हिणवता. आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता, रोज शिव्याशाप देता आणि आमच्याकडेच ५० कोटी रुपये आमचे द्या म्हणून पत्र देता?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

Source link