Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2862

Nana Patole : ‘मी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा’, नाना पटोलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

0
Nana Patole : ‘मी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा’, नाना पटोलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ


नाना पटोले यांनी खुलताबादेतील वेरुळ, घृष्णेश्वर, भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं आहे. याशिवाय नाना पटोले यांनी जर-जरी बक्ष यांच्या दर्ग्याचं दर्शन घेत चादर चढवली. त्यामुळं त्यांनी सर्वधर्मियांना भेट दिल्याने चर्चा सुरू झाल्या आहे. राष्ट्रवादीतील फूटीवर बोलताना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात काय सुरू आहे, हे बघणं आमचं काम नाहीय. आम्हाला सध्या जनतेची काळजी वाटत आहे. घरातला बाप हा बापच असतो, मुलाने काहीही गडबग केली तरी त्याला काही फरक पडत नाही, असं म्हणत नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला हाणला आहे.



Source link

Aditya Kadam: नाटक, एकांकिकेनंतर आदित्य कदम गाजवणार मोठा पडदा! थरारक भूमिकेतून करणार मनोरंजन

0
Aditya Kadam: नाटक, एकांकिकेनंतर आदित्य कदम गाजवणार मोठा पडदा! थरारक भूमिकेतून करणार मनोरंजन


आपल्या या यशाबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, ‘एकांकिका, नाटकं करत करत मी अभिनयाची आवड जोपासली. कालांतराने ही आवड शांत बसू देत नव्हती. तेव्हा मला ‘अनलिमिटेड मर्डर मिस्ट्री’ हिंदी चित्रपटाची ऑफर चालून आली. निर्माते, दिग्दर्शक पी अभयकुमार यांनी मला खूप मोठी संधी दिली आहे, त्यासाठी मी कायम त्यांचा ऋणी राहीन. मोठ्या पडद्यावर काम करणं, हे अर्थात प्रत्येक कलाकारांचं स्वप्न असतं, असंच स्वप्न उराशी बाळगून मी आलोय. आता मला मिळालेली संधी पाहता माझं स्वप्न पूर्ण झालं, असंच मला वाटत आहे. पण इथेच न थांबता अजूनही प्रोजेक्ट्सवर काम करायचं आहे.’



Source link

भरधाव मर्सिडीजमुळे भीषण अपघात; गाड्यांचा चक्काचूर, तिघांनी गमावले प्राण

0
भरधाव मर्सिडीजमुळे भीषण अपघात; गाड्यांचा चक्काचूर, तिघांनी गमावले प्राण


Maharashtra Goa Accident News: फोंडा-पणजी महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ (Banastari Bridge) रविवारी रात्री भीषण अपघात (Accident News) झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून सातजण जखमी झाले आहेत. अपघातातील सात जखमींना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विचित्र अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मर्सिडीज कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

फोंडा-पणजी महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ रात्री 9 वाजता झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार झाले असून सातजण जखमी झाले आहेत. फोंड्याहून भरधाव वेगानं येणाऱ्या मर्सिडीज गाडीनं सुरवातील तीन दुचाक्या आणि नंतर तीन चारचाकी गाड्यांना ठोकल्यानं हा विचित्र अपघात झाला.

बाणास्तरी पुलावर झालेल्या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज कारच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. मार्दोळ पोलिसांनी या चालकाला अटक केली आहे. परेश ए. सिनाई सावर्डेकर असं चालकाचं नाव आहे.

वाणस्तारी पुलाजवळील अपघातात दिवाडी येथील दुचाकीस्वार सुरेश फडते, भावना फडते आणि अनुप कर्माकर हे जागीच ठार झाले आहेत. या अपघातातील सात जखमींना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. चारचाकीनं जोरदार ठोकर दिल्यानं दुचाकीवरील भावना फडते उडून पुलाच्या खाली पडल्यानं त्या जागीच ठार झाल्या.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज गाडीनं सुरुवातीला बाणस्तारी पुलाजवळ थांबलेल्या दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यानंतर चुकीच्या वनवेत घुसून इतर तीन चारचाकी गाड्यांना जोरदार धडक दिली.

नेमका कसा झाला अपघात? 

फोंडा-पणजी महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ रात्री 9 वाजता एका भरधाव मर्सिडीज कारमुळे भीषण अपघात झाला. या विचित्र अपघातात तिघांनी आपले प्राण गमावले, तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज गाडीनं सुरुवातीला बाणस्तारी पुलाजवळ थांबलेल्या दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यानंतर चुकीच्या वनवेत घुसून इतर तीन चारचाकी गाड्यांना जोरदार धडक दिली. 

मर्सिडीज गाडीनं तीन दुचाक्यांना धडक दिली, त्यानंतर दोन आल्टो आणि स्विफ्ट गाडीला धडक दिली. त्यानंतर मर्सिडीज गाडी थेट दुभाजकाला धडकली आणि स्थिरावली. या काळातही चालकाला अपघात घडला याचं भान नव्हतं. त्यामुळेच पाच, सहा गाड्यांना मर्सिडीज चालकानं ठोकलं. पोलिसांनी चालकाला अटक केली असून चौकशी सुरू आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आक्षेपार्ह स्टेटसवरुन बीडच्या आडस गावात दोन गटात राडा, पोलिसांकडून शांततेचे आवाहन



Source link

नागरिकांना मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण; राज्याच्या आरोग्य विभागाचा निर्णय | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. यानुसार सर्व कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मोफत मिळणार आहे. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना समाविष्ट करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक विभागाने नुकताच याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1 हजार 209 उपचार आहेत. आता दोन्ही योजनामध्ये उपचारांची संख्या 1 हजार 356 एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी उपचार खर्च मर्यादा 2 लाख 50 हजार रुपये होती, ती आता 4 लाख 50 हजार रुपये करण्यात आली आहे. रस्ते अपघातासाठी उपचाराची संख्या 74 वरून 184 करण्यात आली. तर खर्च मर्यादा 30 हजारांऐवजी 1 लाख रु. करण्यात आली आहे.

दरम्यान, योजनेच्या कामकाजाचा आढावा, अमंलबजावणीकरता वेळोवेळी सूचना, जिल्हा कार्यक्षेत्रातील नवीन रूग्णालय अंगीकृत करणे, कार्यरत रुग्णालयांचे तात्पुरते निलंबन, राज्य आरोग्य हमी सोसायटीस शिफारस करणे, जिल्हास्तरावर आलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी समितीची 3 महिन्यांतून एकदा बैठक होणार आहे.

अशी आहे जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती

दोन्ही योजना एकत्रित राबवण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर जिल्हा आरोग्य अधिकारी, अंमलबजावणी सहाय्य संस्थांचे जिल्हा प्रकल्प प्रमुख, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक, भारतीय वैद्यकीय परिषदेचा एक प्रतिनिधी ( जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त केलेले), सहाय्यक संचालक (वैद्यकीय), उपसंचालक, आरोग्य सेवा कार्यालय, पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेले एक अशासकीय प्रतिनिधी हे सदस्य तर जिल्हा शल्य चिकित्सक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.











Source link

Sushmita Sen: ‘ताली’च्या पोस्टरवरुन ट्रोल करणाऱ्यांना सुष्मिता सेनचे सडेतोड उत्तर, घेतला मोठा निर्णय

0
Sushmita Sen: ‘ताली’च्या पोस्टरवरुन ट्रोल करणाऱ्यांना सुष्मिता सेनचे सडेतोड उत्तर, घेतला मोठा निर्णय



Sushmita Sen Upcoming movie: सुष्मिता सेनचा ‘ताली’ हा चित्रपट १५ ऑगस्टला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.



Source link

‘पुढारी’च्या दणक्यानंतर महामार्गाची दुरूस्ती | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगलोर महामार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. याबाबत दै. ‘पुढारी’ने सलग दोन दिवस सडेतोड वृत्त प्रसिद्ध करताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खडबडून जागेे झाले. रविवारी सकाळी सकाळीच यंत्रणेने खड्डे मुजवण्याची मोहीम हाती घेतली. दरम्यान, ही दुरूस्ती तोंडदेखली न करता दर्जेदारपणे खड्डे मुजवण्याची मागणी होत आहे.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात सुरुवातीपासूनच तक्रारींचा ओघ आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची अर्धवट राहिलेली कामे, सेवा रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे अपघात होऊन आजपर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग सध्या जीवघेणा बनला आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांनी ‘आ’ वासला असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

खड्डे चुकवण्याच्या नादात दुर्घटना घडत आहेत. लिंबखिंड ते शेंद्रे या हद्दीत दोन्ही बाजूंच्या लेनवर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साठल्याने वाहन चालकाना अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात आदळाआपट होत आहे. प्रसंगी खोल खड्ड्यातून वाहने जाताना टायर फुटून अपघात घडले आहेत. ठिकठिकाणी रस्ता खचला असून मोठी चर पडल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे खड्डे अर्धा ते पाऊण फुटाचे खोल आहेत. महामार्गाच्या दूरवस्थेबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेवून दै.‘पुढारी’ने जोरदार आवाज उठवला. सलग दोन दिेवस याप्रश्नी सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे यंत्रणा जागी झाली. ‘पुढारी’च्या बातम्यांची दखल घेवून तातडीने खड्डे दुरूस्तीला सुरुवात करण्यात आली. रविवारी सातारा शहर परिसरातील महामार्गावर खड्डे दुरूस्ती मोहीम हाती घेण्यात आली.











Source link

Jejuri: जेजूरीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम; बारामती-सासवड मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद

0
Jejuri: जेजूरीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम; बारामती-सासवड मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद


जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक ही सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर – वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.



Source link

The Elephant Whisperers: ऑस्कर मिळालेल्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’मधील आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर आरोप

0
The Elephant Whisperers: ऑस्कर मिळालेल्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’मधील आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर आरोप



The Elephant Whisperers: “आमचे पैसे दिले नाहीत” असा आरोप ‘द एलिफंट व्हिस्परर्स’मधील आदिवासी जोडपे कार्तिकी गोन्साल्विसवर बोमन व बेलीने निर्मात्यांवर केले आहेत.



Source link

Suresh Wadkar: ‘या’ कारणामुळे सुरेश वाडकर यांनी माधुरीला दिला होता नकार

0
Suresh Wadkar: ‘या’ कारणामुळे सुरेश वाडकर यांनी माधुरीला दिला होता नकार



Suresh Wadkar Birthday: गायक सुरेश वाडकर यांना लग्नासाठी माधुरी दीक्षितचे स्थळ गेले होते. मात्र त्यांनी माधुरीला नकार दिला. त्यांनी नकार का दिला हे जाणून घेऊया…



Source link

सातारा : दाट धुक्यात हरवलं पर्यटन डेस्टिनेशन; विकेंडमुळे महाबळेश्वरात गर्दी | पुढारी

0









महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा :  जगप्रसिध्द पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या वर्षा पर्यटनाचा माहोल असून अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस, दाट धुके व निसर्गसौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. दाट धुक्यात महाबळेश्वर हरवलं असून पर्यटकांना साद घालू लागले आहे.

शनिवार-रविवार या विकेंडमुळे पर्यटकांची महाबळेश्वर येथे वर्दळ असून येथील धुंद वातावरणाने पर्यटक बेधुंद होत आहेत. धुक्यात हरवलेलं महाबळेश्वर पर्यटकांना खुणावत आहे. वर्षा पर्यटनासाठी सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांसाठी महाबळेश्वर हा बेस्ट ऑप्शन ठरत आहे. येथील विविध पॉईंट, पर्यटन स्थळे पाहून पर्यटक आनंदी दिसत असून केटस पॉईंट, धोम-बलकवडी धरण, वेण्णा लेकसह लिंगमळा धबधब्यावरील बेधुंद वातावरणाचाही पर्यटक आनंद लुटत आहेत. लिंगमळा धबधबा तसेच वेण्णालेक नौकाविहार येथील दाट धुक्याची अनुभूती पर्यटक घेत आहेत. वेण्णालेक येथे पर्यटक अधिक वेळ घालवताना दिसत आहेत. दाट धुक्यात अनेकांनी नौकाविहाराचा आनंद लुटला. काही हौशी पर्यटक घोडेसवारी करताना दिसले.

महाबळेश्वर येथील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी दिसत आहे. उबदार कपडे, शाल, मफलर सोबत इतर वस्तूंचीही खरेदी होत आहे. गरमागरम महाबळेश्वरी चणे, शेंगदाणे, मका कणीस, फ्रँकी स्प्रिंग पोटॅटो, मॅगीवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत.
दरम्यान संततधार पावसामुळे आजअखेर येथे 170 इंच पावसाची नोंद झाली आहे.











Source link