Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2859

Pune Terrorist arrest : पुण्यातील दहशतवाद्यांचे ‘आयसिस’शी लागेबांधे असल्याचे तपासात उघड; प्रकरण ‘एनआयए’कडे

0
Pune Terrorist arrest : पुण्यातील दहशतवाद्यांचे ‘आयसिस’शी लागेबांधे असल्याचे तपासात उघड; प्रकरण ‘एनआयए’कडे


‘एनआयए’कडे तपास सोपविण्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया मंगळवापर्यंत (८ ऑगस्ट) पूर्ण होणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी कोथरूड परिसरात दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या कडून लॅपटॉप, पांढऱ्या रंगाची पावडर, काडतूस, दहशतवादी संघटनांची पत्रके आणि ड्रोन जप्त करण्यात आला होता. दरम्यान, एटीएसने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी तपसात उघड झाल्या. हे दहशतवाद्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट ची चाचणी देखील केली होती. तर कोंढवा येथे राहणारे याकूब साकी आणि इम्रान खान यांनी घरातच प्रयोगशाळा सुरू केली होती. त्यांना अब्दुल कादीर दस्तगीर पठाण याने घर राहण्यास दिले तर अभियंता असलेला सिमाब नसरुद्दीन काझी याने देखील त्यांना आर्थिक मदत केल्याने त्याला देखील अटक करण्यात आली होती.



Source link

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ घरबसल्या पाहता येणार! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

0
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ घरबसल्या पाहता येणार! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय


या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साडी नेसून एका तृतीयपंथी व्यक्तीच्या भूमिकेत खुर्चीवर बसलेला दिसत आहे. तर, त्याच्या मागे इतर अनेक तृतीयपंथी लोक बसलेले दिसत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी ‘हड्डी’ चित्रपटात एका तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत नवाजचे या चित्रपटातील तीन ते चार लूक समोर आले आहेत. तर, आता चाहत्यांना त्याच्या नवीन लूकनेही भुरळ घातली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी५वर रिलीज होणार आहे. मात्र, अद्याप हा चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले आहे, तर झी स्टुडिओने याची निर्मिती केली आहे.



Source link

TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 08 ऑगस्ट 2023 : ABP Majha

0
TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 08 ऑगस्ट 2023 : ABP Majha



<p>TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 08 ऑगस्ट 2023 : ABP Majha</p>



Source link

Shah Rukh Khan: शाहरुख खानने प्रेक्षकांना टाकलंय कोड्यात! ‘या’ दिवशी सगळ्यांना मिळणार उत्तर

0
Shah Rukh Khan: शाहरुख खानने प्रेक्षकांना टाकलंय कोड्यात! ‘या’ दिवशी सगळ्यांना मिळणार उत्तर


‘जवान’ या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर लोकांना आधीच खूप आवडला आहे. या चित्रपटाचे काही संवादही प्रेक्षकांच्या जिभेवर रुळले आहेत. नेहमीप्रमाणेच शाहरुख खानला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली कुमार करत आहेत. तर, रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली बनणार आहे. ‘जवान’ची निर्मिती गौरी खानने केली असून, गौरव वर्मा सहनिर्माते आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



Source link

Prajakta Mali Birthday: ओशोंवर श्रद्धा असलेल्या प्राजक्ताने काढलाय खास टॅटू! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

0
Prajakta Mali Birthday: ओशोंवर श्रद्धा असलेल्या प्राजक्ताने काढलाय खास टॅटू! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?


Happy Birthday Prajakta Mali: प्राजक्ताची ओशोंवर प्रचंड श्रद्धा आहे. त्यांचं नाव नेहमी ओठांवर राहावं म्हणून तिने हाताच्या मनगटावर टॅटू देखील काढून घेतला आहे.



Source link

Dada Kondke Birth Anniversary: कधीकाळी दादा कोंडके यांनीही पाहिलेलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न!

0
Dada Kondke Birth Anniversary: कधीकाळी दादा कोंडके यांनीही पाहिलेलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न!


Dada Kondke Birth Anniversary: अवघ्या रसिकजनांना हसवणाऱ्या दादा कोंडके यांनी अभिनेता असण्यासोबतच कधीकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न देखील पाहिलं होतं.



Source link

Crime News: पाच कोटींच्या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक

0
Crime News: पाच कोटींच्या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक


शैलजा दराडेंच्या आधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे यांनाही टी ई टी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण परिषदेचा कारभार शैलजा दराडेंकडे सोपवण्यात आला होता. मात्र शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने दराडे यांनी लाखो रुपये प्रत्येकाकडून जमा केले होते. ही रक्कम पाच कोटींच्या घरात होती.



Source link

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा ,पंतप्रधान मोदी एनडीएच्या खासदारांची बैठक घेणार; आज दिवसभरात

0
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा ,पंतप्रधान मोदी एनडीएच्या खासदारांची बैठक घेणार; आज दिवसभरात


8th August Headline :  विरोधी पक्षाकडून केंद्र सराकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर लोकसभेत आज चर्चा होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील खासदारांची बैठक पार पडणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. तसेच विंडीज आणि भारत यांच्यामधील तिसरा टी – 20 सामना हा खेळवण्यात येणार आहे. 

अविश्वासाच्या प्रस्तावावर लोकसभेत होणार चर्चा

मोदी सरकारच्या विरोधात आणण्यात आलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर लोकसभेत आज लोकसभेत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर त्यांनी सोमवारी अधिवेशनात सहभाग घेतला. लोकसभेत सादर होणाऱ्या अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी चर्चेला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी हे त्यांच्या भाषणात कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदारांची बैठक

दिल्लीमध्ये आज महाराष्ट्र सदनात संध्याकाळी 7 वाजता एनडीएच्या खासदारांची बैठक होणार आहे. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या खासदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदारांना मार्गदर्शन करणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील तयारीचा आढावा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

संसदेच्या परिसरात युवक काँग्रेसचं आंदोलन 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. संसदेच्या परिसरात युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे. वाढता द्वेष, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर युवक काँग्रेसकडून सरकारच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे. 

मणिपूरच्या आदिवासी संघेटनेचे प्रतिनिधी घेणार अमित शाह यांची भेट

मणिपूरच्या आदिवासी संघेटनेचे प्रतिनिधी आज दिल्लीत जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मणिपूरच्या हिंसाचारामध्ये कुकी-जो समाजातील जे व्यक्ती मारले गेले आहेत त्यांच्या  सामूहिक दफनविधीसह पाच प्रमुख मागण्यांवर विचार करण्याची विनंती करण्यात येणार आहे. 

आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक

आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. मागील दोन महिन्यात महागाईत झालेली वाढ, भाजीपाला, डाळींच्या किंमतीत झालेली वाढ आणि अमेरीकेच्या फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा एकदा व्याजदर वाढविण्याचा  निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पतधोरण समिती व्याजदर वाढीसंदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी, कुडाळ आणि ओरोससह कोकणातल्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरून या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थिती राहणार आहेत. 

भारत आणि विंडीजमध्ये तिसरा टी 20 सामना 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. नॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा सलग तिसरा पराभव आणि मालिका गमावू नये यासाठी भारतीय संघाला आज कोणत्याही स्थितीत सामना जिंकावा लागणार आहे.



Source link

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याकडून डिलाईल रोड येथील पुलाची पाहणी

0
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याकडून डिलाईल रोड येथील पुलाची पाहणी



<p>Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याकडून डिलाईल रोड येथील पुलाची पाहणी</p>



Source link

Thane crime : १६ वर्षीय मित्राकडूनच अत्याचार; १२ वर्षीय शाळकरी मुलगी गर्भवती

0
Thane crime : १६ वर्षीय मित्राकडूनच अत्याचार; १२ वर्षीय शाळकरी मुलगी गर्भवती


Thane crime news : एका १२ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच एका १६ वर्षीय मित्रावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link