
दादर स्टेशनच्या प्लॅटफॅार्मवर उद्यान एक्स्प्रेस ट्रेन काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आली. एक्स्प्रेस ट्रेन आल्यानंतर जनरल लेडीज डब्यातील सर्व महिला दादरमध्ये उतरल्या. मात्र,पीडित तरूणी एकटीच डब्यात होती.

दादर स्टेशनच्या प्लॅटफॅार्मवर उद्यान एक्स्प्रेस ट्रेन काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आली. एक्स्प्रेस ट्रेन आल्यानंतर जनरल लेडीज डब्यातील सर्व महिला दादरमध्ये उतरल्या. मात्र,पीडित तरूणी एकटीच डब्यात होती.

Pune crime : पुण्यातील एका अभियंता तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाचा मृतदेह नाशिक मार्गावरील एका घाटात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

Ashish Shelar on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची टोल बंद करण्याची मागणी, शेलारांची टीका
Mumbai Entry Point Toll : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करण्याची मागणी केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली आहे. मुंबईतील फक्त दोनच नाही तर पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोल माफ (Mumbai Entry Point Toll) करावे अशी मागणी मनसेचे प्रवक्ते संजय शिरोडकर यांनी केली आहे. या टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे इंधन आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत प्रवेश करण्यासाठी अथवा बाहेर पडताना पाच एन्ट्री पॉईंट आहेत. या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल माफी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या मागणीवर आशिष शेलार यांनीही टीका केली.

पनवेलमध्ये गेल्या आठवड्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने एका व्यक्तीला जन्मठेप आणि २५ हजार, अशी शिक्षा ठोठावली. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र महादेव जाधव, असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने २०१३ मध्ये पीडिता घरात एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. तसेच घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास तुझी जीभ छाटून टाकण्याची धमकी दिली. पीडिता आठ महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.

दीपा आणि कार्तिक यांचा बदला घेण्यासाठी आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन याने एकाचवेळी आर्यन आणि नकुल बनून दीपिका आणि कार्तिकी यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. मात्र, आता त्याच्यासमोर देखील आपल्या आजीचे आणि मावशीचे खरे रूप आले आहे. त्यामुळे त्याने देखील सत्याची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. यात तो दीपिकावर मनापासून खरंप्रेम करू लागला होता. मात्र, त्याच हे खोटं रूप कार्तिकी आणि दीपिका दोघींसमोर आलं. आपल्या बहिणीच्या सुखासाठी जरी दीपिकाने आर्यनला नकार दिला असला तरी कार्तिकी मात्र खूप बिथरली आहे.
<p>Satara Firing: साताऱ्यातील वाईत मोक्का लावलेल्या आरोपीवर न्यायाधिशांसमोर गोळीबार; एक जण ताब्यात</p>
Source link

सातारा, पुढारी वृत्तसेवा : कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे यांच्यावर वाई न्यायालय परिसरात गोळीबार करण्यात आला. ही घटना आज (दि.७) दुपारी घडली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर वाई न्यायालयात गोळीबार करण्यात आला. यावेळी दोन फायर करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच वाई पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.
हेही वाचा

Nashik Crime : नाशिकसह जिल्ह्यात दरोडा, घरफोडीचे सत्र सुरूच असून ग्रामीण पोलिसांकडून (Nashik rural Police) धडक कारवाई केली जात आहे. अशा संशयित चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जात असून हळूहळू दरोडा, घरफोडीच्या घटनांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. अशातच सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीपैकी पाच जणांना नाशिकच्या मालेगावमध्ये (Malegaon) पवारवाडी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले तर दोघे जण फरार झाले.
नाशिक (Nashik) शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik police) कंबर कसली असून दुसरीकडे नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी धडक मोहिमा सुरु आहेत. मालेगाव शहर पोलिसांनी गुन्हेगारी कमी करण्यासाठी कंबर कसली असून रोजच गुन्हेगारी प्रवुत्तीच्या संशयितांना ताब्यात घेतले जात आहे. आज सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीपैकी पाच जणांना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी या संशयितांकडून दोन गावठी पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, दोन धारदार तलवारी, एक चाकूसह एक दुचाकी असा 1 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मालेगाव शहरातील (Malegaon) अकरा हजार कॉलनी परिसरात काही संशयित दरोड्याच्या उद्देशाने लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत छापा मारून पाच जणांना ताब्यात घेतले. यातील काही संशयित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मालेगावच्या विविध स्थानकात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान मालेगावमध्ये शस्त्र सापडण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
तसेच शस्त्रांची मांडणी करून व्हिडिओ व्हायरल करणे, एकाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी या संशयिताला धारधार शस्त्रांसह ताब्यात घेतले. अमीन अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या संशयित गुन्हेगारांचे नाव असून त्याच्याकडून दाेन धारदार चाॅपर, तलवार, काेयता, रेम्बाे चाकूसह दाेन लाकडी स्टीक हस्तगत केल्याने खळबळ उडाली. अमीनने घरात शस्त्र विक्री करण्याच्या उद्देशाने त्याने शस्त्र मांडून व्हिडीओ व्हायरल केला होता. पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्या नेतृत्वाखालील विशेष पाेलिस पथकाने गुलशेरनगर भागात काेम्बिंग ऑपरेशन राबवित संशयित अमीन अन्सारी यास या शस्त्रांसह ताब्यात घेतले. त्याने राजस्थानच्या पुष्कर भागातून ही शस्त्रे आणल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान शस्त्र बाळगणाऱ्या अमिन विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :

‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबतच या चित्रपटात रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार, सुनील, योगी बाबू यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.
कराड : पुढारी वृत्तसेवा: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी व तासवडे येथील टोलनाके जिल्ह्याच्या हद्दीवर स्थलांतरित करा किंवा या दोन्ही टोलनाक्यावरील टोलमध्ये सातारा जिल्ह्यातील जनतेला पूर्णतः सूट द्या, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी संसदेत केली.
लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून खासदार श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी नियम ३७७ नुसार तातडीचे व लोकहितासाठी महत्वाचे मुद्दे सादर करून सभागृहाच्या पटलावर ठेवले. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, महामार्गावर पडलेले खड्डे, संथगतीने सुरू असलेले खंबाटकी बोगदा व सहापदरीकरणाचे काम, प्रलंबित असलेले उड्डाणपूल तसेच टोलनाक्याच्या समस्यांवर प्रश्न उपस्थित करत ही मागणी केली.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात आनेवाडी आणि तासवडे असे दोन टोलनाके आहेत. सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नागरिकांना कामाच्या निमित्ताने दिवसातून दोन-चार वेळा या दोन्ही टोलनाक्यांवरून जावे लागते. या दोन्ही टोलनाक्यांवर ७५ रुपयांपासून ४२५ रुपयांपर्यंतचा कर वाहनधारकांडून वसूल करण्यात आला आहे. मात्र, वसूल केलेल्या कर उत्पन्नानुसार दिल्या जाणाऱ्या सुविधा मात्र खूपच कमी आहेत. जसे रुग्णसेवा, क्रेन, शौचालय, रात्रीच्या वेळी विद्युत प्रकाश आणि इतर अत्यावश्यक सेवा वाढविण्याची गरज आहे. खरेतर हे दोन्ही टोलनाके सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर स्थलांतरित करण्याची गरज आहे. तसे करता येत नसेल, तर सातारा जिल्ह्यातील जनतेला या दोन्ही टोलनाक्यांवर टोलमध्ये संपूर्ण सूट दिली जावी.
यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावरील पुणे ते सातारा आणि सातारा ते कोल्हापूर या भागावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मार्गाची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. प्राधान्याने खड्डे बुजवून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात यावे. तसेच रस्ता पूर्णपणे अपघातमुक्त करावयाचा असेल, तर हे खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाने बुजवणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्ग एनएच ४ चे सहापदरीकरण करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. सातारा ते पुणे विभागाचे काम पूर्ण होण्यास अजून किती कालावधी लागणार आहे ? तसेच खंबाटकी बोगद्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल, असा सवाल त्यांनी केला. खंडाळा तालुक्यातील पारगाव आणि शिरवळ येथील उडाणपूल तसेच वेळे येथे ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली आहे. सदरच्या उड्डाणपूलांची कामे लवकर सुरू करावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा