Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2850

मारहाण झालेले पत्रकार संदीप महाजन यांची आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका, हे म्हणजे…

0
मारहाण झालेले पत्रकार संदीप महाजन यांची आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका, हे म्हणजे…


Jalgaon: शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला (Journalist) मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.

मारेकऱ्यांचे आमदार किशोर पाटलांसोबत फोटो – संदीप महाजन

संपूर्ण प्रकरण हे अंगाशी आलं म्हणून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत, असं पत्रकार संदीप महाजन यांनी म्हटलं आहे. मारहाण करणारे तिघे आमदार किशोर पाटील यांचेच कार्यकर्ते आहेत आणि याचा पुरावा म्हणून त्या तिघांचे आमदार किशोर पाटील यांच्यासोबतचे फोटो दाखवू शकतो, असं पत्रकार संदीप महाजन यांनी म्हटलं आहे. मारहाणीच्या घटनेचा आमदार किशोर पाटील यांनी स्वत:च निषेध व्यक्त केला, ही सगळी नौटंकी असल्याचं पत्रकार महाजन यांनी म्हटलं आहे.

पोलिसांकडे केली होती संरक्षणाची मागणी

अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर स्थानिक पत्रकार महाजन यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षणाची मागणी देखील केली होती. तसेच मला काहीही झाल्यास त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील आणि त्यांचे सहकारी असतील, असं सुद्धा पत्रकार महाजन यांनी म्हटलं होतं. यापुढेही माझ्या आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका असून पोलिसांनी आता तरी संरक्षण द्यावं, असं पत्रकार महाजन म्हणाले.

याआधी संरक्षण मागूनही दिलं गेलं नाही

दरम्यान, मारहाणीनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आधी मला शिव्या दिल्या गेल्या. आता मला मारहाण झाली आहे. याआधाही माझ्या जीवाला आमदारांपासून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचं मी म्हणालो होतो. मात्र माझ्या मागणीनंतरही पोलिसांनी मला संरक्षण दिलं नाही. आताही मला आणि माझ्या कुटुंबाला असुरक्षित वाटतंय. मला आणि माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील आणि पोलीस प्रशासन राहील”

पत्रकारितेचा चुकीचा वापर केलेला नाही

आमदार किशोर पाटील यांच्या नावासमोर आप्पा जो शब्द लागला आहे, तो फक्त पत्रकार संदीप महाजन यांच्यामुळेच लागला आहे. गेल्या पंचवीस वर्षात पत्रकारिता करत असताना पत्रकारितेचा वापर करून कुणालाही त्रास दिला नसल्याचं पत्रकार संदीप महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. ब्लॅकमेलिंग किंवा इतर कुठल्या बाबतची माझ्या विरोधात तक्रार अथवा गुन्हा सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल नसल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं.

आमदारांकडून पत्रकारावर खोटे आरोप

आमदार किशोर पाटील कुठल्याही पद्धतीचे वेगवेगळे खोटे आरोप माझ्यावर करत आहेत, असं पत्रकार संदीप महाजन म्हणाले. आमदार किशोर पाटील यांनी माझ्यासमोर बसून आरोप करावेत आणि सिद्ध करून दाखवावे, असं आव्हान देखील पत्रकार संदीप महाजन यांनी केलं आहे. मी केलेल्या बातमीत कुठल्याही पद्धतीने कुणाचा अपमान होईल असे शब्द वापरले नसल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं.

नेमकं प्रकरण काय?

जळगाव जिल्हा सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी बातमी केली होती. ही बातमी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना चांगलीच झोंबली आणि किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांच्या समर्थकांकडून गुरुवारी (10 ऑगस्ट) पत्रकार महाजन यांना मारहाणही करण्यात आली.

हेही वाचा:

Mumbai: पोलीस भरती परीक्षेत ब्लूटूथ हेडफोन वापरुन कॉपी; उत्तर पत्रिकेतील एका चुकीमुळे कॉपी करणारे अटकेत



Source link

Mumbai University Senate Elections:मुंबईत सिनेट निवडणुकांचा धुरळा, अमित ठाकरे-आदित्य ठाकरे आमनेसामने

0
Mumbai University Senate Elections:मुंबईत सिनेट निवडणुकांचा धुरळा, अमित ठाकरे-आदित्य ठाकरे आमनेसामने



<p>मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची ही निवडणूक १० सप्टेंबरला होणार असून, या निवडणुकीत राजकीय पक्ष आणि त्यांना संलग्न विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर होणारी ही मुंबईतली पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळं शिवसेनेतल्या ठाकरे गटाची युवा सेना आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची ही निवडणूक एकूण दहा जागांसाठी होत असून, या निवडणुकीचा निकाल १३ सप्टेंबरला जाहीर होईल. या दहा जागांपैकी पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, उर्वरित पाच जागा राखीव प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष आणि त्या पक्षांना संलग्न विद्यार्थी संघटना अनेक महिन्यांपासून मतदार नोंदणीमध्ये व्यस्त होत्या. सर्वच राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.&nbsp;</p>



Source link

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटाला, जाणून घ्या कधी आणि कुठे?

0
Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटाला, जाणून घ्या कधी आणि कुठे?


कॉमेडीचा बाज, अचूक टायमिंग आणि वन टेकमध्ये विनोदवीरांनी साकारलेल्या हास्याच्या या जादूला प्रेक्षकांनी यापूर्वीच डोक्यावर घेतले आहे. यातील फिल्टर पाड्याचा बच्चन असो किंवा कोळी वाड्याची रेखा, लॉली असो किंवा शंकऱ्या-शितलीची लव्ह स्टोरी. यातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनेता गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले , दत्तू मोरे, अभिनेत्री वनिता खरात, नम्रता संभेराव आदी कलाकारांना या हास्यजत्रेने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. याचे सगळे श्रेय जाते ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक, दिग्दर्शक, निर्माते असलेल्या सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांना. त्यांच्या बहारदार लेखणीतून उतरलेले विनोद आणि मार्मिक भाष्य यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. दर दिवशी नव्या जोमाने केलेले भन्नाट विनोदी स्कीट, सद्यस्थितीवर केलेले तिरकस भाष्य आणि परीक्षकांपासून निर्मात्यांपर्यंत सर्वांवर केलेले विनोद हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे खुमासदार सूत्रसंचालन, अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचे परीक्षण या सर्व गोष्टी प्रेक्षकांना भावणाऱ्या आहेत.



Source link

CM Eknath Shinde Satara Dare : स्पिडबोटने मुख्यमंत्री शिंदे दरे गावात दाखल

0



<p>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गाव दौऱ्यावर आहे.. मुख्यमंत्र्यांचा तीन दिवसांचा दौरा असल्याची माहिती आहे.. यावेळी शिंदेंनी विभागाच्या बोटीने प्रवास करत दरे गावात पोहचले.. &nbsp;स्पिडबोटने मुख्यमंत्री त्यांच्या गावात दाखल झाले..&nbsp;</p>



Source link

सातारा : सतुराचा धाक दाखवत केळी विक्रेत्याकडे खंडणीची मागणी | पुढारी

0









कराड, पुढारी वृत्तसेवा : मागील महिन्यात हातगाडा व्यवसायिकांकडून खंडणीची मागणी करत हातगाड्यांचे नुकसान केल्याचे प्रकरण ताज्या असतानाच कराड शहरात पुन्हा एकदा हप्तेखोरीचा प्रकार समोर आला आहे. एका हप्तेखोराने चक्क सतुराचा धाक दाखवत केळी विक्रेत्यांकडे पैशाची मागणी केली. तसेच पैसे देण्यास नकार दिल्याने संबंधिताने केळी विक्रेत्याचे साहित्य विस्कटून टाकत नुकसानही केले. ही घटना गुरुवारी (दि.१०) सायंकाळी घडला.

याबाबत अधिकची माहिती अशी की, झोपडपट्टी परिसरातील एका व्यक्तीची बायपास सर्जरी झाली असून तो व्यक्ती केळी विक्रीचा व्यवसाय करतो. मात्र, मागील काही दिवसांपासून एका संशयित सातत्याने येऊन त्या केळी विक्रेत्याकडे पैशाची मागणी करत होता. आपली परिस्थिती हालाखीची असून आपण हप्ता देऊ शकत नाही. दिवसाला फार तर शंभर रूपये मिळतात आणि यातून पैसे देणे शक्य नाही, असे म्हटल्यानंतर विक्रेत्याने संशयिताला सांगितले होते. त्यावेळी आपण पुन्हा पैशाची मागणी करणार नाही, असे संशयिताने आम्हाला सांगितले होते असे पोलिस ठाण्यात आलेल्या लोकांनी सांगितले.

गुरूवारी सायंकाळी पुन्हा तो संशयित हातात सतुर घेऊनच आला आणि त्याने थेट हप्ता देण्याची मागणी केली. त्याचवेळी त्याने विक्रीसाठी ठेवलेली केळी व अन्य साहित्य विस्कटून टाकले. हा प्रकार पाहताच परिसरातील युवकांसह महिलांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास पकडले. या कालावधीत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी संबंधित संशयिताला ताब्यात घेत रात्री आठच्या सुमारास पोलिस ठाण्यात आणले होते.

हेही वाचलंत का?











Source link

Lok Sabha : अधीर रंजन चौधरी आणि अविश्वास प्रस्ताव, लोकसभेतील दोन मोठ्या घडामोडी काय?

0
Lok Sabha : अधीर रंजन चौधरी आणि अविश्वास प्रस्ताव, लोकसभेतील दोन मोठ्या घडामोडी काय?



Adhir Ranjan Chawdhary Suspension : काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chawdhary) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसेच सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. लोकसभेत आवाजी मतदान करुन सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळला आहे. सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचं 10 ऑगस्ट रोजी, गुरुवारी लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणी विशेषाधिकार समित चौकशी करेल, त्यानंतर समितीचा अहवाल येईल अधीर रंजन चौधरी यांचं संसदेतून निलंबन करण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी म्हटलं की, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी प्रत्येक वेळी देश आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्यावेळी त्यांच्याकडून माफीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी माफी मागितली नाही. त्यांच्याविरोधातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.  



Source link

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात दाखल, हेलिकॉप्टरचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

0


मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर (Satara Sainik School Ground) लँड झालं आणि मुख्यमंत्र्यांनी तेथून पुढचा प्रवास गाडीने केला, अशी माहिती समोर येत आहे.



Source link

Maharashtra : पुणे, नाशिक, रायगड, कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर अजित पवार गटाचा डोळा?

0
Maharashtra : पुणे, नाशिक, रायगड, कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर अजित पवार गटाचा डोळा?



<p>अजित पवार गट सरकारमध्ये आल्यावर आता आणखी एक तिढा निर्माण झाला आहे. आणि तोे म्हणजे पालकमंत्रीपदाचा. अजित पवार गटाकडून पुणे, नाशिक, कोल्हापूरसह रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा करण्यात येतोय.. मात्र १० ऑगस्ट उजाडला तरी अजून यावर निर्णय झालेला नाही. महत्त्वाचं म्हणजे १५ ऑगस्ट तोंडावर आला आहे. या दिवशी पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात झेंडावंदन करतात. मात्र नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यानं आधीचेच पालकमंत्री यंदा झेंडावंदन करतील असं दिसतंय.&nbsp;</p>



Source link

Kolhapur: चिमुकल्यांचं शाळेतलं भांडण घरापर्यंत; पालकांच्या राड्यात एकाचा मृत्यू

0
Kolhapur: चिमुकल्यांचं शाळेतलं भांडण घरापर्यंत; पालकांच्या राड्यात एकाचा मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम सत्तार शेख (वय, २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत आणि मुख्य आरोपी सलमा आलासे यांच्या दोघांचे मुले इचलकरंजीच्या कोले मळा येथील एका शाळेत इयत्ता पहिलीत शिकतात. दरम्यान, दुपारच्या सुट्टीत खेळता खेळता सलमा यांच्या मुलाचे शेख यांच्या मुलाशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. यानंतर मृताने सलमा यांच्या मुलाच्या कानशिलात लगावली, याची माहिती सलमाला मिळाली. यानंतर सलामाने तिचा भाऊ शब्बीर अब्दल गवंडी याला बोलावून घेतले.



Source link

Sambhaji Bhide : संभाजी भिडे गोत्यात; तुषार गांधी यांनी केली पुणे पोलिसांत तक्रार

0
Sambhaji Bhide : संभाजी भिडे गोत्यात; तुषार गांधी यांनी केली पुणे पोलिसांत तक्रार


भिडे यांनी महात्मा गांधी यांची बदनामी केली आहेच, शिवाय माझ्या कुटुंबाचाही अवमान केला आहे. गृहमंत्र्यांनी तपास करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात काही झालेलं नाही. त्यामुळं आम्हाला न्याय मागावा लागत आहे. त्यासाठीचं पहिलं पाऊल आम्ही आज उचललं आहे. पोलीस ही तक्रार गांभीर्यानं घेऊन पोलीस आपलं कर्तव्य बजावेल व संभाजी भिडे आणि त्याच्या संघटनेवर योग्य ती कारवाई करेल, असा विश्वास तुषार गांधी यांनी व्यक्त केला.



Source link